MAZYA LOVEMARRIAGECHI GOSHT - 24 books and stories free download online pdf in Marathi

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 24

२४

पुन्हा वाजवा रे वाजवा!

मग व्हायचे ते झाले.

तिच्या नि माझ्या घरी बातमी फुटली. बुरकुल्यांची हरकत फक्त वै इतकी वर्षे तिथे राहिल्यानंतर इकडे कशी ॲडजस्ट होईल यावरच होती.

म्हणजे पत्रातून वै ने कळवले मला..

'डिअर स्टुपिडेस्ट मंकी आॅफ माईन, डॅड ॲंड मॉम आर वरीड.. इट्स सो डिफरन्ट देअर इन इंडिया.. हाऊ आय विल ॲडजेस्ट.. बट दे आर इम्प्रेस्ड बाय यू .. आय डोन्ट नो व्हाय अँड हाऊ..'

मी कळवले तिला.. 'व्हाॅट एव्हर इट इज.. डोन्ट अंडरेस्टिमेट द पाॅवर आॅफ काॅमन स्टुपिड.. अँड एनी वे आय हॅव पास्ड द एक्झाम .. थ्यांक्स..'

यावर तिचे उत्तर आले.. “नो नो ..डोन्ट फ्लाय हाय .. आय गॉट यू थ्रू.. विथ ग्रेस मार्क्स..”

ती पण माझ्यासारखीच थोडी वात्रट होत चाललेली दिसली मला.. मग मी तिला लिहिले..

'ओह.. बाय मर्सी ऑफ गॉड.. ॲन्ड युवर ग्रेस! थँक्स अँड बी रेडी फाॅर युवर ओन स्टुपिडीटी आॅफ चूजिंग द स्टुपिड!'

'आय नो. इट हॅपन्स..'

'ॲज वुई से हिअर, होनी को कौन टाल सकता है!'

थोडक्यात भारत आणि अमेरिकेतल्या पोस्ट खात्याची त्या काळात जी भरभराट झाली असेल त्याचे श्रेय आम्हाला होते!

इकडे बाबांना आमच्या लग्नाबद्दल हरकत नव्हती पण आईच फॉरेनच्या पाटलीणीबद्दल साशंक होती. आईने थोडा विरोध दाखवला खरा पण शेवटी म्हणाली, "चांगली आहे, हुशार आहे. पण फक्त या मोदकाला सांभाळून घेण्याइतकी हुशार असली म्हणजे झाले." थोडक्यात माझी ख्याती ही असली होती! काही असो. दोन्ही बाजूंनी होकार आलाच नि गंगेत घोडे न्हायचे ते न्हालेच!

काही महिन्यांनी बुरकुले येऊन गेले. सहकुटुंब. म्हणजे वै सकट. लग्नाबद्दल जुजबी बोलणी झाली. परत जायची घाई होती त्यांना. वै ला तिकडचा सारा कारभार आटोपणे होते. तेव्हा झटपट साखरपुडी उरकून घेतली.. हो साखरपुडीच.. कोणताच समारंभ नाही.. नुसतीच अंगठ्या एक्सचेंज! त्यामुळे साखरपुडीच म्हणायची. सगळ्यांनी पेढ्यांनी आपापली तोंडे गोड केली.. आणि मी आणि वै नी पण एकांत शोधून आपली.

लग्नाच्या तारखा वगैरे निश्चित झाल्या. वै आणि माझी पत्रापत्री जोरदार सुरू झाली.

त्यातून मी माझ्या वात्रटपणाची झलक दाखवत होतोच तिला. पुढील आयुष्यासाठी तयारी हवीच तिची! तिने लिहिले एकदा..

'आय ॲम वेटिंग फाॅर दी डे मोदक..'

त्यावर माझे उत्तर होते..

'आय नो, सम पीपल डोन्ट माईंड टू बी मार्टियर्स..!'

'मोदक, समटाईम्स आय जस्ट वंडर, हाऊ आय केम ॲक्राॅस यू.. यू नो आय जस्ट कान्ट बिलिव्ह..'

'येस. इव्हन मी! बट यू आर लकीयर दॅन मी.. यू गाॅट अ बेटर बेट!'

'ओह! माय फिश! डोन्ट बी अंडर मिसकन्सेप्शन.. आय काॅट यू इन द वाईड नेट.. ॲम अ स्पायडर वुमन!'

'आय ॲग्री.. काॅट इन द नेट.. जस्ट यू वेट.. यू बेट.. व्हेन यू कम हिअर.. माय डिअर! बट डोन्ट यू थिंक यू आर अ सुपर वुमन?'

माझ्या त्या तीन चार कविता आधी केलेल्या त्याही तिला एकदा पाठवल्या मी. त्यातले काही मराठी शब्द कळणे कठीण होते तिला. म्हटले आलीस इकडे की घेतो तुझे मराठीचे क्लासेस आणि काय!

असली आमची पत्रापत्री सुरू होती. कधीमधी फोन करायचो पण आयएसडीच्या बिलाच्या पळणाऱ्या आकड्यांकडेच जास्त लक्ष जायचे. त्यापेक्षा पत्रलेखन बरे.

मग पुढे काय..

तेच लग्न.. यथासांग!

ते ही त्याच काकाच्या त्याच घरी. चांगली आठ दहा दिवस मुक्कामास आली मंडळी. पाहुणे कुठून कुठून आले. आईचा मंगूमामाही मुलीला घेऊन चांगला आठवडाभर राहिला. दूरदेशातूनही काही जणे आली. सारा आनंदी आनंद झाला.

त्याच घरात बसून मी रागिणीच्या लग्नाच्यावेळी घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवून घेतल्या.. त्यासुद्धा यावेळी वै च्या साथीने. त्या गोष्टी ऐकून माझ्या त्यावेळच्या बावळटपणाबद्दल दोघेही मनमुराद हसलो.

"यू नो.. मी गेली ना तर आय हॅड लाॅस्ट आॅल होप्स.."

"बट आय हाॅप्ड आॅन फर्स्ट अपाॅरच्युनिटी नो? मला फक्त तुझा होकार हवा होता.."

"शहाणाच आहेस.. तू न विचारताच तुला होकार?"

"तुझं मराठी सुधरतेय हां.."

"दन्यवाद!"

"यू नो ही सिस्टीमच चुकीची आहे.. इन धिज डेज आॅफ इक्वॅलिटी.. फक्त मुलांनीच का करावे प्रपोज?"

"खरंय.. टू टेल यू द ट्रूथ यू नेव्हर प्रपोज्ड फर्स्ट. कृत्तिका नि मी काय केलं नस्तं तर.."

"हिअर आय ॲग्री.."

"बेटर.. डू!"

अशी सगळी जुन्या काळाची उजळणी झाली त्याच बागेत, त्याच झाडांसमोर बसून.

लग्नात वै नी कृत्तिकाला तोच .. विसरलेला.. हार रिटर्न गिफ्ट म्हणून दिला! कृत्तिकाने ही माझी मनसोक्त चेष्टा केली.. कर म्हटले.. आता काय फरक पडणार होता?

सारे काही यथासांग झाले. बुरकुले आई बाबा परतले. वै माझी होऊन राहिली. ते जाताना वै ला रडू कोसळलेले पाहायला लागू नये म्हणून माझे प्रयत्न मात्र फसले. अशा प्रसंगी मलाच रडू आवरणे कठीण जाते तसे ते गेलेच.

वै रुळली इथे. इकडील सर्वांना त्या अमेरिकारूपी स्वप्नदेशाची स्वप्ने पडतात तर हिला इकडचेच आकर्षण फार. अगदी लहानपणापासून म्हणे तिला भारतातच यायचे होते. कदाचित इकडची मुळे घट्ट असावीत आणि काय! आता आम्ही मस्त सेटल झालोय. वै मराथी तून मराठी होतेय.. आणि जात्याच हुशार ती.. ब्रिलियंट म्हणावी अशी.. झटपट मराठी शिकत आलीय. इतकी की आता आम्ही शुद्ध मराठीतच भांडतो! ती हुशार आहे आणि आपल्या देशाला अशी ब्रेन गेन ची संधी मी मिळवून दिल्याचा मला ही अभिमान आहे! तशी लग्नास काही वर्षे लोटली आहेत. बायकोपणाच्या सत्तासिंहासनावर वै आरूढ झालीय. तिला गंमतीत 'यू आर माय हेडेक' म्हणालेलो मी ते मधूनमधून ती सिद्ध करतेही.. आपला जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखे!

थोडक्यात गंगेत घोडे न्हाले..

न्हाले म्हणजे अगदी अभ्यंग स्नान!

Share

NEW REALESED