9.12 Jyotiling - 2 books and stories free download online pdf in Marathi

९. १२ ज्योतिर्लिंग- भाग २

९. १२ ज्योतिर्लिंग- भाग २

७. श्री रामेश्वर-

रामेश्वर दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळे याला रामेश्वर असे नाव पडले. स्कन्द्पुरण व शिवपुराणात या पवित्र क्षेत्राचा उल्लेख सुद्धा आलेला आहे. रामेश्वर द्वीपाचा आकार काहीसा श्रीविष्णूच्या शंखासारखा असून श्रीलंकेच्या राजाने याठिकाणी मंदिर बांधले होते. रामेश्वर मंदिराची निर्मिती १२ ते १६व्या शतकात झाली. हे मंदिर अतिशय सुंदर आहे. इथली कलाकुसर पाहून मन प्रसन्न होते. बंगालचा उपसागर व हिंदी महासागर यांचे संगम स्थान असून द्रविड स्थापत्य शैलीचे हे मंदिर मानले जात असून येथील मंडपाची निर्मिती इ स १७४० ते १७७० या कालावधीत झाली.

या मंदिर परिसरात २२ विहिरी असून गर्भगृहात चांदीच्या चौथऱ्यावर सुंदर शिवलिंग आहे. विशेष म्हणजे या शिवलिंगावर केवळ गंगाजलाचाच अभिषेक केला जातो. महाशिवरात्रीस येथे मुख्य उत्सव होतो. दीपोत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी तमिळ भाविक मोठ्याप्रमाणावर यात्रेसाठी येत असतात. सदर यात्रा १५ दिवस चालते. आणि शिवभक्तांसाठी ही एक पर्वणीच असते. हे पवित्र ज्योतिर्लिंग तामिळनाडू राज्यात असून मदुराई-रामेश्वर अशी बस सेवा उपलब्ध आहे.

८. श्री औढ्या नागनाथ-

हे पवित्र ठिकाण महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात आहे. पाण्डवातील धर्मराजाने हे मंदिर बांधले महाराष्ट्रातील संत नामदेव व त्यांचे गुरु विसोबा खेचर यांची प्रथम भेट या मंदिराला दिली. यांनतर मात्र अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. या मंदिरात २५ फुट उंचीची तटबंदी असून चार दिशास चार दरवाजे आहेत. मंदिराचा खलाचा भाग काळ्या पाषाणात व वरील अर्धा भाग विटांवरील पांढऱ्या रंगात असल्याने मंदिर खुलून दिसते. महाद्वारावर शिवलीला प्रसंग आहेत. यात नटराज मूर्ती, शंकर पार्वतीस काही तरी समजावून सांगत असल्यासारखे वाटते आणि हे विलाभोनीय दृश बघावयास मिळते.


महाशिवरात्रीस येथे मोठा उत्सव असतो. रथौत्सव इथल्या उत्सवाच आकर्षण आहे.. रथाच्या ५ फेऱ्या मंदिराभावती केल्या जातात. असे म्हटले जाते की, काशीची गंगा येथे प्रकट होते व कुंडाचे पाणी स्वच्छ करते. विजयादशमीच्या दिवशी नागनाथ महाराजांची पालखी इथून निघते. इथे जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत.

९ काशी विश्वेश्वर-

काशी विश्वेश्वर हे पवित्र ठिकाण उत्तरप्रदेश राज्यात वसलेले आहे. गंगा नदीच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेले वाराणसी जगातील प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. ही नगरी भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही विख्यात आहे. याच नगरीत काशी विश्वनाथाचे वास्तव्य आहे. काशी सर्वात प्राचीन स्थान आहे. काशी विश्वनाथ साप्तपुरांपैकी १ आणि ५१ शक्तीपीठांपैकी १ आहे. काशीवर मुस्लीम आक्रमणे अनेकदा झाली. इ.स १०३३ मध्ये गजनीच्या महमदने काशी लुटली होती. तुळशीदासनी रामचरित्र मानस ग्रंथरचना काशीत केली. संत एकनाथांनी एकनाथी भागवत व रुख्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे लेखन या पवित्र ठिकाणी केले. म्हणूनंच काशीचे महत्व वेगळेच आहे.

नारद पुराण -
गंगा नदीच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेले वाराणसी जगातील प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. ही नगरी भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही विख्यात आहे. याच नगरीत काशी विश्वनाथाचे वास्तव्य आहे. हे मंदिर शंकराच्या प्रमुख ज्योतिर्लिंगामधील एक मानले जाते. लोक येथे केवळ दर्शनासाठीच येतात, असे नाही तर आयुष्यात मोक्ष प्राप्ती व्हावी ती इथेच असे त्यांना वाटते. परदेशातूनही लोक येथे येतात आणि गंगेच्या घाटाच्या सानिध्यात वसलेल्या मठ-मंदिरात जाऊन मनाला शांती देऊ शकणार्‍या साधूंच्या चरणी नतमस्तक होतात.

वाराणसी अर्थात काशीचे महत्त्व फार मोठे आहे. पृथ्वीची निर्मिर्ती झाली तेव्हा प्रकाशाची पहिली किरणे काशीच्या भूमीवरच पडली असे मानले जाते. तेव्हापासूनच काशी ज्ञान, अध्यात्माचे केंद्र झाले. काशीची निर्मिती झाल्यानंतर काही कालांतराने शंकराने येथे काही काळ वास्तव्य केले होते. ब्रह्माने दहा घोड्यांचा रथ (दशाश्वमेघ) घाटावर पाठवून त्यांचे स्वागत केले होते.

मूळ मंदिराचे क्षेत्रफळ ५०० चौरस फुट इतके आहे. १०-१० फुट क्षेत्रफळाचे दोन गर्भगृह व दोन सभामंडप व याच ठिकाणी मोठ मोठे वाडे, घरे असल्यामुळे मंदिर परिसर संपूर्णत: झाकला गेला आहे.
महाशिवरात्री व त्रिपुरी पौर्णिमेस उत्सव होतात. इथे पोचण्यासाठी हवाई मार्ग, रेल्वे मार्ग आणि रस्ता मार्ग सुद्धा उपलब्ध आहे.

१०. श्री त्रंबकेश्वर-

महाराष्ट्रा मध्ये हे स्थान आहे, हे स्थान प्राचीन आहे. सुमारे २०० वर्षांपूर्वी, यास "श्रीपूर" ब्रह्मगिरीस श्रीगड म्हणले जाई. सातवाहन काळात ठाकूर जातींपैकी शीद राजघराण्याच्या ऐतिहासिक ताम्रपटत हा उल्लेख आढळतो. या ठिकाणी यादवांचे राज्य इ स १२७१ ते इ स १३०८ पर्यंत याठिकाणी होते. इ स १८१८ मध्ये ब्रिटीशांचा अंमल या ठिकाणी सुरु झाला. नाशिकहून बीस मैलांवर पश्चिमेस गौतम ऋषिच्या विनंतीवरून गंगा येथें आली व शंकर लिंगरूपानें आले.

शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगामध्ये त्र्यंबकेश्वर चा समावेश आहे. दक्षिणेची काशी मानले जाणाऱ्या नाशिक पासून हे ज्योतिर्लिंग ३५ किली मीटर वर आहे. ज्योतिर्लिग स्तोत्रातही त्र्यंबकम गौतमी तटे असे म्हणून त्र्यंबकेश्वराचा उल्लेख केला आहे.त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते. याच पर्वतावर पवित्र गोदावरी नदी उगम पावते.


मंदिराच्या चार बाजूस दगडी तटबंदी व चार दरवाजे आहे. हे मंदिर ५ दलांचे आहे. . या मंदिराची इमारत सिंधू-आर्य शैलीचा उत्तम नमूना आहे. मंदिराच्या सभोवताली दगडी भिंतींचा मजबूत कोट आहे. या कोटाच्या आत हे मंदिर वसले आहे. वैशिष्ट्यपूर्ण बांधणीचे हे मंदिर नानासाहेब पेशवे यांनी १७५५ ते १७८६ या काळात बांधले. मंदिर बांधायला तब्ब्ल 31 वर्षे लागली. प्रवेश करताच नंदिदर्शन होते. येथे घागारीसारख्या आकारात ब्रह्मा, विष्णू, महेश आशा तीन मूर्ती असून त्यांच्यावरील तीन छीद्राना गंगा, गोदावरी, सरस्वती, नद्यांचे रूप मानले जाते. त्यातून शिवलिंगावर अभिषेक होतो.


त्र्यंबकेश्वरमध्ये कालसर्प योग आणि नारायण नागबलीची पूजासुद्धा होती. त्यामुळे वर्षभर येथे लोकांची गर्दी असते. याशिवाय नाथपंथीयांसाठीही त्र्यंबकेश्वराचे आगळे महत्त्व आहे. इथे जाण्यासाठी नाशिक पासून बस आणि टॅक्सी ची सुविधा आहे.

११. श्री.केदारनाथ-

या परिसरास देवभूमी असे म्‍हटले जाते. चारधामपैकी हे एक असून या ठिकाणी रेडयाची पाठ जेथे जमिनीबा‍हेर राहिली. त्‍याजागी पांडवानी मंदिर बांधले. या मंदिराचे पुनर्निमाण ८व्या श‍तकात शंकराचार्यांनी केले. मुख्य मंदिराची निर्मिती 9 व्या शतकात झाली.

अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जिर्णोध्‍दार केला. समुद्रसपाटीपासून बारा हजार फूट उंचीवरती हे मंदिर वसले आहे. हे मंदिर उत्तररांचाल या राज्‍यात वसलेले आहे. हिमालयावर हरिद्वारहून केदार 150 मैल आहे. केदारनाथाचें देऊळ वैशाख ते आश्विन उघडें असतें. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तें बर्फांत बुडालेलें असल्यामुळे बंद असतें.

बर्फाच्‍छादीत पर्वतामधील एका उंच दगडी चौथ-यावर करडया दगडी रंगाचे मंदिर असून चार दिशांना चार दरवाजे आहे. येथून हिमालयातील नंदादेवी, नंदाघुमटी ञिशुली, हत्‍तीपर्वत आदी शिखरे दिसतात.

महाशिवराञीस येथे मोठा उत्सव भरतो. शिवरथाची मिरवणूक मंदिराभोवतीरथाच्‍या पाच फे-या काढल्‍या जातात. आणि शिव भक्त मनोभावे शंकराची पूजा येथे करतात.

हे मंदिर उत्तररांचाल या राज्‍यात बसलेले असून येथे जाण्‍यासाठी डेहराडूनवरून बस व टॅक्‍सीची सुविधा उपलब्‍ध आहेत.

१२. श्री. घृष्णेश्वर -

(घृश्मेश्वर) दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर (घृश्मेश्वर) म्हणतात. स्कन्द्पुरण व शिवपूराण, रामायण व महाभारतात श्री घृष्‍णेश्‍वराचा उल्‍लेख आला आहे. सुमारे 1500 वर्षापासून राष्‍ट्रकुट घराण्‍यातील राजा कष्‍णराजने हे मंदिर बांधले आहे. इ.स 1730 मध्‍ये गौतमीबाई महादेव होळकर यांनी मंदिराचा जिर्णोध्‍दार केला.

मंदिराचे मुळ नाव कुंकूमेश्‍वर होते. हे मंदिर शिल्‍पकलेचा उत्‍तम नमुना होय. मुळ दगडी चौथरा सहा हजार आठशे चार चौरस फुट असून अर्धे मंदिर हे लाल पाषाणाचे आहे. मंदिरात सुंदर नंदीची मूर्ती असून खांबावर रामायण व महाभारत दशावतार आदींचे चिञ रेखाटले आहे. इ.स 1791 मध्‍ये अहिल्‍याबाई होळकरांनी एक एकर बागेत शिवालय तिर्थ बांधले.

महाशिवरात्रीला मोठा यात्रोत्सव भरविला जातो.शंकराची पालखी शिवालय तिर्थावर स्‍नानासाठी आणली जाते. रात्रीच्या वेळी अंलकार पूजेचा सोहळा होतो. श्रावण सोमवारी मोठया प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येथे येतात.

औरंगाबाद जिल्‍हयातील हे मंदिर असून महाराष्‍ट्रातील प्रमुख शहरांतून येथे जाण्‍यासाठी बस व टॅक्‍सीची सुविधा उपलब्‍ध आहेत.