माझी लेखणी बस एवढीच माझी इस्टेट

टूटे हुए दिल भी धड़कते है उम्र भर
किसी की याद मै या फिर किसी की फ़रियाद में
किसी की तड़पन में तो किसी के इंतज़ार में
ये उम्र तो गुजरती जाती है
किसी की सपनो पर तो किसी की यादों पर...

Read More

नेहमी हसरा चेहेरा, भरपूर पैसा, ४ लोकात इज्जत पण तो व्यक्ती आतून किती एकटा असतो ते त्याला च माहीत असत. नेहमी हसत का राहतो अस मात्र कधी त्याला कोणी विचारत नाही. एकटेपणा कधी दिसत नाही कोणाला पण जो त्या एकटेपणाच्या दलदलीत अडकलेला असतो फक्त त्याला माहित असत म्हणून तो इतर कोणत्याही व्यक्तीला त्यातून बाहेर येण्यासाठी मदत करतो. पण ज्याला कोणी नसत असा व्यक्ती कधीच त्या दलदलीतरुतून आतून पूर्णपणे तुटलेला असतो. पण ह्या दिखाऊ दुनियेत कधीच इतरांना त्याची ती बाजू दिसत नाही दिसतो फक्त त्यांचा पैसा आणि इतर भौतिक सुख दिसतात पण आंतरिक समाधान त्याची भरपाई कोणत्याच किंमतीत होत नाही की होणार नाही हे तेवढंच खर.

Read More

गाड्यांना महाराजांचे झेंडे लाऊन किंवा टॅटू काढून शिवभक्त असण्याचा धाकला देण्याची गरज नाही फक्त कर्तुत्व अस करा की धाकला देण्या अगोदर लोकांना तुमचं दैवतं महाराज आहे हे समजेल.

Read More

त्या राजाने कधी कोणता रंग मानला नाही की जात ना कधी समोरच्याची औकात ना कधी त्याची परिस्थिती पाहिलं फक्त ते म्हणजे त्याची योग्यता आणि त्याचा इमान स्वतः मध्ये सुद्धा बदल घडवा आणि स्वतःच्या इमानाला जागा जगचं काय आपले राजे सुद्धा खूष होतील. जातंआणि रंग वेगळा असला म्हणजे काय झालं गरज सर्वांना एकमेकांची आहे हे आपल्या राजाने आधीच ओळखलं तस आत्ता सुद्धा गरज आहे सोबत सर्वांना घेऊन पुढे जाण्याची.

Read More

What a word politics is. Everything is included in it, but the salary of the leaders is probably fifty thousand a month That is six lakh a year, then if a leader is an MLA or MP for ten years So how much did they get paid? Then for a leader with such a salary, a car is worth only Rs 10 million and its property price is different. Well it will be on one side he is business man but if indeed there is so much wealth then why the government does not oblige those who have low income and those who have crores to pay more tax. How long will the general public be burdened with this tax? People's money is given to big people through bank loans and those people take the money and run away without paying it back. but still, the government's policy does not change and because of that government needs to close the banks.

Read More

ज्या देशाला कृषिप्रधान देश म्हणून ओळखल जात त्याचं देशात जर त्या अन्नदात्याला स्वतःच्या हक्कासाठी लढा द्यावा लागत आहे ह्या पेक्षा जास्त लाजिरवाणी बाब म्हणजे आणखी काय असेल. त्याने उगवलेल्या धानाला आधीच योग्य मुळभाव भेटत नाही आणि त्यात आत्ता उलट सुलट कायद्यांमुळे आणि नियमांमुळे जे भेटत होत त्यात अजून त्या भाबड्याला अजून तग तग करावी लागणार. ज्याचे उत्पन्न वर्षाचे जेमतेम ५० ते ६० हजार असेल त्याला आपल्या पोरा बाळांना शिकवण्यासाठी वार्षिक २ २ लाख भरावे लागतात. ह्याचा कधी विचार केला जातो का की ५० हजार वार्षिक उत्पन्न असणारा बाप कसा २ लाख उभा करत असेल त्यात सुद्धा जर निसर्गाने कृपा केली तर नाही तर येणारे धान आणि केलेलं काबाड कष्ट यांची तर पार राख रांगोळी होते. बस एवढंच मागणं आहे की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे पण देणाऱ्याचे हातचं काढून घेऊ नयेत.

Read More

नाना पाटेकर यांचं "कैसे बताऊ मै तुम्हे तुम मेरे लिये कोन हो" हे किती अप्रतिम बोल आहेत. पण बोल जरी नानांचे असले तरी ते लेखकाचं कर्तृत्व आहे. म्हणजे शब्दशः व्यक्तीच वर्णन कसं करावं याचं उचित आणि अगदी पद्धशीर उदाहरण आहे. म्हणजे किती ते सुरेख आणि किती ते मनाला भावणारे बोल आहेत. गहण्य विचार, स्वतःचं दुखः आणि त्यात लपलेली लेखकाची त्या व्यक्तीसाठीची भावना आणि प्रेम. एखाद्याच्या निष्ठुर झालेल्या हृदयाला सुद्धा प्रेमाचा पाझर फुटेल असे ते शब्द आहेत. कधी कधी वाटतं तेच जर नानांच्या जागी त्याच लेखकाने ते बोल बोलले असते तर अजून किती अप्रतिम वर्णन झाल असत कारण बोल आणि त्याचे तमाम दुःख, भावना ह्या नदीवरच धरण फुटाव अगदी तस बेफांपणे ते अजून खोलवर ते हृदयात भिनले असते. कारण लेखकाच दुःख आणि त्या व्यक्तीसाठीची आपुलकी, प्रेम ह्यांनी त्याला वेगळीच कलाटणी दिली असती. असो आवाज कोणाचा का असेना निदान अशी सुंदर रचना ऐकण्याच भाग्य लाभलं तेवढं पुरे झाल.

Read More

शेक्सपियर बोलला की नावात काय आहे? पण आजच्या घडीला रंगात काय आहे? अस बोलायची नितांत गरज आहे. बरं रंगच नाही तर एखाद्याच्या शरीरावर खोचकपणे बोलणे जास्तच वाढले आहे. तू जाडा, लुकडा, काळा, पांढरा आणि जाती बद्दल तर ना बोललेल बर. माणूस कसाही असला तरी त्याच शरीर हे तुझ्या सारखच आहे ना हाडामासाच, त्याच रक्त सुध्दा लालाच आहे की तुझ्या रक्ता सारखं. मग कशाला खोचक टीका करतोस? का त्याच्या वर्णावर टीका करतोस? अरे त्याला वाटत का त्याने काळी त्वचा घेऊन जन्माला यावं? ते त्याचा हातात नाही मग तू का टोचून बोलतोस का तर तू गोरा पण कर्म तर तुझे डांबरा पेक्षा जास्त काळे आहेत ते बघ आधी. त्याची जात खालचीवरची आहे मान्य पण जात काढली कोणी अश्मयुगीन काळातील पुराव्यावर तर जातीचा काही उल्लेख नाही मग कुठून आल्या? तुझ्या सारख्या गलिच्छ बुद्धीतून च निर्माण झालेली सर्वात घातक गोष्ट आहे ही. असो पण कोणाच्या जातीवर, शरीरावर किंवा कोणत्याही व्यक्तीवर बोलण्याआधी तो कोणत्याही गोष्टीत स्वतःपेक्षा काकणभर सरस आहे हे लक्ष्यात यायला हवं.

Read More

कित्येकदा खूप काही बोलायचं असत पण ती व्यक्ती जेव्हा समोर येते तेव्हा अगदी वाचा बसते. जसं जन्मतः मुके असल्या प्रमाणे अगदी चिडीचूप होऊन जातो आपण. माहित नाही का होत अस पण तो काय विचार करेल हा विचार आपण करतो आणि गप्प बसतो. भीती असते मनात की त्याला काय वाटेल पण आपल्याला काय वाटतं आहे हे सांगत नाही आणि वेळ निघून जाते. त्यामुळे मनात असत ना ते बोलून टाकायचं अगदी बेधडक कारण काय आहे जर आज हिम्मत करून नाही बोललो तर पुढे आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते आणि तीच वेळ येऊ नये. तो काय विचार करेल हा स्वतः करू नये ते त्या व्यक्तीवर सोडायला हवं. त्याचा निर्णय काही असो पण उद्या मनात ही खदखद नको की आपल बोलायचं राहून गेलं. म्हणुन मन मोकळेपणाने बोलायला सुरुवात करायला हवी कारण उद्याचा दिवस त्या विधात्या शिवाय कोणी बघीतलेला नाही.

Read More

जस श्वासाला गरज असते हवेची ना की ती दिसण्याची.
त्याच प्रमाणे प्रेमात दोघांना गरज असते एकमेकांच्या प्रेमाची.
पण जेव्हा त्या निथळ नात्यात खोट, अहंकार, लपवाछपवी या सारख्यांचा प्रवेश होतो तेव्हा नात्याला कर्करोग झाला अस समजण्यास हरकत नाही. जसं कर्करोग हळू हळू रोग्यास मृत्यूच्या छायेत घेऊन जातो त्याच प्रमाणे नात्याचा सुद्धा शेवटाकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो. कारण समोरचा खोट बोलत आहे, लपवाछपवी करतो आहे, वागण्याबोण्यात झालेला फरक हा त्याला दिसून येतो. पण त्याला आशा असते की चंद्राला लागलेल्या ग्रहणा प्रमाणे समोरच्याला लागलेले हे ग्रहण सुटेल. पण त्याचे वाढते ग्रहण पाहून समोरचा त्या कायम स्वरुपी लागलेल्या ग्रहणाच्या अंधारातून एकटाच बाहेर येतो. पण त्याच्या मनात त्या ग्रहणाची भीती निर्माण होते ती कायम स्वरुपी.

Read More