ek prem ashehi .................ghusmat tichya manachi books and stories free download online pdf in Marathi

एक प्रेम असेही -------------घुसमट तिच्या मनाची

८ वर्षांचा काळ लोटून गेला पण तिची व्यथा आज पण कोणी समजून घेतली नाही , ना तिच्या प्रियकराने आणि ना तिच्या घरच्यांनी

कॉलेज चे शिक्षण पूर्ण झाल्यांनतर जॉब साठी खूप पर्यंत केल्यानंतर एका ठिकाणी तिची निवड झाली , अमृता नाव होते तिचे ,कामात खूप हुशार होती ती , तिच्यात फक्त एक कमी होती , ती म्हणजे तिच्या चेहऱ्यावर भाजलेले डाग होते , तसेच मोठ्यानं मान देणे , आदर करणे हे तिच्यावर झालेले संस्कार होते , कामात हळू हळू तिचा जम बसू लागला , सुरुवातीला नवीन असल्यामुळे सगळ्यांचे ऐकून घ्यावे लागत होते , प्रत्येकाच्या काळाने वागत होती ती , वय तसे जास्त नव्हते साधारण २१ वर्षाची होती ती , पहिल्यांदा घरातून बाहेर पडली होती , त्यातच एके दिवशी प्रवासात तिचा मोबाइल चोरीला गेला , जेव्हा हे सगळे तिच्या कंपनीतीतलं लोकांना कळले तेव्हा सगळे तिला मूर्ख समजू लागले , कोणी टवाळकी करत असे , तर कोणी कामाच्या नावाखाली त्रास देत असे , पण तिने जिद्द नाही सोडली , कमला लागून २ महिने झाले होते , नवीन फोन हि घेतला , त्यातच एक मुलगा जो त्याच कंपनीत ४-५ महिन्यापूर्वी जॉईन झाला होता , किरण नाव होते त्याचे , स्मार्ट होता , टँलेन्टेड होता , दिसायला तर शाहरुख खान ची कार्बन कॉपी , तिला तो प्रत्येक कामात मदत करी , कोणी त्रास दिला तरी तिच्या बाजूने उभा राही , खूप छान मैत्री झाली होती दोघात , पण या मैत्रीमागे ती वेगळ्याच प्लॅन ची शिकार होत होती , त्या मुलाच्या आयुष्यात कोणीतरी दुसरी मुलगी होती , जिच्यामुळे तो खूप दुखी राहत होता , त्यातून बाहेर पाडण्यासाठी अमृता ने त्याला खूप मदत केली , मैत्री दिवसेंदिवस अधिक घट्ट होत गेली .

दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते , एका कंपनीत असून पण तास न तास फोन वर बोलत बसायचे त्याओघांचे हे वागणे सगळ्यांना दिसत होते पण त्या दोघांनी कधी कोणाचा विचार नाही केला , एक दिवस मोबाइल वर चॅटिंग करत असताना तिने त्याला सांगितले कि ती त्याच्याशिवाय राहू शकत नाही , त्याच्याशी बोलल्याशिवाय तिला करमत नाही आणि त्याला हवे होते तेच घडत होते , ती वाहवत चालली होती , पण तो तिला टाळत होता , फोन करत नव्हता , मेसेज चा रिप्लाय देत नव्हता , तिने खूप विनंती केल्यानंतर तो तिला ऑफिस बाहेर भेटायला तयार झाला , पहिली भेट होती तशी त्यांची , तो तिला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि ते बोलत थांबले होते तिच्या प्रश्नांचा मारा सुरु होता ? त्याने तिला घरच्या परिस्थितीची अडचण सांगितली आणि तो तिच्यावर प्रेम करेल पण लग्न नाही करणार हि अट पण घातली , पण ती त्याच्या प्रेमात एवढी बुडाली होती कि तिने त्याची अट एवढी मनावर नाही घेली , तिला वाटले कि तिच्या प्रेमाने ती त्याचा निर्णय बदलवू शकेल , , कित्येक तास ते दोघे त्या निर्जन स्थळी गप्पा मारत होती , वाऱ्याचा वेग वाढत होता , अचानक तिच्या मानेवर एक स्पर्श झाला , त्याचा पहिला स्पर्श होता तो , त्यावेळी तो तिला त्याच्या आवडत्या गाण्याबद्दल सांगत होता , " लाग जा गेले की फिर हसी रात हो न हो " , त्याचा तो मनमोहक स्पर्श सगळे जग विसरून ती त्याच्या मिठीत सामावली ओठावर ओठ टेकले आणि तो क्षण तिथेच थांबले , पण अचानक त्या क्षणाला कोणाची द्रिष्ट लागावी म्हणून काही मुले तिथे येऊन किरण ला मारू लागली , ती फक्त रडत होती , नशीब चांगले म्हणून त्यानि त्या मुलीच्या केसालाही धक्का नाही लावला , आणि त्या दोघांनाही तिथून जायला सांगितले , दोघेही खूप घाबरले होते , पण रात्रीची वेळ होती दोघांनाही घरी जायचे होते , जास्त काही न बोलता दोघांनी निरोप घेतला .

दुसऱ्या दिवशी तो मात्र नाराज होता , तिच्याशी बोलत नव्हता , त्याला खूप वाईट वाटत होते कि आपल्यामुळे तिला अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले , आणि काही झाले असते तर म्हणून तो तिची माफी मागू लागला , पण ती अल्लड होती , जगाशी अभिद्न्य , तिला मागमूस हि नव्हता कि बलात्कार कशाला म्हणतात आणि त्या मुलांनी असे काय केले असते तिच्यासोबत ? ती दिवसेंदिवस त्याच्या प्रेमात गुरफटत चालली होती , एक दिवशी तिला कळते कि किरण ड्रिंक करतो , तिला वाईट वाटले आणि तिने त्याच्याशी बोलणे पण बंद केले , पण त्याने तिला मानवले आणि ती त्याच्या आयुष्यात आल्यावर तो हे सगळे बंद करेल असे वाचन दिले , तिला तो हवा होता आणि त्यासाठी काहीही करण्याची तिची तयारी होती , काही दिवस लोटले , काही कामानिमित्त बाहेर गेला होता , ८ दिवस नीट बोलणे हि झाले नव्हते , त्यामुळे भेण्याची ओढ वाढत होती , लग्नानंतरच्या नात्याची कल्पना नसलेली ती ? त्याला म्हणाली कि किरण मला तुझे व्हायचंय आणि तुझे बनून राहायचं ? पण त्याने वेगळा अर्थ घेतला या सगळ्याचा , तो परत आल्यावर त्याने तिला सांगितले कि सुट्टी घे आपण बाहेर जाऊ , एकमेकांसोबत वेळ घालवू , पण तिला कुठे माहित होते आज त्याच्या सगळ्या इच्छाच पूर्ण होणार होत्या , त्याच्या घरी कोणी नव्हते , तरीही तो तिला त्याच्या घरी घेऊन न जात त्याच्या चुलत्यांच्या घरी घेऊन गेला , सगळी तयारी आधीच झाली होती , कोणाला कळू नाही म्हणून त्याने त्याच्या ४-५ मित्रांना रूम बाहेर दुसया रूम मध्ये बिअर ची पार्टी दिली , आणि तो पण पिऊन आला , पण ८ दिवसांचा विरह म्हणून ती त्याला काही बोलली नाही नाही आणि त्याच्या मिठीत बिसावली , तो काहीही ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता , त्याला फक्त एक माहित होते तिला आपले व्हायायचंय , आणि त्याने तिला मिळवले , खूप त्रास होत होता तिला पण त्याच्या सुखापुढे ती हरली , नंतर ते रक्त बघून हंबरली , पण तो खुश होता , कारण एक नवी कोरी मुलगी त्याला उपभोगायला मिळाली होती

दारूच्या नशेत तो काय बोलत होता हे त्यालाच कळत नव्हते , तो देवाला म्हणत होता कि मी नक्कीच कोणते तरी पुण्य केलाय म्हणून एक कोरी मुलगी मला मिळाली , पण तिला या सगळ्याची जाणीव नव्हती , तिला एक वेडी आशा होती कि हा आपल्यावर प्रेम करतोय , आपल्यासोबत लग्न करेल , पण त्यानंतर त्याने तिला सांगितले कि तो तिच्यावर प्रेम करत नव्हता फक्त ऑफिस मधल्या काही मुलांशी त्याने पैज लावली होती कि या मुलीला पटवून तिच्यासोबत एक दिवस घालवून दाखवेल आणि ती पैज त्याने जिंकली , पण हे ऐकून ती स्तब्ध झाली , दार उघडून बाहेर आली तर त्याचे मिता तिला बघत होते , त्यातला एक म्हणाला, का आलीस इथे? तुला माहित नाही का तो कसा मुलगा आहे ? आता त्याचे काम झालाय तो तुला डुंकून पण बघणार नाही , घाबरली होती ती , आतमध्ये जाऊन त्याला या वागण्याचा जाब विचारू लागली पण तो दारू च्या नशेत एवढा धुंद होता कि त्याला काही कळत नव्हते , पण तिला बस स्टॉप वर सोडायचं एवढे लक्षात होते त्याच्या , ती मनोमन घाबरली होती त्याच्या मित्राचे बोलणे ऐकून , बस स्टॉप वर सोडून तो तिला एक शब्द हि न बोलता निघून गेला , आणि दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये नाही आला , पण तिसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये आल्यावर मला त्याने मिळवले हे मोठ्या थाटाने मिरवून सांगत होता , सगळ्यांचा अमृता कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला होता , त्या दिवसानंतर तो तिच्याशी जास्त बोलत नव्हता , पण तिने काय गमावले याची तिला जाणीव झाली होती आणि तो आपल्याशी लग्न करेल यासाठी ती त्याला शक्य तेवढे मानवन्यासाचा प्रयत्न करत होती , पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता , त्याने सांगितले कि तो तिला आधीच म्हणाला होता कि तो तिच्याशी लग्न नाही करणार फक्त प्रेमाइतके नाते मर्यादित राहील , कोणाला सांगू पण शकत नव्हती ती तिचे दुःख ? २-३ महिने असेच गेले , नवरात्री सुरु झाली , ते दोघे बोलत होते पण आणि नव्हते पण , मंदिरात जाण्यासाठी ती दुसऱ्यादिवशी लवकर येणार होती हे तिने त्याला सांगितले होते , मंदिरातून आल्यावर तो तिला एका ठिकाणी घेऊन गेला , आणि परत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला मिळवून तृप्त झाला , त्याला सवय झाली होती या सगळ्याची , पण ती मात्र आशा लावून बसली होती कि हा आपल्यासोबत लग्न करेल , प्रत्येक शनिवारी दोघे गार्डन मध्ये जायचे १-२ तास गप्पा मारायचे , पण लग्नाचा विषय निघाला कि भांडणे होत , अशातच त्याच्या भावाचे लग्न ठरले आणि त्याने सांगितले कि त्याचे लग्न पण त्याच लग्नात करायचंय , तिच्या पायाखालची जमीन सरकली , खूप रडली , पण करणार काय ,त्याच्या घरी जाण्याचे ठरवले आणि तसे त्याला सांगितले पण , पण हे ऐकून त्याने तिचा खूप अपमान केला , चांगल्या घरातल्या मुलांना फूस लावून , शारीरिक संबंध ठेऊन लग्नासाठी जबरदस्ती करतात तिच्यासारख्या मुली ? असे आरोप केले , हे आरोप ऐकून ती तुटून गेली , पण त्याचे लग्न नव्हते , हे कळल्यावर तिच्या मनात परत आशा जागी झाली , , ऑफिस मध्ये सगळ्यांना कळत होते कि हा तिचा गैरफायदा घेतोय पण कोणी काही करू शकत नव्हते , सगळे तिला सांगत होते कि त्या मुलाचा नाद सोडून दे , तिने ते मान्य केलेही असते पण एवढ्या वेळा त्याने तिचा उपभोग घेतला होता कि ती काय सांगणार होती जगाला , म्हणून त्याला विरोध न करता त्याचे सगळं त्रास सहन करत होती , एक दिवस ऑफिस मध्ये भांडणे करून त्याने जॉब सोडून दिला . पण हे ऐकून ती घाबरली कारण एकत्र काम करत असताना तो तिला एवढे टाळत होता , आणि आता तर तो जॉब सोडून गेला होता त्यामुळे तो तिला कधी भेटणार नव्हता , पण तिने त्याला फोन करणे बंद नाही केले , पण तो मात्र जेव्हा त्याला इच्छा होईल तेव्हा तिला भेटायला बोलवत होता आणि शारीरिक समबंध हा प्रेमाचा एक भाग आहे म्हणून उपभोगत होता ,

एक दिवस तो घर सोडून गेला , कुठे गेला काही माहित नव्हते , त्याच्या घरून फोन आल्यावर तिला कळले कि त्याने तिच्याशी लग्न करण्यस्तही घर सोडले , ती खूप खुश होती , पण तो तिला भेटायला आला नव्हता , २-३ दिवस गेल्यानंतर तो अचानक ऑफिस समोर आला आणि तिला लग्नासाठी विचारले , उद्या आपण लग्न करू घरून निघून ये असे सांगितले , ती खुश होती , लग्न होणार होते तिचे , पण पुढे काय वाढून ठेवलाय तिला कुठे माहित होते? दुसऱ्या दिवशी घरी काही न कळू देता ती घर सोडून आली , २ दिवस कोर्टाला सुट्टी असल्यामुळे सोमवार पर्यंत महाबळेश्वर मध्ये राहू आणि मग सोमवारी लग्न करू असे ठरले , पण त्याच दिवशी तो लग्नाला नाही म्हणाला म्हणून ती पश्चातापाची भावनेने त्याला सोडून निघून येत असताना पोलिसांनी त्यांना पकडले , पण त्याला यातून बाहेर पडायचे होते म्हणून त्याने तिला खोटे बोलायला सांगितले आणि तो लग्न करेल असेही पोलीस स्टेशन मध्ये लिहून दिले , पण तेथुन बाहेर आल्यावर पण तो पालटला , २ दिवस घर सोडून एका मुलासोबत राहिलेल्या मुलीला घरी काय बोलतील याची भीती होती , पण घरच्यांच्या भीतीने तो लग्न करीम माझ्याशी याचे समाधान होते , पण सगळे काही विपरीत घडत होते, त्याने तिला आणून तिच्या घरच्यांकडे सोपवले आणि उद्या लग्नाचे बोलायला येतो असे सांगून घरी जायला सांगितले , ती तिच्या स्वप्नांच्या जगात रमली होती , लग्न होणार म्हणून खुश होती , पण तो आलाच नाही त्याने फक्त एक फोन करून सांगितले कि तो लग्न नाही करणार आणि त्याला इथून पुढे फोन करू नको ,

तिच्या पायाखालची जमीन सरकली , कारण २ दिवस त्याच्यासोबत राहून पण तो एकटे सोडून गेला होता , तिच्या शरीरावर असंख्य व्रण होते , ते व्रण घरच्यांना दाखवून विनवणी करत होती कि मला त्याच्यासोबत लग्न करायचंय पण घरच्यांनी नाही ऐकले , कामावरून पण काढून टाकले , कारण न सांगता ३ दिवस सुट्टी घेऊन गेली होती ती ? सगळे जग संपले होते तिचे , पण तो मुलगा खुश होता कारण त्याला कधी तिच्याशी लग्न करायचे नव्हते ? तिच्याकडे फोन नव्हता , घरचे लक्ष्य ठेऊन होते , अशातच लग्नासाठी स्थळे येऊ लागली , पण ती काही करू शकत नव्हती , ८-१० महिने लोटल्यावर घराबाहेर पडण्याची संधी मिळाली , तिने त्याला फोन केला , पण तो नीट बोलला हो नाही , तिने भेटण्यासाठी विनन्ती केली , तो भेटला , त्याने येताना तिच्यासाठी एक गिफ्ट आणले होते , त्याच्या नजरेत प्रेम जाणवत होते आज तिला , १० महिन्यांचा दुरावा एका क्षणात मिटला होता , त्याने परत एकदा तिला लग्न करण्याचे वचन दिले आणि , २ वर्षे वेळ मागितला , या २ वर्षात फक्त एकमेकांसाठी जगण्याचे वचन पण एकमेकांना दिले , चोरून भेटणं , फोन करणे चालू होते , अशातच तिने पुढच्या शिक्षणासाठी क्लास जॉईन केले त्यानिमित्ताने भेटणे तरी होईल म्हणून , पण परत कोणाची नजर लागावी म्हणून , एक दिवशी कळले कि त्याचा एकसिडेन्ट झालाय , आणि पाय मोडला , त्याला भेटायला ती कशाचाही वैचार न करता दवाखान्यात गेली ,ऑपेरेशन नव्हते झाले त्याचे , दुसऱ्या दिवशी ऑपेरेशन होते , पण दुसऱ्या दिवशी दवाखान्यात फोन केला तर कळले कि त्याला दुसऱ्या दवाखाण्यात नेले , पण कुठे हे माहित नव्हते , , २ दिवसांनी कळले कि त्याच ऑपेरेशन झालाय , २-३ वेळा भेटायला गेले , पण त्याला आर्थिक मदत नाही करू शकत याचे ओझे तिच्या मनावर होते , त्यानंतर त्याला ६ महिने चालत येणार नव्हते , त्यामुळे ६ महिने न भेटत राहावे लागणार होते , पण या ६ महिन्यात न चुकता फोन , मेसेज चालू होते , दुरावा वाढत चाललं होता , तो चालू शकत नव्हता मग लग्नाचा विषय कसा काढणार ? हळू हळू त्याने चालायची प्रॅक्टिस सुरु केली आणि लवकर बरा झाला , पण तिच्याकडे त्याचे लक्ष्य नव्हते , काही दिवसांनी तिने त्याला हातभार म्हणून घरच्यांची परवनगी घेऊन नवीन जॉब शोधायला सुरुवात केली , पण सुरुवातीच्या ठिकाणी तिला जॉब ची ऑफर आली आणि ४-५ दिवसात कामावर रुजू झाली , तिने त्याला सांगितले , तो पण खुश झाला , पण लग्नाचा विषय आला, कि तो बोलणे टाळत होता , तिने तिच्या जॉब वर लक्ष्य केंद्रित करून त्याच्याशी जास्त संपर्कात राहणे टाळू लागली , पण तो आठवण आली कि तिला भेटायला येई , फोन करत असे , पण लग्नाचा विषय टाळत असे , खूप वेळा त्याने तिची निराशा केली होती त्यामुळे ती त्याच्यापासून दूर राहत असे ,

अशातच , एक दिवशी त्याच्या डोळ्याला खिळा लागला , त्यावेळी त्याला वाटले कि आपण त्या मुलीबाबतीत खूप वाईट वागलो म्हणून देवाने आपल्याला शिक्षा दिली असेल , यामुळे त्याने एक दिवस आपल्या मित्राला सांगून त्या मुलीची जन्म पत्रिका मागवून घेतली आणि त्या दोघात का जास्त वाद होतात हे बघायला म्हणून ती पत्रिका ब्राह्मणाकडे दिली , पण त्यावेळी पण तो तिची फसवणूक करत होता , तिला भेटून त्याने सांगितले कि ३ महिने थांब , माझी आई माझ्यासाठी मुलगी बघतेय पण मी मुली बघायला नाही जाणार आणि ३ महिन्यांनी आपण लग्न करू , ती परत एकदा त्याच्यावर विश्वास ठेऊन मूर्ख ठरली, त्याचे लग्न अगोदर ठरले होते त्याच्या मामाच्या मुलीसोबत , आणि तो फक्त तिला फसवत होता कारण तिने त्याच्यालग्नात काही प्रॉब्लेम्स नको करायला म्हणून , तो तिला भेटला , तीच हवा तेवढा उपभोग घेतला , प्रेग्नेंट राहू नाही म्हणून गोळ्या खायला दिलाय आणि १५ दिवसांच्या आत मामाच्या मुलीसोबत लग्न केले , पण अमृता ला हे माहित नव्हते , ती ३ महिन्याची वाट बघत होती , पण या ३ महिन्यात तो तिचा नंबर ब्लॉक करून त्याच्या बायकोसोबत सांसारात रामला होता , पण ती अजून पण त्याला भेटायची वाट बघत होती , तो तिला भेटत होता , तिला उपभोगत होता , पण त्याने तिला कळू पण नाही दिले कि त्याचे लग्न झालाय म्हणून , पण एक दिवस तिला बाहेरून कळते कि त्याचे लग्न झालाय , ती त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न करते , पण तो तिला एवढेच सांगतो कि तो खूप खुश आहे आणि जर तिने त्याच्यावर कधी प्रेम केले असेल तर त्याचा संसार सुखाचा होऊ दे , त्या दिवसानंतर ती त्याला फोन हि करत नाही , कि भेटत नाही ,

एवढी दुखी असून पण ती कोणालाही काही न सांगता तिचे दुःख मनात लपवून ठेऊन जॉब वर येते , घरी कोणाशी बोलत नाही , असे ६ महिने उलटून जातात , नंतर एक दिवस अचानक तो समोर येतो , आजारी असतो , राहवत नाही म्हणून ती त्याला फोन करून बोलते तर , त्याला डेंगू झाल्याचे समजते , हॉस्पिटल मध्ये असताना ती त्याला भेटायला हि जाते , पण तेव्हा हि तो तिला खोटे सांगतो , तो सांगतो कि त्याच्या आई ने जीव द्यायची धमकी दिली म्हणून त्याने दुसरे लग्न केले , आणि त्याने त्या मुलीला हात लावला नाही , कि बायकोच कोणते अधिकार दिले नाहीत , उलट जेव्हापासून ती त्याच्या आयुष्यातून गेलीय तेव्हापासून तो जास्त दारू पितोय आणि त्यामुळे त्याची हि अवस्था आहे , तिला इथपर्यंत सांगितले कि दारूच्या नशेत हे लग्न केलाय , आणि हे लग्न तो मनात नाही , लग्न मंदिरात झाले , त्यालालग्नातकाही रुकवत दिला नाही , आणि तिने विश्वास ठेवला , पण काही दिवसांनंतर कळले कि त्याचे लग्न खूप मोठे झाले आणि त्याला लग्नात सगळे काई दिले , उलट त्याच्या लग्नात तो वरातीत नाचला पण होता , त्या दिवशी कळले कि त्याने पैशासाठी , आणि त्याच्या बायकोच्या सुंदरतेपुढे हात टेकले आणि अमृता ला फसवले , त्याच्या सासऱ्याकडे बक्कळ पैसे होते आणि त्याच पैशासाठी त्याने परत एकदा तिला फसवले , पण तो तिला फसवत होता याची तिला जाणीव नव्हती , त्याला लग्नानंतर पण तिच्याशी बाहेर संबंधठेवायचे होते म्हणून त्याने रचलेला के डाव होता हा , ज्यात ती अडकत गेली , काही दिवसांनी तो दारूच्या नशेत अमृताला म्हणतो कि निघून जा माझ्या आयुष्यातून , तू नव्हतीस तेच बरे होते , माझ्या बायकोच्या आणि माझ्या मध्ये आलीस तू , आमचे खूप प्रेम आहे एकमेकांवर , आणि जर माझी बायको प्रेग्नेंट आहे ५ महिन्याची , तिच्या केसाला जरी धक्का लावलास तर जीव घेईन मी तुझा ? हे सगळे ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली , तिच्या चेहऱ्यावरच्या डागासाठी तो तिला हिणवू लागला , २ महिन्यापूर्वी जी व्यक्ती तिला म्हणाली होती कि त्याने त्याच्या बायकोला स्पर्श नाही केला आज ती व्यक्ती सांगतेय कि त्याची बायको ५ महिन्याची प्रेग्नेंट आहे ?

जीव देण्यासाठी रेल्वे रुळावर गेली पण या सगळ्यात तिच्या घरच्यांची काय चूक म्हणून तेथुन परत आली , पण दुसऱ्या दिवशी नाश उतरल्यावर त्याने तिची माफी मागून , परत एकदा तिला खोटे आश्वासन दिले कि १ मूल झाल्यावर घरचे त्याला काही बोलणार नाहीत मग तो तिच्याशी लग्न करून त्याची चूक सुधारेल , पण असे नाही झाले , उलट त्याच्या घरच्यांना हे सगळे कळल्यावर त्या मुलीवर नको नको ते आरोप झाले , लग्नाआधी कोणासोबत झोपणाऱ्या मुलीवर काय संस्कार असतील ? तिची लायकी काय असेल? कोणाशी लग्न करण्याची तिची लायकी नाही? या सगळ्या आरोपांनी त्या मुलीला मारून टाकण्यात आले , आणि किरण , शांतपणे मजा बघत होता , , ज्या दिवशी त्याची बायको डिलिव्हरी झाली त्या दिवशी तर नागाचा फना काढून डंख मारला त्याने , तो अमृताला ला म्हणाल कि तू जंगली आणि मेली आता मला काही फरक नाही पडणार , एक मुलगी झाल्यावर त्याने त्याचे रंग दाखवायला सुरुवात केली तास त्याचा प्लॅन होता तो , कि एक मूळ होईपर्यंत तिला नदी लावायचे आणि मग समाजाच्या नजरेत उतरवून तिला बदनाम करून आयुष्यातून हाकलून द्यायचे , शेवटी तेच झाले , एक मूळ होईन पण एका विवाहित पुरुषासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मुलीची लायकी काय असेल असे त्याने सगळ्यांना सांगायला सुरुवात केली , लग्न झालेले माहित असून पण ती मला भेटत होती , मला फोन करून भेटायला बोलवत होती अशी चर्चा सगळीकडे त्याने पसरवून दिली , त्यामुळे समाजाच्या नजरेत ती एक चारित्र्यहीन ठरली गेली , , तिने त्याला या वागण्याचा जाब विचारला पण उपयोग नाही झाला , ती त्याच्या घरी गेली त्याच्या घरच्याना त्याचा खरा चेहरा दाखवायला पण त्याच्या घरच्यांना पण त्याने अगोदर तिच्या विरुद्ध काहीही सांगून ठेवले होते त्यामुळे त्याची आई आणि बायको दोघीही तिला वाटेल तसे बोलल्या , तिला न्याय नाही मिळाला तिथेही , उलट ती त्याच्या घरी गेली म्हणून तिच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करण्यात आली , सगळीकडे छी थू होऊ लागली , पण तो मात्र त्याच्या बायकोसोबत मजा मारत होता , तिने खूप वेळा त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला पण उलट तो म्हणाला कि लग्नाआधी माझ्यासोबत झोपताना नाही कळले का तुला ? तेव्हा विचार करायचा ना तुझ्या इज्जतीचा ?

ज्याच्यावर एवढे प्रेम केले , एवढा विश्वास ठेवला शेवटी त्याने धोका दिला होता , " माजली होती म्हणून फोन करून बोलवत होतीस , वासना पूर्ण करायच्या होत्या म्हणून भेटत होतीस " , अशा शब्दात तिची हेटाळणी करण्यात आली त्याच्या बायकोकडून , "बाहेर जॉब करणारी मुलगी कशी असते हे सगळ्यांना माहित आहे? अशा मुलीची कोणी गॅरेंटी घ्यावी , लग्नानंतर पण बाहेर काम केल्यावर दुसऱ्यासोबत पण बाहेर काहीही करू शकते , जिथे लग्न आधी माझ्यासोबत संबंध ठेवले , मग कशावरून लग्नानंतर दुसऱ्या कोणासोबत जाणार नाही , म्हणून मी तुझ्याशी लग्न केले नाही ", अशा शब्दात तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले , फक्त तिच्या चेहऱ्यावर असलेल्या डागांमुळे , तिच्या गरिबीमुळे आणि तिच्या जातीमुळे तिच्या आयुष्याचे वाटोळे झाले होते , पण या तिन्ही गोष्टी ती बदलू शकत नव्हती , पण तिच्या झालेल्या या अपमानाची परतफेड त्या सगळ्यांना करावं लागणार होती, पण ते शक्य नव्हते , कारण तिच्या घरचे तिचे काही ऐकून घ्यायला तयार नव्हते , त्यातच तिच्यासमोर एक सत्य आले कि , किरण ने हे सगळे प्रकरण मिटवण्यासाठी तिच्या वडिलांना पैसे देऊन खरेदी केले होते , जेव्हा तिला हे कळले तेव्हा तिच्या पायाखालून जमीन सरकली , आजपर्यंत ती फक्त ऐकत होती कि एखादा बाप असे करू शकतो , पण प्रत्यक्षात तिच्या बाबतीत हे घडले गेले , किरण ने त्याचे लग्न टिकावे , म्हणून आणि अमृता त्याच्या आयुष्यातून कायमची जावी म्हणून तिच्या वडिलांशी तिच्या आयुष्याचा सौदा केला , त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला न्याय मिळवून देण्यासाठी तिची साथ नाही दिली , जगात असे वडील पण असतात ….

या जगात मानले तर मानलेली नाती पण आयुष्यभर साथ देतात आणि कधी कधी रक्ताची नाती पण धोका देतात , प्रेम करून आणि विश्वास ठेऊन तिने चूक केली म्हणून तिच्या प्रेमाने तिचा गैरफायदा घेतला आणि वडिलांनी कधी साथ दिली नाही , त्या दिवशी कळले कि त्याचे लग्न टिकावे , आणि त्याची बायको त्याच्या आयुष्यातून जाऊ नये म्हणून एक मूल होईपर्यंत एका कटपुतली सारखे खेळवले होते त्याने अमृताला ? आज त्याची मुलगी ६ महिन्यांची झालीय आणि अमृता आजही एकटीच , आजही आपल्या समाजात अशी किरण सारखी मुले आहेत जी मुलींच्या सदजेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना एवढे फसवतात पण समजत अशीच मुले प्रतिष्ठित म्हणून वावरत असतात , आणि समाज अशा लोकांना मन सन्मान देत असतो , देवही अशाच लोकांची साथ आयुष्यभर देतो , पण एक न एक दिवस त्या मुलीला न्याय नक्की मिळेल , ज्यांनी तिचा गैरफायदा घेतला , आणि तिच्याविषयी अपशब्द वापरून तिचा अवमान केला देव अशा संत लोकांना कधी शिक्षा करेल कि नाही हे माहित नाही ? ८ वर्षे तिला उपभोगून तिच्याशी न लग्न करत फेकून दिलेली ती ? तिला ना तिच्या प्रेमाने समजून घेतले ना तिच्या घरच्यांनी ? घरी सांगितल्यावर घरच्यांनी वेश्या म्हणून तिची हेटाळणी केली , कोणी म्हणाले लग्न करण्याची लायकी नाही , कोणी म्हणाले धंदा कर , कोणी म्हणाले रांड म्हणून राहा , तर कोणी म्हणाली रांड म्हणून राहायची पण लायकी नाही , आज एवढ्या असंख्य आरोपांनी तिच्या काळजावर जे वार केले ते वर सहन करत आजही ती उभी आहे फक्त त्या क्षणांसाठी जेव्हा तिचा किरण येऊन तिला म्हणेल कि खरेच माझी चूक झालीय आणि निदान मेल्यानंतर तरी तो तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून तिला समाजात न्याय मिळवून देईल