Coronachya maadhyamatun jag pradushanmukt hoil books and stories free download online pdf in Marathi

कोरानाच्या माध्यमातून जग प्रदुषणमुक्त होईल

10. कोरानाच्या माध्यमातून जग प्रदुषणमुक्त होईल

देशात खुप मोठ्या प्रमाणात प्रदुषण वाढलेलं होतं. ध्वनीप्रदुषण, वायूप्रदुषण, पाणीप्रदुषण, त्याचबरोबर मनप्रदुषणही. त्यामुळं कुठं ध्वनीतून आजार, कुठं श्वसनातून आजार, तर कुठं थुंकण्यातून आजार निर्माण होत होते. कुठं मनप्रदुषणातून चो-या, डकैती, खुन, फसवेगीरीही...... प्रदुषणानं कहर माजवला होता. त्यामुळं पृथ्वीच्या आवरणावर त्याचा परीणाम झाला होता. पृथ्वीवरील रहिवाशी लोकांवरही. महत्वाचं म्हणजे प्रदुषणाचे जे प्रकार आहेत. त्यात वाढ झाली होती.

आवरणाचे तीन प्रकार आहेत. वातावरण, जलावरण, शिलावरण. या तीनही आवरणात प्रदुषण आहे. कारखान्यात वाढ झाली. त्या कारखान्यातून निघणारा जो धूर होता. त्या धुरातून सल्फर डाय आक्साईड आणि हायड्रोजन सल्फाईड निघून व वातावरणात पोहचून वातावरण विषारी झाले. तसेच त्याच कारखान्यातून निघणा-या सांडपाण्यानं पाणी प्रदुषीत झाले. नव्हे तर त्या कारखान्यातून निघालेल्या पांढ-या राखेतून जमीनही प्रदुषीत झाली. त्यानुसार पाणीप्रदुषण, पाणीप्रदुषण अतोनात वाढलं. याचा परीणाम शेतीवर होवून शेती पीकत नव्हती.

आता आणखी एक समस्या वाढली होती. ती म्हणजे ध्वनी प्रदूषण. आता शहरातच नाही, तर गावागावातही प्रदुषण वाढलं होतं. पाणी, वायू, त्याचबरोबर ध्वनीही.......

परंतू हे जरी खरं असलं आणि यामुळे झालेल्या पृथ्वीच्या वातावरणावरील परीणाम लक्षात घेता आता अशातच कोरोना व्हायरस आला. त्यात संबंध देशच काय?जगही प्रदुषणमुक्त झाले असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरेल काय?तर याचं उत्तर नाही असं येईल. कारण कोरानाच्या या संकटातून देशाला वाचविण्यासाठी पुर्ण जगात लाकडाऊन झालं. सर्व जगानं आपआपली शहर लाकडाऊन ठेवली. त्यानुसार लोकं घरातच राहायला लागले. जगाने विमान उड्डाण, रेल्वे, बसप्रवास सारं बंद केलं. त्यामुळे गाड्या बाहेर पडल्या नाहीत. कारखान्यातून दुषीत हवा निघाली नाही. या लाकडाऊन च्या काळात कारखान्यातलं सांडपाणी निघालं नाही. तसेच राखही जमानीवर पसरली नाही. लोकं रस्त्यावर आली नाही. गाड्यांचा आवाज नव्हता. लग्नात बँडचा आवाज नव्हता. डीजे दिसला नाही. मोबाईल रिचार्ज बंद झाले. कारण पैसे संपण्याची भीती लोकांच्या मनात होती. याचा परीणाम हा झाला की ध्वनी प्रदूषण काहीअंशी का होईना, ध्वनीप्रदुषण थांबलं. पाणीप्रदुषण बंद झालं आणि वायूप्रदुषणही. कारण हे प्रदुषीत करायला जे घटक जबाबदार होते. ते घराच्या अंदर होते. याचाच सर्वात मोठा परीणाम हा झाला की ज्या सुर्याच्या अतिनील किरणानं पृथ्वी वाचू शकत नव्हती. या सर्व प्रकारच्या प्रदुषणानं पृथ्वीच्या आवरणात जे छिद्र पडलं होतं. जे सुर्याचे तापमान या ओझोन वायूच्या वातावरणीय छिद्रानं जास्त जाणवत होतं. ते आता कमी जाणवेल. सुर्याच्या अतिनील किरणाच्या विषारी प्रभावानं ज्या पृथ्वीवरील वातावरणीय बदलाला घायाळ केलं होतं. ते या कोरोनाच्या निमित्ताने का होईना बंद झालेलं आहे. कारण वातावरणाला पडलेलं छिद्र बंद झालेलं आहे असा दावा शास्रज्ञांनी केलेला आहे.

महत्वाचं सांगायचं म्हणजे खरंच पृथ्वीच्या या वातावरणातील छिद्राला कोरोना संकट फायदेशीर ठरले काय?खरंच याने छिद्र बंद झाले काय?पण ते पाहणे आपले काम नाही. ते शास्रज्ञाचे काम आहे. परंतू एक गोष्ट नक्की की हा बदल जो झाला, तो अतिशय चांगला झाला. कारण बहुतःश सगळी मंडळी घरात होती. त्यांनी या काळात काहीच प्रदुषण केले नाही. तेच तत्व उद्याही टिकवून ठेवायचे आहे.

प्रदुषण जरी तीन प्रकारचं असलं तरी चवथाही प्रकार आम्हाला आज पाहायला मिळत आहे. ते प्रकार म्हणजे मनप्रदुषण. लोकांची आजच्या काळात मनही प्रदुषीत झालेली असून, ज्याप्रमाणे मोबाईलवर बोलण्याने ध्वनीप्रदुषण होवून पक्षांवर परीणाम होवून पक्षी मरण पावले. त्याचाच परीणाम हा झाला की माणसावर या मोबाइल वर बोलण्याचा परीणाम झाला. कुठे याच मोबाईलच्या माध्यमातून हत्यासत्र घडलं. केवळ मोबाईलवर बोलण्यानं नाही तर या मनाच्या माध्यमातून कुठं कुठं खुन, बलत्कार इत्यादी प्रकार घडले, घडताहेत. त्या मनाच्या प्रदुषणालाही रोखण्याची आज गरज असून ज्याप्रमाणे कोरोनाच्या संकटातून पाणी, वायू आणि ध्वनीप्रदुषणाला आपण काही अंशी थांबवलं. त्याचबरोबर आपल्या मनाच्या प्रदुषणालाही आपण याच कोरोना संकटातून थांबवलं होतं. परंतू आता जास्त काळ लाकडाऊन ठेवता येणार नाही. कारण उपासमारीनं लोकं मरु शकतात. कोरोना संकट जरी असलं तरी लोकांना उपासानं मरु द्यायचं नाही. सरकारजवळ धान्य जरी असलं तरी करोडो रुपयाचं जे नुकसान होत आहे. ते भरुन निघू शकणार नाही. तेव्हा कोरोना संकट जरी असलं तरी ते संकट मानून न घेता आता कामं करावी. पण सावधानता बाळगून. तसेच कुठेही पुर्वीसारखे खर्रे खावून थुंकू नका. भींती रंगवू नका. कारण त्यातून कोरोना पसरु शकतो. तसेच कामावरुन आल्यावर हातपाय स्वच्छ धुवा. जमेल तर अंघोळ करुन घ्या. त्याबरोबर मनही स्वच्छ ठेवा. मनालाही धुवून घ्या. पाण्यानं नाही तर चांगल्या विचारानं. कोरोनापासून नक्कीच हा बोध जरुर घ्या. चांगल्या विचारानं मनाचं प्रदुषण थांबवा. तेव्हाच बलत्कार, खुन आणि फसवाफसवीचे प्रकार बंद होतील.