A Heavy Prize - A Mr. Wagh story - 8 books and stories free download online pdf in Marathi

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 8

दि लास्ट मूव्ह्


किती दिवस झाले बाबाराव देसाईंची केस चालू आहे याची गणती नव्हती. आणखी किती दिवस चालू राहील याचा अंदाज नव्हता...
                  तशात हे आणखी... 
          मरून पडलेल्या व्यक्तीच्या पोटात सूरा खुसून खून केला गेला होता. बाबारावांच्या मरणानंतर इतक्या दिवसांत नवीनने पहिल्यांदाच एवढी साधारण मर्डरची केस पहिली होती. ही केस जाता - जाता सॉल्व्ह होईल अशी त्याला आशा होती...
          पंचनामा झाला. डेडबॉडी हलवण्यात आली. पोस्टमार्टम करण्यासारखे काही नव्हते. तरी अटॉप्सी ऑपरेट करण्यात आली. काही विषेश सापडले नाही. खून सूरा खुपसूनच झाला होता. ७.२५ इंच खोल व १.५ इंच रुंद अशी जखम होती. 
          मेलेल्या व्यक्तीची माहिती गोळा करण्यात आली. त्याच्याकडे आढळलेल्या काही वस्तू जसे पाकीट, मोबाईल, त्याची गाडी, इत्यादींवरून त्याचा शोध घेण्यात आला.
मृताचे नांव शक्ती आनंद शुक्ला. मूळचा तो उत्तर प्रदेश मधला. कामानिमित्त दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आलेला. कामानिमित्त इथे येणे हा फक्त त्याचा बहाणा होता. युपीमध्ये त्याच्या कारखान्यात बनणाऱ्या अवैध बंदुकांना इथले मार्केट खुले व्हावे म्हणून तो इथे आला होता आणि या दहा वर्षांत त्याने इथे खूप जम बसवला होता हे त्याच्या फोन कॉन्टॅक्ट्स व रेकोर्ड्स वरून कळून आले. पण त्याला जवळचे असे कोणी नातेवाईक नव्हते. त्याच्या व्यवसायातील कोणी तरी हा खून केल्याची शक्यता आता समोर येत होती... 
अगदीच साधारण वाटणारी ही केस अशी चिघळत जात होती... एका काजव्याने सूर्याचे रूप घेतले होते. 
         नवीनने कार्तिक आणि वरूणकडे जाण्याचा निर्णय घेतला. कारण यात आतांकवाद्यांचा अंतर्भाव असण्याची शक्यताही आता डोकावत होती. वरुणने संपूर्ण यंत्रणा या प्रकरणाच्या उकलीसाठी खर्ची घातली. या सर्व हालचालींत मिस्टर वाघला जाणून बुजून या इन्वेस्टीगेशन बाहेर ठेवण्यात आले. 

        कार्तिकलाही उघडपणे यात भाग घेता येत नव्हता. शिवाय त्याची मेडिकल लिव्ह केव्हाचीच संपली होती. मात्र यासाठी त्याने एक नामी शक्कल लढवली होती. गावातीलच एका मानसोपचार तज्ञांकडून त्याला अधिक ट्रीटमेंटची गरज असल्याचा एक रिपोर्ट रायटिंग मध्ये घेतला आणि तो ब्युरोला मेल केला आणि आपली लिव्ह वाढवून घेतली होती. पण मात्र तो अधिकच लपून राहू लागला. नवीन आणि वरुण कडून जी माहिती मिळेल तेवढीच. 

       शक्ती शुक्लाच्या कॉन्टॅक्ट्समधील झाडून पुसून सगळ्यांना अटक करण्यात आली, एक व्यक्ती सोडून. सगळ्यांची अगदी कसून चौकशी देखील करण्यात आली, पण काहीच होऊ शकले नाही.
दुसरीकडे मीडिया व त्यांच्या मार्फत बाबाराव देसाई समर्थक आणि सरकार विरोधक मात्र तपास यंत्रणेच्या या डायव्हर्जनमुळे त्यांच्यावर चांगलेच तोंड सुख घेत होते. यात स्वतःचे स्वार्थ पाहणारे आणि समाजाची दिशाभूल करणारेही बरेच होते. 
          इन्वेस्टीगेशन टीमचा प्रवक्ता म्हणून उभारलेल्या नवीनकडून मीडिया मार्फत लोकांना एवढेच सांगण्यात आले,
"आम्ही तपासापासून भरकटलो नाही आहोत. यातून आम्हाला नक्कीच एखादी लीड मिळेल अशी आम्हाला आशा आहे!"
"अशी आशा पोलिसांना का वाटते हे आपण जनतेला खुलासेवार सांगावे." एका महिला पत्रकाराने  नवीनकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
पण नवीन सुद्धा हुशार, त्याला तिचा हा प्रयत्न चांगलाच लक्षात आला. जनतेच्या उल्लेखाने त्याच्यावर उत्तरे देण्यासाठी प्रेशर टाकण्याचा पंचवीस वर्षीय त्या महिला रिपोर्टरचा हा प्रयत्न आहे हे त्याला लक्षात आले. 
"आताच आम्ही काही माहिती बाहेर काढू शकत नाही!" नवीनने तो प्रयत्न हाणून पडला.
"का नाही? तुम्ही जनतेच्या प्रश्नांच्या उत्तराचे देणे लागता! जनतेला हे कळलंच पाहिजे, की पोलिसांचा तपास कशाप्रकारे चालू आहे. जनतेला हे कळलं पाहिजे, की ते या समाजात कितपत सुरक्षित आहेत?" तिने पुन्हा तोच सायकॉलॉजिकल गेम खेळण्याचा प्रयत्न केला.
"मान्य आहे! पण जनतेने सुद्धा हे समजून घेतले पाहिजे, की आम्ही आम्हाला मिळालेल्या लीड्स जर असे जाहीर टीव्ही चॅनेल्सवर सांगत बसलो, तर आम्ही कधीच गुन्हेगाराला पकडू शकणार नाही! आम्ही जी गुप्तता पाळतो, ती जनतेच्याच सुरक्षेसाठी!" 
जनतेच्या नांवानेच आता नवीनने महिला रिपोर्टरला गप्प केले. आणि जनतेच्याच नांवाने त्याने तिला तिच्या आगाऊ प्रश्नांचे उत्तर दिले. 

रिपोर्टर्सच्या प्रश्नांना तर टाळता आले, पण ओथोरिटीजचे काय?
          नवीनचा बाईट् झाल्या - झाल्या होम मिनिस्ट्री मधून इन्वेस्टीगेशन टीमचा प्रमुख असलेल्या वरुणला घरचा आहेर देण्यासाठी फोन आला.
'विल यू प्लिज एक्स्प्लेन, हाऊ कॅन धिस मॅन शुक्ला विल हेल्प अस टू कॅच बाबाराव देसाईज मर्डरर?' पलीकडून खुद्द रक्षामंत्री बोलत होते.
"सर, मरे हुये शक्ती शुक्ला के रेकॉर्ड्स से मालूम हुआ हैं, की उसने माऊसर सी नाइन्टी सिक्स यह पिस्टल किसीं समर नकाते को बेचीं थी; जिससे लेट बाबाराव देसाई का मर्डर हुआ हैं! हम उसीकी तलाश मैं हैं।" वरुणने घाम पुसत स्पष्टीकरण दिले. 
'ठीक हैं! जो करणार हैं जलदी करो! कोई भी गलती नहीं होनी चाहीये!'
पलीकडून न सांगताच फोन डिस्कनेक्ट करण्यात आला होता. 

"अरेऽऽऽ याऽऽऽर...! मला आत्तापर्यंत वाटत होते, मिस्टर वाघच हे सगळं करत आहे; पण आता हे काही नवीनच?..." माझा मेंदू ओरडत होता. 

मिस्टर वाघ काही तरी म्हणाला तसा मी भानवरती आलो. 
"अं?"
"अरे मी विचारले आई कुठे गेल्या आहेत, कधी येणारायत?"
'आई? आता याचे आईकडे काय काम?' मनात मी स्वतःला प्रश्न केला आणि त्याला बोललो,
"गावी गेलीये. पाहुण्यांच्यात लग्न आहे. संध्याकाळ होईल. का?"
"हॅ! मग अजून वेळ आहे. नाही बराच वेळ आपण बोलतोय, आई साहेब आल्या तर अवघड होईल म्हणून विचारले. 
'हा... एवढंच होय...' सुटकेचा निःश्वास...
'पण चला या निमित्ताने हे तरी कळालं, की मिस्टर वाघ या जगात कोणाला तरी घाबरतो; आणि तेही माझ्या आईला...' 
'आमचा संबंध तुटेल म्हणून ही भीती का?...'
"कंटीन्यू करू?" त्याने विचारले.
एक तर मी नाही म्हंटले तर हा ऐकणार होता का? तर नाही. शिवाय मला उत्सुकता आधीपासून होतीच; ती आता शिगेलाही गेली होती. आणि आईबद्दल विचारणं हे मात्र त्याचं एक नाटक. त्याला जर आई संध्याकाळपर्यंत नाही हे माहीत नसते, तर तो आलाच नसता.
माझा अडकलेला स्वास मोकळा करण्यासाठी त्याने विषय थोडावेळ भरकटवला होता.


फोन नंबरवरून वरुणच्या टीमनकडून टेलिकॉम कंपनीच्या मदतीने समर ऋषीकेश नकातेचा अड्रेस शोधण्यात आला, पण तो खोटा होता. शक्ती शुक्लाच्या वही खात्याच्या रेकॉर्ड्सवरून समरने माऊसरसाठी शक्ती शुक्लासोबत डिलींग केल्याचे समोर आले होते. 

दोनच दिवसांनी वरुणला दुसऱ्या एका शहरातील ज्यूरिसडिक्शन मधून आणखी एक कॉल आला. वरुण नवीन व कमिशनरला घेऊनच इंफॉर्म केलेल्या ठिकाणी पोहोचला. 
       एका प्लॅटवर; एका व्यक्तीचा मृतदेह पडला होता. बरेच रक्त वाहून गेले होते. तरी रक्ताचा निचरा अजूनही होतच होता. डोक्याच्या आरपार गोळी गेली होती. ती व्यक्ती सोफ्याला रेलून पडली होती. एक पाय दुमडलेला आणि दुसरा पसरलेला. दुमडलेल्या पायाच्या मांडीवर 'ग्लॉक' पडली होती.
फ्लॅटची तपासणी करण्यात आली. त्यावरून जो मेलाय तोच समर नकाते असल्याचे आणि हा फ्लॅट देखील त्याचाच असल्याचे कळून आले.
समोरील दृश्यावरून तरी ही आत्महत्या असल्याचे दिसून येत होते. पंचनाम्यानंतर बॉडी अटॉप्सीसाठी हलवण्यात आली... आता याचा रिपोर्ट आल्याशिवाय यांना काहीच काम उरले नाही. 

आता यावेळी मात्र कार्तिकला लपून राहणे शक्य नव्हते. असह्य होऊन तो बाहेर पडला. 

दुसऱ्या दिवशी कमिशनरचे केबिन; कमिशनर, वरुण, मिस्टर वाघ आणि काही विश्वासातले ऑफिसर्स केसचे सर्व धागे जुळवण्याचा प्रयत्न करत होते, तोच दारावर नॉक झाले.
"येस?" कमिशनर ओरडले.
        एक कॉन्स्टेबल आत आला.
"सर, सीबीआय इन्स्पेक्टर..." त्याचे वाक्य पूर्ण होण्याआधीच कार्तिकने आत एन्ट्री मारली आणि सगळ्यांनी दचकून आपापल्या खुर्च्या सोडल्या. नवीन, वरुण आणि मिस्टर वाघ सोडून.
"मिस्टर कार्तिक आपण?" कमिशनरने वाक्य पूर्ण केलेच नाही.
              कार्तिकची नजर मिस्टर वाघवर होती.
"मी बोलावलंय त्यांना." कमिशनर कार्तिकचा रोख ओळखून बोलले. 
"सुरुवातीपासून मी इथेच आहे! आणि ही गोष्ट मिस्टर वरुण यांनाही माहीत होती." त्यांनी कमिशनर यांना खुलासा केला,
"पण हे या केबिनबाहेर जाता कामा नये!" 
हे वाक्य कार्तिक मिस्टर वाघकडे बघून म्हणाला. यावर मिस्टर वाघने फक्त स्मित केले. त्याची ही क्रिया कार्तिकला मात्र चिडवून गेली.
'पण कुठे या मूर्खाच्या नादी लागा' या अविर्भावात त्याने मिस्टर वाघकडे दुर्लक्ष केलं. ही गोष्ट लक्षात आल्याने मिस्टर वाघला अजूनच हसू आलं. आणि त्याच्या ओठांवरील स्माईल अधिकच ब्रॉड झाली.
         इतक्यात काची दारावर पुन्हा नॉक झाले. कमिशनरना आता कोण आहे हे विचारण्याचाही वैताग आला होता. कोण येणार आहे हे देखील त्यांना गृहीत असावे. म्हणून त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.  मघासचाच कॉन्स्टेबल कसलेसे एन्वेलोप घेऊन नॉक करून आत आला. हा बहुदा कमिशनरच्या मर्जीतला असावा. कारण एवढ्या कॉन्फिडेनशीयल मिटिंगमध्ये सुद्धा तो  ये - जा करत होता हे वाघचे निरीक्षण. 
"कायाय?" कमिशनरचा पुन्हा वैताग.
"सर, फॉरेन्सिककडून पीएम रिपोर्ट आलाय."
"आला का. ठीकाय." चेहऱ्यावरील वैतागाचे जाळे कमी न करता कमिशनर बोलले.
जवळ उभ्या कार्तिकने तो हाती घेतला आणि डोळ्याने व मानेने त्याला जाण्याची खून केली. 
"रिपोर्ट काय म्हणतोय?" वरूणने रिपोर्ट पाहत असलेल्या कार्तिकला विचारले.
          नाराजीनेच त्याने वर पाहिले. ओठ फुगवून नकारार्थी मान हलवत,
"काहीच फायदा नाही. इट्स प्योअर्ली अ सुईसाईड. तेथे सापडलेली युज्ड् बुलेट समरचीच कवटी छेदूनच भिंतीत अडकली होती. समर जवळ सापडलेले कार्टेज त्याच नाईन एमएम बुलेटचे, त्याच्या मांडीवर सापडलेल्या ग्लॉक सेवेन्टीनचेच आहे." 
नवीनने उठून कार्तिकला बसण्यास खुर्ची दिली आणि तो बाजूला उभा राहिला. कार्तिक खुर्चीत रेलून बसला, टेन्शनच्या जाळ्यात.
"काय करावे, काऽऽऽय कऽराऽऽवेऽऽऽ?" कार्तिक पुटपुटला, पण थोडे लाऊड.
         त्याच्या हातून वरुणने रिपोर्ट घेतला. 
"त्याच्याकडे सापडलेल्या ग्लॉकनेच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट आहे. नवीन, त्याच्या फ्लॅटवर तपासात काही सापडले?" कार्तिकने विचारले.
        अदबीने उभारलेला नवीन पुढे झाला,
"सर, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या वेपेन कलेक्शनमध्ये एक माऊसर आणि माऊसरचे अराऊंड फोर कार्टेजेस् सापडलेत. शक्ती शुक्लाच्या रेकोर्ड्स नुसार समर नकातेने एक माऊसर आणि त्याचे पाच राऊंड्स शक्ती शुक्लाकडून विकत घेतले होते."
नवीनने सांगितलेली माहिती ऐकून कमिशनरचे डोळे चमकले. कार्तिकही सावरून बसला.
"पर्चेस डेट कधीची आहे?" कार्तिकने विचारले.
"बाबाराव देसाई यांच्या मृत्यूच्या आधी चार दिवस!" 
"बिंगो! दॅट्स इट! नाऊ धिस केस इज् क्लिस्टर क्लिअर!" कमिशनरना हुरूप आला. ते उत्साहाने ओरडले.
"आपल्याला असे लगेच कंक्लूजन काढता नाही यायचे. काही गोष्टी अजून कन्फर्म व्हायच्या आहेत." कार्तिकने कमिशनरच्या उत्साहाला आळा घातला,
"म्हणजे बघा, एक तर या समर नकातेने ज्याच्याकडून वेपेन विकत घेतले त्याला म्हणजे शुक्लाला का ठार का मारले? आणि मग त्याने स्वःताही आत्महत्या का केली? अजून एक, की त्याने खरेच बाबारावांना जीवे मारले असेल, तर त्यामागे त्याचा मोटिव्ह काय? असे काही प्रश्न अनुत्तरीतच राहतात." 
कार्तिकच्या या बोलण्याने कमिशनरच्या चेहऱ्यावर पुन्हा वैतागाची छाया पसरली.
"साहेब..." म्हणत पुन्हा तोच कॉन्स्टेबल यावेळी नॉक न करताच डायरेक्ट आत आला. त्याच्या हातात एक लॅपटॉप होता व आणखी एक इन्वेलोप होता. यावेळी कॉन्स्टेबलच्या हाती ग्लव्हज् होते. हा लॅपटॉप काही महत्वाचा एव्हीडेन्स असणार हे मिस्टर वाघच्या लक्षात आले. 
         कॉन्स्टेबलने तो लॅपटॉप कमिशनर समोर डेस्कवर ठेवला. 
"हा लॅपटॉप?" कार्तिकने विचारले.
"समर नकातेकडे सापडला. पण याला पासवर्ड होता. तोच डिकोड करून सायबर डिव्हिजन कडून आला आहे." नवीनने सांगितले.
"म्हणजे तुम्ही सांगितले होते तो हाच का?"
"हो सर." 
कमिशनरनी सायबर क्राईम युनिटला फोन लावला.
"हा हॅलो. कमिशनर शिंदे बोलतोय. लॅपटॉप मिळाला. थँक्स् फॉर दि को - ऑपरेशन. सगळा डेटा नीट रिस्टोर झालाय ना?"
'हो डिलिटेड सर्व डेटा रिस्टोर केला गेला आहे.' पलीकडून सांगण्यात आले.
"थँक्स वन्स अगेन. ठेवतो." त्यांनी रिसिव्हर ठेवला.
"लेट्स सी वॉट्स इंसाईड?" म्हणून वरुणने लॅपटॉप ओढला आणि त्यातील फोल्डर्स व फाईल्स एक - एक करून उघडून पाहण्यास सुरवात केली. 
कार्तिकही त्याच्याकडे सरकून बसला. नवीनही एव्हाना एक रिकामी खुर्ची बाहेरून आणून कार्तिकमागे बसला होता. तो लॅपटॉप पाहण्यासाठी पुढे झुकला.
कमिशनरनी इन्वेलोप पाहायला सुरवात केली. फॉरेन्सिककडून आलेल्या तो रिपोर्ट पाहून झाल्यावर,
"लॅपटॉपवर समर नकाते सोडून दुसऱ्या कोणाच्याच फिंगरप्रिंट्स आढळल्या नाहीत. म्हणजे..." 
"म्हणजे यातील माहिती ही शंभर टक्के ओथेन्टीक असणार आहे!" वरुणने एक्साईटमेंटमध्ये कमिशनरचे वाक्य तोडले. 
आता कमिशनर यांनी पण थोडे पुढे सरकून आपले डोके मध्ये घातले. मिस्टर वाघ मात्र काही देणे - घेणे नसल्यासारखा मागे रेलून बसला होता.
          दोन - अडीच तास सगळं पाहण्यात गेले. काही सापडले नाही. मग कार्तिकने हिडन फाईल्स व फोल्डर्स पाहण्यास सुरवात केली.
         त्यातही तासभर गेल्यावर काही अनटाइल्ड् एक्सेल फाईल्स सापडल्या. 
         एका फाईलमध्ये त्यांना समर नकातेने काही टाईप केलेले आढळले. 
         समर नकाते हा कॉन्ट्रॅक्ट क्रिमिनल होता. पैसे घेऊन तो लोकांची इल्लीगल कामे करायचा. अशी बरीच रेकॉर्ड्स त्या फाईल मध्ये सापडली. 
                त्याच्याकडून कामे करवून घेतलेल्या लोकांची नांवे, करावयाचे काम आणि त्या लोकांकडून घेण्यात आलेली रक्कम व शिल्लक रक्कम असे बरेच काही त्यात नमूद होती.
        आणि त्यात बाबूचेही नांव होते...
        बाबू सुतारने समर नकातेला वीस लाख रुपये देण्याचे ठरले होते आणि त्यातली ५०% रक्कम त्याला ऍडव्हान्स देण्यात आली होती बाबाराव देसाई यांना ठार मारण्यासाठी. आणि बाबूने हे का केले असेल याची कारणे तर सगळ्यांनाच माहीत होती. 
       त्यात पुढे हे देखील नमूद केले होते, की ड्यू रक्कम बाबूकडून वसूल झाली नव्हती. 
"बाबूचे इंटेरोगेशन चालू होते आणि नंतर तर तो मेलाच. त्यामुळे पैसे द्यायचे राहिले असतील." वरुण म्हणाला.
"याह राईट. असंच वाटतंय!" कार्तिकने दुजोरा दिला.
पुढील एक्सेलशीट पाहण्यात आली. त्यामध्ये समर नकाते किती जणांचे पैसे द्यायचा बाकी आहे ते नमूद केले होते.
          त्यात शक्ती शुक्लाचे नांव होते. समर शक्ती शुक्लाचे पाच लाख रुपये देणे बाकी होता. 
          शक्ती शुक्लाकडील रेकॉर्ड्सवरून हे कळलेच होते, की दोघांमध्ये व्यवहार व्हायचे. समरने शक्तीकडून बऱ्याच वेळेला महागडी आणि विंटेज वेपेन्स खरेदी केली होतीत. त्यांतील पैसे तो देणे बाकी होता.
"याच कारणावरून तर समर नकातेने शक्ती शुक्लाला ठार मारले नसेल!" नवीनने आपला तर्क बोलून दाखवला.
"असू शकते." वरुण म्हणाला. 
"पण त्याने स्वतः आत्महत्या करण्याचे कारण अजूनही उघड होत नाहीये..." समाधान न होऊन नकारार्थी मान हलवत कार्तिक बोलला.
"शुक्लाचे पेमेन्ट फक्त बाकी होते?" इतका वेळ गप्प बसलेल्या मिस्टर वाघने प्रश्न केला.
सर्वांनी त्याच्याकडे पाहिले.
"नाही. अजून चारजण आहेत. सगळी रक्कम मिळून एक कोटी बाहत्तर लाख काहीतरी होते." स्क्रीनमध्ये पाहत कार्तिकने मानातल्या मनात बेरीज करून मिस्टर वाघला सांगितले.
"साहजिक एवढी मोठी रक्कम तो आणणार कोठून होता? आणि प्रत्येक देणेकऱ्याला मारणे तर त्याच्यासाठी रिस्की असणार. मग तो दुसरे करणार काय?" मिस्टर वाघ पुढे बोलला. 
"पण तो स्वतः हिटमॅन आहे. तो खुनी देणेकऱ्यांना घाबरला हे कसे मानावे?" वरुणने मिस्टर वाघला पृच्छा केली. 
"बाबारावांच्या मर्डर नंतर त्याने हार्ड्ली एखाद - दुसरे असायनमेंटच घेतले असेल नाही?" मिस्टर वाघने त्यालाच उलट प्रश्न विचारला.
मिस्टर वाघचा हा अनपेक्षित प्रश्न ऐकून कार्तिकने पुन्हा मागील एक्सेलशीट ओपन केली.
          मिस्टर वाघचे म्हणणे बरोबर होते. बाबारावांच्या मृत्यूनंतर त्याने एकच असायनमेंट घेतल्याची नोंद होती. 
          हे पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले.
"तुमच्या हे कसं...?" कार्तिकच्या तोंडून अचानक शब्द बाहेर पडले. आतापर्यंत कोणाचेच या गोष्टीकडे लक्ष गेले नव्हते.
"सिम्पल!" मिस्टर वाघ कार्तिकचे वाक्य मधेच तोडत बोलला,
"साहजिक पोलीस बाबूपर्यंत पोहोचलेत हे समजल्यावर हे प्रकरण शांत होईपर्यंत आपण गप्प बसू असाच त्याचा विचार झाला असेल. इट्स ए सिम्पल सायकॉलॉजी. कोणत्याही क्रिमिनलला पकडले जाण्याची भीती असतेच की. पोलीस कधी ना कधी त्याच्यापर्यंत पोहोचणार हे त्याला स्पष्ट होते. म्हणून तर त्याने हा डेटा देखील डिलीट केला. तो गप्प बसला म्हणजे इन्कम थांबला; पण देणेकरी थांबत नाहीत ना. मग काय; केली आत्महत्या!"
मिस्टर वाघाची थेअरी पटण्यासारखी होती!
"पण डाऊट उरतोच! समर नकाते क्रिमिनल असून आपल्या कामाचे रेकॉर्ड्स का ठेवत असेल?"
"अशा लोकांना आमचे शिक्षक शंकासूर म्हणायचे!" मिस्टर वाघने नवीनला टोमणा मारला.
"मिस्टर वाघ!" वरुण डाफरला.
"नाही तर काय? आता या प्रश्नाला काही अर्थ आहे का? त्याला राहवत असेल ऑर्गनाईज्ड् त्यात नवीनला काय प्रॉब्लेम आहे?" मिस्टर वाघ पुन्हा तिरकस बोलला. 
कार्तिक सुद्धा मिस्टर वाघकडे रागाने पाहू लागल्याचे पाहून कमिशनर मध्ये पडले,
      "मिस्टर वाघ, तुम्हाला काय म्हणायचंय ते प्लिज नीट सांगा."
     "आपण आपल्या कामांचे रेकॉर्ड्स ठेवत नाही? ठेवतोच ना? त्याला ओव्हर कॉन्फिडन्स असेल, की तो कधी पकडलाच जाणार नाही. शिवाय तुम्ही नकातेचे पूर्वायुष्य पाहिलंत, तर तो कॉमर्स स्टुडन्ट् असल्याचे तुमच्या लक्षात येईल. त्याने सीएचे शिक्षण पूर्ण केलं आहे. असेल त्याला तशी सवय." 
कमिशनरनी होकारार्थी मान डोलवली.
"आता सगळे स्पष्ट झाले! स्वातंत्र्य सेनानी बाबाराव देसाईंचा खून बाबूने समर नकाते कडून करवून आणला आणि त्यासाठी त्याने शक्ती शुक्लाकडून माऊसर खरेदी केली!" कमिशनरच्या चेहऱ्यावर मोकळे हसू आले. त्यांचा चेहरा खुलला.
"पण मग बाबारावांच्या नातेवाईकांचे काय?" नवीन पहिल्यापासूनचा आपला मूळ मुद्दा सोडायला तयार नव्हता.
"त्या प्रत्येकाचा मृत्यू कसा झालाय हे आधीच स्पष्ट झाले आहे. नाही का खाडे?" मिस्टर कमिशनरनी नवीनला विचारले. 
"पण सर, बाबारावांचे नातेवाईक किंवा त्याच्या संपर्कातील लोकांचे इतक्या मोठ्या प्रमाणात मरणे शंकास्पद वाटत नाही?" नवीनने आपला मुद्दा पुन्हा रेटला. 
"तसे कसे म्हणू शकतोस तू खाडे? बाबू सुतार, शक्ती शुक्ला आणि समर नकाते यांच्या मरणांतरही तुला असे वाटते?" कमिशनरनी ही आपला मुद्दा लावून धरला.
"हो कारण तेही या - ना कारणाने बाबारावांशी जोडले गेले होते." नवीन त्याचा हेका सोडायलाच तयार नव्हता. 
मग कार्तिकनेच या कॉन्व्हरसेशनवर विरजण टाकले,
"आय डोन्ट एक्सेप्ट धिस थेअरी! समर नकाते आणि शक्ती शुक्ला याचा तसा डायरेक्ट संबंध बाबाराव देसाईंशी नव्हता. समर नकातेला त्यांना मारण्यासाठी बाबू सुतारकडून असायनमेंट मिळाली होती आणि त्यासाठी त्याने शक्ती शुक्लाकडून माऊसर विकत घेतली होती एवढाच या दोघांचा बाबारावांशी आलेला संबंध! आणि तोही इंडायरेक्ट.
"आय थिंक कमिशनर इस राईट! अँड अफ्टर ऑल, आपल्याला लेट बाबाराव देसाई यांचा खुनी शोधायचा होता. ते काम झाले आहे!" कार्तिकही आता रिलॅक्स झाला, 
"हजारे, चहा सांगा सगळ्यांना. इतके दिवस डोके बधिर झाले होते. डोक्याच्या नसा जरा ढिल्ल्या करूया चहा पिऊन!" 
असे बोलून कार्तिक निवांत दोन्ही हात डोक्यामागे घेऊन खुर्चीला रेलला. हजारे नांवाचा ऑफिसर चहासाठी बाहेर धावला.
"वेल देन, माय नेम इज क्लिअर्ड ऍट द लास्ट! आईल टेक अ लिव्ह. एन्जॉय युअर पार्टी!" असे म्हणत मांडीवर हात ठोकत मिस्टर वाघ उठला.
"कुठे चाललात मिस्टर वाघ? आणि नेम इज क्लिअर्ड म्हणजे?" कमिशनरनी प्रश्न केला.
"ते विचार तुमच्याच लोकांना!" 
कमिशनर काही बोलण्याआधी मिस्टर वाघने केव्हाच केबिन सोडले होते. 

         मिस्टर वाघने त्याची १९६० ची कॅडीलॅक सडॅन पार्किंग मधून बाहेर काढली.
         तेवढ्यात नवीन धावत गाडी समोर आला. मिस्टर वाघने घाईने ब्रेक मारला. नवीन ड्रायव्हिंग विंडोजवळ आला. 
"जे काही झाले त्याबद्दल प्लिज माफ करा." नवीनने केविलवाण्या चेहऱ्याने दिलगिरी व्यक्त केली.
"हं! तुमच्या बड्या अफसरांना काय आपली चूक मान्य करून माफी मागायला काय कमीपणा वाटतोय वाटतं. तुम्हाला एकट्यालाच पाठवलंय." मिस्टर वाघ थोडा गुश्यातच उपरोधिक बोलला.
"तसे नाही. पण तुमच्यावर संशय घेण्याची सुरवात मीच केली म्हणून..." नवीन अपराधिपणाने बोलला.
"इट्स ऑल राईट. तुम्ही तुमचे कामच करत होतात. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. मीही नाही. आय लाईक युअर कॉन्सिएन्शीयसनेस! तुमची कर्तव्यनिष्ठा मला आवडली. मला खात्री आहे तुम्ही खूप प्रगती कराल! बाय!" 
मिस्टर वाघने नवीनचा निरोप घेतला आणि त्याची गाडी क्षणात दिसेनाशी झाली.


"फू... थँक्स टू गॉड! यावेळी तुम्ही कोणाला ठार मारले नाही. आणि सॉरी! मी सुद्धा आपल्यालावर डाउट घेतला होता!" मी उसासा टाकत बोललो. 
"कोणी सांगितले मी कोणाला मारले नाही?" गूढ हसत तो माझ्याकडे पहात म्हणाला. त्याच्या डोळ्यात चमक दिसत होती.
"म... म्हणजे?" मी घाबरलो. अडखळलो.
"त्या सगळ्यांना मीच मारलंय!" मिस्टर वाघने सवयी प्रमाणे बॉम्ब फोडला.
मी त्याचक्षणी भीतीच्या अंधारात कोंडला गेलो. अंगा - अंगावर शिरशिरी आली...
"आय हॅड किल्ड ऑल ऑफ देम!" 
असे बोलून त्याने त्याचे कृष्ण (?) कृत्य ठळक केले.
"पण का? त्यातील कोणीच गुन्हेगार नव्हते..." मी घाबरूनच होतो.
"पण कोणी इनोसेंटही नव्हते!" तो माझे बोलणे पूर्ण होण्या आधीच पटकन बोलला.
"अशाने सगळे गुन्हेगार तर मरतील, पण तरी एक मात्र जीवंत राहील!" मी ठामपणे मिस्टर वाघच्या डोळ्यांत रोखत बघून बोलून गेलो. 
तोही माझ्याकडे रोखून बघत होता. काहीच भाव नाहीत. मलाच कळले नाही हे असे कसे झाले... मी असा कसा बोललो...
         माझे हे बोलणे ऐकून तो उठला. माऊसर होलस्टरला खोचून घराबाहेर निघून गेला...
         मी मात्र स्तब्ध! 

        'हा तर आता चिडला! आता माझा तर नंबर नाही ना?...'