Gold Film review Marathi books and stories free download online pdf in Marathi

गोल्ड - गोल्ड न काळ दर्शवणारा चित्रपट...

'गोल्ड'- 'गोल्ड'न काळ दर्शवणारा चित्रपट...

खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचे सगळेच चित्रपट वेगळ्या धाटणीचे असतात. "हॉलिडे", "टॉयलेट", "पॅडमॅन"... अक्षय कुमारचे गाजलेले चित्रपट!! सगळेच वेगळ्या विषयाचे.. आता अक्षय कुमारची 'खिलाडी कुमार' ही ओळख सगळ्यांनाच माहिती आहे पण ही ओळख पुसली जात आहे. अॅक्शन बरोबर वेगवेगळे विषय हाताळण्याच कौशल्य अक्षय कुमारकडे आहे. आजकाल खऱ्याची दुनियाच राहिलेली नाही असं अनेकदा म्हटलं जातं. पण बॉलिवूडमध्ये बघाल तर 'खऱ्या'चाच जमाना आहे. 'गोल्ड' देखील एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर ''गोल्ड'' चित्रपट पाहून पुन्हा एकदा देशप्रेम उफाळून निघेल ह्यात शंका नाही. ७० वर्षांपूर्वी १२ ऑगस्ट रोजी भारतीय हॉकी टीमने पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं. त्याचाच जल्लोष करणारा 'गोल्ड' हा चित्रपट आहे. हॉकी कोचच्या रूपातील अक्षय कुमार आणि त्याच्या टीमची मैदानावरची कामगिरी पाहण्यास प्रत्येकजण आतूर आहे.

ह्या चित्रपटात मौनी रॉयच चित्रपटामध्ये पदार्पण होत आहे. मौनी रॉय 'नागीण' मालिकेमुळे प्रकाशझोतात आली होती. नागीण मालिकेचे २ भाग केल्यामुळे मौनी रॉयची नागीणची नटी अशीच ओळख तयार झाली आहे. नागीण मालिकेमुळे मौनी रॉयला खूपच प्रसिद्धी मिळाली खरी पण तिला तिच्या नागीण रोल मधून बाहेर पडून चित्रपटात पाहायला ऑस्तुक्याच ठरणार आहे. मौनी रॉय आणि अक्षय कुमार यांच्याबरोबर इतर कलाकारांचा अभिनय सुद्धा उत्तम आहे. चित्रपटातली गाणी वेगळ्याच जमान्यात आपल्याला नेऊन ठेवतात. अभिनेता अक्षय कुमार, टेलिव्हिजन स्टार मौनी रॉय आणि इतर सहकलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘'गोल्ड'’ या चित्रपटातील ‘मोनोबिना’, असे बोल असणारं हे गाणं यासिर देसाई, शाशा तिरूपती, मोनाली ठाकूर आणि फरहाद भिवंडीवाला या युवा गायकांनी गायलं आहे. पाश्चिमात्य संगीत आणि उडती चाल, ही या गाण्याची वैशिष्ट्य ठरत असून, त्यात कलाकारांचा अभिनयही प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. एकूणच हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर कमाल करेल अशी चिन्ह आहेत. रिमा कागती दिग्दर्शित ‘'गोल्ड'’ हा चित्रपट हॉकी या खेळावर आणि देशाला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी व्यक्तीच्या प्रवासावर भाष्य करणार आहे. अक्षय कुमार आणि मौनी रॉय यांच्याव्यतिरिक्त कुणाल कपूर, विनीत कुमार सिंग, अमित सध आणि सनी कौशलही या चित्रपटातून महत्त्वाच्या भुमिकांमध्ये दिसणार आहेत. १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारचा अभिनय आणि मौनी रॉयच दिसण आणि अभिनय पाहण औत्सुक्याच ठरणार आहे. आणि ह्यावेळेचा स्वातंत्रदिन चित्रपटप्रेमींसाठी काही खास असेल असा अंदाज आहे.

''गोल्ड'' ह चित्रपटाच्या नावावरूनच चित्रपट भारताला मिळालेल्या सुवर्णपदकाची गोष्ट असेल ह्याचा अंदाज बांधता येतो. आणि ह्या चित्रपटातून भारतवासीयांना देशासाठी काही करण्याची प्रेरणा नक्की मिळेल. देशाच्या इतिहासातील एका महत्त्वपूर्ण प्रसंगावर हा चित्रपट भाष्य करतो. हॉकी या खेळात स्वतंत्र भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणं हेच स्वप्न तपन दासचं असतं आणि या स्वप्नासाठी तो कशाप्रकारे एक- एक खेळाडूला एकत्र आणतो ही ह्या चित्रपटाची थोडक्यात कथा. ‘'गोल्ड'’ चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच चर्चेचा विषय ठरला आहे. म्हणजे बॉक्स ऑफिस वर काय कमाल करतो हे पाहण्यात खरी मजा आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने तर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘'गोल्ड'’ हा चित्रपट हिंदुस्थानी हॉकीपटू तपन दास यांच्या जीवनावर आधारित आहे. भारताला स्वातंत्र मिळाल्यावर मिळालेल्या पहिल्या सुवर्ण पदकाची ही कथा!! तपन दास यांनी हिंदुस्थानला १९४८ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिक येथे हॉकी या खेळासाठी पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. अक्षय कुमार या चित्रपटात तपन दास यांची भूमिका साकारणार आहे, हे वेगळ सांगायची गरज नाही.

ह्या चित्रपटातील काही महत्वाच्या गोष्टी-

1. हा चित्रपट हॉकीविषयी माहिती देतो. फक्त एका भूमिकेविषयी सांगत नाही. हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे आणि त्याबद्दल माहिती ह्या चित्रपटातून सांगितली आहे. हॉकीचा सुवर्णकाळ ह्या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

2. छोट्या पडद्यावरची मौनी रॉयच मोठ्या पडद्यावर पदार्पण!! तिला पाहण ह्या चित्रपटात उत्सुकाचा विषय आहे. बरेच टिव्ही कलाकार मोठ्या पडद्यावर पदार्पण करतात पण सगळेच यशस्वी होतात अश्यातला भाग नाही. मौनी रॉयचे मोठ्या पडद्यावरचे पदार्पण हा चर्चेचा विषय आहे.

३. भारताने ऑलंपिकमध्ये आतापर्यंत तीन 'गोल्ड' मेडल(1928, 1932, 1936) जिंकले आहेत. परंतू त्यावेळी आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. यामुळे आपल्याला ब्रिटिश इंडिया म्हटले जात होते. यामुळे हे ब्रिटेनसाठी खेळल्याप्रमाणे होते. यामध्ये एक दारुचे व्यसन असणारा व्यक्ती आहे. त्याला हॉकी आणि देशावर प्रेम आहे. त्याला स्वतंत्र भारतासाठी 1948 मध्ये होणा-या ओलंपिक 'गोल्ड' मेडल जिंकायचा आहे. परंतू रस्त्यांत अनेक अडचणी आहेत. ह्याच अडचणींचा सामना कसा केला जातो हे ह्या चित्रपटात दाखवण्यात आल आहे.

3. भारतातल्या प्रत्येकालाच हॉकी ह्या खेळाबद्दल प्रेरणा देणार हा चित्रपट आहे. हॉकी बद्दल प्रेम वाढवणारा हा चित्रपट आहे अस म्हणल तर ते वावग ठरणार नाही.

4. हा चित्रपट पाह्ण्याच महत्वाच कारण म्हणजे अक्षय कुमार!! प्रत्येकवेळी नवीन विषय घेऊन येणारा अक्षय कुमार ह्यावेळी काय जादू करतो हे पाहायला 'गोल्ड' हा चित्रपट पहिलाच पाहिजे..

चित्रपटाविषयी थोडस-

स्वत:ला भारतीय म्हणवून घेण्यासाठी आपण काय केले पाहिजे? एकसंघ भारत म्हणजे काय? भारतीय असण्याची एक भावना आपल्याला जोडून ठेवू शकते की नाही? या प्रश्नांवर हा सिनेमा भाष्य करतो. क्लायमॅक्सपर्यंत तपन दासच्या हॉकी टीमचा प्रत्येक स्पर्धक देशासाठी नाही तर स्वत:साठी खेळत असतो. पण शेवटी हा संघ भारतीय असल्याच्या भावनेने एकसंघ होतो आणि इतिहास घडवतो. आपल्या देशाच प्रेम सगळ्यांनाच असत आणि तेच जिवंत ठेवण गरजेच असत. भारत एकसंघ देश आहे. भारतात विविश जाती, प्रदेश, भाषा आहेत पण त्यांना एकत्र बांधून ठेवणारा दुवा म्हणजे भारत देशासाठी असलेल आपल्या सगळ्याचं देशावरच प्रेम, वेगवेगळ्या प्रदेशाचा, भाषेचा, जातीधर्माचा, संस्कृतीचा दाखला देऊल लोक एकमेकांविरोधात लढतात आणि त्यामुळे देशाचे कसे नुकसान होते, हा मुख्य संदेश हा चित्रपट देतो. पण हा संदेश देण्याच्या नादात ‘'गोल्ड'’ पडद्यावर फार प्रभाव पाडू शकत नाही. तरी चित्रपटातून सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न नक्की झाला आहे.

कित्येक लोकांना स्वातंत्रपूर्व काळातल्या हॉकी विषयी आणि स्वातंत्र मिळाल्यानंतर मिलेलेल 'गोल्ड' विषयी माहिती नसेल. त्याच आठवणीना उजाळा देणारा हा चित्रपट आहे. आपल्या देशाचा झेंडा ऑलिम्पिक मध्ये झळकतांना पाहण गौरवाच आहे आणि तोच आनंद ह्या चित्रपटात जिवंत करण्याचा प्रयत्न झाला आहे. चख दे इंडिया सुद्धा हॉकीवरच आधारित चित्रपट होता आणि 'गोल्ड' हा चित्रपट सुद्धा सुद्धा देशप्रेमाने भरून टाकेल ह्यात काही शंका नाही. स्वतंत्र भारताची पहिली हॉकी टीम तयार करण्याच्या जिद्दीने पछाडलेला तपन दास स्वत:हून हॉकी फेडरेशनला भेटतो. हॉकी फेडरेशनचे प्रमुख त्याच्यावर विश्वास दाखवतात आणि तपन दास कामाला लागतो. स्वतंत्र भारताची हॉकी टीम बनवण्यासाठी तो अख्खा भारत पिंजून काढत एकापेक्षा एक सरस खेळाडू निवडतो. पण हे खेळाडू निवडताना भारत-पाक फाळणीच्या घडामोडींकडे त्याचे दुर्लक्ष होते. तपन दासची हॉकी टीम तयार होते. भारतही स्वतंत्र होतो. पण फाळणीने सगळे संदर्भ बदलतात. तपनच्या टीममधील अनेक मुस्लिम खेळाडू टीम सोडून पाकिस्तानात निघून जातात. ही पोकळी भरून काढण्याची आणि वर्षभरावर येऊन ठेपलेल्या आॅलिम्पिकसाठी टीमला सज्ज करण्याचे दुहेरी आव्हान तपन दासपुढे येते. शिवाय भारतीय हॉकी टीमचा सिनीअर मॅनेजर मेहता हा तपन दासच्या मार्गात अनंत अडचणी उभ्या करतो. या अनंत अडचणींवर चरणदास कसा मात करतो आणि स्वतंत्र भारतात हॉकीच पहिले सुर्वणपदक कसे मिळवून देतो, ही या चित्रपटाची कथा आहे.

थोड्या नकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा ह्या चित्रपट पाहिल्यावर वाटू शकतात पण ज्या चित्रपटातून देशप्रेम उफाळून बाहेर येईल तो चित्रपट नक्कीच बघावा. देशासाठी पहिले सुवर्ण पदक मिळवण्याच्या इर्षेने पेटलेले खेळाडू आणि हॉकीसारखा खेळ असा सगळा मसाला असल्याने आपल्याला ‘लगान’ किंवा ‘चक दे’च्या तोडीचा स्पोर्ट ड्रामा बघायला मिळणार, हा अंदाज बांधूनचं कुठलाही प्रेक्षक चित्रपटगृहाची पायरी चढेल. पण काहींना ह्या अपेक्षा पूर्ण झाल्यासारख्या वाटत नाहीत. पहिल्या १० मिनिटांतच ‘'गोल्ड'’ प्रेक्षकांचा हा अंदाज खोटा ठरवतो. ‘'गोल्ड'’ हा ‘लगान’ इतकाच भव्यदिव्य असला तरी त्याला ‘चक दे’ची सर नाही अशीच काही प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहायला मिळते आहे. पण अर्थात ही झाली काहींची मतं... शेवटी प्रेक्षक आपण असतो आणि चित्रपट बघावा का नाही हा निर्णय सुद्धा सर्वस्वी आपलाच असतो.

'गोल्ड' हा चित्रपट म्हणजे फक्त हॉकी नाही तर विसरला गेलेला 'गोल्ड'न काळ ह्या चित्रपटात दर्शवण्यात आला आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ असलेला हॉकी हा खेळ देशासाठी नेहमीच ऐक्याच प्रतिक राहील आणि ही भावना जागृत करण्यासाठी 'गोल्ड' हा चित्रपट नक्कीच पाहावा.. जेव्हा देशप्रेमाचा विषय येतो तेव्हा थोड्याश्या त्रुटींकडे सहज दुलक्ष करता येऊ शकेल. स्वातंत्र दिनाच्या दिवशी आलेला हा चित्रपट पाहावा असा नक्कीच आहे. शेवटी काय, प्रत्येक प्रत्येक भारतीयांच्या मनात देश प्रेम सतत मनात जिवंत ठेवण ही महत्वाची गोष्ट आहे.. शेवटी देश महत्वाचा...जात, धर्म हे नगण्य असत ह्याचा अनुभव घेण्यासाठी आणि देशप्रेमात डुबकी मारून देशप्रेम जिवंत ठेवण्यासाठी 'गोल्ड' हा चित्रपट!!

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------अनुजा कुलकर्णी.