Hey, I am reading on Matrubharti!

यमुनेच्या काठी
वाट पाहते दिठी
कुणीतरी!

वार्‍यावर स्वार
रंगीत पदर
फडफडे

काजळ नयनी
श्यामसखा मनी
भावविभोर


पूर्ण चंद्रबिंब
फुललेला कदंब
डोहापाशी

कृष्णकिनारा
सुरेल तारा
छेडितसे!

-Aaryaa Joshi

Read More

भैरवाच्या साथीने दिस उजाडावा
सारंगाच्या सहवासात सूर्य तळपावा
पूरिया आणि मारव्याने
गुलाल उधळावा
मुलतानीच्या आलापीत
दिस सारा संपावा
असे सजावे जीवन लेऊन
सूरतालांचे नजराणे घ्यावे
हे जगणे गाणे व्हावे

Read More

रेशम फिरीरी फिरीरी


हल्लीच्या काळात यू ट्यूबवर असंख्य चित्रफिती उपलब्ध आहेत, मनात आलं की घरबसल्या त्या पाहून आपण एखाद्या ठिकाणी भ्रमंती स्वतःच करून आल्याचा अनुभव घेऊ शकतो.
लदाख... होय लडाख नाही हं... लदाखच... निसर्गाची कृपा असलेला पण तरीही दुर्लक्षित असा हा प्रदेश. भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्वाचा असलेला, पिरोजासाठीही लक्षवेधी ठरलेला, गोम्पा आणि बौद्ध संस्कृतीशी आपली नाळ जोडणारा लदाख लेखिका सातत्याने काही वर्षे अनुभवते आहे आणि त्यातून साकारलेलं हे पुस्तक.सीमंतीनी नूलकर यांचं २०१९साली प्रकाशित झालेलं हे पुस्तक आणि प्रकाशक आहेत अनुभव अक्षरधन!
म्हटलं तर बसल्या बैठकीत वाचा किंवा निवांत एकेक प्रकरण. लदाख पानोपानी भेटतो आणि खुणावत राहतो.
२०१९ मधे केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित झालेला लदाख आजही आपली धार्मिक आणि सांस्कृतिक पाळंमुळं सांभाळून आहे आणि याचं दर्शन या पुस्तकात घडतं.आध्यात्मिक ज्ञान आणि सृष्टीसौंदर्य असं हातात हात घालून भेटतं ते लदाखमधे.
इसवी सनाच्या चौथ्या शतकात लदाखचं वर्णन केलं गेलं आहे- Land where snow never melts and only corn ripes.
लदाखला भौगोलिकदृष्ट्याही विविध नावांनी ओळखलं जातं.कुणी त्याला हिमभूमी म्हणतं तर कुणाच्या लेखणीत ती चंद्रभूमी! कधी हिमालयातलं वाळवंट तर कधी हिमालयातील पर्जन्यछायेचा प्रदेश!
लेखिकेने लदाखी स्वयंपाकघरापासून सगळीकडे फेरफटका मारला आहे. सलग झालेल्या लदाख भेटींमधे परिचित झालेली माणसं आणि त्यांच्याशी जुळलेले ऋणानुबंधही या पुस्तकात वाचायला मिळतील.
मोहरीच्या फुलांपासून ते गोल्डन फ्लाॅवरपर्यंत विविध फुलं छायाचित्रांसह इथे भेटतील.
लदाखी स्रीचं आयुष्यही लेखिकेने अतिशय खुबीने वर्णन केलं आहे.
लदाखचा भौगोलिक प्रदेश, तेथील पुष्पौषधी आणि त्यांचं महत्व, बहरणारा निसर्ग तर कधी अंगावर काटा आणणारा थरारक रस्त्यांचा प्रवास.लदाखी भोजन, भाषा, भूषा, भक्ती आणि भटकंती असं सगळंच या पुस्तकात जुळून आलं आहे.
बौद्ध लामांचं आयुष्य, गोम्पाचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व, लदाखमधले जागतिक स्तरावर प्रसिद्ध असे उत्सव, स्थानिक लोकांच्या कल्याणासाठी सुरू असलेले सामाजिक उपक्रम हे सर्व वाचताना आपणही त्या सर्व घटनांचा अविभाज्य भाग आहोत असं सतत वाटत राहतं हे या पुस्तकाचं बलस्थान!
गाडीच्या चक्रधरापासून ते ट्रेकिंगमधे ओझेवाहक म्हणून मदत करणार्‍या व्यक्तीपर्यत सर्व स्तरातली लदाखी माणसं इथे भेटतात.लदाखमधले सामाजिक उपक्रम, राजकीय अस्थिरता आणि सैन्याची कामगिरी, लदाखी माणसं आणि या सगळ्या अस्थिरतेतलं त्यांच्या ओठांवर रूळणारं हसू आणि समाधान या सगळ्याबद्भलच लेखिकेने शेवटच्या प्रकरणात नोंदवलेलं आहे. प्राणवायूची कमतरता, अतिथंड हवामान, काही गैरसोयी असं सगळं अनुभवूनही लेखिकेचं लदाखवरचं प्रेम हे सातत्याने वाढतंच राहिलं आहे.ते का? आणि कसं? हे मुळातून वाचण्यासाठी या पुस्तकात रमून जाणं हाच एकमेव उपाय!
रेशम फिरीरी रेशम फिरीरी म्हणजे मन जिथे रेशमासारखं होऊन लहरत राहतं तीही जागा! पायी फिरा, बाईकने जा , सिंधुच्या प्रवाहात बोटीतून प्रवासाचा अनुभव घ्या,जीपच्या थरारक सफरीचा आनंद घ्या... पण एकदातरी लदाचला जाऊन याच! पुस्तकातली उत्तमोत्तम छायाचित्र डोळ्याचं पारणं फेडतात आणि लदाखच्या सादाला प्रतिसाद लवकरच द्यावा असं चक्र मनात आपोआप सुरू झालं नाही तर नवल!
(पुस्तकाच्या शेवटी परिशिष्टात नोंदवलेले नकाशे, पर्टनासाठी महत्वाची असलेली ठिकाणे,महत्वाच्या गोम्पांची केंद्रे,अंतरे,उत्सव या सर्वांची माहिती पर्यटकांसाठी उपयोगी अशीच आहे.)चला तर मग, कधी निघूया???

Read More

मनात माझ्या
आलेला प्रश्न
तुला न सांगताच कळतो...
भावनांच्या वादळात
भरकटलेल्या नावेला
हळवा किनारा सापडतो...
तुझ्या शब्दांनीच
घडते किमया
हुंदका हलका होतो.....
तहानलेल्या धरणीला
पावसाचा शिडकावा
जसा तृप्त करतो..
सई साजणी
मैत्र अंगणी
तू तर चंद्रकोर...
निळ्या आभाळी
भटकून येऊ
गाऊ लागला चकोर....

Read More

पेटली शेकोटी
ऊब मनाला मिळाली
स्नेहाच्या भावनेने
संक्रांती सजली!
उसाचा गोडवा
नात्यांना लाभला
ऊतू गेल्या दुधाने
सूर्यदेव व तोषला!
गायी गुरे सजली
झूल अंगावर ल्याली
काळ्या मातीची लेकरं
कोठारी बैसली!
देते कुणी वाण
सुगडात भरलेले
तिची समृद्धी पाहून
देव गाभारी हर्षले!
कुणी नाच करी
विसरून जन-मन
घ्या आनंद सारे
विसरून आत्मभान!
जळून जावे दुःख
सुख यावे दारी
संक्रमणाचे पर्व
सांगते गोष्ट न्यारी!

Read More

विवेकासह आनंद
आयुष्य व्हावे समर्पित
कालिमातेच्या चरणी हस्त
जोडले गेले....
समाजाच्या हितास्तव
रचियली ईश्वरस्तव
आरात्रिकांचा गुंजारव
मंदिरी घुमला....
बुद्धाची करूणा
जग जिंकायची कल्पना
अंगणातली अल्पना
मंगलमय झाली....
आर्या

-Aaryaa Joshi

Read More

मैं निकल पडू अकेलीसी
तो आ जाना
बिना बताए
और थाम लेना मेरा हाथ अपने हाथोमें
रास्ता अपनेआप खिलने लगेगा!

-Aaryaa Joshi

Read More

सूरज ढल गया है पिछले साल का
कल आयेगा नया सवेरा
बस... साथ रहे हमेशा
हमारा तुम्हारा....

-Aaryaa Joshi

आसान नहीं है
आपके बिना दिन गुजारना
चाहे ठंड हो या धूप
आपकी याद सताती है खुब

-Aaryaa Joshi

कहाँ होगा किसीने...
प्यार मत करना..
दिललगी ना करना...
पर हम तो उससे पहलेही
जिंदगी तबाह कर बैठे.....
आपके लिए.....