mi mazzya aavdipramane lihitey.. mala vachyla n lihyyla aavdt...mi matrubharti var mzay katha share krnar ahe..tumhala kashya vattat te mala comment krun nakki kalava..#archu..

पुन्हा एकदा माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली.. सर्वप्रथम या व्हिडिओला पाहिलं ,त्यावेळेस असं वाटलं की हा व्हिडिओ बहुदा खरा नसावा.. कोणीतरी मुद्दामून शूट केलेला असेल??? पण नाही ही सत्य परिस्थिती आहे, हे अनेक बातम्या व न्यूज चॅनेल मध्ये आल्यानंतर समजलं..!!अहमदाबाद मधील साबरमती नदीच्या रिव्हर फ्रंट वा क वेब्रिज वरून या आयेशा आरिफ खान या महिलेने व्हिडिओ बनवून तसेच आपल्या मृत्युचे कारण सांगून आत्महत्या केली... जाता जाता तिने कोणावरही प्रश्नचिन्ह उभे न करता हसत या जगाचा निरोप घेतला ...आपल्या आयुष्यातील टोकाचा निर्णय घेण्यामागची वेदनादायी कारण ही तिने हसत हसत सांगितलं.. पण हसत हसत सांगताना तिचे डोळे मात्र सगळ्यांनाच तिच्या दुःखाचे सत्य सांगून गेले..कुटुंबियाकडून विश्वास घात झाल्याची वेदना तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती..खरंच काय विदारक परिस्थिती आहे...!! आजही हुंड्यासाठी कित्येक जणींना आपला जीव मुठीत घेऊन जगावं लागतं आणि ज्यांना हे सहन झालं नाही त्या या जगाचा निरोप घेतात...✍️✍️💞Archu💞व्हिडिओमध्ये आयशा सांगते की,"माझे नाव आयशा आरिफ खान असून मी जे काही करत आहे तो सर्वस्वी माझा निर्णय आहे त्यासाठी मला कुणीही दबाव टाकलेला नाही..तिच्या नवऱ्याला स्वातंत्र पाहिजे म्हणून असती त्याला कायमचा स्वातंत्र्य देऊन चालली आहे..मी माझ्या देवाला विचारेन कि देवा माझे आई-वडील हे चांगले आहेत माझा मित्रपरिवार देखील तितकाच चांगला आहे पण माझ्याच नशिबात काहीतरी कमी असेल??? मी खूप शांत त्यांनी या जगाचा निरोप घेत आहे.. माझ्यामागे कुणालाही जबाबदार धरू नये.. तसंच कुणीही माझ्यासाठी भांडू नये... मी या वाहणार्‍या हवेसारखे आहे आणि मला तिच्या  सारखेच वाहवत रहायचे आहे...एक गोष्ट मी शिकले एकतर्फी प्रेमातून काही होऊ शकत नाही प्रेम करायचं असेल तर ते दुतर्फा करा नाहीतर त्यातून काही साध्य होत नाही.. काही प्रेम हे अर्धवटच असतात असा निरोप तिने यातून सगळ्यांना दिला.."मी आज खूप खुश आहे कारण मला सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत ज्यांना ज्यांना मला सांगायचं होतं त्यांना मी सांगितला आहे.. माझा सगळ्यांना सांगून झालं आहे म्हणून तिने निरोप घेतला..आयुष्याचं जुलै 2018 मध्ये आरेफ खान सोबत लग्न झालं होतं..तिच्या सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा खूप छळ केला होता.. 2018 मध्ये ती आपल्या आई वडिलांच्या घरी गेली होती पण पुन्हा मध्यस्थी करणाऱ्या काही माणसांनी त्यांचे वैवाहिक जीवन पुन्हा एकदा रुळावर आणली होती.. त्यावेळी तिच्या वडिलांनी मुलीच्या सासरच्या मंडळींना दीड लाख रुपये दिले होते.. पण ये रे माझ्या मागल्या या उक्तीप्रमाणे तिच्या सासरच्या मंडळींनी पुन्हा त्रास दिल्याने ती आपल्या माहेरी परत आली होती.. तिच्या सोबत सासरचे पहिल्यासारखं वागायला लागले होते..आणि या सगळ्यांना कंटाळून च तिने आत्महत्या केली...,आज कित्येक महिलांना तडजोड करून आपल्या संसारात जीवन भर त्रास असतानादेखील त्या तडजोडीचा संसार करतात.. आणि ज्यांची सहन शक्ती संपली त्या या जगाचा निरोप घेतात.. पुन्हा एकदा हुंड्यासाठी, एकीचा बळी घेतला...खरंच, माणसाच्या आयुष्यापेक्षा ही इतर कशाला महत्त्व नाही हे अजूनही लोकांना पटत नाही.. का प्रत्येक वेळेस एका सुखी संसारासाठी संपत्ती आडवी येते..??? का तिच्या सन्मानाला ठेच पोहोचवली जाते..??? का प्रत्येक वेळेस तिचेच बलिदान मागितली जाते??? जरी ती खंबीर असली म्हणून तिचा अमर्याद छळ करून तिला हळवे केले जाते???तिचे अस्तित्व तिच्यापासून हिरावून घेताना माणसातील माणुसकी खरंच संपली आहे..!!! आयुष्याचा निर्णय घेताना टोकाची भूमिका घ्यायला, मन धजावत नसलं तरी हे जनसमाज तिला जगून देत नाही!!!!आज ही व्यथा मांडताना डोळ्यातून प्रचंड संताप बाहेर पडत आहे ..लिहिताना हात थरथरत आहेत.. तरीही कित्येकांना या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही हेही एक वेदनादायक सत्य आहे....✍️✍️💞 Archu💞

Read More

दुःख अडवायला उंबऱ्यासारखा ..
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा...
वाट चुकणार नाही जीवनभर तुझी..
कर तू मित्र एक आरशासारखा...
आत्महत्याच करणार नाही कुणी..जवळ असेल जर मित्र मनासारखा..
त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा ..
बस धडा "मैतरी" वाचण्यासारखा..
मैत्री चाटते ,गाय होऊन मना..
जा बिलग ..तू तिला.. वासरा सारखा..
✍️✍️💞Archu💞
(अनंत राऊत यांची ही गझल खूप आवडली मला... म्हणून मी लिहिली..)

-Archana Rahul Mate Patil

Read More

आडगाव माझं माहेर ..जयपूर माझे सासर..गावात घर..घरासमोर अंगण ..अंगणात मोठे प्रांगण ..प्रांगणात तुळशीचे वृंदावन..वृंदावना समोर रांगोळी..नाव घेते हळदी च्या वेळी..नाव घ्या, नाव घ्या,नावात काय असतं..नावात असतं..लहानांचा मोठेपण,मोठ्यांचा थोरपण,थोरांचा मान,तोच आमचा स्वाभिमान ,भरजरी शालू ,ठसठसशीत चांदण्या..नाव घेते ठोंबरे पाटलांची कन्या..चंद्रकोर नथ,मोत्यांची डोरले ,काचेच्या हिरव्या बांगड्या हातात..चांदीची जोडवे पायात. ..ही आहे सौभाग्याची खून..उखाणा घेते मते पाटलांची सून...आज आहे लग्न .लग्नाचा मंडप..मंडपात पंगत..पंक्तीत अत्रावळ,अत्रावळीवर पत्रावळ,पत्रावळीवर भात ,भातात वरण ,वरणात तूप ..तूपासारखं रूप,रुपयासारखा जोडा,राहुल पाटलांचा नी माझा,अखंड राहो सौभाग्य जोडा..✍️✍️💞 Archu💞आत्ता लग्नसराईत चालू झाली तर उखाण्याची काही औरत गंमत असते नाही का.. उखाणे घ्यायचं म्हटलं की गालावर हसू येतं, नी नाव घ्यायला लाजही वाटते.. पण सगळ्यांच्याच आग्रहाखातर उखाणा हा घ्यावाच लागतो.. तशी आपली परंपराच आहे.. उखाणे लाच आईना असेही म्हणतात... जुन्या म्हाताऱ्या बाया अगदी लांबलचक ओवीबद्ध असा उखाणा घेतात.. आता त्यांच्यासारखा उखाणा घ्यायला कुठे जमतो... म्हणून आता शॉर्टकट पाच ते दहा शब्दांचा उखाणा घेतात.. पण आमच्या इकडे गावी मात्र सगळ्याच बायका अगदी तोंड भरून अप्रतिम असा उखाणा घेतात.. नेहमी नेहमीच कार्यक्रम असल्यामुळे उखाणे ही वेगवेगळे घेतात.. प्रत्येकाची उखाणे घेण्याची पद्धत ही वेगळी जरी असली तरीही ऐकायला खूपच भारी वाटतो... प्रत्येकामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण असाही असतात आसाम प्रसंगाला त्या प्रसंगाला अनुरूप असा उखाणा घेतला जातो.. हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला म्हणा किंवा लग्नविधी च्या वेळेस अनेक वेळा हा उखाणा घ्यावा लागतो.. जेव्हा सर्वप्रथम नवरी ही गृहप्रवेश करत असते त्या वेळी नवरदेवाच्या बहीणी दार उघडून तिला उखाणा घेण्यास सांगतात तेव्हापासूनच ती उखाणा घ्यायला सुरवात करत असते.. लाजेची लाली घेऊन नाव घ्यायला आणि ऐकायला ही खूप छान वाटते बरं का... मला तर नाव ऐकायला आणि मोठमोठ्या उखाणे मध्ये घ्यायलाही आवडतं.. तुम्ही उखाणे घेता का???.मी एक उखाणा तिथे टाकला आहे तो खूप जुना असला तरी मला तेवढाच एक मोठा येतो बाकी छोट्या छोट्या शब्दांमध्ये रचना करता येते.. पण तितका सहज जमत नाही.. हा उखाणा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा..!!तुमचीच ✍️✍️💞Archu💞

-Archana Rahul Mate Patil

Read More

एका बाळाला आपल्या आईची मांडी म्हणजेच त्याच्या हक्काची राजगादी असते ...या गादीवर बसलेल्या असताना ते सुख आणि ते प्रेम अनुभवलं,की कोणत्याच सिंहासनाची देखील बरोबरी होत नाही... खरंच आईची मांडी प्रत्येक बाळासाठी राज सिंहासन असते... नाही का!!!!!!✍️✍️💞Archu💞

-Archana Rahul Mate Patil

Read More

26 जानेवारीला की ..प्रजासत्ताक दिनालाकी शोभा आली..या मंडळाला ....फडकला झेंडा ..,झेंडा हा तिरंगा ...गांधी-नेहरू अगरकर ...कीभारतरत्न आंबेडकर ...फडकला झेंडा झेंडा हा तिरंगा ...केशरी रक्ताची खूण..पांढरे त्याचे बंधन ...हिरवा देई समाधान ...फडकला झेंडा झेंडा हा तिरंगा..✍️✍️💞 Archu💞

-Archana Rahul Mate Patil

Read More

चुकलंच जर माझं काही तर ते मला सांगा ,दुसऱ्यांजवळ नाही....!!!
कारण सुधारायचं मला आहे, दुसऱ्यांना नाही ......!!!
नाही का...!!!!!!!!!!!!✍️✍️💞Archu💞

-Archana Rahul Mate Patil

Read More

मार्गशीर्ष महिन्यातील येणारी मोक्षदा एकादशी आणि त्याच दिवशी येणारी गीताजयंती म्हणजेच एक महान पर्व... या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली होती म्हणजेच भगवंताच्या स्व मुखातून श्रीमद भगवत गीतेचा जन्म झाला आहे.. श्रीमद भगवत गीता हे संपूर्ण ग्रंथाचं सार मानले जाते... भगवद्गीता असा एकमेव महाग्रंथ आहे की ज्याची जयंती साजरी केली जाते...👣

भगवंतांनी त्यांच्या प्रिय शिष्याला म्हणजेच अर्जुनाला युद्धाच्यावेळी केलेला उपदेश म्हणजेच गीता होय.. ज्यावेळी महाभारताचे महायुद्ध चालू होते दोन्ही बाजूने महासेना युद्ध करण्यासाठी सज्ज होत्या त्यावेळी अर्जुनाचा सारथी म्हणून आलेले श्रीकृष्ण भगवान त्यांनी अर्जुनाचे मार्गदर्शन करण्यासाठीच त्याला युद्धभूमी च्या मधोमध आणले... आपल्याच सखिया विरुद्ध कसे लढावे आणि हा धर्म आपण का करावा असे म्हणून हातपाय गाळून बसलेल्या अर्जुनाला प्रेरणेचे व स्नेहाचे अगदी मोलाचे असे मार्गदर्शन भगवंतांनी दिले.. संसार रुपी अर्जुनाला साक्षात परब्रम्ह परमेश्वर ईश्वरानेच या संसारातून मुक्तता कशी मिळेल यासाठीच हे परम ज्ञान दिले...कधीकधी प्रवाहाविरुद्ध जाऊनही सत्याची कास धरणाऱ्या अपयश हे मिळते पण त्यासाठी सामोरे जाण्यासाठी खचून न जाता आपण प्रयत्नाची पराकाष्टा करून आपले ध्येय साध्य केले पाहिजे... भगवद्गीते मधून अनेक उपदेश आपल्याला मिळतात... गीतेमधील प्रत्येक श्लोकाचा नवनवीन अर्थ असतो... प्रत्येक शब्द अन शब्द भगवंताच्या मुखातून निघाल्यामुळे पवित्र आहे प्रत्येकाचा विशेष असा अर्थ आहे...👣

श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व वर्णन करणेवास्तविकपणे कोणालाच शक्य नाही हा खूप रहस्यमय असा ग्रंथ आहे खरंतरआतापर्यंत अनेक जणांनी त्यांच्या त्यांच्या बुद्धी नुसार प्रत्येक श्लोकांचे वेगवेगळे अर्थ मांडलेले आहेत.. शास्त्रज्ञही त्यावर प्रत्येक पैलूंनी विचार करतात.. असा कोणताच प्रश्न नाही की जो भगवत् गीतेतून सुटणार नाही.. भगवद्गीतेमध्ये आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नाचे उत्तरा आहे.,.. या ग्रंथाचा सतत अभ्यास करूनही त्याचा थांगपत्ता लागत नाही आता असा महासागर असलेले हे गीता रुपी ज्ञान भगवंतांनी आपल्यासाठी अगदी सहजतेने आपणास सांगितले आहे...👣

आपणही हा अद्वितीय असा ग्रंथ वाचून त्याचा लाभ घ्या.. गीताजयंती आजच असल्यामुळे तिचे महत्त्व शतपटीने वाढते असे समजून तरी आजच्या दिवस गीतेचे पारायण जरूर करा... भगवान श्रीकृष्णाची पूजा करून तसेच मोक्षदा एकादशी चा उपवास करून संपूर्ण दिवसभर आपल्या आराध्य देवतेची पूजा करावी...👣

गीता पाठ पढाने वाले..
गीता पाठ कराने वाले..
गीतारहस्य बताने वाले..
तुमको लाखो प्रणाम...💞

हम तो मूर्ख है ..
तुमको नही भजते..
गीता का पाठ ..
याद नही करते ..
जो पढते है उनको..
हमारा कोटी कोटी प्रणाम..💞

गीता जयंती चा उपक्रम प्रत्येकाने ज्याच्य त्याच्या परीने नक्की करावा,... माझ्या माहेरी आडगाव ला दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मित्रा जयंतीचा मोठा कार्यक्रम होणार आहे.. तिथे सर्व भाविक वृंद आणि गीतापठण केलेल्या बंधू-भगिनी एकत्रित होऊन संपूर्ण श्रीमद्भागवत गीता या ग्रंथाचे वाचन करतात भगवंताचे आवाहन करून त्यांची मनोभावे पूजा भजन कीर्तन करून त्याची येतो सांग गता करतात.. मीही नेहमीच गीतेचे पारायण करत असते तुम्ही देखील गीता पारायण करून भगवंताच्या ध्यानात लिन होऊन या आनंदाची अनुभूती घेऊ शकता...

तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला वाचून कमेंट करून नक्की कळवा तुमच्या-आमच्या मधील ✍️✍️💕Archu💕

-Archana Rahul Mate Patil

Read More

जिथे आपल्याच माणसासमोर आपल्याला आपल्या चुकांची स्पष्टीकरण देऊनही त्यांना पटत नाही, तेव्हा आपण (आपली चूक नसताना ही )वाईटच ठरलेलं चांगलं... नाही का...!!!!

✍️✍️💞Archu💞

-Archana Rahul Mate Patil

Read More

आज दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात वसुबारस पूजनाने होत असते ..खरंतर, दिवाळी पाच दिवसांची मानली जाते ..त्यातीलच पहिला दिवस म्हणजेच गोवत्स पूजनाचा... ज्याप्रमाणे आपल्या बाळावर आपले प्रेम असते, जसे की गायीचे वासरा वर असते, तसेच प्रेम आपल्या सगळ्यांना  मिळावे म्हणून पूर्वापार पासून चालत आलेल्या या परंपरेचा पाया म्हणजेच गोरक्षण, गोपूजन आणि वातसल्याचे दर्शन होय...
गाय आणी वास राचे हे मंगल माय नाते वात्स ल्य आणि उदारता शिकवते..
...ह्या दिवशी गाई व वासराची पूजा केली जाते... गाई प्रमाणेच वात्सल्य, उदारता आपल्या अंगी यावी ...तसेच वासरा प्रमाणे कोमल, शीतलता आणि चंचलता आपल्या हृदयास स्पर्श करून आपल्या जीवनात त्याचा उपयोग व्हावा... वत्सा प्रमाणेच आपलेही प्रेम अतूट राहावे, म्हणूनच खरंतर या भारतीय संस्कृतीतल्या रूढी प्रथा परंपरा....

आज पासुनच दीपावलीच्या दिव्यांची सुरुवात होते ..ते वसुबारस,नरक चतुर्दशी, धनत्रयोदशी ,लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज.. या पाचही दिवसात दिवाळीची आरास केली जाते...
उद्या धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस.. यादिवशी आपल्या प्राण्यांच्या स्वामीला म्हणजेच यम दूतांना किंबहुना साक्षात यमाची पूजा केली जाते... सकाळीच सुर्याऊदय होण्याअगोदर स्नान करून ती हळदी-कुंकू इत्यादीने अभ्यंग स्नान करून यमदीप दान केले जाते..
कणकेचा दिवा लावून त्यामध्ये तिळाचे तेल टाकून तो दिवा दक्षिणेकडे तोंड करून यमाची सकाळीच प्रार्थना केली जाते.. अपघाती मृत्यू ,अकस्मात ओढवले जाणारी मृत्यू इत्यादींपासून बचाव होण्यासाठी यमदेवांची प्रार्थना केली जाते ... ओम एमायनमः
ओम यमदीपदानाय नमः असे म्हणून पूजा करावी...

तसेच या दिवशी सायंकाळी च्या वेळेला कणकेचे 14 दिवे करून त्यामध्ये तिळाचे तेल टाकून ते आपल्या घराभोवती, अंगणात ,परिसरात ,अडगळीच्या ठिकाणी तसेच मंदिरात व इतरही ठिकाणी ती लावले जाते..
या 14 दिव्या पैकी तेरा दिवे लावले जातात व एक मोठा कणकेचा दिवा त्यामध्ये तीलायाचे तेल टाकून होत्या... खाली शिजवलेल्या तांदळाची रास घालून त्यावर हा दिवा ठेवला जातो.. या दिव्यामध्ये तीलाचे तेल रात्रभर टिकेल इतपत असावे  .हा दिवा रात्रीतून विझता कामा नये .....आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर उजव्या हातात च्या बाजूला या दिव्याची मांडणी किंवा स्थापना केली जाते...

असे म्हणतात की यमदेवतिची पूजा केल्याने आपल्याला कोणत्याही  कठीण प्रसंग करण्यास सामोरे जाण्याची प्रसंग ओढवत नाही.. यम देवतेला यामदिप दान केल्याने आपल्या कुळाचा उद्धार होतो.. तसेच आपला वअंश,वंश अंश प्रगल्भ प्रयोग होत असतो ..आपल्या पती पिता-पुत्र आणि बंधू यांना उदंड आयुष्य मिळते . असे हे यमदीपदान यामध्ये वतेला नक्कीच त्याचे फळ आपल्याला मिळेल यात शंकाच नाही तर मग तुम्हीही नक्कीच प्रयत्न करा तुमच्या आमच्या मधील archu 💕

Disclaimer:    The opinions expressed in this

Read More

आयुष्य हे एक सुंदर पुस्तक आहे..
प्रत्येक वेळी, प्रत्येक दिवशी नवीन पान उलगडत असते..
प्रत्येक महिन्याला एक नवीनच धडा मिळतो...
आणि पुढच्या वर्षी पुन्हा नव्याने नवीन कोरी करकरीत पुस्तके आपल्याला मिळतं..
जीवनातील मागच्या धड्यांच्या अनुभवावरून आपणही नवीन धडे गिरवत असतो..
नाही का!!!
✍️✍️💞Archu💞

-Archana Rahul Mate Patil

Read More