चलते चलते युही कोई मिल गया था - १

चलते चलते युही कोई मिल गया था.. - १

 

शनिवारचा दिवस होता. मुसळधार पाऊस पडत होता. असाच पाऊस पुढचा पूर्ण आठवडा पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून आला होता. साहजिकच आरवच्या आईला टेन्शन आल होत. त्याच कारण होत आरव!! रविवारचा दिवस आरव घरात बसून कधीच घालवायचा नाही. दर रविवारी ट्रेक किंवा आऊटिंग ठरलेल असायचं त्याच!! उद्या ट्रेक ला जाऊ नकोस अस आईने आरव ला सांगितलं होत पण तिला माहिती होत की आरव तिच काहीही ऐकणार नाही! कारण ऐकेल तो आरव कसला! आरवचा अट्टाहास असायचा की रविवारचा एक दिवस बाहेर हिंडण्यासाठीच ठेवायचा. आरव निसर्गात रमायचा. त्यात काहीही बदल करण्याची त्याची तयारी नसायची.

 

आईला कसही करून आरव ला उद्या बाहेर जाऊ नकोस हे पटवून द्यायचं होत. आरव नेहमी कोणत्या उद्योगात असायचा. त्यावेळी आरव सुद्धा जरा निवांत बसला होता. पाऊस पडल्यामुळे हवा थंड झाली होती. आईने आरव ला चहा आणू का विचारलं. तो सुद्धा हो म्हणाला आणि त्याच्या आईने चहा केला आणि आरवला दिला आणि त्याच्याशी बोलायला लागली.. आणि आईला गप्पांचा मूड होता. आरव च्या आईला त्याच्या लग्नाची चिंता सतावत होती त्याचबरोबर आरव च्या आई ला त्याचा ट्रेकिंग चा छंद फार रुचायचा नाही. आरव चा नसता हट्ट तिला नको असायचा पण आरव मात्र बदलायला आरवच्या आईने त्याला थांबवण्यासाठी शेवटचा प्रयत्न करण्यासाठी बोलण चालू केल,

 

"आरव.. सो आज निवांत भेटलास.. नाहीतर तुला कुठे वेळ?

 

"अस काही नाही ग आई.. तुझ्यासाठी नेहमीच आहे वेळ!! बर... आज बोलू...मस्त गप्पा मारू!!"

 

"हो हो.. काम कस चालूये?"

 

"काम मस्त बघ आई... आवडणार काम आहे मग मज्जा येते! तू कशी आहेस आई? सॉरी आई! तुला मी कधी हे विचारत नाही ना? मला तुझी काळजी नाही अस नाही ग आई, की मला तुझी काळजी नाही.. पण काही ना काही चालू असत.. मग मी बिझी असतो."

 

"सॉरी नको.. तुझी काळजी वाटते इतकच!! तुला म्हणल, लग्नासाठी मुली पाहू का? तर नको म्हणतोस... तुला कोणी आवडते का? त्याला सुद्धा नाही म्हणतोस!! लग्नाचं वय झालय तुझ.." आरव ने आईला मधेच थांबवलं.

 

"ए आई, प्लीज ग!! नको तो विषय.. इतकी मस्त हवा आहे. माज्या डोक्यात मस्त उद्याचे प्लान चालू आहेत आणि तू लग्नाबद्दल काय बोलती आहेस? लग्न होईल वेळ आली की.. सारख सारख तेच तेच बोलून लग्न थोडी ठरत... आणि यु नो, मुलगी बघून बिघून मी लग्न करणार नाहीये. बायको अशी हवी जी क्लिक होईल! अस वाटल पाहिजे, हीच ती... मग त्या नात्यात खरी मजा येईल!! ढकल गाडी नको व्हायला लग्न!!"

 

"आरव.. धन्य आहेस तू! कोणत्या जगात राहतोस काय माहित!! बर ते ठीके, सांग उद्या कुठे जाणार? आणि उद्या जायलाच पाहिजे अस थोडी आहे. इतका पाऊस येतोय... मग नको जाऊस उद्या!! दर रविवारी ट्रेक ला जातोस ना? मग एक दिवस न गेल्यानी काय मोठ आभाळ कोसळणारे?"

 

"आई.." आरव ने आईकडे पाहिलं. तिला मिठी मारली आणि तो बोलला, "तुला माहिती आहे आई, मी कित्येक वर्ष, म्हणजे ११वी मध्ये गेल्यापासून दर रविवारी बाहेर पडतो.. मला निसर्ग खुणावत असतो ग... आणि आज घरी थांबून करू काय? मला बाकी काही काम धंदे नाहीत.. त्यापेक्षा निसर्गात जाऊन फ्रेश होऊन येतो.. मग पुढचा आठवडा मस्त जातो!! मला निसर्गात गेल नाही तर कसतरीच होत."

 

"अरे पण आज हवा कशी आहे आरव! किती पाऊस पडतोय.. रस्ते निसरडे होतात. आपल्याला माहिती आहे हवा विचित्र आहे तरी ट्रेक चा अट्टाहास बरा नाही रे आरव! तू जातोस फिरायला आणि आमचा जीव टांगणीला लाऊन तू फिरत बसतोस. आणि तू अश्या ठिकाणी जातोस जिथे रेंज नसतेच!! मग आम्ही काय करायचं आरव?"

 

"ए आई, तू कोणता विषय कुठे नेतेस ग.. मी फार काही लांब जात नाही आणि माझ्याबरोबर माझे २ मित्र असतातच की.. मी एकटा नसतो. आणि २८ वर्षाचा झालोय आता.. सारख छोटा असल्यासारख का वागतेस आई? मला काळजी घेता येते! घाबरून घरात बसून राहिलो तर आयुष्य जगणार कधी आई?" आरव जोरजोरात हसत बोलला.

 

"हो हो.. तू आता मोठा झाला आहेस..." आरवची आई हसून बोलली "यु आर अ बिग बॉय.. आता नाही वागवणार लहान मुलासारख!" आरव च्या आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि परत बोलायला लागली, "आणि हो, तू आणि तुझे विचार माझ्या आकलनापलीकडे आहेत आरव! काय मजा येते इतकी निसर्गात कोण जाणे.. कर कर मज्जा पण काळजी मात्र घे! आणि स्वतःहून जरा फोन कर.."

 

"ओके आई... लव यु!!! आणि हो, काळजी घेतो! काळजी नसावी आईसाहेब!" आरव हे बोलला आणि दिलखुलास हसला त्याची आई सुद्धा त्याच्या बरोबर हसायला लागली.

 

"कसा रे आरव तू मिश्कील!! मला वाटणारी चिंता एका मिनिटात घालवून टाकलीस.. पण तुझी चिता वाटते रे.. कुठे हिंडत असतोस ते सांगून पण जात नाहीस! आल्यावर मस्त मस्त फोटो दाखवतोस पण आधी आमचा जीव अर्धा करतोस!"

 

"इतकी चिंता नाही करायची आई.. जे होणार ते होणारच आहे!"

 

"बर ठीके आरव, तू जिंकलास!! आता झोप लवकर आणि उद्या मस्त मज्जा कर!!"

 

"येस आई... बाय द वे, चहा आणि तुझ्याशी गप्पा- मस्त..वाटतंय!"

 

"मला पण छान वाटल.. तू झोप आणि मी पण झोपते!! उद्या लवकर उठायचं आहे. गुड नाईट!!" आई इतक बोलली आणि तिच्या रूम मध्ये गेली. पण आरवचे विचार मात्र तिच्या मनातून जात नव्हते. त्याच विचारात आई कधी झोपली तिला कळल नाही..

 

***

Rate & Review

Verified icon

VaV 6 months ago

Verified icon

APK 6 months ago

Verified icon

Surekha 7 months ago

Verified icon

Anita Chandurkar 7 months ago