आभा आणि रोहित..- ५

आभा आणि रोहित..- ५

 

ठरल्याप्रमाणे आभा आणि रोहित आभाच्या घराजवळ असलेल्या बागेत भेटले. आभा ने त्याच्याकडे पाहिलं. आणि पाहतच राहिली. ह्यावेळी रोहित एकदम सध्या कपड्यात आला होता. म्हणजे त्याच्या पेहरावात कुठेही दिखाऊपण आभा ला जाणवला नाही. आभाला रोहित चा वेगळाच रंग पाहायला मिळत होता. रोहित ला बघून आभा च्या चेहऱ्यावर छानस हसू आल..रोहित ने ते पाहिलं.. आणि तो पटकन बोलला,

 

"काय झाल आभा.. का हसती आहेस?"

 

"काही नाही अरे.. तुला एकदम नॉर्मल वेशात पाहिलं.. त्यात कुठेही तुमच्या श्रीमंतीचा दिखावा नाही..छान वाटल.. परवा तू वेगळाच होतास आणि आज तू वेगळाच आहेस म्हणून चेहऱ्यावर हसू आल...ठीद्क्यात सांगायचं तर, परवा एकदम फॉर्मल..आज एकदम नॉर्मल!" आभा बोलली. रोहित तिच बोलण ऐकत होता. आणि तिच बोलण ऐकून त्याच्या सुद्धा चेहऱ्यावर हसू आल...

 

"आभा... जागा तसा वेश!" तो परत हसला, "आपण परवा भेटलो होतो ते मोठ हॉटेल आहे. तिथे साधे कपडे घालून गेलो तर कोण नीट बोलणार पण नाही.. तिथेले वेटर सुद्धा अगदी व्यवस्थित पेहरावात असतात. तिथे कपड्यांवरून माणसाची पारख होते.. आपण तेच असतो पण वेश बदलला की माणूस वेगळ वाटतो.. बरोबर? इथे मात्र आपल्याकडे पाहणारे कोणी नाहीत आणि कुणाला काही दाखवायची गरज नाही.. त्यामुळे मी नॉर्मल वेशात आलो आज.. तेहे ब्लेझर घालून आलो असतो तर लोकं हसली असती.. हाहा..ए,बर झाल आपल बागेत भेटायचं ठरलं..मला पण कंटाळा येतो सारख व्यवस्थित राहून! कधीतरी साध राहण्यात मजा असते...थंब्स अप फॉर युअर डिसिजन.." रोहित ने हाताने खून करून दाखवली.

 

आभा रोहित च बोलण ऐकत होती. तिला रोहितच बोलण ऐकून काहीतरी वेगळंच वाटल. ती जरा विचारात पडली..आभा काही बोलत नाही ते पाहून रोहित बोलायला लागला,

 

"कुठे हरवलीस? कोणता इतका गहन विचार करते आहेस?"

 

"काही नाही...असच! बरोबर बोललास... जिथे जाऊ त्याप्रमाणे राहायला पाहिजे.. आणि हे सुद्धा बरोबर आहे, कपड्यांवरून माणसाची पारख होते.. वेल सेड! बाय द वे, कुठेतरी बसून बोलूयात का? किती वेळ उभ राहणार आणि उभ राहून बोलणार?" आभा बोलली

 

"हाहा.. हो की.. विसरलोच! समोर मस्त हिरवळ आहे तिथे बसू.. आणि गुड टू नो, तुला माझे विचार पटले.."

 

"येस.. हिरवळ सुंदर उगवली आहे ना बागेत.." हिरवळीत बसत आभा बोलली.." एकदम लुसलुशीत.. मन प्रसन्न होत झाडांच्या मध्ये असलो की.."

 

"करेक्ट...पण बसलोय काय? आधी भेळ हवी... किती दिवसांनी खाईन भेळ... सो थांब आधी मी जरा भेळ घेऊन येतो.. तुला गोड की तिखट? की मिडीयम?"

 

"हाहा.. बागेत आल्यावर सगळ्यात आधी भेळ हवी असते ना.. बाग म्हणजे भेळ हे समीकरण आहे जणू! हाहा... ह, मला गोड भेळ..अजिबात तिखट नाही हवाय.. गोड म्हणजे गोडच!!"

 

"ओह...गोड इतक आवडत तुला.. म्हणूनच तू इतकी गोड आहेस.." रोहित पुटपुटला..

 

"काय म्हणलास रोहित? मला ऐकू नाही आल.."

 

"तुला काही नाही म्हणलो.. स्वतःशी बोललो...मी जातो आता भेळ आणायला! गर्दी वाढेल नाहीतर भेळ वाल्याकडे.."

 

इतक बोलून रोहित भेळ आणायला गेला. आणि आभा गवताशी खेळत बसली होती.. जरा वेळातच रोहित भेळ घेऊन आला. त्यानी गोड भेळ आभाला दिली आणि स्वतःची तिखट भेळ घेऊन खायला सुरु केली..

 

"तू चालू कर आभा.. मी नाही थांबणार आता.. यम! कसली दिसती आहे भेळ."

 

"हाहा.. तू खूप दिवसांनी खातो आहेस बागेतली भेळ अस वाटतंय.. इथली भेळ खूप भारी असते. आम्ही येतो इथे कधी कधी.."

 

"वा..बर मी तुला इथे का बोलावलं आहे ते सांगतो..."

 

"हो..मी त्याचीच वाट पहात होते." भेळीचा एक घास तोंडात टाकत आभा बोलली. "तू सांग..अचानक का भेटायचं ठरवलस? खर सांगू, तू परवा घाई ने निघून गेलास आणि नंतर तुझ्याकडून ना फोन ना मेसेज...मला राग आला होता पण रागापेक्षा इतका छान बोलत होतास आणि बोलता बोलता मिटिंग आहे अस सांगून निघून गेलास त्याच जास्त आश्यर्य वाटल..म्हणजे भावनांचा गोंधळ झाला.."

 

"सांगतो सगळ.. आणि मी सॉरी म्हणलो काल.. माझ वागण बरोबर नव्हत पण..." रोहित ने बोलण्यात पॉज घेतला.. मग परत बोलायला लागला, "पण नंतरच ते नंतर सांगतो! आधी माझ्या बद्दल थोड सांगतो...परवा माझ्याबद्दल काहीच सांगितलं नाही. आणि तू सुद्धा काही विचारलं नाहीस.." रोहित हे बोलून झाल्यावर हसला.."फक्त स्वतःबद्दल सांगितलं.."

 

"ठीके..पण नंतरच ऐकायचं आहे मला..विसरू नकोस ते सांगायला.. " आभा हसून बोलली, "मी स्वतः बद्दल सांगितलं फक्त? तूच मिटिंग आहे म्हणून निघून गेलास... आणि मला म्हणतो आहेस, काही विचारलं नाहीस? उलटा चोर ह.. ऐकून घेणार नाही.." खोटा राग आणत आभा बोलली..

 

"ओह हो.. आभा मॅडम चिडल्या वाटत.. मी माझे शब्द मागे घेतो...." रोहित  हसला.. आभा सुद्धा रोहित च बोलण ऐकून हसली..

 

"बर.. तू सांग तुझ्या हॉबी आणि आवड आणि इतर गोष्टी..तुझ्याबद्दल बोलायच्या आधीच तू निघून गेलास.. आपली पहिली भेट अर्धवट झाली होती.. ए,खर सांगू का.. मला वाटलं होत, तुझी आई माझ्या आईला फोन करून नकार कळवतील.. पण तस काही झाल नाही.. तुझा फोन आला, तू भेटायला बोलावलस आणि मला धक्का बसला...तस मला सुद्धा इतक्यात लग्न करायचं नाहीये सो मी पण खूप उत्सुक न्हवते तुला भेटायला.. पण आई ने भेटायला लावलं.."

 

"हाहा..ओह.. तुला मला भेटायचं नव्हत.. तरी भेटलीस... इंटरेस्टिंग.. बाय द वे तरी तू आज भेटलीस!" भुवया उंचावट रोहित बोलाला,

 

"आले..तर आले! माझी मर्जी.. तू सांग आता तुझ्या बद्दल..."

 

"ओके.. आणि तुला नकार का देऊ? नाही नाही.. मी तुला सांगितलं होत, मला तुझा स्वभाव आवडला आहे. दुसऱ्यांदा भेटायचं होतंच.. बर.. आता मी सांगतो काय काय करतो.. बिझिनेस सांभाळतो,फोटोग्राफी करतो,निसर्गात फिरतो..वाचन फार नाही करत पण आवडीचं असेल तर वाचतो.. आणि महत्वाच,कलेला दाद देतो!!" शेवटच बोलतांना रोहित ने थोडा स्ट्रेस दिला. आभा ने ते हेरल.. आणि ती बोलायला लागली,

 

"कलेला दाद देतोस? म्हणजे मागच्यावेळी मी डान्स बद्दल बोलले म्हणून तू गेला नाहीस? मला तेच करण वाटल होत..आणि बऱ्याच हॉबी आहेत तुला..नाईस! हॉबी असल्या की मन प्रसन्न रहात."

 

"वेल सेड.. हॉबी नसतील तर आयुष्य कंटाळवाण होऊ शकत. जे जे आवडेल ते ते करून घायचं. ऐक आता.. कलेला दाद म्हणजे, मी तुझ्या बरोबर नेहमीच असेन.. तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुझी साथ देईन... अर्थात.. आपल लग्न अजून ठरलं नाहीये...मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल.. माझे विचार अजून पक्के नाहीत पण मोस्टली माझ्याकडून हो.... आणि तू तुझी स्वप्न सांगितलीस तेव्हा मला एकदम धक्का बसला होता. पैसा सोडून हॉबी कडे वळणारे लोकं कमी असतात. मला धक्का बसला आणि तो पाचव्याचा होता. मग  मीटिंग पण आठवली म्हणून लगेच निघून गेलो.."

 

आभा ने रोहितचे बोलणे ऐकले. आभाला आधीच अंदाज आला होता की डान्स ची स्वप्न खूप लोकांना रुचणार नाहीत. आभा बोलली,

 

"मला वाटलच होत, डान्स च स्वप्न तुला रुचल नसेल.. "

 

"नाही नाही आभा.. मी मीटिंग करून घरी गेलो तेव्हा बराच विचार केला. तेव्हा मला पण माझी काही स्वप्न आठवली. जी मी अजून पर्यंत पूर्ण केली नाहीयेत पण आता करणार हे नक्की...डान्स ही अतिशय सुंदर गोष्ट आहे. आणि जरा विचार केल्यावर तुझ्या विचारांचं कौतुक वाटल मला.. पैसे सोडून तू तुझ्या हॉबी ला महत्व देतेस.. आपल लग्न झाल नाही तरी मी तुला तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला हवी ती मदत करणार हे नक्की समज..."

 

आभा रोहित च बोलण ऐकत होती. ऐकता ऐकता तिच्या चेहऱ्यावर छान हसू आल.. आभा मनोमन विचार करायला लागली. रोहित नवरा म्हणून विचार करण्यासारखा आहे हा विचार ती करत होती.

 

"काय झाल आभा.. मी खर बोललो.. मी आधी पण सांगितलं आहे, मला कोणाला इम्प्रेस करण्याची गरज नाही. खरच वाटल ते बोललो.."

 

"ए..मी काही बोलले पण नाही.... फक्त जरा विचार करत होते.. तू माणूस म्हणून मला पण आवडायला लागला आहेस. आपण भेटू परत.. "

 

"येस.. बाय द वे, बागेत भेटलो खूप छान वाटल. कशी होती तुझी गोड भेळ? हाहा..मला तर मस्त तिखट भेळ आवडते. माझी भेळ मस्त होती... टेस्टी एकदम!! आणि महत्वाच, मला आज मनातल सांगता आल..आणि मला पण भेटायचं आहे परत...बर, आता निघायचं? जरा काम आहेत..."

 

"येस..निघू.. आणि नो नो... गोड भेळ टेस्टी असते! चिंचेची मस्त चव जिभेवर रेंगाळत राहते.."

 

"हाहा... मी करतो पुढच्या वेळी ट्राय!!"

 

मग जरा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि दोघांनी बोलण आवरत घेतल आणि बागेतून निघाले.

 

***

Rate & Review

Prathamesh 2 months ago

Neha Dhole 2 months ago

Rasikmhadlekar 2 months ago

Shashi 2 months ago

Madhu Upadhyay 2 months ago