आभा आणि रोहित.. - १०

आभा आणि रोहित..- १०

 

आभा रोहित च्या बाबांचा उत्साह पाहून आश्यर्यचकित झाली होती. तिला घरात आपलेपणा जाणवत होता. त्यामुळे आभा सुद्धा जरा रिलॅक्स झाली होती. आभाने अजून खायला सुरु केल नव्हत. ती तिच्याच तंद्रीत होती. पण रोहित ने मात्र खायला चालू केल होत. त्याने आप्पे पहिले आणि त्याला राहावल नाही. रोहित ने आप्प्याचा पहिला घास तोंडात घातला आणि त्याच्या तोंडातून आहा आल.. मग तो बोलायला लागला,

 

"बाबा... फार टेस्टी झालेत आप्पे.. काय काय घातलं आहे ह्यात? नाईस न्यू रेसिपी..आणि सॉरी... मी लगेच खायला चालू केल..म्हणजे थांबलो नाही.."

 

त्यावर त्याची आई हसायला लागली. आणि बाबा पण हसायला लागले,

 

"चालत रे रोहित.. सॉरी कशाला? आणि हो..थँक्यू सुद्धा... आणि ह्यात काय आहे? गुड क्वेशन..." रोहित चे बाबा परत हसले आणि बोलायला लागले, "सगळ्या हेल्दी भाजी आहेत रोहित...तुला न आवडणाऱ्या सुद्धा.."

 

"अरे वा.. मला कळल पण नाही.. तुम्ही करत राहा नाव नवीन रेसिपी ट्राय.. मला पण थोड हेल्दी फूड खायला मिळेल.. आणि आभा तू खात नाहीयेस... तुला आवडत नाहीत का आप्पे? बाय द वे, तुला आवडतात सगळ्या भाज्या?"

 

रोहित च बोलण ऐकून आभा तंद्रीतून बाहेर आली.. आणि आभा ने आप्पे खायला चालू केले. तिला सुद्धा आप्पे आवडले होते पण ती लगेच काही बोलली नाही. तिला अजूनही रोहित च्या बाबांचं कौतुक वाटत होत. इतका मोठा बिझिनेसचा पसारा सांभाळून पण ते अगदी साध राहाण पसंत करत होते. त्यांच्या घरातलं वातावरण सुद्धा अगदी साधच होत. त्या गोष्टीचा विचार थांबवण तिच्यासाठी अवघड होत होत. रोहित आणि त्याच्या आई बाबांना लोकांबद्दल आपुलकी होती आणि ते आभा ला जाणवत होते. तिने परत आप्प्याचा घास घेतला...आणि लगेचच बोलायला लागली,

 

"हो हो रोहित!! मला आप्पे आवडले... आणि मी सगळ्या भाज्या खाते.." तिने थोडा पॉज घेतला. अजून एक घास खाल्ला आणि परत बोलायला लागली, "एकदम मस्त टेस्ट आलीये.. खरच मस्त काका.. तुमच्या हाताला चव आहे.. तुमची ही हॉबी आवडली मला.."

 

"थँक्यू आभा... मी करत असतो काही न काही ट्राय.. नवीन डिशेस खायची आणि बनवायची सुद्धा आवड आहे मला. आपण बनवून इतरांना देणे ह्यात सुद्धा आनंद मिळतो. कधी सगळा गोंधळ होतो पण तेव्हा आमची सौ सांभाळून घेते.. हाहा.. तू येत जा घरी मग मी अजून नाव नवीन डिशेस बनवून तुला खायला देईन.." रोहित चे बाबा बोलले आणि रोहित च्या आईकडे पाहिलं.. मग सगळे हसायला लागले,

 

"नक्की काका.."

 

"बर, आप्पे पुराण बास करा... आता सांगा आभा, काय ठरतंय तुझ आणि रोहित च? लग्न करायचा विचार आहे की अजून थोडा वेळ हवा आहे? एकमेकांना समजून घेतल्या शिवाय होकार नका देऊ.. पण मी सांगू आभा, मला तर तू खूप आवडली आहेस.. रीमा ने सांगितलं होत त्यापेक्षा जरा जास्तीच सुंदर आणि वागायला एकदम मस्त आहेस. तुझ्यात वेगळाच स्पार्क आहे.." आभा च्या डोक्यावरून हात फिरवत रोहित ची आई बोलली. त्यांच बोलण आणि वागण पाहून आभा थोडी ऑकवर्ड झाली. ते रोहित ने पाहिलं आणि रोहित बोलायला लागला,

 

"आई.. तुम्हाला भेटायचं म्हणून आभा आली आहे.. किती वेळा तेच तेच....सारखा लग्नाचा विषय नको आज हे मी तुला सांगितलं होत.. आभा ला आपल्या घरी एन्जॉय करू दे की.. आणि लग्नाच आम्ही ठरवतो आहे..ठरलं की तुम्हाला सांगूच ना.. लपवून ठेवणार नाहीये..." रोहित थोडा वैतागून बोलला आणि त्याच बोलण ऐकून आभा थोडी चिडली...

 

"रोहित, तू का वैतागला आहेस? काकू माझ्याशी बोलल्या होत्या... तू माझी वकिली करण्याची गरज नाहीये.. आणि मला आवडलं नाही तर मी सांगेन ते... मी आहे समर्थ माझे विचार मांडायला..." आभा रोहितकडे पाहून बोलली. आणि तिने मान वळवली. मग मात्र ती रोहित च्या आईशी बोलायला लागली, "काकू, अजून थोडा वेळ हवा आहे आम्हाला...आणि तुम्ही दोघ खूप छान आहात. एकदम मनमेळाऊ.." रोहित ने आभा ची बाजू घेतली तरी आभा त्यालाच बोलली ही गोष्ट रोहित च्या मनाला लागली. तो थोडा उदास झाला..

                        

"बर...मी नाही बोलत तुमच्या मध्ये.. मारा तुम्ही गप्पा मी खेळत बसतो माझे गेम्स..." रोहित इतक बोलला आणि त्याने आपल तोंड मोबाईल मध्ये घुसडल..

 

आभाच आणि रोहितच बोलण ऐकून रोहित ची आई हसली आणि तिने रोहित च्या बाबांकडे पाहिलं.. आभा स्वतःच्या मताशी ठाम आहे ह्या गोष्टीचा त्यांना आनंद झाला. ती स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला सक्षम आहे हे सुद्द्धा दोघांना जाणवलं. आणि गरज पडली तर आपल्या मतापासून मागे सुद्धा हटणार नाही म्हणजेच जिद्दीची आहे हे सुद्धा रोहित च्या आई बाबांनी हेरले.. आणि आभा सून म्हणून आपल्या घरी यावी अस सुद्धा रोहित च्या आईला वाटून गेल पण रोहितच्या आईने ते बोलणे टाळले. मग मात्र कोणीच काही बोललं नाही. जरा वेळ शांततेत गेला मग रोहित ने मोबाईल बाजूला ठेवला आणि रोहित बोलायला लागला,

 

"आभा.. आवडले ना तुला आई आणि बाबा?"

 

"खूप छान मनमोकळे आहेत काका आणि काकू." मग तिने रोहितच्या आई बाबांकडे पाहिलं आणि ती बोलली,"छान वाटल तुम्हाला भेटून काका काकू...मस्त आहात तुम्ही दोघे.. एकदम इंटरेस्टींग..काका, मला तर खूप भारी वाटल जेव्हा तुम्ही स्वयपाक घरातून बाहेर आलात. इतके डाऊन टू अर्थ.. आधी थोड बर्डन आल होत तुम्हाला दोघांना भेटायला यायचं तेव्हा. पण तुम्हाला भेटले आणि सगळाच ताण गेला.. एकदम फ्रेंडली आहात. रोहित म्हणाला होता तुम्ही खूप छान आहात पण आपली पहिलीच भेट त्यामुळे मला अंदाज नव्हता. थोडी ऑकवर्ड होते आधी पण आता छान वाटतंय.. तुम्ही दोघे एकदम छान आहात. "

 

"मग मी सांगितलं होत न तुला की मस्त आहेत माझे आई बाबा..." रोहित दिलखुलास हसून बोलला. रोहित ची आई रोहित च बोलण ऐकून बोलायला लागली,

 

"आभा... थँक्यू.. आम्हाला पण तू खूप आवडलीस.. छान आहे तुझ व्यक्तिमत्व. घरी साधेच असतो.. घरात आपलेपणा महत्वाचा.. आणि सांगायचं तर पैसा हे सर्वस्व नसत.. पैश्याच्या नादात घराच घरपण हरवून दिल तर मग त्या पैश्याची किंमत राहत नाही. पैसा काय येतो जातो.. पण नाती आणि घर सुधृद असणे महत्वाचे. घरातल्यांची मने जपणे हे महत्वाचे मानतो आम्ही दोघे...आणि प्रत्येकानी पटेल तसच जगाव..मगाशी तू रोहित ला थांबवलस त्याच फार कौतुक वाटल मला.." रोहित च्या आईने रोहित च्या बाबांकडे पाहिलं आणि बोलली. रोहित च्या बाबांनी सुद्धा मान हलवून होकार सांगितला. आभा रोहितच्या आईचे बोलणे ऐकत होती आणि तेव्हा तिला मगाशी पाहिलेल्या ट्रॉफीज आठवल्या.. आणि तिच्या चेहऱ्यावर छानस हसू आल.

 

"आणि सांग आभा...सध्या जॉब करतेस ना? पुढे काय प्लान आहेत?" रोहित चे बाबा बोलले,

 

"हो काका... मी सध्या जॉब करते. पगार चांगला आहे पण मला खुर्चीत बसून कॉम्पुटर समोर अख्ख आयुष्य घालवायच नाहीये. म्हणजे माझी पण इतर काही स्वप्न आहेत..त्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार..मी पण फक्त पैश्याच्या भोवती आयुष्य पाहत नाही.."

 

"अरे वा.. चांगल आहे की.. प्रत्येकानी स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य जगाव.. कोणी सांगताय किंवा कोणाकडे पाहून जगूच नये. तुझी मते ठाम आहेत.. इतल्या लहान वयात तू तुझे निर्णय घेतेस ही गोष्ट खरच कौतुक करण्यासारखी आहे. "

 

रोहितच्या बाबांचं बोलण ऐकून आभा खुश झाली. तिच्या चेहऱ्यावर मस्त हसू आल. आभा पुढे बोलणार होती आणि तिची स्वप्न सांगणार होती  पण तितक्यात रोहित बोलायला लागला,

 

"आभा... चल आपण जरा घर बघून येऊ.. तुला माझी खोली दाखवतो.."

 

"हो हो जा.. रोहित आभाला घर दाखवून आण.. मी पण जरा स्वयपाक घरात जाते.. आणि जेवायला थांब आभा.. स्वयपाकाच्या काकूंना सांगते मग काहीतरी मस्त बेत करतील त्या..."

 

"आणि मी जरा माझी कामे पूर्ण करतो.."

 

"चल ग आभा.." रोहित ने डोळ्यांनी आभाळा इशारा केला. आभा मनाविरुद्ध तिथून उठली. तिला अजून थोडा वेळ रोहित च्या आई बाबांशी बोलायचं होत पण रोहित ने तिला मधेच उठवल. पण आभा त्यावेळी शांत राहिली. आणि आभा सुद्धा रोहित बरोबर जायला निघाली पण तिला रोहित ने बोलण पूर्ण करून दिल नाही ह्याचा राग आला होता..रोहित ने स्वतःच्या खोलीत आभा ला आणले आणि दार लाऊन घेतलं.

 

***

Rate & Review

VaV 4 weeks ago

Surekha 1 month ago

Sarika 1 month ago

Neha Dhole 1 month ago

Suvarna Kadam 1 month ago