आभा आणि रोहित...- २

आभा आणि रोहित...- २  

 

संध्याकाळी ४ वाजले.. आभा रोहित ला भेटण्यासाठी तयार होत होती.. तयार होतांना आभा च्या मनात बरेच गोंधळ चालू होते. पण तरीही तिला इतल्या लवकर लग्न करायचं नव्हत. तिला लग्नासाठी कोणालाही भेटायचं सुद्धा नव्हत. पहिल्यांदीच ती लग्नासाठी मुलगा पाहायला जाणार होती आणि ती सुद्धा एकटीच! तिच्या मनाची घालमेल थांबत नव्हती. पण काही गोष्टी तिच्या मनात नक्की होत्या त्यामुळे मनोमन रोहित ला कसा नकार द्यायचा हे ठरवत होती.. तिच्यासाठी लग्न कधीच इतक महत्वाच नव्हत. तिच्या काही इच्छा आकांशा होत्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी तिच्यात जिद्द देखील होती.

 

आवरून आभा निघाली आणि हॉटेल मध्ये आली. तिनी चौफेर नजर फिरवली.. तिला रोहित कुठेच दिसला नाही! तिनी रोहित ला फोन लावला...

 

"इज धिस रोहित?"

 

"येस..स्पिकिंग!! मे आय नो, व्हू इज स्पिकिंग?" रोहित बोलला. रोहित च हे बोलण आभासाठी विचित्र होत. आपण ज्या मुलाला भेटायला आलोय आणि त्याच्याकडे तिचा नंबर सेव्ह नाही ह्या विचाराने आभा एकदम चिडलीच! आणि त्याच बोलण ऐकून आभा वैतागली...आणि वैतागून बोलायला लागली,

 

"कोण बोलताय काय? तुझ्या आईनी माझा नंबर दिला न्हवता?" आभा चा आवाज चढला..अर्थात, हे होणे स्वाभाविक होते..रोहित कडे आभाचा नंबर सेव्ह असायला पाहिजे होता. "आणि कुठे आहेस? मी काय तुला शोधत हॉटेल भर हिंडू का आता? आपण भेटणार होतो मग माझा नंबर तू सेव्ह करायला हवा होतास ना..मला खर तर तुला भेटची अजिबात इच्छा नाहीय पण...आपण भेटतोय तरी कशाला?" आभा रोहितशी उखडून बोलत चालत होती...तिच बोलण ऐकून रोहित ला हसू येत होत पण त्याने हसू दाबलं..आणि तो बोलायला लागला,

 

"हो की...आई म्हणाली होती तुझा नंबर सेव्ह करून ठेव..सॉरी! विसरूनच गेलो सेव्ह करायला तुझा नंबर! म्हणजे कामात जरा बिझी होतो. व्हेरी सॉरी! आणि आलीयेस तर भेटून जा.. परत असा चान्स मिळणार नाही!" रोहित मिशिकपणे बोलला, "बर,कुठे आलीयेस तू? कोणते कपडे घातले आहेस? आणि मी इथेच आहे! मी नेहमी वेळेच्या आधी येतो..पण मला तू कुठेच दिसत नाहीयेस!" रोहित आभा ला आणि आभा रोहित ला शोधत हिंडत होते! एकदा मोबाईल, एकदा आजूबाजूला पाहत दोघे चालत होते. चालता चालता दोघांची एकमेकांना टक्कर झाली.. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. आणि आभा ओरडली..

 

"हळू की.. जरा बघून चालाव माणसांनी!" पण तिला एकदम लक्षात आल तो रोहित आहे!! आणि आभाचा राग मावळला..ती हसायला लागली आणि रोहित सुद्धा जोरात हसायला लागला..

 

"कुठे होतास? मी तुला शोधलं होत पण मला तू कुठेच नाही दिसलास!! मी तर चिडले होते.. आणि तू धडकलास  काय.. ओह माय गॉड!! मला न्हवत वाटल आपली भेट अश्या पद्धतीनी होईल.. आणि कोण बोलताय अस फोन वर बोललास तेव्हा तर मी फार चिडले होते. आणि मला वाटलेलं तू मला रिसीव्ह करशील..म्हणजे मला वाटलेलं आपण एकदम फोर्मल पद्धतीनी भेटू..पण आपण तर मजेदार पद्धतीनी भेटलो.." आभा हसत बोलली...

 

"हाहा.. आपली पहिली भेट अश्या पद्धतीनी होणार होती म्हणजे!! वॉव! मला तर वाटलेलं आपण समोरासमोर भेटू आणि आपल सिरिअस बोलण चालू होईल! त्या आधी शांतता असेल. कोणीच आधी बोलणार नाही. मग आपल्यापैकी कोणीतरी तुझ नाव काय... अस बोलण चालू करेल... मग खूप वेळानी तू मला काहीतरी विचारशील.. मी तुला काहीतरी सांगेन!!! मी तुला काहीतरी विचारेन आणि तू काहीतरी सांगशील! पण तस काहीच झालंच नाही!! आपण एकमेकांना धडकलो! आणि आय गॉट टू नो, यु गेट अॅन्ग्री!! मस्त.. इतक्या लगेच स्वभावाचे विशेष गुण कळत नाहीत..." रोहित ने विशेष शब्दावर जरा जोर दिला.. "पण मला कळल..क्रेझी! मला खर वाटल होत तुझा फोटो पाहून कि तू एकदम सिरिअस टाइप्स असशील.. तू चिडकी आहेस पण यु लुक इंटरेस्टिंग!!"

 

"हो का? बाय द वे, विशेष शब्दावर जॉब का दिलस? हाहा..आणि तू किती बोलतोस!! तुला बोलायला आवडत म्हणजे.. आणि खरय, उगाच फोर्मल बोलण चालू नाही झाल.. मला तर जाम बोर झाल असत आपण सिरिअस बोलायला लागलो असतो तर.. खर तर मला भेटायचं नव्हतच! पण आईने फोर्स केल त्यामुळे आपण आज भेटतोय..बर.. आपण उभ्याने बोलायचं आहे का? की आता कुठेतरी बसून बोलायचं?"

 

"हो की... मी विसरलोच!!! सॉरी. मी टेबल बुक केल आहे! व्हेरी सॉरी..मी सांगायला विसरलो की कोणत टेबल बुक केल आहे. आणि आपण मस्त पद्धतीनी भेटणार होतो तसे भेटलो..मला आज मजा येणारे तुझ्याबरोबर!!!" रोहित बोलला...

 

"ओह.. आय सी! लगेच तुझा विचार करून मोकळा.. इतक्या लगेच कोणाबद्दल मते बनवू नये.. तू मला ओळखतही नाहीस... पहिल्यांदी भेटतोय आपण तरी इतका कॉन्फिडन्स?"

 

"मग.. आहेच माझ्यात कॉन्फिडन्स...उगाच नाही बिझिनेस चा इतका पसारा सांभाळत..बर आपण आधी बसू मग बोलू.."

 

दोघ जाऊन बसले आणि बोलायला लागले..रोहित बाकी काही न बोलता लगेच मेनू कार्ड पाहायला लागला..आणि त्यानी मेनू कार्ड पाहताच आभाला विचारलं,

 

"तू काय खाणार?"

 

"मी काहीतरी लाईट घेईन.. ऑर फक्त ज्यूस विल बी गुड!" आभा बोलली..तिने मेनू कार्ड पहिले सुद्धा नाही.

 

"फक्त ज्यूस? हाहा! भूक बिक लागत नाही का तुला?" आपल हसू आवरत रोहित बोलला, "सॉरी सॉरी! हसायचं न्हवत! पण आय कुड नॉट कंट्रोल... आणि मी करतो ऑर्डर! पी तू फक्त ज्यूस! मी तर भरपेट खाणारे! इथे सगळाच मस्त मिळत.. त्यामुळे मी माझ्या पोटाचे लाड करतो इथे आल्यावर!!" रोहित इतक बोलला आणि त्यानी ऑर्डर दिली.. मेनू कार्ड टेबल वर ठेवलं आणि तो बोलायला लागला..."सगळ्यात आधी, तू खूप सुंदर दिसतेस!! तुझ्या चेहऱ्यावर वेगळच तेज आहे! सांग, तू काय करतेस? म्हणजे मला आईनी ढोबळ कल्पना दिली आहे.. पण मला ते तुझ्याकडून ऐकायला आवडेल!"

 

"हास हास.. हसण चांगल असत! मी कमीच खाते.. उगाच पोटात भरायला मला नाही आवडत!! आणि ओह.. माझी माहिती माझ्याकडून ऐकायचं आहे? खर तर जे तुला माहिती नाही ते मला सांगायला आवडेल मला.. बाकी तुला माहिती असेल.. तुला माहित नसेल हे सांगते! ही माहिती मी कुठेही सांगितली न्हवती कारण मला माझी स्वप्न सगळ्यांसमोर उघड करायला आवडत नाहीत! सगळ्यात आधी सांगते... मी मुक्त जगते! म्हणजे मला कोणतीही बंधन नको आहेत! म्हणजे लग्न झाल म्हणून माझ फ्रीडम गेलेलं मला आवडणार नाही!! ते शक्य असेल तरच आपण पुढे बोलूयात? म्हणजे तुझा आणि माझा वेळ उगाच जाणार नाही! आपण इतर बोलू पण लग्नाच्या दृष्टीनी नाही.. चालेल का?" आभा बोलतांना थोडी सिरिअस झाली..पण रोहित ला तिचे विचार ऐकून फार फार्क पडला नव्हता.

 

"वा.. तुझे विचार क्लिअर आहेत म्हणजे!! नाईस टू नो!!! आणि फोर्मल नकोच बोलायला.. अस थोडी आहे आज बोललो आणि उद्या लग्न फायनल? मी तुला बघायला आलोय आणि आपण बोलतोय असा विचार देखील मनात आणू नकोस आभा!!" रोहित च बोलण पूर्ण केल आणि ते ऐकून आभा नी भुवया उंचावल्या आणि बोलयला लागली,

 

"म्हणजे काय? आहेतच... विचार क्लिअर आहेतच! प्रत्येकाला मताप्रमाणे आयुष्य जगण्याचा अधिकार आहे... आणि जर तो मला मिळणार नसेल तर मी नक्कीच त्या मुलाबरोबर लग्न करणार नाही! म्हणूनच आधीच सांगतल! नंतर त्यावरून भांडण नको!! प्रत्येकाला स्वतःची मत असण्याचा अधिकार आहे..म्हणजे तुलाही! तू सुद्धा तुझी मते मांडावी! तुझ्या समोर बायको कशी असावी अशी प्रतिमा असेलच ना? ते एकदा चेक करून मगच आपण पुढच बोलाव अस मला वाटत.. काय वाटत तुला?"

 

"भारी.. मला न्हवत वाटल तू इतक्या लगेच इतक स्पष्ट बोलशील! मला आवडलीयेस तू.. मी ह्या आधी बऱ्याच मुलींशी बोललो होतो.. लग्नासाठीच.. पण त्यावेळी कोणी आपले विचार इतक्या स्पष्टपणे मांडले न्हवते! अडून अडून काहीतरी सुचवत होत्या सगळ्या पण स्पष्ट कोणीच नाही बोलल.. बऱ्याच जणींना माझ्या नावामुळे माझ्याशी लग्न करायचं होत! उरलेल्या मुलींना माझ्या पैश्यासाठी!! पण तुला माझ्या नावानी, पैश्यानी फार फरक पडलेला दिसत नाही!!"

 

"ओह.. तू बऱ्याच मुलींना भेटला आहेस वाटत! आणि मी तुझ्या जीवावर, तुझ्या पैश्यांवर माझ आयुष्य का जगेन? अर्थात, छान वाटेल माझा नवरा फेमस असेल तर पण तो माझा अट्टाहास नाही!! नाव, खूप पैसे नसेल तरी माणूस म्हणून माझा नवरा हे माझ्यासाठी महत्वाच असेल...आणि आता मी काय बोलाव हे मला सुचत नाहीये!" आभा शांत बसून राहिली...तितक्यात ऑर्डर आली.. घे तुझा ज्यूस!! रोहित ने खायला चालू केल.. आभा मात्र फक्त जूस हलवत बसून राहिली....रोहित ला वाटल आभा बोलेल पण आभा काहीच बोलत नव्हती. जरा वेळ शांततेत गेला..

 

***

Rate & Review

Madhuri 1 day ago

Prathamesh 2 months ago

VaV 3 months ago

Tejaswini Choudhari 3 months ago

Nivedita Bhavekar 3 months ago