Kankachya svapratil kalpnechi katha - 6 in Marathi Horror Stories by मुक्ता... books and stories PDF | कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 6

कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 6

हा भाग वाचण्यासाठी मागील भागांची कल्पना घ्यावी...

भाग-6


"श....वि....ता....मा....व....शी...."कणकची बोबडीच वळली.

" अगं कणक एवढ्या लवकर विसरली तू तुझ्या सविता मावशीला..?"

कणकने घाबरत मागे वळून पाहिले तर, गवाणमध्ये (जेथे गाई बैलांचा चारा ठेवलेला असतो असे गोठ्यातील ठिकाण) सविता मावशींचे मृत शरीर पडलेले दिसले. खूपच घाबरुन गेली ती... थरथरत होती... तिच्या सर्वांगाला घाम फुटला. तिथून पळणारच तोच, गवाणमधून आवाज आला.........................

"कणक का पळते आहेस एवढी? आणि तेही मला पाहून. मी तर तुझी सविता मावशी आहे ना? आठवतयं का?? बघ मी आणि कविता मावशी तुला भुतांच्या गोष्टी सांगायचो आणि आज मी स्वतः .... हा..हा..हा.." तो गवाणमधला आवाज अर्थात सविता मावशी जोरात आक्रोश करीत एकदम विद्रुप हसल्या ...

कणकला कोणी 440 व्होलटचा करंट दिला असाच धक्का बसला. जणू भीतीचा काळा डोंगर तिच्यावर कोसळला...!

"पण... पण.. तुम्ही तर मेल्या होत्या...!"

" कोणी सांगितलं तुला? बाकीच्या लोकांसाठी मी मेलेली आहे. पण तुझ्यासाठी तर मी जिवंत आहे. मी तुला कधी सोडेल का?? आठवतंय तुला? तू माझ्या घरी खेळायला यायची. माझ्या अहिश सोबत..!( अहिश हा सविता मावशींचा सावत्र मुलगा) तेव्हाच मी ठरवलं होतं की तुला माझ्या घराची सून बनवेल.मी कधीच कोणासोबत वाईट वागतं नव्हते.तुला तर माहीतीच आहे, पुर्ण गाव माझ्या स्वभावाची दाद द्यायच.मग काय कमी होती गं....काय? सांग ना.. तुला माझ्या घराची सुन बनवण्याची गोष्ट मी वत्सलाबाईंंच्या कानावर घातली होती.पण तुझ्या आईने साफ नकार दिला. कारण का? तर अहिश माझा सावत्र मुलगा होता म्हणून.(एखाद्या आईचा सावत्र मुलगा जावई बनवू नये अशी वत्सलाबाई यांची समज होती) तरी पण मी काही बोलली नाही. अनेकदा मी तुझ्या आईला समजवलं. पण नाहीच...! वत्सलेचं मत शेवटपर्यंत नाहीच होत. मग मी शेवटी एका गूहेतल्या बाबांचा सहारा घेतला. कारण मला माहिती होतं की, वत्सला कविता प्रमाणे या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते. आणि मग मीच मुद्दाम त्या बाबाला पैशे $$ देऊन तुझ्या आईला अर्थात वत्सलेला जाळ्यात अडवलं. मी जस-जस सांगत होती अगदी तसंच ते बाबा वत्सलेला सांगत होते. आमच्या प्लॅनप्रमाणे ..!भुतांचा संचार, पाच भूत, आत्मा..आठवतायंं तुला हे शब्द... ! आणि हो याच प्लॅन प्रमाणे तुझ्या सोबत खूप काही होणार आहे. असं की, तु ज्याची कल्पनादेखील केली नसेल. हा...हा...हा..हा...!!"

पुन्हा तेच विद्रूप हास्य.....की, ज्याने कणक खाडकन झोपेतून उठली. तिने आजुबाजुस पाहिले तर, सर्व तिच्या आजूबाजूला बसले होते. तिला खूप अशक्त आणि कमजोर वाटत होतं. ती खूप घाबरली होती.

" कणक उठलीस बाळा? आता कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय ना?(आजी कणकचा ताप पडताळतात.) हा ...आता थोडा ताप उतरला आहे."

"पण ...पण मला ताप कसा आला? आणि मी इथे कशी? मी तर....!"

"कणक तू जास्त विचार नको करूस.."

"आजी पहिले मी इथे कशी ते सांग?"

"ते सोड...बघ मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीच्या पालक पुर्‍या केल्या आहेत.चल लवकर खाऊन घे!"

"अरे वा..पालक पुरी... छान!!...(कणक सर्व विसरून थोडी हसली.)

जेवणानंतर कणकला थोडं बर वाटू लागलं. ती थोड्यावेळ भावांसोबत मोकळ्या हवेत बसायला गेली. त्यांच्या मस्त गप्पा गोष्टी सुरु होत्या.. कणकला मात्र सविता मावशींची घटना आठवली.

" काही जरी झालं तरी या घटनेचा शोध मी लावूनच राहील...!"( कणक मनातल्या मनात विचार करून म्हणाली.)

तिला सर्व आठवत होते. पण, तिला एक गोष्ट कळत नव्हती की, ते स्वप्नं होत का खरी घटना? घटना आहे का स्वप्न.. हे पडताळण्यासाठी ती भावांना प्रश्न विचारू लागली.

"ऐक ना सई... अगं तू मला लपाछपी मधे शोधलं का नाहीस?"

"अगं ताई हे तू काय विचारतेस?"

"काय म्हणजे? प्रश्न विचारते..सांग ना..!"

"अगं ताई, मी सर्वांना शोधलं. सर्व सापडले देखील. पण तू काही सापडत नव्हती. मग आम्ही सर्वांनी मिळून तुला शोधायचं ठरवलं. खूप वेळ झाला होता, म्हणून काका-मावशी, आजी सगळे आले, आपल्याला बघायला. 'हे नेमकी काय करताय एवढा वेळ?' आम्ही तू सापडत नसल्याची गोष्ट त्यांना सांगतली.सर्वजण तुला शोधत होते.सगळे खुप चिंतेत होते. तेवढ्यात नयनला तुझा आवाजा आला."

नयन प्रश्नार्थक चेहऱ्याने कणकला म्हणाला, "काय गं ताई, काय बडबड करत होतीस? त्या गोठ्याच्या गवाणजवळ.. 'पण ...पण तुम्ही मेल्या' असं काहीतरी तू बोलली आणि चक्कर येऊन खाली पडली. आम्ही सारे धावतच तेथे आलो, तुला उचललं आणि घरी आणलं. तू सर्व घामाने भिजली होती. एखाद्या तापत्या तव्या प्रमाणे तुझं सार अंग तापून गेलं. सर्व घाबरले.. तात्काळ लगेच डॉक्टरांना बोलून तुला तपासलं. आणि मग काही वेळाने तू उठली. काय बघितलं ताई तु तिथे, की तुझी अशी अवस्था झाली?"

- ज्ञानेश्वरी ह्याळीज

क्रमशः

Rate & Review

अनिता
rasika kanade

rasika kanade 2 years ago

hemant

hemant 2 years ago

Deepa Bagde

Deepa Bagde 2 years ago

Monika Jadhav

Monika Jadhav 2 years ago