चलते चलते युही कोई मिल गया था... शेवटचा भाग - ४

चलते चलते युही कोई मिल गया था... - शेवटचा भाग ४

 

आईने मुलीच्या आईशी बोलून भेटायचा दिवस पक्का केला होता. आरव च्या मनात चलबिचल होत होती. पण आता आरव ला विशाखाचा विचार काहीही करून मनातून काढायचा होता. त्यामुळे त्याला काही निर्णय घेणे भाग होते. आरुषी ला भेटायला नक्की केलेला दिवस उजाडला. आरव थोडा अस्वस्थ होता. पण फ्रेश होऊन आरव ला आरुषी ला भेटायचं होत. सगळे विचार पुसत नवी सुरवात करायची होती. आरव अगदी नीट तयार झाला आणि बाहेर आला. त्याची आई आणि वडील त्यांची वाट पाहतच होते.

 

"छान दिसतो आहेस आरव.." आई आरव कडे पाहून हसली.. आणि मस्त परफ्युम चा फवारा आरव वर मारला..

 

"आई.. काय करती आहेस?" आरव ओरडला...

 

"काही नाही रे..तुझ्या बाबांनी आणलाय बघ हे परफ्युम... सुंदर वास आहे ना?"

 

"ओह..बाबांनी आणलेलं परफ्युम? छान आहे वास... पण इतक का लावलंस आई.. कस वाटत, इतका भपका आला तर.." आरव हसला..

 

"असू दे रे.. पहिल्यांदी मुलगी पाहायला जातो आहेस.. मुलीकडच्या लोकांना पण छान वाटल पाहिजे तुला भेटून.."

 

"हाहाहा.... " आरव मनसोक्त हसला.."आई तू खूप खुश आहेस ना..मी शेवटी मुलगी पाहायला होकार दिला आणि आज येतो सुद्धा आहे?"

 

"हो रे आरव... तुला कोणी चांगला जोडीदार मिळावा अस नेहमीच वाटत आम्हाला.. चल आता उशीर नको करूस! वेळेत जाऊ.."

 

"हो आई.. पण कशी ना माझी मतं बदलली.. " आरव स्वतःशीच हसला, "माझ आवरल आहेच.. निघू आपण!!"

 

आरव इतक बोलला आणि तिघे आरुषी च्या घरी जायला निघाले.. घरी पोचली. घर मस्त होत. सुंदर सजवलं होत. त्याचे उत्तम आदरातिथ्य झाले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि शेवटी आरुषी बाहेर आली...

 

"हेलो...मी आरुषी.." आरुषी बोलली... आरव तिच्या वडिलांशी बोलण्यात गुंग होता पण आरुषीचा आवाज ऐकला  आणि वळून तिच्याकडे पाहिलं आणि तिच्याकडेच पाहत राहीला... आणि स्वतःशी पुटपुटला.. "विशाखा?"

 

आरुषी ला अस्पष्ट अस काहीतरी ऐकू आल.. "काय म्हणलात?"

 

"काही नाही.. "

 

"काही नाही कस? मला अस्पष्ट विशाखा ऐकू आल.."

 

"न न नाही... पण खर म्हणजे हो! मी विशाखाच म्हणलो होतो..."

 

"ओह... विशाखा माझी बहिण.. जुळी बहिण! पण तुम्हाला कस माहिती तिच्याबद्दल?"

 

आरव आरुषीचे बोलण ऐकत होता...आणि तो एकदम उडलाच..."काय?"

 

आरुषी ला काय चालू आहे हे कळेना..आणि तिने जोरात ओरडून विशाखा ला हाक मारली..."विशाखा.. जरा बाहेर ये!!"

 

आरव च्या आई वडिलांना आणि आरुषीच्या आई वडिलांना हे सगळ काय चालूये काहीच कळत नव्हत. सगळे काय होतंय ते फक्त पाहत होते. कोणी काहीच बोलले नाही.. तितक्यात विशाखा बाहेर आली आणि आरव ला पाहून ओरडलीच..

 

"आरव..तू? दुसऱ्यांदा भेटलास तो इथे आणि असा? मी न त्या दिवशी भांबावून गेले होते. त्यामुळे तुझा पत्ता, फोन काहीच घेतलं नाही.. तू भेटलास.. मला सुखरूप आणलस हे सगळ इतक अचानक होत की....आणि मग माझे मित्र आले सो मी तिथे थांबलेच नाही...पण मला आनंद आहे आपण शेवटी भेटलोच...सगळ्यात आधी खूप थँक्स.."

 

"कोणी आम्हाला सांगेल का की दोघ काय बोलताय?" आरव ची आई बोलली..ते जाणून घ्यायची उत्सुकता तिथे बसलेल्या सगळ्यांना होती.

 

आरव आणि विशाखाने झालेला सगळा प्रकार सांगितला.. आरव ची आई तर आवाक झाली... आरव च्या आईला माहिती होत, आरव ला विशाखा किती आवडली आहे.. पण तिचा काहीच पत्ता नसल्यामुळे तिच्याशी संपर्क कारण फार अवघड होत. आरव ज्या मुलीच्या विचारांपासून लांब जायचा प्रयत्न करत होता तीच मुलगी आरव ला भेटली होती. बराच वेळ सगळे झालेला किस्सा ऐकण्यात मग्न झाले.. शेवटी आरव ने विशाखा ला हटके अंदाजात प्रपोज केल,

 

"विशाखा, माझ्याबरोबर दर रविवारी ट्रेक ला येशील? आणि अर्थात, पूर्ण आयुष्य माझी साठी देशील? मी पण प्रत्येक वेळी तुझ्याबरोबर असेल हे माझे शब्द आहेत.."

 

आरव च हे बोलण ऐकून विशाखा नाही म्हणण शक्यच नव्हत. शेवटी आरव च आणि विशाखाच लग्न फायनल झाल..

 

शेवटी आरव हे सुद्धा बोलला की त्याला विशाखा आवडली आहे. आरुषी ने सगळ ऐकून कपाळाला हात मारून घेतला,

 

"विशाखा मला म्हणाली होती.. आरव नावाच्या मुलाने मला सुखरूप आणून सोडल पण मी ते विसरले आणि अजून म्हणजे अस काही होईल मला वाटलंच नाही... मी सांगत होते आईला.. मला आत्ता लग्न बिग्न करायचं नाहीये पण आईने आरव ला भेटायची बळजुबरी केली..मी ५ मिनिटांनी मोठी म्हणून आधी माझ लग्न व्हाव अशी इच्छा होती आईची.. आणि आरव, पुढच तुम्ही पाहून घ्या. मी जाते आणि आधी साडी बदलून येते..." आरुषी मनापासून हसत बोलली..आणि कपडे बदलायला तिच्या खोलीत गेली...

 

आरव चे आई बाबा आणि विशाखाचे आई बाबा एकमेकांकडे पाहून हसले..आणि दोघांनी विशाखाला आरव बद्दल काय वाटतय ते विचारलं...विशाखा ने थोडा विचार केला नी तिला आरव बरोबर अजून भेटायला काही प्रॉब्लेम नाही हे सांगितलं. विशाखा ने होकार सांगितला तरी आरव शांत बसून होता. त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.. एकदम शून्यात हरवल्यासारखा झाला आरव.. आणि एकदम गाण गुणगुणायला लागला,

 

"चलते चलते युही कोई...मिल गया था..." आणि हसला... आणि त्याच्या हसण्यात सगळेच सामील झाले.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 

 

 

 

 

 

 

***

Rate & Review

Verified icon

VaV 6 months ago

Verified icon

APK 6 months ago

Verified icon

Surekha 6 months ago