Shivaji Maharaj ek uttam shikshak aani pratikshak hote - 1 books and stories free download online pdf in Marathi

शिवाजी महाराज एक उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक होते... - भाग १

राजे स्वतः प्रशिक्षक आणि शिक्षक बनले... शिवाजी राजांच्या जीवनाचा हा आणखी एक नवा पैलू जसा दिसला तसा तो वाचकांसाठी मांडण्याचा प्रयत्न केला. एक जून रोजी शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक केला. त्याचे औचित्य साधून सदर लिखाण पूर्ण करण्याचा योग आला. यात खूप समाधान वाटले...

....शिवाजीराजांच्या या पराक्रमाला माझ्यासारख्या विद्यार्थी पामराचा मानाचा मुजरा.....

लेखक:
( C ) चंद्रकांत पवार " चंद्रेय "

शिवराज्याभिषेक सोहळा दिन...
१ जून. २०२१.
संपर्क: ७४००२१७२१५.
-------------------------------------------------------------------
परमपूज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना शिकवले होते. त्यांना प्रशिक्षित केले होते .त्याच प्रमाणे छत्रपती राजाराम महाराज हे त्यांचे दुसरे पुत्र होते .त्यांनाही त्यांनी शिकवले. प्रशिक्षित केले. छत्रपती शिवाजी राजांनी अख्ख्या महाराष्ट्राला लढायला शिकवले.... स्वराज्यवाद ,राष्ट्रवाद यांची शिकवण त्यांनी दिली. राष्ट्रवादाचे प्रशिक्षण त्यांनी घडवलेल्या इतिहासातून दिले. ज्वलंत राष्ट्रप्रेम कसे असते.
याची शाळाच त्यांनी जणू स्वराज्यामध्ये भरवली होती. त्यातून निरनिराळे मावळे विद्यार्थीरत्न रूपाने शिकून बाहेर पडले होते...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचा विचार आला कसा... छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचा विचार येण्यासाठी कारणीभूत आहेत .छत्रपती महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले.ते शिवाजी महाराजांसमोर प्रेरणास्थान म्हणून उभे होते..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर दोनदा त्यांनी बंड केले होते. ते बंड नंतर बादशहाने मोडून टाकले . त्या बदल्यात शहाजीराजेंना मोठी किंमत चुकवावी लागली . त्यांचे बंड दडपून टाकण्यात आले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांचे रोहीडेश्वराचे गड घेण्याचे महाकार्य होतं . त्याचा सर्वांनी प्रथम धसकाच घेतला तसे करण्याला अनेक लोकांचा विरोध होता. वयस्कर मंडळीच्या मनात तर धडकी भरली होती. बादशहा मोठी कारवाई करील. तो जाळपोळ करील. अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली होती .परंतु त्यांना धीर देत शिवाजी महाराजांनी रोहीडेश्वर गडावर स्वारी केली. तो गड ताब्यात घेतला . पहिल्याच धडकेत रोहिडेश्वर गड स्वराज्यात आणला. ते बघून सर्व मावळ्यांचा उत्साह वाढला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहीडेश्वर गड प्रथम जिंकला . पाठोपाठ तोरणा गड जिंकला. तोरणा गडावर शिवाजी महाराजांना धन सापडलं. धनाची बातमी त्यांना सांगितली तानाजी मालुसरे यांनी.
तेव्हा महाराज म्हणाले तानाजी तुम्हीच घेऊन या ते धन.
मात्र तानाजी म्हणाले. नाही मी नाही येणार तुम्ही चला. माझ्यासोबत
तेव्हा शिवाजी महाराज तानाजीला म्हणाले .
अरे मला खबर कोणी सांगितली गडावर धन सापडल्याची तूच ना. मग तूच घेऊन ये. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे . मावळ्यांच्या पहाऱ्यात धन महालात आलं...मग शिवाजी महाराजांच्या मागे साक्षात भवानीदेवी उभी आहे. असा एकच जल्लोष झाला.

अनेकदा तह करण्यासाठी आलेल्या शत्रूला कशाप्रकारे भेटायचे. शत्रुची भेट कुठे घ्यायची. शत्रु सोबत भेटताना सोबत कोणाला घ्यायचे. किती माणसे सोबत असायला पाहिजेत. शस्त्रे कुठची घ्यायची . छुपे शस्त्रे घ्यायची की नेहमीची .त्या प्रकारे शत्रुकडून सुद्धा माणसांची कपात करून नेमकी माणसे भेटीच्या वेळी शत्रूकडून उपस्थित रहावीत याची खातरजमा करून घेणे .यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पारंगत होते. तसे करायला भेटीच्या दरम्यान ते शत्रुपक्षाला भाग पाडायचे. ही शिकवणी ते शत्रुपक्षाला द्यायचे. अक्षरशः शत्रूला त्यांच्या निरोपातून आणि नियमामधून म्हणजेच शिस्तीतून अप्रत्यक्षरित्या ते शिकवायचे. इतका त्यांचा बिनचूकपणा शिक्षकी वृत्तीने अचुक बनला होता.

कुणाला काय शिकवायचे आणि कुणाला कसे प्रशिक्षणासाठी तयार करायचे . कुणाला आपली गरज आहे. हे ओळखण्यात शिवाजी महाराज तरबेज होते. हा तरबेजपणा त्यांच्या शिक्षकी वृत्तीमुळे त्यांना मिळाला होता .हे ही येथे नमूद करण्यासारखे आहे. निरीक्षण करण्याच्या त्यांच्या सवयीने त्यांना अधिकच महान बनवले होते.
कुणाला भेट द्यावी.
कुणाची भेट घ्यावी
कुणाला देऊ द्यावी.
कुणाला भेटू नये .
शिवाजी महाराजांना हे चांगले माहीत होते . त्याचाच उत्तम दाखला किंवा उदाहरण आहे .
अफजलखानला भेटून त्यांनी त त्याचा कोथळा बाहेर काढले.म्हणूनच शिवाजी राजे उत्तम शिक्षक आहेत. हे बिरुद त्यांना पूर्णपणे लागू होते. त्यांच्या शिरपेचात त्यामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे .

शिवाजी महाराज एखाद्याची परीक्षा घेण्यामध्ये अव्वल होते .परीक्षा तोच घेतो जो स्वतः जातीचा परिक्षक असतो. संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाला शिवाजी महाराज जेव्हा पोचले. तेव्हा संत तुकारामांनी त्यांना बसायला स्वतःचे उपरणे दिले. मात्र शिवाजी महाराजांनी त्याला पाय न लावता त्याच्यावर बसले.जो सच्चा शिक्षक असतो. तो दुसऱ्याचा सन्मान करू लागतो .इथे या गोष्टीने हे सिद्ध होते. शिवाजी महाराज संत तुकारामांना स्वतःहून भेटण्यास गेले ही गोष्ट खूप मोठी आहे. ते एक राजा होते. जेव्हा राजा प्रजेच्या भेटीला जातो तेव्हा प्रजेचा सम्मान मोठा वाढतो. ही गोष्ट जेव्हा इतर लोकांना कळते. तेव्हा राज्याचा आणखीनच सन्मान होतो.

जनतेच्या मनात अशा राज्याबद्दल आदर निर्माण होतो . तो आदर निर्माण करण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी स्वतःहून केले नाही . ते आपोआप घडलेले आहे. तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी शिवाजी महाराज गेले. तेव्हा त्यांनी तुकाराम महाराजांना दागदागिने दिले. मात्र तुकाराम महाराजांनी त्याला त्याकडे पाहिले सुद्धा नाही किंवा त्याला हात सुद्धा लावला नाही . परंतु तुकाराम महाराजांच्या पत्नी आवली उर्फ जिजा यांनी त्या दागिन्यांना हात लावला .ते दागिने आपल्या अंगावर घालून पाहिले. मात्र तुकाराम महाराजांनी दागिने शिवाजी महाराजांना साभार परत केले. हा सच्च्या गुरू शिष्या मधला प्रसंग आहे. अर्थात त्या प्रसंगांमध्ये त्यांचे गुरु तुकाराम महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे शिष्य बनले होते .असा गुरु शिष्याचा विहंगम कार्यक्रम मावळ्यांच्या वाट्याला पहायला येतो. तेव्हा अस्मान ठेंगणे होते. तुकाराम महाराजांच्या भेटीच्या वेळी विद्यार्थी बनले होते स्वतः छत्रपती महाराज . आता भूमिका उलट झाली होती. जे शिवाजी महाराज अनेक मावळ्यांच्या शिक्षकांच्या भूमिकेत होते.तेच राजे संत तुकाराम महाराजांचे शिष्य बनले होते. शिष्य आणि गुरुची जोडी आता बदलली होती . त्याच्या भूमिकांसुद्धा बदलल्या होत्या . छत्रपती शिवाजी महाराज स्वतः राजा असून सुद्धा आता त्यांच्या रक्षणाची पूर्ण जबाबदारी तुकाराम महाराजांवर येऊन पडली होती.

शिवाजी महाराज तुकाराम महाराजांची परीक्षा घ्यायला गेले होते .त्यांना भेटायला गेले होते .मात्र तुकाराम महाराजांनी ओळखले होते शिवाजी राजे आपल्याकडे येत आहेत म्हणजे राजांचा काहीतरी हेतू असणार.. मात्र त्या परीक्षेत तुकाराम महाराज पूर्णपणे सत्य उतरले होते. एक सच्चा संत आणि एक सच्चा राजा यांची ती भेट होती. त्या भेटी मध्येच स्वराज्याची पुढची वाटचाल ठरली होती.

शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी भेटण्यासाठी स्वतः आमंत्रण दिलेले.नव्हते .तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना बोलावलेलेही नव्हते. परंतु शिवाजी महाराज स्वतः त्याच्यांकडे गेले होते. त्यांचे कीर्तन प्रवचन ऐकायला .कीर्तनात शिवाजी महाराज रमले असताना. त्यांचा माग काढत तिथे मोगल सैनिक पोचले होते .परंतु शिवाजी महाराजांच्या प्रशिक्षिकी सवयीने तिथूनही ते सहीसलामत सुटले. त्यांच्या जवळ उत्तम प्रशिक्षण गुण असल्यामुळे अनेक मावळ्यांना उत्तमरित्या राजानी तयार केले . त्यामुळे येणाऱ्या संकटांची चाहूल घेत. त्यांचे मावळे दक्ष राहून संकट ओळखत होते. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये मोगल सैनिक पोचले. तेव्हा तुकाराम महाराजांनी त्यांच्या भक्तीने तिथे अनेक शिवाजी महाराजांची रुपे असलेली लोकं तयार केली. त्या संभ्रमात मोगल सैन्य असताना. शिवाजीराजांनी लगेचच तिथून प्रस्थान केले आणि सुरक्षित जागी छत्रपती शिवाजी महाराज पोचले.

त्या कीर्तनामध्ये असा प्रकार झाला होता.
असे म्हणतात की मुघल सैनिकांना जिथे-तिथे शिवाजी महाराज दिसत होते. इतकी शक्ती आणि भक्ती तुकाराम महाराजांनी तिथे निर्माण केली होती. प्रत्येक मनुष्य हा शिवाजी राजांच्या रूपात तेथे दिसत होता. त्यामुळे गोंधळून मोगल सैनिक निघून गेले. त्याच वेळी वेगाने हालचाल करत छत्रपती महाराज सुखरूपपणे दुसऱ्या ठिकाणी पोहोचले. त्यामुळे तुकाराम महाराजांना एकदम हायसे वाटले... त्यांच्या शिष्याचे त्यांनी संरक्षण केले होते. तुकाराम महाराजांनी शिवाजीराजांनी आलेल्या भेटी दागिने स्वीकारले नाहीत या गोष्टीवरून त्या भेटीची कीर्ती सर्वदूर पसरली आणि लोकांच्या कायम स्मरणात राहिली.