Tujhach me an majhich tu..12 books and stories free download online pdf in Marathi

तुझाच मी अन माझीच तू...भाग १२

तुझाच मी अन माझीच तू...भाग १२

राजस ने अमेय शी बोलून लगेचच फोन बंद केला आणि आवरायला लागला.. अमेय चिडलाय त्यामुळे त्याला शांत करण्यासाठी काहीतरी आयडिया करायचं राजस ने ठरवलं.. आणि त्याने समोरचे कपाट उघडले..

अमेय हा राजस चा खास मित्र.. अमेय राजस शी सगळ काही शेअर करायचा. त्याचे आई बाबा व्हॉलेंटरी रीटायरमेंट घेऊन गावात राहून शांत आयुष्य जगत होते. अमेय एकटाच राहत असल्यामुळे त्यानी स्वतःला कामात बिझी करून घेतले होते. त्याला सुद्धा एका एमएनसी मध्ये जॉब होता.. फक्त काम हे व्यवधान असल्यामुळे याला एकावर एक बरीच प्रमोशन्स मिळाली होती.. राजस त्याचा खास मित्र पण तो पण बिझी असल्यामुळे दोघे नेहमीसारखे भेटत नसत.. पण गरज पडेल तेव्हा दोघे एकमेकांसाठी सदैव तत्पर असायचे.. दोघांची मैत्री "शोले" मधल्या जय आणि विरू सारखीच होती.

राजस ला अमेय चा राग काढणे अत्यंत गरजेचे होते.. अमेय चिडला की किती चिडतो हे राजस ला चांगलेच माहिती होते आणि लवकरात लावर अमेय चा राग त्याला घालवायचा होता. राजस ने थोडा विचार केल्यावर त्याला अमेय ला सगळ्यात जास्ती काय आवडत ह्याची आठवण झाली. अमेय कश्यानी खुश होईल हे राजस ला माहिती होतेच. राजस ने कपात उघडले.. कपाटात खाली वर करून पाहिलं..पण त्याला हे हवं होतं ते मिळालं नाही. त्याने हातावर मुठ मारून घेतली..आणि त्याच्या तोंडातून "शीट" आलं आणि तो चिडून कपाटबंद करायला लागला. इतक्यात त्याला काहीतरी आठवलं आणि त्याने पटकन ड्रॉवर उघडला.

"येस.. फायनली मिळालं.." त्याने समोरच असलेली Calvin Klein ची परफ्युम बॉटल त्याने हातात घेतली. त्या परफ्युम चा मस्त वास नाकात भरून घेतला.. आणि स्वतःशीच बोलला.

"अमेय साहेब, आता चिडून दाखव.. तुझ आवडतं परफ्युम ला नाही म्हणूनच दाखव.." मग राजस स्वतःशीच हसला.. तेही जोरजोरात... आज घरी तो एकटाच असल्यामुळे त्याला कश्याचीच चिंता नव्हती. आई असेल तर जोरात हसल्यावर आई त्याला चांगलच झापायची... पण आज त्याला काहीच चिंता नव्हती.. त्याने पटकन एक गिफ्ट व्रॅप कागद काढून त्या परफ्युम ला मस्त पॅकिंग केल.. आणि तो आवरायला लागला..

५ मिनिटात त्याचे आवरले. आणि तो ठरलेल्या कॉफी शॉप मध्ये गेला.. तिथे अमेय आधी आलेलाच होता. नेहमीप्रमाणे राजस लेट झाला होता आणि आधीच अमेय राजस वर भडकला होता आणि राजस ला यायला उशीर झाल्यामुळे तो जास्तीच चिडला होता. राजस ने अमेय ला पाहिले आणि डोक्यावर हात मारून घेतला..

"कशाला यायचं ना इतक वेळेत? अमेय ला अक्कल नाहीये!!! दुसऱ्याला सारख टेन्शन मध्ये ठेवतो..." राजस मनात बोलला.. तरी आपण लेट झालोय ह्याच दुःख त्याने चेहऱ्यावर येऊन दिले नाही..तो अमेय च्या समोरच्या वर जाऊन बसला..

"हेलो अमेय.. गुड टू सी यु!! आत्ताच आलास ना?"

"आलात..फार लवकर आलात!!" अमेय च्या आवाजात थोडा राग होता आणि तो राजस ला स्पष्ट जाणवला होता, "वेळेची किंमत तुला काहीच ना रे?"

"आहे आहे.. वेळेची किंमत आहे!! मी वेळेत निघालो होतो.पण मध्ये गर्दी... यु नो हल्ली किती वाढलय ट्राफिक!! सो डोंट ब्लेम मी.. बट यु कॅन ब्लेम द ट्राफिक!!" विषय टाळत बोलला.. आणि राजस ची अमेय कडे पहायची हिम्मत सुद्धा नव्हती.. राजस चे वागणे अमेय ला नवीन नव्हते.

"साल्या.. मी १५ मिनिटे वाट पाहतोय इथे...दरवेळी ट्राफिक हे एकमेव कारण कसं मिळत रे तुला?"

"अरे खरच.. मी नेहमीपेक्षा आधी निघालो होतो..पण खूप म्हणजे खूप ट्राफिक!! मी कंटाळलो शेवटी!!"

"हो का..किती ला निघालास? खर बोल राजस.. मी काय तुला आज ओळखत नाही..."

"७.५५ pm.." राजस हळू आवाजात बोलला

"आय न्यू इट.. तू बोलावलस की मी का येतो लगेच काय माहिती.. तुला ना कश्याचीच आणि कोणाचीच किंमत नाही..नुसत म्हणत असतोस, बेस्ट बडी बेस्ट बडी! मग स्वतः बोलावल्यावर तरी वेळ पहायची ना.."

"पुढच्यावेळी नक्की.. आणि यु आर माय बेस्ट बडी!! तू माझ्यावर जास्ती चिडणार नाहीसच!! आय नो.."


"अस समजू नकोस.. मी निघून जाणार होतो आणि तुला ठेवणार होतो ताटकळत पण मी रूड नाही वागू शकत यार तुझ्याशी! आधी पैश्यावरुन माझ डोक आउट केलं..त्यात एखादा अजून चिडवणार नाही पण आपण राजस आहात.. केअरलेस!!!" अमेय राजस ला पंच मारत बोलला..

"सॉरी म्हणालो की रे... आधी आपण काहीतरी खायचं का रे? जाम भूक लागलीये.. मग सांगतो खर कारण,,"

"तू बोलत राहा.. आपली ऑर्डर येईल..मी आल्या आल्या दिली होती ऑर्डर!!"

"वॉव!! बर आता ऐक.. आधी मी सॉरी रे अम्या!! मला एकट्याला असल बोअर झालेलं आणि सो तुला फोन केला.. आणि माझ्याही नकळत मी बोलून गेलो पैसे मी देईन!!"

"मी तेच विचारतो आहे.. आपल्यात ह्या आधी कधी पैसे आलेले आठवतंय का?" अमेय चिडून बोलला..

"बरी आठवण झाली, हे घ्या साहेब! माझ्यामुळे तू चिडलास.." राजस ने गिफ्ट अमेय च्या हातात ठेवलं.. ते अमेय ने चाचपडून पाहिलं.. त्यात बाटली आहे असं अमेय ला जाणवलं. आणि त्याक्षणी अमेय चा पारा एकदम चढला..

"काय आहे हे? यु नो आय डोंट ड्रिंक तरी? आज तू मेलास बघ.." अमेय राजस ला मारण्यासाठी उठलाच.. तितक्यात खाणं आलं आणि दोघांनी खायला सुरु केले.. पण आधीचे बोलणे कंटिन्यू करणे महत्वाचे होते..

"ए अम्या.. थांब थांब!! आय नो तू आज माझ्यावर फार चिडला आहेस.. पण गिफ्ट उघडून बघ मग बोल की.. मी पण ड्रिंक करत नाही मग उगाच नसत्या गोष्टींवर पैसे खर्च का करेन.." राजस हसत बोलला.. आणि अमेय ला जाणवले गिफ्ट उघडायच्या आधी आपण प्रतिक्रिया द्यायला नको होती.. त्याने गिफ्ट उघडल.. आणि त्याचे डोळे लकाकले

"वॉव.. Calvin Klein ची परफ्युम बॉटल.. अमेझिंग रे राज!! पण अचानक इतक महागड गिफ्ट का?"

"तुला आवडलं ना गिफ्ट!! मी खुश झालो..."

"आवडलं ना म्हणजे काय? मी ह्याच ब्रँड च परफ्युम वापरतो.. मध्ये गेलेलो आणायला पण आउट ऑफ स्टॉक होत.. आणि तू दिलस!! थँक्यू राजस!!!"

"बस क्या... तू माझा खूप जिवलग दोस्त आहेस रे... आणि तुला विनाकारण चिडवल..मग सॉरी तो बनता हे ना... पण चूक माझी नव्हती..." राजस तोंड वेडवाकड करत बोलला..

"म्हणजे ?"

"आत्ता येतांना तुला गिफ्ट शोधण्यामध्ये वेळ गेला...आणि..."

"आणि.. काय सांग!!"

"अरे.. ऑफिस मध्ये आभा नावाची मुलगी जॉईन झाली आज.. असली भारी आहे ती.. पण आमचं वाजल.. म्हणजे तेव्हा पण चूक माझीच होती.. मी उगाच लाईन मारायचा प्रयत्न केला तर तिने असलं लेक्चर दिलं.. मैत्री पण पारखून करते म्हणाली.. आणि दुपारी तिच्या कॉफी चे पैसे दिले तर मलाच सुनावलं.. मी उगाच कोणाला खड्ड्यात पडत नाही etc... सो तेच शब्द होते डोक्यात..!" राजस ने अमेय ला खर कारण सांगितलं... राजस चे बोलणे ऐकून अमेय ला मनापासून हसू आलं..

"गुड गुड.. म्हणजे आमच्या राजस ला तोडीस तोड मिळाली कोणीतरी..आता दाखवेल ती तुला इंगा!! "

"साल्या.. तू माझा मित्र आहेस ना.. आभा कोण माहिती नाही तरी तिची साईड काय घेतोस?" स्वतःच्या तोंडात घास कोंबत राजस बोलला..

"नो नो.. मी तिची साईड घेत नाही!! पण तू सुधार! अनोळखी लोकांच्या जास्ती नादी लागू नकोस!!"

"बर बर..पण असणारे आता रोजच माझ्या तोंडासमोर ती... सो अजून काय काय होणारे काय माहिती... आता खा.. आणि आज माझे पैसे पण तूच दे.." राजस वैतागून बोलला..

"चालेल.." अमेय हसून बोलला... त्याला जाणवलं आभा मुळेच राजस आज असा विचित्र वागला.. आणि अमेय चा राग पळून गेला.

क्रमशः..

Share

NEW REALESED