आभा आणि रोहित...- ४

आभा आणि रोहित...- ४

 

रोहित अचानक हॉटेल मधून निघून गेला आणि रोहितची ही गोष्ट आभाला खटकली होती. घरी आल्यावर ती आई बाबांशी फार काही बोलली नाही. ठीक आहे मुलगा इतक सांगून आपल्या खोलीत निघून गेली होती. पण ती रोहित चा विचार मात्र थांबवू शकत नव्हती. रोहित असा अचानक हॉटेल मधून का गेला हे आभाला कळत नव्हत. आभा विचार करत होती, खरच रोहित ला मिटिंग होती की डान्स बद्दल ऐकून तो हॉटेल मधून अचानक निघून गेला.. आभा हा विचार करतांना अक्षरशः वेडी होत होती. पण आभा मात्र ही गोष्ट कुठेही बोलणार नव्हती. पण काही वेळानंतर आभा तिच्या रुटीन मध्ये व्यस्त झाली तशी रोहित चा विचार तिच्या मनातून जायला लागला. नंतर आभा बऱ्यापैकी नॉर्मल झाली.

 

आभा आणि रोहित च्या भेटीला २ दिवस होऊन गेले होते. आभा रोहित च्या भेटीबद्दल विसरली न्हवती पण त्याच्याकडून २ दिवसात एकदाही फोन नाही म्हणून तिने रोहित चा विचार बंद केला होता. तिला ऑफिस ची कामं पूर्ण करायची होती. त्यामुळे तिने लॅपटॉप चालू केला. पण आभा च लक्ष कामात लागत नव्हत. आभाच्या मनात सतत काहीतरी विचार चालू होते. तितक्यात आभा चा फोन वाजला. दोन दिवसांनी रोहित नी आभा ला फोन केला होता. रोहित चा फोन पाहून तिला आश्यर्य वाटल.. तिला वाटल होत, रोहित ची आई तिच्या आईला नकार कळवेल पण अस होण्याऐवजी रोहितनी तिला फोन केला होता... हे आभासाठी आश्यर्यकारक होत. बराच वेळ रिंग वाजत होती आणि आभा आपल्याच विचारात गढून गेली होती. शेवटी तिनी फोन घेतला..

 

"हे रोहित!!..."

 

"आभा.. फोन घेतलास. मला वाटल फोन उचलणारच नाहीस तू..."

 

"नाही.. जरा दुसरीकडे होते त्यामुळे उशीर झाला फोन उचलायला. का फोन केला आहेस?" थोड रुक्षतेने आभा बोलली..

 

"आधी परवा साठी सॉरी! खरच अर्जंट मिटिंग होती.. सो आय हॅड टू गो!! आणि मी आधी विसरलो होतो मिटिंग बद्दल!!"

 

"हे सांगायला फोन केलास आणि तो २ दिवसांनी? आणि इतक फॉर्मल बोलायची गरज नाहीये..म्हणजे मला कळल होत काही कारण आहे म्हणून तू गेलास.. त्याच स्पष्टीकरण द्यायची काहीही गरज नाहीये रोहित!!"

 

"दुसऱ्या दिवशी सांगायचं राहून गेल.. सॉरी आहे परवासाठी...आणि फोर्मल वागत नाहीये, स्पष्टीकरण पण देत नाहीये.. अस अचानक गेलो,नंतर मला पण विचित्र वाटल.. आणि मला माझ्या चुकेची जाणीव झाली की मी सॉरी म्हणतो."

 

"ना.. सॉरी नको! खरच त्याची गरज नाही...इट्स ओके.. आय नो..वर्क फर्स्ट!! आणि तुमचा इतका पसारा आहे बिझिनेस चा!! सो काहीच प्रॉब्लेम नाही!! अचानक मीटिंग आठवतात, अचानक बोलण सोडून निघून जाता... असेल तुमच्यात..तुम्ही मोठी लोकं..."

 

"थँक्यू आभा! मला वाटल तू काहीच बोलली नाहीस म्हणजे चिडली असशील! मला तर वाटलेलं फोन घेणार पण नाहीस! आणि तुझ्या बोलण्यातला उपहास समजला मला.. खरच मीटिंग बद्दल विसरलो होतो."

 

"ठीके, रोहित! इतका काही इश्यू नाही. आणि मी का चिडू? मी अनोळखी लोकांवर चिडत नाही..उपहास मात्र करू शकतो.."

 

"ओह.. अनोळखी!!" रोहित चा आवाज एकदम बदलला.. आभा बोलली ते त्याच्या आवडल नाही पण ते खर तर होतच! दोघे फक्त एकदा भेटले होते आणि ते एकमेकांसाठी अनोळखीच होते. आभा ला ते जाणवलं पण त्यावेळीही ती काही बोलली नाही...

 

"एकदा भेटून मी लोकांना ओळखत नाही. म्हणजे पहिल्या भेटीत लोकं किती खरी कळतात मला नाही माहिती. सो तू माझ्यासाठी अनोळखी आहेस अजूनही...मी काही चुकीच बोलले का?" आभा बोलली..

 

"मान्य.. एका भेटीत कोणी ओळखीच होत नाही...बर.. तू सांग उद्या भेटायचं? वेळ आहे तुला?"

 

"उद्या? कधी? आणि अस अचानक का ठरवलस?" रोहितच बोलण ऐकून आभा विचारात पडली आणि आभाला एकदम खूप प्रश्न पडले.

 

"मला वाटल तुला भेटाव... तुला जमेल का ते सांग! नाहीतर नंतर भेटू...नो प्रॉब्लेम! तुला सुद्धा तुझे प्लान्स असतील.."

 

"मी खूप बिझी नसते तुझ्यासारखी.. आणि तुझ काही अर्जंट आहे?"

 

"अर्जंट नाही पण परवा मी बोलण अर्धवट सोडून गेलो.. ते पूर्ण करायचं आहे."

 

"ओह...ठीके मग! उद्या संध्याकाळी नो प्रॉब्लेम! पण कुठे? खूप लांब नको ठरवायला.. माझ्या घराजवळ कुठेतरी भेटू? चालेल का? आणि खूप भारी हॉटेल मध्ये जायची गरज नाही.. मला नाही आवडणार माझ्यावर कोणी इतके पैसे खर्च केले तर...आणि तू पैसे घेणार नाहीस हे सुद्धा मला माहिती आहे. आय थिंक.. आज हॉटेल पेक्षा आपण बागेत भेटू..तिथे मनमोकळ्या गप्पा होतील..जागेच बर्डन पण राहणार नाही.." आभा बोलली...

 

"गुड आयडिया.. सारख हॉटेल मध्ये जायचा खूप खूप कंटाळा आलाय मला पण.. कामानिम्मित आणि मीटिंग साठी बऱ्याचवेळा मोठ मोठ्या हॉटेलात जाव लागत. कधी मर्जी असते कधी मारी नसतांना... आणि बरोबर, जागेच बर्डन असतच.. हळू बोला, एटीकेट पाळा...बागे मध्ये कोणाच बंधन नाही. मुक्त संवाद होईल...आणि शुद्ध हवा... आणि हो, महत्वाच!! आपण बागेत मस्त भेळ, पाणीपुरी खाऊ! हाहा..अन्हेल्दी फूड.. लॉंग टाईम... वॉव! अन्हेल्दी बट स्टिल आय लव इट!! मी किती दिवस झाले बागेत गेलोच नाहीये!!" रोहित चा मूड एकदम बदलला..आणि आभाचा सुद्धा..

 

"भारी...भेटू मग उद्या ५ वाजता.. मी नंतर बोलते... जरा काम आहे!"

 

"ओके.. भेटू मग..बाय!"

 

आभा नी फोन ठेवला आणि ती कामात बिझी झाली.. पण रोहितने अचानक भेटायला का बोलावलं ह्याचा विचार ती करत होती. रोहित सुद्धा काही गोष्टी  मनात ठरवत होता. त्याला आभा आपली जोडीदार म्हणून खूप आवडली होती. आणि ह्यानंतर मुली पाहायचा त्याचा अजिबात मानस राहिला नव्हता. आभाशी लग्न करण्याचा त्याचा विचार पक्का झाला होता.

 

आभाच काम आवरलं आणि ती निवांत बसून मोबाईल पाहत होती. तिने रोहित च फेसबुक अकाउंट उघडल आणि त्याचे फोटो, त्याची माहिती वाचायला लागली. फोटो पाहून रोहित एकदम आनंदी आणि नवीन गोष्टी करायला उत्सुक वाटला आभला. ते फोटो पाहून आभाच्या चेहऱ्यावर हसू आल. मग तिने रोहित च्या पोस्ट वाचायला सुरु केल. रोहित फेसबुक वर खूप अॅक्टिव्ह आहे अस आभा ला वाटल नाही. पण तिला रोहित ची एक पोस्ट दिसली. "#लाइफ इज चेंजिंग#थिंकिंग इज चेंजिंग#हॅपी.." आभा ने पोस्ट कधी टाकली ती तारीख पहिली. रोहितने ही पोस्ट आभा ला भेटल्यावर लिहिली होती. आभा ने पटापट रोहित च अकाऊंट स्क्रोल केल.. अशी एकही पोस्ट तिला दिसली नव्हती. आभा विचारात पडली.. आभा आपल्याच तंद्रीत होती. तितक्यात तिची आई आली,

 

"काय आभा.. आज काम नाही वाटत?"

 

"काम झाल आई...आता जरा बसले निवांत."

 

"जास्ती ताण नको घेउस कामाचे.. आणि मगाशी फोन वर कोणाशी बोलत होतीस?"

 

"रोहितचा फोन होता अग.." आभा च बोलण ऐकून आई खुश झाली..

 

"मी म्हणाले होते , तो करेल फोन... कामात बिझी असेल त्यामुळे फोन नसेल केला. आम्ही त्याल भेटलो होतो तेव्हा गुणी वाटला एकदम.. आणि एकदम निर्णय घेणारा सुद्धा नाही वाटला..."

 

"किती ग लग्न लग्न करतेस आई.. लग्न, संसार,नवरा..ह्यापेक्षा पण आयुष्य आहे मला.."

 

"बर राहील ते.. काय बोललात आत्ता?"

 

"भेटतोय उद्या बागेत.. हॉटेल मध्ये नको वाटत सारख सारख!"

 

"मारा मनमोकळ्या गप्पा..मी जाते आता.. तू झोप लवकर! गुड नाईट.."

 

इतक बोलून आभा ची आई बाहेर गेली. आभा मात्र विचारात पडली होती. उद्या रोहित काय बोलेल ह्याचा विचार करत आभा झोपून गेली.

 

दुसऱ्या दिवशी तिला सकाळीच जाग आली. तिला काय वाटल कोण जाणे पण ब्रश करायच्या आधी तिने फेसबुक उघडलं आणि रोहितच अकाउंट उघडल.. तिने पटापट त्याची फ्रेंड लिस्ट पहिली.. आणि परत एकदा रोहितने केलेले पोस्ट पहिले. रोहित चा स्वभाव कळतोय का ते पहायचं होत. पण आभा ला रोहित च्या स्वभावाच्या अंदाज लागत नव्हता. पण तिने हे मात्र पाहिलं, रोहित खूप हेल्पिंग आहे. बऱ्याच फ्रेड नी याला थँक्यूचे मेसेजेस पाठवले होते. आभाने फेसबुक बंद केल आणि बेड वरून उठली..

मग मात्र तिने पटापट आवरलं आणि आपल्या कामाला लागली.

 

 

***

Rate & Review

VaV 3 months ago

Prathamesh 2 months ago

Suvarna Kadam 3 months ago

Tejaswini Choudhari 3 months ago

Surekha 3 months ago