चलते चलते युही कोई मिल गया था... - २

चलते चलते युही कोई मिल गया था... - २

 

आरव रविवारी पहाटेच उठला आणि त्याने पटापट आवरलं.. तो निघणार तितक्यात त्याच्या मित्राचा फोन आला आणि त्याने सांगितलं की दोघांना आज त्याच्या बरोबर यायला जमणार नाहीये... आता आरव विचारात पडला... तितक्यात आई समोरून आली आणि ती बोलायला लागली,

 

"इतक्या सकाळी कोणाचा फोन होता आरव?"

 

"आई.. आज जय आणि सिद्धार्थ दोघ येत नाहीयेत.. सो आज अजून मज्जा येणार!! मी एकटाच जाणार."

 

"नको जाऊस आरव.. आज तुझे मित्र पण नाहीयेत!!"

 

"काही होत नाही ग आई.. माझ सगळ आवरून झाल आहे आणि मी नाही चुकवणार माझा नेम!!! कोणी नाही आल म्हणजे मी जायचं नाही अस थोडी असत. आयुष्य कोणावर अवलंबून नाही ठेवायचं."

 

"बरोबर आहे आरव..पण तू एकटा आणि पाऊस कमी होत नाहीये...मग तरी अट्टाहास का?"

 

"बस.. आई इथे! भित्यापाठी ब्रम्हराक्षस.. पाऊस पडला की अपघात होणारच ही आयडिया डोक्यातून काढून टाक... अस काही नाही की मला बाहेर जायला गाडीच हवी!! आई...तू म्हणजे ना.."

 

"ठीके..म्हणजे तू जाणारच आहेस म्हणजे!!"

 

आरव हसला.. आणि बोलायला लागला, "हो आई..तुला माहितीये, मला इन मीन ४ मित्र पण नाहीयेत.. मग कोणासाठी थांबून माझ आयुष्य जगण का थांबवू ना?"

 

"ठीके ठीके... पटल सगळ तुझ... पण जपून जा.. आणि मजा कर!!!"

 

"येस आई... मी निघेन १० मिनिटात..."

 

इतक बोलून आरव त्याची सॅक घ्यायला त्याच्या खोलीत गेला. तो तयार झाला आणि निघाला..त्याने आई ला बाय केल आणि निघाला.. पाऊस अजूनच वाढला होता. त्याने जी मिळेल ती बस पकडली आणि मधेच उतरला. आज त्याने काहीच ठरवलं नव्हत कुठे भटकंती करायची.. धुवांधार पाऊसात जिथे वाट नेईल तिथे आरव जात होता. त्याने आड वाट निवडली. आरव कधीच एकट हिंडायला घाबरायचा नाही. त्या दिवशीही पाऊस आरव ला थांबवू शकला नाही. आरव पाऊसाला न जुमानता चालत होता. ह्यावेळी तो फक्त वाट नेईल तिथे जाणार होता. इतक्या पाऊसात एकही पक्षी बाहेर नव्हता. पक्षी सोडाच, दूर दूर पर्यंत एकही माणूस दिसत न्हवता. आरव स्वतःशीच हसला आणि स्वतःशीच बोलला,

 

"कसा आहे निसर्ग... रौद्र रूप धारण केल की कोणाच ऐकत नाही आणि सगळ्यांना घाबरवून सोडतो! असो..आपण आपल ठरल्याप्रमाणे चालत राहू.."

 

पाऊस आरवच्या अंगावर कोसळत होता. आणि प्रत्येक थेंब त्याला नवीन अनुभूती करून देत होता. प्रत्येक थेंब अंगावर घेत आरव झपाझप पाऊलं टाकत चालत होता. त्यादिवशी आरव नेहमीपेक्षा जरा जास्तीच खुश होता. ह्यावेळी निसर्गाच वेगळंच रूप तो अनुभवत होता आणि प्रत्येक क्षण एन्जॉय करत होता. चालता चालता त्याला हळू आवाजात 'हेल्प हेल्प' असा आवाज ऐकू आला. त्याने नीट ऐकल. आवाज मुलीचा होता. आरव जरा सावध झाला आणि त्याने आवाजाचा पाठलाग करायला सुरु केल. पुढे जाता जाता तो आवाज वाढल्यासारख त्याला जाणवलं आणि आपण बरोबर दिशेने जातोय ह्याची खात्री आरव ला झाली. आणि थोड अंतर पार केल्यावर त्याला झाडाखाली उभ राहून ओरडणारी एक गोंडस मुलगी दिसली. त्या मुलीचा चेहरा एकदमच नाजूक होता. ती अतिशय गोड दिसत होती. तला पाहून आरवच भान एकदम हरपूनच गेल. तिने देखील आरवला पाहिलं आणि ती ओरडायची थांबली.. ती थोडीशी शांत झाली. आकाशाकड पाहिलं आणि स्वतःशीच बोलायला लागली,

 

"थँक्यू गॉड.. माझी प्रार्थना ऐकलीस!"

 

आरव पुन्हा त्या मुलीकडे पाहून हसला. आता मात्र ती मुलगी चिडली. आणि तावातावाने बोलायला लागली,

 

"हसतोस काय? एकटा कधी पाऊसात अडकला नाहीयेस. म्हणून तुला काही माहिती नाही." कुडकुडत ती मुलगी बोलत होती.

 

"बर..नाही हसत! पण तुला काय माहिती मी एकटा कधी पाऊसात अडकलोय की नाही?"

 

"ए मुला,ही वेळ आहे का भांडायची..मला माझ्या ग्रुप शोधायला मदत कर.."

 

"ठीके.. तू ग्रुप बरोबर आली होतीस ना? मग तू एकटी कशी राहिलीस? आय मीन, तुला एकटीला सोडून कसे गेले सगळे?"

 

"नाही माहिती मला...मला काहीच आठवत नाही काय झाल होत..पण मी ग्रुप बरोबर आले होते..आणि इथे एकटी आहे सो मी खूप घाबरले आहे..." थोडा विचार करत ती मुलगी बोलली..

 

"आठवत नाही काही अस कस? असो..."

 

तितक्यात ती मुलगी शिंकली.. आरव ला हसू आल पण हसू आवरत तो बोलला,

 

"तू तर पूर्ण भिजली आहेस.. आजारी पडशील.. झेपत नाही तर कश्याला करायचे नसते धंदे? आय थिंक,पहिल्यांदीच आलीस अशी..म्हणून यु वर सो केअरलेस.."

 

"एक शिंक आली फक्त... इतक काही नाही.. आणि हो! पहिल्यादीच आलो... काहीतरी थ्रील हव होत..बर, आधी मला कुठेतरी माणसात नेऊन सोड रे..मग मी शोधेन माझे मित्र कुठे आहेत.. आणि हा मोबाईल पण काही कामाचा नसतो.. जेव्हा गरज तेव्हा रेंज नसते!"

 

"हो अग.. इतका पाऊस आहे.. न आड ठिकाणी रेंज मिळतच नाही.. पण डोंट वरी! आपण मुख्य रस्त्यावर आलो की रेंज येईल.. आय थिंक,आपण चालयाला लागू..मग कुठेतरी पोचूच! म्हणजे मला रस्ता माहिती नाही.. मी पण असाच कुठेतरी फिरायला म्हणून इथे आलो.. आणि इथे पहिल्यांदीच आलोय..रस्ता मिळेल तिथे चालत राहिलो.. कुठे आलोय हे सुद्धा नाही माहिती पण मिळेल रस्ता घाबरू नकोस!! आपण चालायला लागू.." दोघ चालायला लागले..

 

"काय.." ती मुलगी किंचाळली, "तुला पण रस्ता माहित नाही? ओ गॉड.."

 

"आपण कुठे जंगलात आलो नाहियोत.. इतक ओव्हर अॅक्टींग नको करूस.. मै हु ना.. मी तुला बरोबर बाहेर नेतो इथून!"

 

"हाहा..मै हु ना? फुल ऑन फिल्मी!! ठीके! तुझ नाव काय?"

 

"आरव..तू?"

 

"मी विशाखा! तू नेहमी फिरतोस का असा एकटा?"

 

"हो म्हणजे नाही... मी आणि २ मित्र आम्ही हिंडतो खूप पण आज ते दोघ आले नाहीत पण मी माझा नेम चुकवत नाही सो एकटाच आलो.. आज एकटा आलो म्हणून आधी हो म्हणालो आणि नेहमी मित्र असतात..  आज आड वाटेला आलो.. काहीही न ठरवता! आणि तुला भेटलो.. हाहा! तू गोड आहेस बाय द वे.. "हसत आरव बोलला,

 

"ओह.. इंटरेस्टिंग... नेम चुकवत नाही फिरायचा!! आणि मी गोड आहे? सरळ सरळ फ्लर्ट?" भुवया उंचावत

 

"गोड आहे हे सांगण फ्लर्ट थोडी असत.. आता तू मला हॅन्डसम म्हणालीस तर मी थोडी अस म्हणेन?" आरवला हसू दाबता येत नव्हत तरी तो हसू दाबत बोलला..त्यानंतर मात्र तो शांत झाला.. त्यानंतर विशाखा सुद्धा काही बोलली नाही. दोघ फक्त चालत होते...

 

दोघ चालत होते. पाऊस सुद्धा थोडा कमी झाला. आणि बऱ्यापैकी चालून झाल्यावर आरव ने विशाखाला मेन रस्त्यावर आणून सोडलं..

 

"अरे वा.. आणून सोडलास आरव मला सुखरूप! थॅंक्यू थॅंक्यू सो मच.." इतक बोलून तिने आरव ला मिठी मारली...आरवसाठी ही मिठी अनपेक्षित होती. आरव ला काय कराव हे सुचल नाही त्यामुळे तो स्तब्ध उभा राहिला.. काही क्षणातच विशाखा भानावर आली. ती आरव पासून लांब गेली आणि बोलायला लागली,

 

"सॉरी! मला वाटलेलं आता मी हरवलेच आहे..आता सगळ संपल असच वाटल होत..पण तू भेटलास! आणि मी सुखरूप आहे.. माझा भावनांवर सय्यम राहिला नाही आणि मी तुला हग केल. सॉरी.."

 

"इट्स ओके.." आरव बोलला पण त्याला विशाखाच्या मिठी मुळे काहीतरी वेगळेच वाटले होते. आरव अजून पूर्ण भानावर आला न्हवता पण तरी तो बोलला, "मी जातो आता.. आय होप, इथून नीट जाशील!" गोंधळलेल्या स्थितीत आरव बोलला..

 

"हो हो.. इथे रेंज आहे.. आणि समोरच बस उभी आहे.. मी जाईन."

 

तितक्यात समोरून तिचे मित्र आले. विशाखा खुश झाली आणि तिने मागे वळून देखील पहिले नाही, आरवशी काहीही बोलता तिथून निघून गेली.. आरव ला तेव्हा कसतरीच झाल.. तो त्याच्या विचारात गुंग झाला.. त्याच्या मनातून विशाखा जात नव्हती. मग मात्र तो तिथे थांबला नाही.. त्याने बस पकडली आणि काही वेळात घरी पोचला..

 

***

Rate & Review

Verified icon

VaV 7 months ago

Verified icon

APK 6 months ago

Verified icon

Surekha 7 months ago

Verified icon

Anita Chandurkar 7 months ago