Premacha chaha naslela cup aani ti - 50 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५०.

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५०.

तर, माझ्या प्रिय वाचकांनो.... आपण आता कथेत थोडं हळू - हळू पुढे जाऊया.... मी थोडक्यात तुम्हाला तिचा बालपण ते या कथेचं शीर्षक साध्य होईल इथपर्यंत लवकर - लवकर घेऊन जाईल..... नंतर, योग्य वेळ आल्यावर कथा तुम्हाला उलगडेलच....

माझ्या कथांमध्ये नायक वा नायिका यांच्या विचारांवर मी त्यांच्या कुटुंबियांच्या चांगल्या संस्कारांचा परिणाम किंबहुना सकारात्मक परिणाम दाखवू पाहते....(जर, "खऱ्या आयुष्यात असं कुठ असतं का!?" हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, मग असं वागायला शिकणे ही काळाची गरज म्हणावी लागेल....) आता हे प्रत्येकालाच पटावं हा अट्टाहास ही मी बाळगत नाही....

हेच संस्कार दाखवायला मी पूर्ण कुटुंबीय कुठल्या प्रगल्भ विचारांचे आहेत हे मागील भागात दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहेच...... आता इथून पुढे मला एका अतिशय वेगळ्या विचाराच्या नायिकेच्या पात्राला कथेच्या शेवटापर्यंत जिवंत ठेवायचं आहे......(अधोरेखित शब्दावर भर द्यावा) किंबहुना मला तिचे विचार तुमच्यापर्यंत पोहचवायचे आहेत.....

तर, मला वाटतं तुमच्या काही प्रश्नांचं निरसन मी केलं असावं...... आणि तरी तुम्हाला प्रश्न असतील तर, बिनधास्त विचारू शकता.....

तिन वर्षानंतर.....

आता आपली पिल्लू म्हणजेच, सुकन्या साधारण सात वर्षांची झाल आहे...... म्हणजे, आता ती शाळेत जात असणार हे नक्की.....

आता जेव्हा तिला शाळेत टाकायचे होते तेव्हा, कुठल्या शाळेत टाकायचं हा प्रश्न? तेव्हा घरी चांगलीच मीटिंग भरलेली.... आपल्या लेकीच्या भविष्याचा प्रश्न ना शेवटी....

तर, आजोबांचं असं मत होतं की, इंग्लिश मिडीयम किंवा कोणत्याही खाजगी शाळेत न टाकता, आपण सुकन्याला जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकूयात आणि ज्या कुठल्या शाळेत ती शिकेल.... त्या शाळेत नव - नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षणात कसा हातभार लावता येईल यावर लक्ष द्यायचं... तसा संजय काही अशासकीय संस्थेत सदस्य पदावर कार्यरत होताच.... म्हणून, त्यांचा एक प्रोजेक्ट त्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या विकासावर राबवायचा निर्णय घेतला होता.... तसे शासन निर्णय ही काढण्यात त्यांची मदत शिक्षण अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन केली होती..... कारण, उद्देश सकारात्मक होता.....

जिल्हा परिषद शाळा... या शाळेची एक वेगळीच मजा असते..... आता इतक्या मोठ्या फॅमिलीची मुलगी आणि जिल्हा परीषद शाळेत! म्हणून लगेच माझ्या बुद्धीवर प्रश्न उभारू नका म्हणजे मिळवलं..... तर, सुधारणा कधी होतील जेव्हा युक्ती तशी कृती असेल....! मात्र असं बघायला मिळत नाही..... स्वतःचा स्टेटस जपता यावा म्हणून, मुलांना खाजगी इंग्रजी शाळेत टाकण्यात येतं... काही मुलं न्यूनगंडामुळे अधिकच अबोल होतात.... शेजारचा बंड्या जातो म्हणून, आपला शाम्या ही इंग्लिश मिडीयम शाळेत घालणारे आज बहुसंख्य दिसतील.... मग आपल्या शाम्याला कितपत झेपतं हे ही बघितलं जात नाही.....

मला माझे एक वाचक सांगत होते..... त्यांच्या घरी मराठीची बोंब आहे.... का? तर, इंग्लिश मिडीयमचा क्रेझ.....

आता माझं हे म्हणणं नाही की, इंग्रजी शिकुच नका.....! नाहीतर मला दोष द्याल.... तसंही नवीन विषय मांडला की, बहुतेकांच्या तो पचनी पडत नाही.....!

मी सहज एकदा एका लग्न समारंभात गेले होते.... तर, असंच आम्ही मैत्रिणीत बोलताना, मी ओघात बावन्न बोलून गेले..... तेव्हा सगळ्या मैत्रिणी माझ्यावर मी ते इंग्रजीत उच्चारले नाही म्हणून हसल्या..... खरं तर, त्यांना बावन्न म्हणजे किती विचारल्यास माहीत नव्हतेच..... "सो कॉल्ड इंग्लिश मिडीयम ना" मग मी मोठ्याने हसले आणि त्या चार जणी मिळून जितका मोठा हसण्याचा आवाज नव्हता तितका माझ्या एकटीचा होता... स्वॅग मराठी....... अभिमान मराठी... कोणाचाही अपमान करण्याचा उद्देश नाही हे आवर्जून वाचावे..

तर, सांगण्याचं तात्पर्य तुम्ही समजून घ्या...... जिल्हा परिषद शाळा काही वाईट नाहीत...... स्वतःचा स्टेटस जपण्याच्या दिखाव्यामुळे आपण मुलांवर ओझं तर टाकत नाही ना!? ह्यावर विचार करून बघा.... आपण जिल्हा परिषद शाळांवर टीका करताना, त्यांची खालावलेली गुणवत्ता, शिक्षकांच्या अपुऱ्या प्रशिक्षन सुविधा, शिक्षकांची बुद्धिमत्ता यावर भर देतो पण, कधी या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अट्टाहास केलाय? नाही ना! हेच, इथेच आपण येऊन थांबतो....!

मला सांगायला खूप अभिमान वाटतो...... आमच्या विदर्भाचे वर्धा जिल्ह्यातील नितेश कराळे सर....अतिशय हुशार, कणखर व्यक्तिमत्त्व मात्र, त्यांच्या शिकवण्याची पद्धत जरा व्यंगात्मक...! आता यावरून त्यांना असंच समजलं गेलं..... त्यांच्यावर हसलं गेलं........ मात्र त्यांची शिकवण्याची पद्धती आणि बोलण्यातील खरेपणा हे त्यांचं वैशिष्ट्य आपल्याला शोधूनही सापडत नाही...... त्यांनी लाज वाटते म्हणून, वैदर्भीय बोलीभाषा सोडून, मी पुणेरी करत बसले नाहीत.... कारण, त्यांना स्वतःच्या बोलीभाषेचा खूप अभिनान आहे.... आणि मला वाटतं की, कोणाचं व्यक्तिमत्व ठरवायचं असेलच ना.... तर, एक वरच्या पातळीची बुद्धिमत्ता असावी! कारण, आजकाल कोणाच्या बोलण्यावरून किंवा त्याच्या राहणीमानावरुन त्याचं व्यक्तिमत्त्व ठरवलं जातं.... आता आमचे हे कराळे सर, थंडीच्या रात्री बाहेर एक बॅग भरून ब्लँकेट, आपल्या पत्नीसोबत घेऊन फिरतात आणि जो कोणी थंडीत कुडकुडत असेल ना त्याच्या अंगावर नेऊन पांघरून टाकतात.... हे काम ते रात्री करतात.... कोणाला दिसू नये म्हणून..... कारण, त्यांना प्रसिद्धी नको आहे...... इथंच जिंकलं माणसाने.....

नितेश कराळे सर, यावर्षी पदवीधर मतदार संघाचे उमेदवार म्हणून उभे होते..... माझं मत त्यांनाच होतं कारण, विद्यार्थांच्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने विधिमंडळात मांडणारे ते वाटले..... टक्कर जोरात दिली होती..... तरीही राजनीतिक पायगंडे न वापरल्याने ते हरले..... मात्र हरून ही जिंकले..... कारण, सर्व होतकरू विद्यार्थी - वर्ग त्यांच्या पाठीशी होता..... असे आमचे नितेश कराळे सर....

त्यांच्याविषयी आवर्जून सांगावं वाटते..... जेव्हा ते रिंगणात उतरले होते...... तेव्हा, त्यांना लाभलेला चाहता वर्ग......

स्त्रोत :- 11 Nov 2020 04:31 PM, रजत वशिष्ठ, एबीपी माझा...

नागपूर : ज्वालामुखीतून लाव्हा रस कसा बाहेर पडतो. तर तो खद - खद - खद बाहेर पडतो, अशा खास वऱ्हाडी शैलीत MPSC च्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या आणि त्यामुळेच विदर्भ व महाराष्ट्रात तरुणाईमध्ये "खद - खद मास्तर" म्हणून, ओळखले जाणारे नितेश कराळे आता निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून, नितेश कराळे यांनी त्यांचा अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने त्यांचे विद्यार्थी आणि त्यांना सोशल मीडियावर फॉलो करणारे तरुण उपस्थित होते.

कोरोना आला आणि वर्गात बसवून पारंपरिक पद्धतीने शिकवल्या जाणाऱ्या शिक्षण पद्धतीला ब्रेक लागला. तेव्हा पर्याय म्हणून सुरु झालेल्या ऑनलाईन शिक्षणात अनेक शिक्षकांनी आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतून रंजक बनविले. त्यापैकीच एक वर्ध्यातले नितेश कराळे. ज्वालामुखीतून लाव्हा रस कसा बाहेर पडतो. इथपासून तर मराठीतल्या स्वर आणि व्यंजनांचा अचूक उच्चार करताना जिव्हा कशी वळवावी लागते हे सर्व खास वऱ्हाडी-गावरान शैलीत विद्यार्थ्यांना शिकवणारे कराळे गुरुजी त्यांच्या खास शैलीतील शिकवणुकीमुळे युट्युब आणि इतर समाज माध्यमात खद - खद सर म्हणून प्रसिद्ध झाले. आज तेच कराळे सर महाराष्ट्रातील तरुणाईच्या मनातील खद खद दूर करण्यासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरले आहेत.

वाटल्यास इथे लिंक देते त्यांचे लेक्चर्स बघून, हसू येईल पण, त्यामागची त्यांची जिद्द किती सकारात्मक ते यातून आपल्याला कळेल....


https://youtube.com/channel/UC2hVHyEU3alXMf2oUwUonoA

फोटोत चॅनल चे नाव स्पष्ट पाहू शकता....🙏👇
नाव "पुणेरी पॅटर्न" का? तर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घेण्यासाठी ते काही दिवस पुण्यात होते आणि हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय.... मला वाटतं, नाव काहीही असुदेत त्यागची त्यांची निःस्वार्थ इच्छा बघावी.


कुठल्याही स्वार्थापोटी मी हे सामायिक करत नसून, एखाद्याची जिद्द काय असू शकते हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय..... त्यांचा तो निःस्वार्थी प्रयत्न बघा.... बस.... उगाच नकारात्मकता पसरवू नये... आवडलं नसल्यास कॉमेंट करून तसं सांगू ही शकता..... सर्वस्वी तुमच्यावर आहे...

एकूणच इतक्या सगळ्या बळबळीचा उद्देश काय? तर, माणसाचं व्यक्तिमत्त्व हे विचाराने ठरावे ना की, त्याच्या बोलीभाषा किंवा परिधानाने....!

तर, मला काय वाटतं जितका अट्टाहास आपण, इंग्रजी शाळांचा धरतो तितकाच जिल्हा परिषद शाळांचा धरला तर, त्यांच्यात सुधारणा होऊन, त्या देखील स्वतःचा परफॉर्मन्स देऊ शकतील..... याचं उत्तम उदाहरण....

सोलापूर जि. प. शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार'...... किती कौतुकास्पद गोष्ट ही..... देशासोबतच आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा.....


माहिती स्त्रोत :- महाराष्ट्र टाईम्स....
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 03 Dec 2020, 09:09:00 PM
प्रतिनिधी :- हर्ष दुधे


डिसले गुरुजी
☺️🙏☺️


"मी सोलापूर जिल्ह्यात असताना, पुरस्कारांची घोषणा झाली. आपल्याला पुरस्कार जाहीर झाल्याचे कळाल्यावर खूप आनंद झाला आणि समाधान वाटले. या पुरस्कारासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी, वार्की फाउंडेशन आणि शालेय शिक्षण विभागाचे आभार मानतो. हा पुरस्कार मी राज्यदेशातील माझ्या शिक्षक बांधवांना समर्पित करतो. पुरस्काराची निम्मी रक्कम ९ शिक्षकांना त्यांच्या देशातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी देण्यात येईल. तर, शिक्षकांना टेक्नोसॅव्ही बनवण्यासाठी ३० टक्के रक्कम वापरण्यात येईल. उर्वरित रक्कमेतून २०३० पर्यत विविध देशातील ५० हजार विद्यार्थ्यांची पीस आर्मी तयार करण्यात येईल."

थोडक्यात माहिती बघूया.....

कोण आहेत डिसले गुरुजी?

सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत डिसले शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले.

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी शाळेचे शिक्षक रंजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. तब्बल सात कोटी रक्कमेचा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरल्याने, त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या पुरस्कारासोबतच त्यांना जगातील सर्वोत्तम शिक्षक असा बहुमान प्राप्त झाला आहे. पुरस्काराची रक्कम आपण विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च करणार असल्याचे डिसले गुरुंजीनी मटाला सांगितले.

पुरस्काराविषयी

लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. डिसले यांची अंतिम दहा स्पर्धकांमध्ये निवड झाल्यावर, त्यांचे कौतुक थेट बॉलिवूडमधूनही करण्यात आले होते. क्युआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रतच नव्हे, तर देशातील शिक्षण क्षेत्रांत डिसले यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी डिसले यांची निवड करण्यात आली आहे. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील १४० देशांतील १२ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे डिसले यांनी जाहीर केले आहे. त्या माध्यमातून ९ देशांतील शेकडो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ३० टक्के रक्कम डिसले, टीचर इनोव्हेशन फंड करीता वापरणार आहेत. त्यामुळे देशातील शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे डिसले यांनी सांगितले. तर, उर्वरित २० टक्के रक्कम विविध देशातील विद्यार्थ्यांच्या 'पीस आर्मी' साठी वापरण्यात येणार असल्याचे डिसले यांनी सांगितले.

आता काही जास्त बोलणार नाही... मला वाटतं मला जे बोलायचं ते तुमच्या पर्यंत जाऊन पोहचलं असावं.... "ह्यातून मी स्वतःला अतिशय माहितीपूर्ण व्यक्तिमत्त्व दाखवू इच्छिते" असा गैरसमज बाळगून, दोष देत बसण्यापेक्षा, जे इथे मी मांडण्याचा प्रयत्न केलाय त्यावर विचार केला जावा हीच निःस्वार्थ इच्छा....

तर, आता येऊ आपल्या फॅमिली कडे....... दिवस जात होते..... दिवसेंदिवस सुकन्या मोठी होत होती..... आता नायिका म्हणून, ती अतिशय हुशार वगैरे दाखवणार नाही कारण, हे तुम्ही तिच्या वागणुकीवरून ठरवावं असा माझा प्रयत्न असेल..... कारण, हुशार विद्यार्थी म्हणजे शिस्तबद्धता असणे, असं होत नाही.... होप आज मला काय बोलायचं होतं ते समजलं असावं..... आणि हो सकारात्मक अर्थ अपेक्षित आहे.....

तर, मला सांगा.... एक खरा विद्यार्थी कोण असतो?? ज्याला खुप प्रश्न पडतात.... बरोबर... तर, आपल्या सुकन्याला सुद्धा खुप प्रश्न पडायची.....

एकदा आजी तिला घेऊन बसलेली..... तिचा होम वर्क करायला, तेव्हा.....

पुस्तक होतं इयत्ता दुसरीचं, मराठी बालभारतीचं.... माझं सर्वात आवडतं...... मी आताही वेळ मिळाला की, गंमत म्हणून वाचते....

पुस्तक काही वर्षांआधीचं आहे..... २०१३.... फक्त मुद्दा समजुन घ्या....


आजी : "परी, आज वर्गात काय होम वर्क करायला सांगितला आहे....."

सुकन्या : "उडायला शिकायचंय मला! एका चीमण्याची गोष्ट..... वाचून यायला सांगीतले आहे..."

आजी : "अरे वाह.... बस बघू इथे..... ये माझ्या जवळ..... चला, आपण आधी वाचूया मग नेहमीप्रमाणे यावर बोलूया....."

सुकन्या : "हो नीन्नी..."

दोघीही मोठमोठ्याने तो पाठ वाचून काढतात..... आधी आजी, त्यापाठोपाठ सुकन्या.....

.....................
.....................
.....................

@१५ मिनिटांनी......

आजी : "सांग बघू आपण काय शिकलो...."

सुकन्या : "शेवटी, चिमणा उडायला शिकला....."

आजी : "आणखी...?"

सुकन्या : "ये नीन्नी अग पण, आपल्याला का नाहीत असे पंख....??"

झालं आता ऐका हिचे प्रश्न.....

आजी : "आपल्याला देवाने दोन हात, दोन पाय आणि बाकी सगळे अवयव दिले ना म्हणून बेटा..... पण, पक्षांना त्याऐवजी पंख दिलेत....."

सुकन्या : "ये नीन्नी पण, मग अवयव म्हणजे काय ग....??"

आजी : "अवयव म्हणजे, जसे तुझे हात, पाय, हे क्यूटसं फेस हे सर्व......"

नाकाला हात लावत, कुतूहलाने.....

सुकन्या : "आणि माझं हे छोटुसं नाक पण...."

आजी : "हो परी ते पण...."

सुकन्या : "आजी, चिमणा का बरं घाबरत होता अग.....?? कारण, शेवटी तर शिकलाच ना उडायला??"

आजी : "बरं, मला सांग बघू..... तुला शाळेतली ती घसरगुंडी का बरं आवडत नाही.....?"

सुकन्या : "नाही बाबा.... ती नको.... खूप वाईट आहे ती...."

आजी : "आणि असं का वाटतं तुला??"

सुकन्या : "माझ्या क्लास मधली शीतल घसरून पडली होती त्यावरून....."

आजी : "म्हणजे तुझ्या मनात भीती आहे म्हणून, तुला ती आवडत नाही....? की, तुला ती आवडतच नाही.....? थोडा विचार कर बघू...."

आता मात्र सुकन्या विचारात पडली...... इत्तुसं डोकं, इतका मोठा प्रश्न...... थोड्या वेळाने.....

सुकन्या : "मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नीन्नी..... आपण, घाबरत असतो.... जसा चिमणा उडायला घाबरत होता.... आणि जर शेवट पर्यंत घाबरतच राहिला असता तर उडलाच नसता..... हो ना...."

आजी : "अगदी बरोबर..... मग आता तू काय करणार...."

सुकन्या : "मी त्या घसरगुंडी वर खेळणार...."

आजी : "आणि आता समजलं मग, आपल्याला पंख का दिले नाहीत ते?"

सुकन्या : "कारण, आपल्याकडे हात - पाय आहेत.... पक्षी जी कामं त्यांच्या पंखाने करतात.... ती आपण आपल्या अवयवांनी करतो...."

आजी : "बरोबर....... मग आता मला सांग तू या पाठवरून काय शिकलीस.....?"

सुकन्या : "न घाबरता, चिमणा धीट झाला आणि शेवटी तो उडायला शिकला...."

आजी : "याचा अर्थ काय.....?"

सुकन्या : "मी पण आता घाबरणार नाही..... पडणार या भीतीने खेळायला जात नव्हते..... पण, आता जात जाईन....."

आजी : "खेलोगे - कुदोगे बनोगे नवाब......"

सुकन्या : "पढोगे - लिखोगे तो ही बनेगी हर एक बात......"

आजी : "व्हेरी गूड....."

आतून जया आणि मावशी येतात..... मावशी घरी निघून जातात......

आजी : "आवरलं बाळा....."

जया : "हो आई..... तुम्ही तर, ती म्हणच बदलून टाकलीत हो आई...... खेलोगे - कुदोगे वाली....."

आजी : "काळानुसार काही म्हणी बदलायला हव्यात जया.... कारण, मुलांच्या मनात मग नकारात्मक भाव येत नाहीत...."

जया : "आई तुमच्या मार्गदर्शनात सुकन्या खूप लवकर सर्व काही शिकते आहे... बघून भारी वाटतं...."

आजी : "लहानपणीच वळण लावली की, बरं असतं....."

तेवढ्यात संजय आणि आजोबा येतात......

आजी : "मग काय म्हणता...... झालं काम.....?"

आजोबा : "हो म्हणजे आज आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना जाऊन भेटलो..... लवकरच, शाळेत सेट बसवला जाईल.... ज्याने, टीचींग बदलून मॉडर्न एज्युकेशन पॅटर्न आपण शाळेत राबवतोय...."

आजी : "खूप मस्त....."

तिकडून सल्लू आणि उर्वी येतात.... दोघे स्टडी करत असल्यामुळे, आता डायरेक्ट डीनरसाठी खाली येतात.....

सल्लू : "आम्मीजी, जनाब क्या चल रहा हैं..."

आजी : "आ तेरी ही कमी थी...."

सल्लू : "सलमा राणी हो गयी पढाई....."

सुकन्या : "सल्लू दादू...... चिमणा उडायला शिकला..."

सल्लू : "मतलब??"

आजी : "अरे तिचा एक लेसन आहे.... मराठी बालभारती मधला...... त्याच विषयी बोलते आहे ती...."

सल्लू : "अच्छा वो..... फिर सलमा तू भी ऐसे ही उडना..... किसी से डरने का......"

सुकन्या : "बिलकुल नहीं......"

संजय आणि आजोबा बाहेरून आले असल्याने, जाऊन आधी फ्रेश होऊन येतात......

आजोबा : "जया बेटा वाढतेस का बाळा..... जाम भूक लागली आहे......"

जया : "हो बाबा....."

आजोबा : "काय विशेष आज......"

जया : "बाबा..... पनीर कोफ्ता......"

आजोबा : "अरे वाह....... सरकार उठा लवकर....."

आजी : "याचं फेवरेट काही असलं म्हणजे, माझ्याच सोबत याला जेवायचं असतं...."

आजोबा : "फेवरेट डिश सोबतच, फेवरेट कोणी असलं तर.... आहाहा.... मझा आ गया वाली फिलिंग असते....."

आजी : "पुरे आता चला....."

सगळे डिनर एन्जॉय करतात.......

अँड असेच दिवसामागून - दिवस जात असतात..... सुकन्या दिवसेंदिवस वाढत असते..... आणि इतकंच नाही तर, योग्य त्या मार्गदर्शनात..... याची झलक आज दिलीच आहे मी.....
.
.
.
.
.
.
.
क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️


Rate & Review

Vaishali Kamble

Vaishali Kamble 7 months ago