LAL MAHAL AANI SHAHIESTEKHAN PART 2 books and stories free download online pdf in Marathi

लाल महाल आणि शाहिस्तेखान - भाग २

सर्व मंडळी निघाली ?? पद्मावती देवी आणि तुळजाभवानी आणि जिजामाता सर्वांचे आशीर्वाद पाठी घेऊन निघाली...फक्त ४०० जण होते..पुण्यापासून अर्ध्या एक कोसावर राजे आणि त्यांचे सोबती घोड्यावरून उतार झाले..सर्जेरावांकडे पाहून म्हणाले "आमचे काही बरे वाईट झाले तर स्वराज्य राखा वाढवा".. सर्जेराव राजांना मुजरा करून आणि त्यांचे घोडे सोबतीला घेऊन सिंहगडाच्या दिशेने निघाले...

काही पावलांवर मोगली वेढा दिसत होता.. चिमणाजी,बाबाजी पुढे आणि पाठी राजे आणि नेतोजी..प्रत्येक चौकीवर तपासणी होत होती..पण आपण छबिन्याचे शिपाई आणि गस्तीला गेलो होतो आणि आपले काम संपवून छावणीत आराम करायला परत चाललो आहोत ..हि थाप पचत होती..कारण शाहिस्तेखानाच्या सैन्यात खूप मराठा सरदार पण होते..त्यामुळे हे पण आपल्यापैकी कोणी एक आहेत अशी मोगली सैनिकांची समजूत होत होती

छावणी आळसावली होती..थंडी मी म्हणत होती आणि त्यात रमजान चा महिना..दिवसभर उपास आणि रात्री जेवण..त्यामुळे दिवसभराच्या उपासाने भरपूर भूक लागे..आताही मोगली सैन्य शांत झोपले होते...जे जागे होते ते हे तर आपल्यातले शिपाई समजुन दुर्लक्ष करत होते..शिवाय पाठच्या चौकी पहाऱ्यानी यांची चौकशी नक्की केली असणार नाहीतर येवढे आत कसे आले असते ?? आणि येणार तरी कोण "शिवाजी"...आता तर कुठे सिद्दी जौहरच्या वेढ्यातुन कसेबसे निसटले..आणि शिवा पुन्हां येवढे मोठे धाडस करणार नाही.....आणि तिथे शाहिस्तेखान आपल्या बेगमांच्या गराड्यात शांत झोपला होता, छावणीत सर्व काही आलबेल होते पण थोड्या वेळेपुरतेचं..

राजे आणि त्यांचे मावळे लाल महालाजवळ आले.. राजांचे बालपण येथेच गेलं होते ना ?? सर्व रस्ते आणि वाटा माहित होत्या?? काही आवाज ना करता सर्वजण लाल महालाच्या पाठी आले..लाल महालाचा मुदपाकखाना (स्वयंपाक घर) आणि आबदारखाना ( पाणी साठविण्याची जागा) बाजू बाजूला होते.. आणि मुदपाकखान्यातून एक दरवाजा थेट शयनकक्षाच्या दिशेनं घेऊन जातो हे राजांना पक्के माहित होते..आणी आत शिरायला मुदपाकखाना का निवडला तर तिथे पहारे कमी असणार आणि तिथे असणार कोण आचारी बस...नाही हा फक्त अंदाज नव्हता राजे आधीपासून सर्व पाहत होते..राजांचा तिसरा डोळा नाही का फिरत होता..

पाठच्या दारातून राजे आणि त्यांचे मावळे आत शिरले...पण पुढे जाणार तोच मुदपाकखान्यात खुड खुड ऐकू आली..काही आचारी उठले होते..सकाळ सकाळी खानाचे जेवण तयार करायचे होते..पण आता नाईलाज होता..ते झोपलेले आचारी आणि तो जागा असलेला आचारी यांना काही गडबड न करता कायमचे झोपवण्यात आले..एक धोका टाळला पण मुदपाकखान्यातून जाणारी वाटच साध्या विटांनी बंद केली होती..कारण खानाच्या जनानखान्याला आडोसा आणि एकांत हवा होता...लगेच ते माती विटांचे बांधकाम पाडायला सुरुवात झाली..वाट मोकळी झाली राजे ,नेतोजी,चिमणाजी,बाबाजी आत शिरले..काही मावळे थेट मुख्य दरवाज्यापाशी धावले अर्धवट झोपलेले चौकी पहारे त्यांनी कापून काढले..मशाली पटापट विझवून टाकल्या..

पण खानाच्या काही दासींनी पाहिले साक्षात यमदूत येत होते..त्या आरडा ओरडा करत खानापाशी गेल्या..खान गडबडून जागा झाला..एक दोन मिनिटे त्याला कळेच ना काय झाले ते...आपलेच बघा ना आपल्याला कोण घाई गडबडीत झोपेतुन उठवले कि आपण कसे गडबडतो..मग इथे तर साक्षात यमदूत खानाला उठवायला आले होते..एकाच गोंधळ उडाला...त्यातला त्यात दासींनी दिवे पटापट घालवून टाकले..सर्व काळोख झाला..मराठे आत काळोखात आडव्या तिडव्या तलवारी फिरवत होते...जो समोर येत होता तो कापला जात होता..खानाच्या एक दोन बायकाही मारल्या गेल्या..नाईलाज होता...येवढयात खान लपला होता तिथे राजे आले...राजांना पाहून खानाच्या बायका किंचाळल्या..खान तलवार घेण्यासाठी धावला..तेवढ्यात राजांची नजर खानावर पडली आणि राजांनी वेळ न दवडता खानावर तलवार टाकली..आणि खान जोरात किंचाळला.. सर्व झटापट झाली..राजाने वाटले खान मेला..घाई गडबडीत सर्वबाहेर आले..
त्यांना बाहेर आलेले पाहताच मावळयांनी तिथे असलेले नगारे वाजवायला सुरवात केली..इशारत झाली होती..राखीव तुकडीने बाहेरून कापायला सुरुवात केली होती..गडबड गोंधळ ऐकून मोगली सैन्य महालाच्या बाहेर जमायला सुरवात झाली होती..आणि एकच आवाज उठला " हरहर महादेव" खाड्कन मुस्काटात मारावी आणि जागे करावे असा तो आवाज होता..तेवढ्यात मुख्य दरवाजा उघडला गेला आणि पुराच्या लोंढा आत शिरावा तसे मोगली सैन्य आत शिरले..गडबड, गोंधळ, काळोख आणि तेवढ्यात मराठेच ओरडत सुटले " भागो भागो गनीम "... येवढ्या लाखभर मोगलांमध्ये शिवा आणि मराठे घुसलेच कसे...नक्कीच त्यांना चेटूक येत असावे..

गडबड गोंधळ चा फायदा घेऊन राजे ठरल्या ठिकाणी सर्जेरावांना भेटले आणि तिथूनच जवळ असणाऱ्या सिंहगडावर पोहचते झाले..पण मोगली सैन्य हि फार चिवट त्या गोंधळातून सावरून त्यांनी मराठ्यांचा पाठलाग चालू केला...१०० ते १५० मशाली धावताना दिसत होत्या...मोगली सैन्य मोठ्या चेवाने त्यांच्या पाठी लागले...मराठे जिवाच्या आंकाताने धावत होते..पण कात्रजचा घाट लागल्यावर त्यांची चाल मंदावली..मोगली सैन्य जवळ जाऊन बघते तर काय...६० ते ७० बैल कसेही वेडे वाकडे धावत होते..त्यांच्या दोन्ही शिंगाना मशाली बांधल्या होत्या...बघा मराठयांची अक्कल...राजांनी सांगितले आणि बहिर्जींनी केले...

सकाळ झाली आणि छावणीत झालेला गोंधळ दिसत होता...कित्येक मोगली सरदार मारले गेले होते...खानाच्या दोन बायका आणि एक मुलगा आणि काही दासी मारल्या गेल्या होत्या...पण खानाचे फक्त बोटांवर निभावले होते..खानाने मात्र ह्या गोष्टीचा धसका घेतला आणि आपली छावणी तीन दिवसांत हलवली...

औरंगजेबाला हि बातमी कळली तेव्हा त्या तर आपले डोकेच पकडले... शाहिस्तेखान, लाखभर सैन्य, हत्ती, घोडे, तोफा, दारू गोळा..अजून काय करायचे...शिवाला अजून कसे मारायचे...

समाप्त