Unanswered Friendship ..... ??? - 03 books and stories free download online pdf in Marathi

अनुत्तरित मैत्री.....??? - ०३











आता आपण बघुया प्रतीक्षा सोबत काजलच्या वाढदिवसाला🎂 काय घडणार.... तेही अनपेक्षित.......🤦🤷🙅
आणि त्यानंतरही घडतच असते.....

वाढदिवसाला प्रतीक्षा खूप आधीच जाऊन काजलला हातभार लावत होती..... जवळची मैत्रीण असल्याने आईने तिला जाण्याची परवानगी दिली होती......☺️ सगळी तयारी झाली...... काजल ने छान तयारी केली होती आणि त्याच वेळी "तिची जिवलग, जवळची मैत्रीण" पूजा आली.. प्रतीक्षा स्वतः बाजूला जाऊन एका कोपऱ्यात उभी झाली.........तिला त्यांच्यात नव्हते पडायचे... नंतर सगळी मंडळी जमली.... वाढदिवस साजरा झाला🎈🎈🎀🎁🎉🎊.... पहिला घास ती तिच्या जवळच्या मैत्रिणीला भरवायची नेहमी....... पण, प्रतीक्षा हाच वाढदिवस पहिल्यांदा साजरा करायला आलेली....... त्यामुळे, तिला माहिती नव्हतं की काही अनपेक्षित घडेल..

प्रतीक्षा ला वाटले हा मान आपलाच असेल......म्हणून, ती काजलसाठी आणलेला गिफ्ट🖋️ घेऊन उठली..😊 पण बघते तर काय🙄
🙄
🙄😕
काजल ने तिचा केकचा🍰 पहिला घास चक्क पूजाला भरवला सुद्धा...🙄🙄....ही तशीच खाली आपल्या जागेवर जाऊन बसली☹️ आणि सर्वांच्या केक भरवून झाल्या नंतर तिने तिला गिफ्ट देऊन केक भरवला आणि स्वतः खाल्ला तोही खूप कमी ........आणि घरी जायला निघणार तोच.......

काजल : "प्रतीक्षा थांब की जरा जाशील नंतर"

काजल मागून आली..... पण, ती खूप दुखावली☹️ गेली असल्याने तिने तिथून काढता पाय घेतला...... काहीही न बोलता निघून गेली...... पण, याचा काजलला काळीमात्र फरक पडला नाही...... ती तिच्यात आणि तिच्या जवळच्या मैत्रिणीमध्ये मग्न होऊन पार्टी एन्जॉय💃 करत होती.....

इकडे प्रतीक्षाला कळून चुकले होते की, आता आपण तिच्या जिवनात तितके महत्त्वाचे नाहीत...आणि तिने आपल्या अभ्यासावर👩‍💻📚 लक्ष देण्याचे ठरवून नवीन सकाळ एका नव्या उमेदीने😊 सुरू करण्याचे ठरवले.... इकडे काजलच प्रतिक्षाला दुसऱ्यांसमोर जवळची मैत्रीण म्हणणे तितक्याच जोमात सुरू असल्याने कुणालाही प्रतीक्षाच्या मनात🥺💬 काय आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता वाटली नाही.....

असेच दीवसामागे दिवस जात होते आणि काजल तिच्यावर कुणी तरी लाईन😉🧐 मारतो अस नेहमीच प्रतिक्षाला भासवत होती आणि कुणी तरी प्रतीक्षाकडे सुध्दा बघतो तिला लाईक करतो अस म्हणून तिला फासण्याच्या प्रयत्नात नेहमीच असायची..... पण, प्रतिक्षाचे यात लक्ष नसायचे🥴🙅 किंबहुना तिला यात रसच नव्हता....... तिला चांगल्या गुणांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण करायची होती... त्यामुळे ती, तिचा अभ्यास आणि स्वतः मधेच व्यस्त असायची....

प्रतीक्षा ने वेळोवेळी काजलला अभ्यासात मदत केली होती..... पण, नेहमी काजल नेच प्रतिक्षाची मदत केली अस भासवण्यात काजल पटाईत होती....

एकदा झालं अस...... की, प्रतीक्षाने तिची विज्ञानाची वही📘 काजलला मदत व्हावी म्हणून दिलेली....... पण, दुसऱ्या दिवशी घेऊन ये नाहीतर जुंबळे सर खूप रागावतात😠 अस सांगितल होतं...... तसही प्रतीक्षा हुशार🧠 असल्याने सरांची आणि सगळ्याच शिक्षकांची लाडकी होती...... त्यामुळे रागवण्याचा प्रश्न तर नव्हताच...... पण, तरीही तिलाच रिस्क घ्यायची नव्हती....दुसऱ्या दिवशी काजल ने प्रतीक्षाची मस्करी म्हणून, वही न आणल्याची बतावणी केली..... इकडे प्रतीक्षा अतिशय चिंतेत😟 होती....... वर्ग भरायला सुरुवात झाली....... मुले आले, शिक्षकही आलेत...... आणि काजल प्रतीक्षाला वही घेऊन येते अस सांगून गेली मात्र वही तिच्याच बॅगमध्ये होती...... इकडे प्रतीक्षा काळजीत होती.. सर आले सगळ्यांचं गृहाकार्य तपासण्या करिता वह्या बाहेर काढा सांगितले...... प्रतीक्षा अत्यंत घाबरलेली...... पहिल्याच बाकावर ती बसत असल्याने सर आले......

सर : "आज वही कुठे आहे? तू तर कधीच विसरत नसतेस! चक्क आज कशी विसरलीस?"

अस म्हणून ते प्रतीक्षावर खूप ओरडले😡😡... ती सरांकडे अवाक होऊन बघू लागली..... कारण, त्या सरांनी तिला कधीच रागावले नव्हते...

ती काही बोलणार तेवढ्यात

काजल : "सर, मे आय कम इन?"

सर : "एस कम इन"

काजलच्या मागे एक वर्गातलाच मुलगा अक्षय, उशीर झाल्याने आला त्याला मात्र सरांनी आत घेतले नाही..... कारण, तो खूप दिवसांनी शाळेत आला होता....... त्याची खबर नंतर ते घेणार होते.....😂😂

काजल : "सर हिची वही📘 मी घरीच विसरल्यामुळे मी आणायला गेलेली....... तिने कालच तिचा गृहपाठ पूर्ण केलाय..... त्यानंतर मला वही📘 दिली होती... ह्म्म..."

धापा टाकत ती बोलत होती....😪😪

सरांनी सगळ्यांसमोर तिचं कौतुक केलं...... की, तिने कस प्रतीक्षा ला मार बसू नये म्हणून तिची वही वेळेत परत आणली होती......सगळे कौतुकाने तिच्याकडे बघत होते...... मात्र अक्षय जो वर्गाबाहेर उभा होता ज्याला सरांनी शिक्षा केली होती........ तो मात्र, एका संशयित नजरेने तिच्याकडे बघत होता......🤨 की, काजल कशी आनंदात सगळ्यांचे कौतुक स्वीकारत होती... कारण सगळ खरं त्याने नंतर प्रतिक्षाच्या कानावर टाकलं होतं....

वर्ग झाले आणि खेळायची सुट्टी झाली.......प्रतीक्षा दुःखी असल्याने, एका कडेला एकटीच बसली होती😒....... कारण, कधी न रागवणारे ते सर तिला आज रागावले होते ज्यात तिची काहीच चूक नव्हती..

तिकडून अक्षय हात झटकत येत होता....😂😂..... कारण, त्याला सरांनी चांगलच तुडवल होतं........

अक्षय : "अग तुला माहितीये का काजल आज किती मोठं खोटं बोलली ते...?"

प्रतीक्षाने खूप आश्चर्याने त्याला बघितले......🙄

अक्षय : "अग प्रतीक्षा, काजल घरी जाऊन वही घेऊन नव्हती आली ती तर इथेच शाळेबाहेर पाणीपुरी खात मला दिसली..... जेव्हा मी शाळेबाहेर माझ्या मित्रांसोबत खेळत होतो....... मी २० मिनिटांआधी शाळेत पोहचलो...... पण, माझे मित्र मला भेटले आणि मला उशीर झाला....... तेव्हा मी तिला त्या पाणीपुरीच्या ठेल्यावर बघितले होते...."

हे ऐकून प्रतीक्षाला धक्काच बसला...... ती काजलला याबाबतीत विचारते...... पण, ती उडवाउडवीची उत्तरे देते...... म्हणून, प्रतीक्षा त्या माणसाला विचारायचे ठरवते..... जिथून, काजल पाणीपुरी खाते.... कारण तो, मुलींना ओळखत असतो..... कधी तरी प्रतीक्षा पैसे असले की जात असायची...

प्रतीक्षा : "भैया..... आपके पास काजल आयी थी..... तो वो कितने देर रुकी थी?"..

भैया : "अरे...... आज तो काजल बिटीया बोहत टाईम यिहा ही बैठी रही..... क्यू बिटीया कुछ परेशान लागत हो क्या बात है...... गोलगप्पा नाही खात हो का आज..?"

उत्तरेकडून असल्याने तो असा बोलत होता.....

प्रतीक्षा : "नहीं - नहीं भैया बस येसे ही पूछ रही थी...... अच्छा मैं चलती हुं...."

भैया : "जी बिटीया आते रहत जाओ यीहा..."

अस म्हणत एक स्माईल🙂 देत तो त्याच्या कामाला लागला....धंदा करणारे असेच लाडी - गोडी लावतात........ हे प्रतीक्षाला माहिती असल्याने ती तिथून निघाली......

रस्त्याने ती त्याच विचारात असता तिला गाडीची धडक लागते....... आणि ती रस्त्यावर पडते सुद्धा...... आणि उठून परत जायला लागते...... तिला गाडीवाला काय बोलला हे कळलं सुद्धा नाही....... ती तिच्याच तंद्रीत🙄🙄 जात असते....

"का केलं हिने अस" याच विचारात ती असते... आणि इतकं करूनही काजल खोटं बोललेली......तिने स्वतः ते जाणून केलं नाही असच ती सांगत असते आणि कौतुक सुध्दा झालं त्यामुळे आता तर ती हवेतच असणार ना!...💃....

असेच दिवस गेलेत प्रतीक्षाचा अभ्यासही जोरात सुरू होता पण काजल तिला सतत इकडे चल - तिकडे चल म्हणून भरकटवण्याचा प्रयत्न करत होती..... पण, तिला कुणीही असच सहजासहजी भरकटू शकणार नव्हत..... कारण, ती एकनिष्ठ होती आणि तिला शेवटी त्याचंच फळही मिळालं आणि यशही आलं......

दहावीचा निकाल लागतो...... प्रतीक्षाला ७०.००% पडतात आणि काजलला तिच्या पेक्षा कमी ६५.००% काजलला स्वतःची लाज वाटते..... प्रतीक्षा वर्गात तिसरी.... पहिली असते कविता... नेहमी ती प्रथम असायची तिला ८३.००% .. दुसरी दिव्या तिला ८१.००%... दिव्या आणि कविता खूप चांगल्या मैत्रिणी होत्या....त्यांनी कधीच एकमेकींची सोबत सोडली नव्हती.....आताही सोबत आहेत.....

सगळे खुश होते...... कारण, आता नवीन जीवनाची सुरुवात होणार होती.... इकडे प्रतीक्षाची एक समस्या... पुढे शिकवणार की नाही?🙄 पण तीला शिकायचे होते आणि म्हणून मुलींच्या महाविद्यालयात वाणिज्य शाखेत तिचं एडमिशन करण्यात आलं..... कारण, मुलांच्या संगतीत मुली बिघडतात हा समाजमान्य अलिखित नियम तिच्याही घरी होताच....😏😏

आता इथून पुढचा प्रवास बघुयात पुढच्या भागात तोपर्यंत प्रतीक्षाला एडमिशनचा विचार करू देत....☺️