आभा आणि रोहित..- ६

आभा आणि रोहित..- ६

 

आभा आणि रोहित ह्यांची भेट मस्त झाली. आणि दोघांच्या एकमेकांची थोडी अधिक माहिती कळली... दोघांनी एकमेकांबरोबर वेळ घालवला... दोघांच्या मनमोकळ्या गप्पा झाल्या.. एकमेकांची आवड समजायला लागली.. रोहित त्यांची ही भेट खूप सुंदर झाली!! परत भेटू म्हणून दोघ गेले..आभा घरी आली. तिला सुद्धा रोहित बद्दल काहीतरी वाटायला लागल होत. दुसऱ्या भेटीत रोहित तिला खूप ओळखीचा असल्यासारखा वाटला.. आणि रोहित नी तर पहिल्याच भेटीत आभाशी लग्न करायच अस मनोमन ठरवलं होत... फक्त ते बोलून दाखवलं न्हवत!! हळू हळू आभा च्या मनात रोहित बद्दल ओढ निर्माण होत होती!! तिला सुद्धा रोहित चा सहवास आवडायला लागला होता..सगळ आपोआप होत होत..एक दिवशी रोहित ने आभा ला फोन केला.. दुसऱ्या भेटीनंतर दोघांमधल नातं खुलायला लागल होत. दोघांचे एकमेकांशी लग्न करायचे विचार पक्के होत होते. पण दोघांना एकमेकान विषयी अधिक जाणून घ्यायचं होत. त्यामुळे दोघांच्या भेटी गाठी सुद्धा वाढल्या होत्या. आभाच्या आयुष्यात रोहित फिट बसत होता. आणि आभा च्या आयुष्यात रोहित ला एक स्थान मिळत होत. आभा निवांत बसली होती तितक्यात आभा च्या फोन वर रिंग वाजली.. त्याक्षणी ती धावत आली आणि क्षणाचाही विलंब न करता आभाने फोन उचलला.

 

"हे रोहित.." आभा धावत आल्यामुळे तिला थोडी धाप लागली होती. ते रोहित ने हेरले आणि तो बोलला,

 

"आभा.. कुठे पळायला गेली होतीस की इतकी धाप लागली आहे?"

 

"नाही रे रोहित.. तुझा फोन ऐकू आला म्हणून धावत आले.."

 

"हाहा..माझा फोन ऐकू आला? म्हणजे काय? फोन ऐकू आला समजू शकतो.. पण तो माझाच फोन आहे हे तुला कस कळल? सांग सांग, तुला कस कळल, माझा फोन आहे.. ह? गुड क्वेश्चन ना? अंतर्ज्ञानामुळे कळल अस काहीतरी सांगू नकोस!"

 

"नो नो.. ह्यावेळी अंतर्ज्ञानामुळे नाही... आहे माझ सिक्रेट.."

 

"सिक्रेट काय? सांग कस कळल माझा फोन आहे?" रोहित बोलला आणि त्यावर आभा हसून बोलायला लागली..

 

"काय रोहित.. इतक्या मोठ्या बिझिनेस चा डोलारा सांभाळतोस आणि हे कळू नये? मी तुझ्या नंबर ला वेगळी कॉलर ट्यून ठेवली आहे..म्हणजे ती ट्यून वाजली की लगेच कळत तुझा आहे आणि मग मी पटकन तुझा फोन उचलते..मला वेळ घालवायचा नसतो.."

 

"ओह.. माझा फोन आल्यावर तुला लगेच उचलायचा असतो... हे नवीन आहे माझ्यासाठी.. म्हणजे तुला माझ्याशी बोलायचं असत तर.. गुड!! पण माझ्या नाही आल लक्षात तू माझ्यासाठी वेगळी कॉलर ट्यून .." रोहित चा आवाज थोडा पडला.

 

"मी गम्मत केली रे रोहित.. बिझिनेस आणि फोन नंबर ला वेगळी ट्यून ह्याचा काही संबंध नाही. असंच बोलले.. थोडी मजा..तुला टोमणा नव्हता. डोंट फील लो.. फोन का केलास सांग!"

 

"नाही नाही.. मी उदास झालो नाहीये... मला भारी वाटतंय.. माझ्यासाठी वेगळी कॉलर ट्यून.. म्हणजे माझी तुझ्या आयुष्यात काहीतरी जागा आहे."

 

"म्हणजे काय... तू माणूस म्हणून मला आवडायला लागला आहेस आणि मित्र म्हणून पण...फोन का केला सांग आता.."

 

"अरे वा.. नवनवीन गोष्टी बाहेर येतायत.. हाहा.." रोहित हसला, "आणि हो की.. ते सांगायच राहिलं.. उद्या घरी येशील? जरा आई बाबांना तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत. म्हणजे मी तुझ खूप कौतुक करत असतो घरी आणि तू त्यांना अजून भेटली नाहीयेस...म्हणून म्हणल शनिवार तुझ्यासोबत घालवू सगळे.. अर्थात, तुला जमत असेल तर..."

 

आभा ने थोडा विचार केला.. तिला एकदम बर्डन आल पण ती परत उत्साहित झाली आणि ती बोलायला लागली,

 

"ओह.. ग्रेट!! उद्या मला काही प्रॉब्लेम नाही..जमेल.. मला पण भेटायचं आहे तुझी आई बाबांना...खूप ऐकलय त्यांच्या  बद्दल... पण प्रताक्षात भेट नाही झाली. ती उद्या होईल... पण किती वाजता येऊ?"

 

"बर झाल तुला जमतंय.. माझी पण भेट होईल... म्हणजे वेगळ बाहेर भेटायची गरज नाही.. संध्याकाळी ५ च्या सुमारास चालेल?"

 

"ओके.. संध्याकाळी ५ला चालेल. पण मला एक सांग, तुझे आई बाबा कसे आहेत? ऐकून माहितीये ते खूप चांगले आहेत पण वागायला कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे ते नाही माहिती. खर सांगू तर त्यांना भेटताना मला थोड ऑकवर्ड होईल.. पहिल्यांदी भेटती आहे. म्हणून आधी थोडी आयडिया देऊन ठेव.. ते कसे आहेत?"

 

"ओह.." रोहित ने सुस्कारा सोडला..

 

"काय झाल? सुस्कारा का?"

 

"तुला आई बाबा कसे आहेत ते माहिती करून घ्यायचं आहे? कशाला म्हणतो मी.. म्हणजे मी त्यांच्या विषयी सांगितलं तर तू घाबरशील कदाचित.. कदाचित लग्नाला सुद्धा नकार देशील.. पण सांगतोच.. बाहेरच्या लोकांशी वागायला दोघे छान आहेत. पण घरात मात्र दोघ वेगळेच असतात. खर तर बाबा खूप कडक आहेत. त्यांना काश्यानीही राग येतो..आणि आई शिस्त प्रिय.. वेळ देऊन २ मिनिट उशीर झाला तर खूप चिडतात बाबा आणि आई सुद्धा..."

 

आभा ने रोहित चे बोलणे ऐकले आणि आभाचा आवाज थोडा बदलला. "ओह..मग कधीतरी नंतर येईन.. म्हणजे उद्या नको!"

 

रोहित आभाच बोलण ऐकून हसायला लागला..

 

"घाबरलीस का काय? घाबरू नकोस...गम्मत करतोय ग आभा.. मगाशी तू माझी गम्मत केलीस आता मी.. फिटांफिट.. हाहा.."

 

"काय रोहित तू पण.... फिटांफिट करायला खोट बोललास? घाबरले ना मी.. मग सांग की,कसे आहेत तुझे आई बाबा?"

 

"हो हो..सांगतो! दोघ एकदम मस्त आहेत. कशाच बंधन नाही घालत.. कोणावर स्वतःचे विचार लादत नाहीत. फक्त घरी रात्रीच जेवण एकत्र करायचा असा नियम आहे. ते झाल नाही तर चिडतात मग बाबा.. आई काहीतरी नाव नवीन ट्राय करत असते. आणि एकदम मस्त आहेत दोघे.. उगाच स्वतःला कोणीतरी समजून वागत, बोलत नाहीत.. समोरच्याचा आदर करतात.. नवीन कल्पनांना नाही म्हणत नाहीत..म्हणजे भारी आहेत माझ आई बाबा!! माझे आई बाबा आहेत म्हणून नाही.. पण दोघांमध्ये खरच उत्तम माणूस दडलाय.. भेटलीस की जाणवेल तुला पण.."

 

आभा रोहित च बोलण ऐकत होती आणि त्याच बोलण ऐकून खुश झाली...

 

"मस्त मोकळ वातावरण आहे म्हणजे तुमच्या घरी.. मी सुद्धा मोकळ्या वातावरणातच वाढले.. आणि आता सुद्धा तसच वातावरण असेल तर क्या बात है..."

 

"आता सुद्धा... म्हणजे तुझा होकार येतोय का काय?" रोहित हसला..

 

"अ..अ... दे अजून थोडा वेळ मला.."

 

"येस.. तू घे तुझा वेळ.. मला पण फायनल निर्णयावर यायच्या आधी काही गोष्टी जाणून घ्यायला आवडतील. आणि आई बाबांचं बोलायचं तर तुला पण नक्की आवडतील आई बाबा... माझे आई बाबा आहेत म्हणून नाही खरच दोघे मस्त आहेत. मी तर तुला आवडतोच... हो ना?"

 

"हो रे रोहित.. तू मला आवडतोस.." आभा हसत बोलली

 

"मग मी आई बाबांचा मुलगा आहे त्यामुळे चांगले गुण आहेत ते दोघांचेच.. मी जो आहे तो त्यांच्यामुळे!! आय लव माय मम अॅड पॉप्स.."

 

"ओह हो.... तू मम, पॉप्स अस बोलतोस आई बाबांना?" आभा हसली, "आणि तुझे चांगले गुण त्यांच्यामुळे... वाह! किती डाऊन टू इर्थ आहेस ना... हाहा.. बर भेटू उद्या.."

 

"तुला पत्ता मेसेज करतो.."

 

"मला माहिती आहे रे तुझ घर.. मी पण तुझा थोडा रिसर्च केला आहे.." आभा मिश्कीलपणे बोलली

 

"हो का.. बर ह.. वेळेत ये नाहीतर आई बाबा चिडतील.." रोहित मनापासून हसला.. "आता ठेवतो ग फोन.. भेटू उद्या!"

 

"एक मिनिट रे रोहित.. मी कशी वागू ते सांगितलं नाहीस.."

 

"तू कशी वाग हे मी कस सांगू? तुला हव तस वाग.. हव ते बोल...मी तुला आधीच सांगितलं आहे.. दिखाव्याची गरज नाही.. माझ्या मते तू आहेस तशीच वाग.."

 

"चालेल म्हणजे काही पूर्व तयारी नको.. हाहा..."

 

"हो हो आभा.. मी ठेवतो फोन.. जेवायला जायचं आहे आणि माझ्यामुळे आई बाबांना उशीर नको.. ये उद्या.. भेटूच!"

 

"येस.. भेटूच उद्या.. बाय".. आभा ने फोन ठेवला आणि एकटीच विचार करत बसली..बराच वेळ विचार करत होती..

 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 

***

Rate & Review

Shashi 2 months ago

Prathamesh 2 months ago

Tejaswini Choudhari 2 months ago

Neha Dhole 2 months ago

VaV 2 months ago