आभा आणि रोहित...- ३

आभा आणि रोहित...- ३

 

"काय झाल आभा?  तू एकदम गप्प झालीस!"

 

"गप्प झाले कारण मला वाटल तू माझे विचार ऐकून तू काहीतरी रीअॅक्ट करशील! पण तू माझ्या मताला सहमती दिलीस... स्ट्रेंज! मला अस काही नव्हत वाटल सो जरा विचार करत होते." आभा बोलली..

 

"रीअॅक्ट करायचं कारणच काय? प्रत्येकाला आपली मत असतात आणि तुझी मत तू स्पष्टपणे बोलून दाखवतेस.. मला आवडला तुझा स्वभाव! आणि मी ते सांगितलं! खोट दाखवत नाहीस तू स्वतःला! जशी आहेस तशीच लोकांना दाखवतेस आणि खूप कमी लोकं अस वागतात!! जसे नाही तस सतत दाखवायचा प्रयत्न का न करायचं? आपण जसे आहोत तसे आहोत...आणि आपली ही पहिलीच भेट आहे तरी तू स्वतःची मतं स्पष्ट बोलून दाखवलीस...मला ते आवडलं आणि मी ते बोलूनही दाखवलं..."

 

"रोहित, यु नो का.." आभा हसली आणि बोलली.

 

"काय.. सांग कि आभा! आय नो तू खूप स्पष्टवक्ती आहेस. बोल बोल बिनधास्त..तुझी मते ऐकायला मी उत्सुक आहे.."

 

"हाहा.. मला वाटतंय ते सगळ जे तू बोललास ते तू किती महान आहेस हे दाखवायला बोललास! इतक्या लगेच तुला माझे विचार पटले आणि पटले तरी ते तू लगेच का सांगशील ना? म्हणजे असाच अर्थ होतो ना, की दाखवायचं मी कसा वेगळा विचार करतो.. मी कसा वेगळा आहे इतरांपेक्षा.. मी भारी आहे किती हे दाखवायचा प्रयत्न? आणि अस केल्यानी मी इम्प्रेस होईन. तू तर बऱ्याच मुलींना लग्नासाठी भेटला आहेस त्यामुळे तुला माहिती असेल मुली काश्यानी इम्रेस होतात. आणि मी बी तुला असाही वाटल असेल, तू सांगितलेल्या सगळ्या गोष्टीवर लगेच विश्वास ठेवेन आणि तुला लग्नाला हो म्हणेन!! असच वाटतंय न तुला? डोंट से नो!! सम हाऊ आय फील दॅट!" आभा हे बोलली आणि हसली. पण रोहित ला तिच हे बोलण अजिबात आवडल न्हवत. त्याला आभाच हे बोलण मनाला लागल. आणि त्याचा वज बदलला.

 

"काय आभा.. स्वतःला कोण समजतेस? तुला अस का वाटल की मला तुला इम्प्रेस करायची गरज आहे? आणि तुला लोकं कळत नाहीत वाटत! मला कोणालाही काही दाखवायची गरज नाही.. त्याची गरज नाही मला... देवाच्या कृपेनी म्हण किंवा काहीही, मुली माझ्याशी लग्न करायला वेड्या झालेल्या आहेत. आणि महत्वाच, तू लग्नाला नाही म्हणलीस तर अजून मुली आहेतच की.. त्यातही तुला अस का वाटतंय की मी तुला होच म्हणेन? मी तुला अजून हो म्हणालो नाहीये हे विसरू नकोस! मी तुला फक्त सांगितलं, तुझा स्वभाव मला आवडला.. माझ्यासाठी लग्नाचा निर्णय खूप महत्वाचा आहे.. कारण लग्न केल तर ते एकदाच करायचं... समोरची व्यक्ती भलेही इतरांसाठी खूप खास नसेल. पण ती माझी योग्य जोडीदार पाहिजे!! मला ती मुलगी, तिचा स्वभाव आवडला पाहिजे..आणि मी फक्त म्हणलो मला तू आवडलीस.. तू म्हणजे तुझे विचार आवडले.. ह्याचा अर्थ मी लग्नाला तयार आहे अस नाही! अस नाही कि तू जगात एकटीच अशी स्पष्ट बोलणारी आहेस! खूप असतील पण मी भेटलेल्या मुलींमध्ये तू पहिली होतीस जी पहिल्याच भेटीत इतक स्पष्ट बोललीस म्हणून सांगितलं.. तू जे बोललीस ती गोष्ट मला अजिबात आवडली नाही. तुला मला दुखवायचा अधिकार दिलेला नाही. आणि तू स्पष्ट बोलतेस पण एकाच भेटीत असे समज करून मला मी खोट वागतो आहे अस बोलून दाखवशील अस वाटल न्हवत वाटल.." आभा ला रोहित च्या बोलण्यातून तू दुखावला गेला आहे हे आभा ला जाणवल.. रोहन इतक बोलला आणि त्याने मान दुसरीकडे वळवली..त्याने आभा कडे पाहण बंद केल.

 

"सॉरी! दुखवायचा हेतू नव्हता. मी बोलून गेले.. म्हणजे मी फार विचार नाही करत बोलायच्या आधी.. तो स्वभाव मी नक्की बदलेन... आणि मला माहितीये, तुला ५६ मुली भेटतील. पण मी पहिल्यांदी लग्नासाठी मुलाला भेटती आहे. मला वाटल तू खोटी तारीफ करतोयस! लोकं दाखवतात एक आणि वागतात एक. म्हणजे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे...अस वाटल आणि मी लगेच बोलले.. माझी चूक..मी मान्य करते!" आभा इतक बोलली आणि पुन्हा गप्प झाली..

 

"एक गोष्ट लक्षात घे, मला कोणाचीही खोटी तारीफ करण्याची गरज नाही!! आणि तू इतक्या लगेच तुझी मत बोलून दाखवत जाऊ नकोस आभा.. समोरचा माणूस अश्यानी दुखावला जाऊ शकण्याची शक्यता असते..मी तुझ्या स्वभावाबद्दल बोललो आणि ते सकारात्मक होत. मी शक्यतो कोणाला दुखवत नाही."

 

"सॉरी म्हणले ना... माझा पहिलाच अनुभव आहे. त्यात मला तुला भेटायचं नव्हत. आई बाबांनी बळजुबरी केली. म्हणजे, ब्लॅकमेल.. असा मुलगा तुला परत मिळणार नाही..भेटून तर बघ etc etc.. सो मी भेटायला तयार झाले तुला पण थोडी नकारात्मकता होतीच. आणि तू माझ्या विचारांचं इतक कौतुक केलस, मला डाऊट आला आणि मी बोलले.. ए, चेंज द सब्जेक्ट! उगाच सिरिअस नको व्हायला पहिल्याच भेटीत!! माहिती नाही आपली ही शेवटची भेट असेल कदाचित..म्हणजे तू नकार देशील किंवा मी सुद्धा! त्यामुळे आज भेटलो तर लेट्स टॉक अॅज फ्रेंड्स.." आभाच बोलण ऐकुन रोहित ला हसू आल. आणि तो बोलाला,

 

"वेल सेड आभा... लग्नाचा विषय थोडा वेळ बाजूला ठेवू.. तू हॉबी सांगणार होतीस! आणि काय करतेस ते सुद्धा.."

 

"हो हो.. सांगते! मी सोफ्टवेअर इंजिनिअर आहे.. आता एका कंपनीत जॉब करते पण खर सांगू का, मला नाही मजा येत कम्प्युटर समोर बसून काम करायला. मी इंजिनिअर  झाले कारण तशी माझ्या आई बाबांची इच्छा होती. कारण हातात डिग्री असली की फरक पडतो. पण मला रस नाही ह्या गोष्टीत. मला भरतनाट्यम आणि कथक शिकले आहे... त्यासाठी पूर्ण वेळ द्यायचा आहे!! माझा असा मानस आहे कि मला सगळ्या जगासमोर माझी कला दाखवायची आहे.. म्हणजे नावासाठी नाही.. मला कलेसाठी पूर्ण आयुष्य घालवायच आहे. त्यात मला खूप आनंद मिळेल..जे आवडत तेच करायचं आहे. मी जॉब सोडून पूर्ण लक्ष डान्स कडे वळवणारे... लगेच नाही पण हे कधीतरी करणार आयुष्यात. तिच माझी आवड आहे! मला माझे क्लास सुद्धा काढायचे आहेत.. आणि बरेच प्लान्स आहेत.." आभा बोलत होती.. डान्स बद्दल बोलतांना तिचा चेहरा उजळलेला रोहित नी पहिला... रोहित आभा च बोलण ऐकत होता.. पण डान्सच नाव आल आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हाव भाव बदलले..ते आभा नी हेरले! रोहित काहीच बोलला नाही.. त्याला शांत बसलेल पाहून आभा परत बोलायला लागली,

 

"काय झाल? तुला नाही का आवडणार मी लोकांसमोर डान्स केला तर किंवा डान्स चा क्लास काढले तर?.. डान्स क्लास काढून लोकांना शिकवलं तर??" आभा बोलली... तिच बोलण ऐकून रोहित जरा विचारात पडला...

 

"नाही अस काही नाही.. बर तू सांग.. तुला अजून काही हवय खायला कि जायचं? माझी आत्ता एक मिटिंग आहे आणि वेळेत पोचण गरजेच आहे!" सारवासारव करत रोहित बोलला..आणि घाईनी बिल मागवलं..

 

"इतकी घाई का झाली एकदम? आधी बोलतांना तर निवांत होतास! आणि तुझ्या बद्दल तर काही सांगितलं नाहीस!"

 

"नंतर सांगतो..सॉरी! आत्ता खरच जायचं आहे. आत्ता एकदम आठवल अग मिटिंग च! आपण भेटू न पुन्हा.. मी तुला फोन करेन!" बिल देत रोहित म्हणला..आणि लगेचच तिथून निघाला!...

 

आभा ला ही गोष्ट खटकली..पण आभा काही बोलली नाही पण तिला अंदाज आला कि तिच डान्स मध्ये आयुष्य घालवण आवडल नसेल.. पण नक्की तेच कारण आहे हे मात्र तिला काळात नव्हत. आभा  सुद्धा काही न बोलता तिथून उठली आणि रोहित ला बाय करून हॉटेल बाहेर पडली.. पण पुढच्यावेळी कधी भेटायचं ह्यावर बोलण झाल नाही! आभा ला अस वाटल रोहित कडून नकार येईल आणि तिला हव ते आपोआप होईल..त्यामुळे तिनी झालेल्या गोष्टीचा फार विचार केला नाही.. पण रोहित मात्र त्याच गोष्टीचा विचार करत राहिला. रोहित ची आभाच्या डान्सच्या आवडीबद्दल रोहित ला काहीही प्रॉब्लेम न्हवता पण त्याच्या समोर प्रश्न होता तो आई बाबांना हे कस सांगायचं!! रोहित च्या आई बाबांना हे पटणार न्हवत हे अगदी नक्की होत.. विचार करत रोहित आपल्या गाडीत बसला आणि घराकडे निघाला.. खर तर त्याला आभा आपली जोडीदार म्हणून खूप आवडली होती.. त्याला त्याची जोडीदार स्पष्टवक्ती, स्वतःचे विचार मांडणारी, गरज पडल्यास एक पाऊल मागे घेऊन चूक मान्य करणारी हवी होती! हे सगळेच गुण आभा मध्ये होते आणि दिसायला पण सुंदर होती आभा.. पहिल्या भेटीतच समोरच्यावर छाप पडेल अशी तिच व्यक्तिमत्व होत!! पण पहिल्या भेटीत हे सांगण टाळल होत!! आणि तो स्वतः वेल ऑफ असल्यामुळे बायकोनी काम करून पैसे आणावे अस त्याला अजिबात वाटत न्हवत.. बायकोने मनाप्रमाणे आयुष्य जगले तर त्यासाठी रोहित चा नकार अजिबात नव्हता. त्याला आभानी तिचा छंद जोपासावा अस वाटत होत त्याला दडपण होत ते त्याच्या आई बाबांचं!!

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 

 

***

Rate & Review

Madhuri 7 days ago

Prathamesh 2 months ago

Tejaswini Choudhari 3 months ago

Nivedita Bhavekar 3 months ago

Shashi 3 months ago