Hey, I am reading on Matrubharti!

आसोनी हात पाय
जाहलो म्या पांगळा
गावच्या वेशीचे कवाडे
लावूनी गाव झाला आंधळा

आज व्हावी रे विठ्ठला
तुझीच एक गळा भेट
लोटांगण घालाया रे
पायी तुझ्या आज थेट

दिंडीची वाट ओस पडली तरी
सुटत नाही बघ तुझा लळा
गळ्यांत तुळशीची माळ नाम तुझे ओठावरी
एकादशी कोरड पडली तुझ्या नामाची ह्या गळा
...अविनाश लष्करे
( ARL )

Read More

A

आपल्या आयुष्यातील काही दुःखाचे क्षण,
उरलेल्या जीवनाला नेहमी कुरतडत बसतात,
त्या वेदना शमविण्यासाठी नेहमी हसण्याचा,
मलम दिवसातून एकदा तरी लावावा...ARL

Read More

चमकदार बूट घालणारा आत्मनिर्भर असेलच असे नाही. परंतु ,
बूट चमकवणार आत्मनिर्भर असतोच...ARL