चलते चलते युही कोई मिल गया था... - ३

चलते चलते युही कोई मिल गया था... - ३

 

घराच दार उघड होत त्यामुळे आरव सरळ आत शिरला.. आरव घरी आला खरा पण तो त्याच्याच विचारात हरवला होता. ओला चिंब झालेल्या आरवच मन सुद्धा ओलं चिंब झाल होत.. त्याच्या मनातून आणि डोक्यातून विशाखा जातच नव्हती. आरव घरी गेल्या गेल्या आधी बाथरूम मध्ये शिरला..

 

अंघोळ करून एकटाच सोफ्यावर बसून राहिला..  अनपेक्षितपणे झालेली भेट आरवच्या मनातून जात नव्हती. विशाखाचा गोड चेहरा त्याच्या नजरेसमोरून हलत नव्हता. आरव विशाखाच्या विचारात होता तितक्यात समोरून त्याची आई आली,

 

"कधी आलास आरव? मला तर कळल पण नाही..इतक्या लवकर येशील अस वाटलंच नव्हत..आणि तू फोन नाही केलास आरव.. आम्ही वाट पाहत होतो तुझ्या फोन ची...."

 

"आलो मगाशीच.. आज भयानक पाऊस होता. भीती वाटेल असा आई..आणि इतका पाऊस होता..सो नाही जमल फोन करायला..सॉरी!"

 

"सॉरी नको रे.. पण तुझी सारखी काळजी राहून लागते...तरी मी सांगत होते.. जाऊ नकोस.. पण असो, सुखरूप आलास ते महत्वाच!!"

 

"आई, इथे माझ्यापाशी बस ना.. आज मला काहीतरी वेगळाच अनुभव आला.. आणि मी ते विचार थांबवू शकत नाहीये.."

 

"आले आले..." अस म्हणत आई आरव पाशी बसली, "सांग, काय झाल? आल्यापासून तू एकदम शांत शांत झाला आहेस आज.."

 

"आई, आज काहीतरी वेगळंच झाल... आणि जे झाल त्यानी मला फार अस्वस्थ केल..."

 

"तू सांग तर खर... कुठे पडला नाहीस ना? किंवा काही भीतीदायक पाहिलं नाहीस ना?"

 

"नाही ग आई... ऐक ना.. मी काहीतरी वेगळंच सांगणारे..."

 

"बर तू बोल..मी नाही करत मध्ये डिस्टर्ब..."

 

"हो.. आता ऐक, आज पाऊस कोसळत होता आणि मी नेहमीच आड वाटेनी जात असतो.. आज सुद्धा गेलो तेव्हा एक मुलगी पाऊसात ओली चिंब भिजली होती. ती जीवाच्या आकांताने मदत मागत होती.. रस्त्यावर कोणीच नव्हत... फक्त ती आणि मी... मी तिला पाहिलं आणि तिची मदत केली.. पण पाहता पाहता ती माझ्या नजरेसमोरून कुठेतरी दूर गेली... माझ मन सैरभर झाल.. हीच ती मुलगी जिला मी शोधात होतो अस वाटल..मला त्या मुलीला भेटायची ओढ इतकी वाढली आहे.. पण त्या मुलीने काहीच माहिती नाही सांगितली...फक्त नाव सांगितलं.. तीच मला माझ्या आयुष्यात हवी आहे ग.. पण नाही माहित तिला कस शोधू... काय करू मी? नाही विसरता येत मला त्या मुलीला.." आरव काकुळतीला येऊन बोलला.. "मला माहिती होती कोणीतरी माझ्यासाठी नक्की मिळेल पण ती अशी अचानक भेटली की तिचा पत्ता, पूर्ण नाव, गाव काहीच माहिती नाही मला.. काय ग असत आयुष्य आई.. देव देतो पण अर्धवट.."

 

आईने आरव चे बोलणे ऐकून घेतले..जरा विचार केला आणि त्याच डोक आपल्या मांडीवर ठेवलं...मग ती बोलायला लागली,

 

"आरव, मी एक सांगू.. अस होत कधी कधी की आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो आणि ती मनातून जात नाही... पण तिच्या बद्दल काही माहिती नाही याचा अर्थ, तुमची भेट तितक्या वेळेपूरतीच होते. तुला ती मुलगी क्लिक झाली...आतून आवाज आला हीच ती... पण शहाणा असशील तर तिचा विचार बंद कर..तू त्या मुलीला मदत केलीस ह्याचा मला सुद्धा आंनद आहे. ते मुलगी सुखरूप आहे ही अत्यंत उत्तम गोष्ट झाली. पण तू कुठे शोधणार तिला? म्हणजे नुसत्या नावावर कस काय शोधणार तू त्या मुलीला? निस्ता वेळ वाया घालवण असेल ते.... त्यामुळे त्या मुलीचा विचार सोड आणि मला काही स्थळ आली आहेत त्यांना भेटून घे.. काय माहिती, तुझी खरी जीवनसाथी ह्या स्थळांपैकी कोणी असेल.. आणि ज्यातून काही सध्या होणार नाही अश्या गोष्टींचा विचार बंद कारण कधीही चांगल असत."

 

विशाखा ला भेटल्यापासून आरव सैरभर झाला होता. पण ह्यातून बाहेर येण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे होते. आरव ने बराच वेळ काहीतरी विचार केला.. वतन वेगळ.. आणि जे वाटेल ते होईलच अस नसत हे आरव ला कळून चुकल होत.. शेवटी आरव बोलला,

 

"ठीके आई.. प्रक्टिकल राहील पाहिजे....कोणीतरी भेटेल, क्लिक होईल हे सगळ परीकथेत ठीक आहे.. खऱ्या आयुष्यात असले फंडे चालत नाहीत. बरोबर होत तुझ.. एकट्याने आयुष्य काढता येणार नाही मग सुंदर जोडीदार तर हवाच आणि तो शोधायलाच पाहिजे..आकाशातून नाही येणार..मी माझ्या मतांवर ठाम होतो पण आता अस वाटाय, देवाची मर्जी काही वेगळीच आहे."

 

आईने आरव च बोलण ऐकून घेतलं.. हसली आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. मग बोलायला लागली,

 

"तुला तेल लाऊन देऊ का आरव? कसे झालेत केस बघ.."

 

"हो.. दे तेल लाऊन... मग झोपेन तुझ्या मांडीवर.." आईने तेल आणल आणि ती आरव ला लावायला लागली,

 

"आरव नको लाऊन घेऊस मनाला...मला माहितीये, तुझ्या मनातून ती भेटलेली मुलगी जात नाहीये. नको करूस तिचा विचार.. खूप लोकं भेटतात अशी आणि जातात.. प्रत्येकाबद्दल तर विचार नाही करू शकत आपण.. आणि हो.. मी ठरवते मुलीला भेटायला जायचं...तुझ्या काकूने २ मुली सांगितल्या आहेत. त्यातली एक मला आवडली आहे. आरुषी नाव आहे तिचं.." आरव आईच बोलण ऐकत होता..

 

"ठीके आई...तू ठरव दिवस आणि वार..भेटेन मी आरुषी ला..कोण जाणे, ती पण मला क्लिक होईल..." आरव बोलला आणि आपल दुख लपवत हसला..

 

"काळजी करू नकोस आरव.. सगळ नीट होईल..पण प्लीज आरव, ही विशाखा चा विचार करून नको येउस त्या मुलीला भेटायला.. म्हणजे मोकळ्या मनाने भेट.."

 

"हो.. पण कस विसरू विशाखाला? लव अॅट फर्स्ट साईट होत ग आई...तिच माझी जोडीदार अस क्लिक झाल होत.. पण सगळ इतक अनपेक्षित होत की मी काही बोलूच शकलो नाही तिच्याशी...जाऊदे.. किती विचार करू? आता डोक फुटायची वेळ आली आहे.... "

 

"मला समजू शकत.. आपण लवकरात लवकर मार्ग काढू... तू असा असलास की पहाववत नाही आरव.. हो फ्रेश आणि तुझे जुने फोटो दाखव.. काहीतरी जुने किस्से सांग तुझ्या ट्रेकिंगचे..."

 

"हो आई... चालेल!! आम्ही ना एकदा ३घे गेलो होतो तेव्हा पण असाच पाऊस आला... समोरच काही दिसत नव्हत इतका पाऊस.. आणि ऐक ना....." आरव बराच वेळ आईशी बोलत होता. त्याचे जुने किस्से सांगत होता. थोड्या वेळा करता का होईना, त्याला विशाखा चा विसर पडला होता.

 

***

Rate & Review

Verified icon

APK 6 months ago

Verified icon

VaV 6 months ago

Verified icon

Surekha 7 months ago

Verified icon

Anita Chandurkar 7 months ago