तू अशीच जवळ रहावी... - भाग 1 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - भाग 1

तू अशीच जवळ रहावी... - भाग 1

एक मुलगी हॉस्पिटलच्या बेडवर शांत पडलेली होती...सगळ्या प्रकारच्या मशिन्स तिच्या अंगाला लावल्या होत्या...चेहरा पूर्णपणे सुकलेला होता...डोळे बंद करून एकदम निपचित पणे पडली होती...तिला तस पाहून तिच्या घरच्यांना भरपूर वाईट वाटतं होते...तिच्या रूमच्या बाहेर भरपूर सारी लोक होती...पण आज आतील रूममध्ये असलेल्या मुलीची अवस्था पाहून बाहेरील लोकांचे डोळे पाणावले होते...

"मला नाही पाहवत चैतन्य तिला या अवस्थेत...😭नेहमी हसणारी होती ती आणि आज बघ कशी पडली आहे सगळयांना त्रास देऊन...15 दिवस होत आले पण काहीच रिस्पॉन्स देत नाही आहे रे ती"एक मुलगी बाहेर रडतच चैतन्यला बोलत असते...

"प्रतीक्षा आपली अशी अवस्था आहे ग पण त्या मृत्युंजयची अवस्था कशी असेल ग...😢15 दिवस झाले तो माणूस जरा वेळासाठी पण तिच्यापासून दूर झाला नाही...बघ काय अवतार केला आहे त्या माणसाने"चैतन्य प्रतीक्षाला जवळ घेत बोलतो...

"आपल्या भावनाला अशी बघण्याची कधीच सवय नाही ना रे आपल्याला कोणाला😞...ते तीच आपल्या सगळयांना चिडवणे,रागावणे,मस्करी करणे या गोष्टी आपल्याला हव्या हव्याहव्याशा वाटत होत्या ना तिच्या त्या रूपातच तिला पहायची सवय झाल्याने अशी मला नको वाटते ती😢...."सीमा

"आपण फक्त देवाकडे मागू शकतो तिला😢बाकी काहीच नाही करू शकत...सगळयांना अस रडवून पागल मस्त झोपली आहे...😭उठू दे फक्त तिला मी कट्टीच घेणार तिच्यासोबत.."आर्या

"मी पण बोलणार नाही भावना सोबत खूपच तिला आवडत आहे आम्हाला रडवायला..."सर्वेश

"पोरांनो नको रे अस बोलू ती अपूर्ण आहे तुमच्या सगळयांशिवाय...तुम्ही सगळे तिच्या सोबत असायचा म्हणून आम्ही बिनधास्त राहत होतो...पण तुम्हीच अस केलं तर कस होईल ना"एक माणूस त्यांच्या जवळ येऊन दुःखी होऊन बोलतो...

"काका i am sorry हो पण खरच तिला अस पाहायला नाही आवडत ना म्हणून बोललो😭आमची पण इच्छा आहे ती लवकर उठावी मृत्युंजय जीजूची अवस्था नाही पाहवत आम्हाला...😭"सीमा रडतच बोलते...

"मला माहिती आहे...😢माझी पण तीच अवस्था आहे पण भावनाच्या आईला सांभाळायचे आहे मला म्हणून मी धीट राहण्याचा प्रयत्न करत आहे...पण मला नाही होत सगळं कारण माझी मुलगी आहे ती..."काका(भावनाचे बाबा)...

"काका प्लीज तुम्ही अस नका बोलू मृत्युंजय काहीच होऊ देणार नाही आपल्या भावनाला...विश्वास आहे ना माझा त्याच्यावर..."चैतन्य...

"हम्म देव करो आणि तसच होवो...😢"भावनाचे बाबा...

इकडे रूममध्ये भावना बेडवर पडलेली असते...तिच्या बाजूला मृत्युंजय बसलेला असतो...त्याचे डोळे रडून रडून लाल झालेले असतात...अंगातील त्राण सगळा कमी झालेला असतो...मजबूत शरीरयष्टी,गोरा वर्ण...6 फूट उंचीचा भरभक्कम दणकट असा तो होता...(पूर्ण वर्णन नंतर करते...)त्याने भावनाचा हात स्वतःच्या हातात घेतला...त्यावर स्वतःचे ओठ टेकवले...तसच त्याने तिचा हात स्वतःच्या हातात घट्ट पकडला...

"भावना तुला मी खरच आवडत नव्हतो तर सांगायला हवे होते तू तसे ना...😢मी निघून गेलो असतो तुझ्या आयुष्यातुन कायमचा पण मनात तुझ्याशिवाय कोणालाच स्थान दिले नसते...मी आजही तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे...एकदा उठून फक्त मला सांग जय मला नको तू म्हणून मी कायमचा निघून जाईल तुझ्या आयुष्यातुन... मला फक्त तू सुखी राहायलेली पाहायची आहे बाकी काहीच नको ग मला...😢"मृत्युंजय दुःखी होऊन बोलतो...त्याचे ते बोलणे कोणीतरी स्क्रीन वरून ऐकते...ते बोलणे ऐकून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आसुरी हास्य येते...

"भावना तू कधीच जयची नाही होऊ शकत...तो फक्त माझाच आहे आणि माझाच रहाणार...लहानपणापासून तुला दूर ठेवत होती मी त्याच्यापासून पण तो जरा पण तुला सोडत नव्हता...याचाच मला राग यायचा...नेहमी सगळं माझं असलेलं तुला मिळत गेले...पण आता नाही मिळणार मी तुला जगूच देणार नाही...काळजी करू नको हा तू मेली की तुझ्या जयला सावरायला आहेच मी..."एक मुलगी स्क्रीनकडे पाहत आसुरी हास्य करत बोलते...ती तशीच स्क्रिनकडे पाहत बसते...

इकडे मृत्युंजय मात्र तसाच बसून भावनाकडे पाहत असतो...बाहेरील कोणालाच त्याची तशी अवस्था पाहवत नव्हती...पण ते तरी काय करणार ना...स्वतःच ते व्यवस्थित नव्हते...या सगळयांना जोडणारा धागा सावरणारी भावना होती आणि तीच निपचित पडल्याने सगळे शांत झाले होते...

तर ही आहे भावना सावंत(माझा या कथेशी कुठचाही प्रकारचा संबंध नाही आहे...😔ही एक काल्पनिक कथा आहे...)एकदम अल्लड,मनमौजी,matured मुलगी होती...हिने जीवनातील सगळी संकट हसून पार पाडली...कारण स्वभाव होता तिचा तसा...😌प्रेम या गोष्टी पासून काढीचाही संबंध नव्हता तिचा...मनाने निर्मळ,स्वच्छनंदी अशी होती...एका नामवंत कंपनीत सॉफ्टवेअर developer होती...गोरी मोरी दिसायला सुंदर...कमनीय कमरबांधा...तिचे ते काळेभोर डोळे आणि लांबसडक काळे केस सर्व मुलांना आवडायचे...कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशी ती होती...पण मॅडमला जो प्रपोझ मारायला गेला ना त्याची हालत नेहमी बेकार व्हायची...म्हणून मुलं थोडेफार दूर रहायचे(नाही हा भावना नाही मारायची त्यांना...😜ते कळेल पुढे तुम्हाला...)

मध्यमवर्गीय होती पण मनाने विचाराने खूप श्रीमंत होती...तिचे विचारच एका मोठया माणसासारखे असायचे...तिला सर्व प्रकारच्या कला अवगत होत्या... उत्तम चित्रकार,डान्सर,गिटार,वीणा वादक होती ती... कथक मध्ये देखील ती चांगली होती...जे आवडेल ते ती करायची...15 भाषांचे ज्ञान तिला होते...एवढ्यावरच ती थांबत नव्हती तर अजून खूप साऱ्या भाषांचे ती ज्ञान घेत असायची...घरामध्ये तर पूर्ण पुस्तकांची लायब्ररीच तिने केली होती...त्यातील ती जास्तीत जास्त पुस्तक ही संस्कृत भाषेतून होती...कारण भावनाच्या प्रचंड आवडीची भाषा होती ती...😌एवढं सगळं असून देखील कॉम्प्युटर मध्ये नंबर वनला होती...युनिव्हर्सिटी मधून नेहमी फर्स्ट येत होती...हुशार असल्याने तिला जॉब पण तसाच लवकर मिळाला...मल्टि टॅलेंटेड असल्याने घरातील कोणी तिला बोलत नव्हते...कारण सगळयांची लाडकी होती ना ती... सगळं आयुष्य तिचं मस्त मजेत चालू होते...प्रेम काय असते हे माहिती नसल्याने तिचा संबंधच नव्हता...😜पण म्हणतात सुखी आयुष्य देव जगूच देत नाही कोणाला...😞तसच तिच्या आयुष्यात काहीतरी घडले...

फ्लॅशबॅक:-

एक दिवस अशीच भावना ऑफिसमधून लेट घरी आली होती आणि सगळयांसोबत जेवण करून मस्त झोपी गेली...उद्या तिला रविवारची सुट्टी असल्याने ती खुशीतच झोपून गेली...सकाळी 8 च्या दरम्यान तिचा फोन वाजू लागला तशी तिची झोप चाळवली...तिने मोबाईल पाहिला तर अनोळखी नंबर होता...म्हणून तिने फोन कट केला आणि पांघरूण तोंडावर घेऊन झोपी गेले...पुन्हा फोन तिचा रिंग होऊ लागला तशी ती उठली...

"अरे कोणाला एवढं रिकामटेकडे वेळ असतात...😣जे मला कॉल करत राहतात...रविवारच्या पण दिवशी माझ्यासारख्या गरीब मुलीला झोपू देत नाही...बघतेच आता कोण आहे ते🙄"भावना विचार करत स्वतःशीच बोलत कॉल उचलते...

📲भावना-हॅलो कोण बोलत आहे(झोपेतच डोळे चोळत बोलते)...

📲"तुझ्या आईचा जावई बोलत आहे😅"पल्लीकडून एक मुलगा हसत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून तर भावनाची झोपच गायब होते...भावना पटकन उठुनच बेडवर बसते...

📲"ओय नीट बोल हा😣माझ्या आईचा जावई बिवई कोणी नाही आहे...जा तू उडत..."भावना चिडतच बोलते...

📲"बर तुझ्या बाबांचा जावई...😂"तो मुलगा हसत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून भावना भरपूर तापते...

📲"ऐ बाबा माझा साधा बॉयफ्रेंड नाही आहे रे आणि तू जावई वगैरे काय बोलत आहे...😡माझ्या बाबांचा पण जावई नाही कोणी"भावना...

📲"बर ओके जावई नाही पण तुझ्या भावाचा मी होणारा जीजू बोलत आहे...माय cutipie😍"तो...

📲"ऐ तुझी एवढी हिंमत कशी झाली एवढं सगळं बोलण्याची...😡काम काय आहे ते बोल हा गपचूप तुझे...😡एकतर झोप मोड केली आहे माझी पूर्ण आणि त्यात असा वेड्यासारखा बोलत आहे..."भावना चिडत बोलते...

📲"ऐ झोपाळू मुली बाहेर ये रूमच्या तयार होऊन...मी दाखवतो ना मी कोण आहे ते आणि वेडा तर मी आहे फक्त तुझ्यासाठी मेरी जान..u.muhmma😘"तो हसत बोलत मोबाईल ला किस करत फोन कट करतो...त्याचे बोलणे ऐकून ती तर भयंकर तापते...

"ईईईई🤑 किती घाण आहे हा शी...मी याची जान बिन नाही आहे...हा मला बाहेर का यायला सांगत आहे???कोण होता बर तो...जाऊ का मी बाहेर???की मस्करी करत आहेत सगळे माझ्याशी???आज काही स्पेशल आहे असं तर मला आठवत नाही😒माझा बर्थडे पण नाही आहे आज मग काय असेल बर???आता झोप मोड झालीच आहे तर जातेच मी...😞हा जो कोणी आहे ना कधीच सुखी होणार नाही माझी झोप मोड केली या माणसाने...😔"भावना स्वतःशीच बडबडत फ्रेश होते...ती एक मस्त असा रेड ब्लॅक कलरचा पंजाबी ड्रेस घालते...मस्त अशी तयार होऊन ती रूमच्या बाहेर येते...बाहेरच दृश्य पाहून ती पूर्णपणे शॉक होते...तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो...तिच्या हातातुन तिचा मोबाईल खाली पडतो...त्याच्या आवाजाने सगळयांचे लक्ष तिच्यावर जाते...पण भावनाला याचे भान नसते कारण ती अजूनही शॉकमध्येच असते...

"मृत्युंजय😱😱तू म्हणजे तुम्ही इथे"भावना गालावर हात ठेवत शॉकमध्येच बोलते...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
          ©®भावना सावंत(भूवि❤️)
***************************

Rate & Review

Gajanan

Gajanan 1 month ago

Bhavana Sawant

Bhavana Sawant Matrubharti Verified 10 months ago

Payal Karlekar

Payal Karlekar 10 months ago

Suresh kolap

Suresh kolap 10 months ago

madhuri devarde

madhuri devarde 10 months ago