Vithoba of Shri Kshetra Pandharpur - 4 books and stories free download online pdf in Marathi

श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 4

विठ्ठल लोकदेव देव आहे. तो लोकांचा देव आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरचा पंढरपूर आहे. त्या कारणाने कर्नाटक मधली भक्त मंडळी सुद्धा पंढरपूरला येतात. त्यामुळेच म्हटले जाते कानडा विठ्ठल माझा.

पुंडलिक मातृ-पितृ भक्त असण्याच्या आधी भक्त पुंडलिक स्वतःच्या पत्नीची सेवा करायचा. तिला त्रास होईल असे काही करायचा नाही. तो आई-वडिलांना रागवायचा. माझ्या पत्नीला काही कामे सांगायचे नाहीत. तिला आरामात ठेवायचे. असा दम तो स्वतःच्या आईवडिलांना द्यायचा...
पंढरपूरच्या यात्रेला निघताना त्याने स्वतःच्या बायकोला खांद्यावर घेतले होते आणि आई-वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून त्यांना मागून खेचत तो पुढे निघाला. ते दृश्य बघून लोकं त्याला हसत. परंतु त्याची त्याला जराही लाजलज्जा वाटली नाही... त्याच्या खांद्यावर बसलेल्या त्याच्या पत्नीला सुद्धा त्याबद्दल जराही वाईट वाटले नाही... पंढरपूरच्या यात्रेला निघताना मध्ये त्यांना कुकुट स्वामीचा आश्रम लागला .
त्याने त्यांना विचारले की पंढरपूर यात्रेचा रस्ता कुठून जातो .तेव्हा कुक्कुटस्वामी म्हणाले.
मला काय माहीत नाही...
त्यांच्यावर रागावून पुंडलिक त्यांना म्हणाला. तुम्ही एवढे ऋषी झालात .तुम्हाला पंढरपूरचा रस्ता माहित नाही. तुम्ही कसले ऋषी आहात .परंतु यावर कुक्कुट स्वामी जराही रागावले नाहीत. ते हसले आणि पुढे निघून गेले.
कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये पुंडलिक शिरला. तेव्हा तिथे त्याला तीन स्त्रिया दिसल्या तीन स्त्रियांना त्याने विचारले की तुम्ही कोण आहात...?
त्या स्त्रिया म्हणाल्या आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्या आहोत. कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये आम्ही पाणी भरत आहोत...
ते ऐकून लगेच पुंडलिकाचे गर्वहरण झाले. त्या घटनेपासून तो मातृ-पितृ भक्त झाला. त्याच्या आई-वडिलांचे दुःखाचे दिवस सरले . पुंडलिकाच्या सेवेमुळे आई-वडिलांचे चांगले दिवस सुरू झाले. पुंडलिकाच्या कृती मध्ये बदल झाला होता. त्याच्या बायकोने खूप जळफळाट केला. परंतु त्याने तिच्याकडे जराही लक्ष दिले नाही. तो आपल्या आईवडिलांच्या सेवेमध्ये गुंग राहिला... तो चांगला आज्ञार्थी पुत्र झाला. पुंडलिक स्वतःच्या आई-वडिलांचा आदर राखू लागला. त्यांचे ऐकू लागला. त्याच्या आई वडिलांनी त्याला सांगितले . आता आम्ही वृद्ध झालो आहोत. आम्हाला काही प्रवास झेपत नाही. ही यात्रा सोडून आपण दिंडीरवनात जावे आणि तिथेच राहावे. आई-वडिलांच्या विनंतीस मान देऊन भक्त पुंडलिक दिंडीरवनात आला आणि आई वडिलांची सेवा करू लागला... आज्ञाधारक बनल्याने भक्त पुंडलिक सर्व जगात सुप्रसिद्ध झाला. त्यालाही बुद्धी श्री विठ्ठलाने दिली. त्याच विठ्ठलाला भक्त पुंडलिकाने आपल्या घराबाहेर विटेवर उभा करून ताटकळत ठेवले होते. परंतु त्यामुळे विठ्ठलाला जराही राग आला नाही आपला भक्त आपल्या आई वडिलांची सेवा करतो आहे हे बघून विठ्ठल रुक्मिणीचा ऊर अभिमानाने भरून आला. त्यामुळेच भक्त पुंडलिक विठ्ठलाचा लाडका भक्त झाला.

संत जनाबाई हिने अभंग लिहिले आहेत .त्यामध्ये तिने म्हटले आहे की
विठु माझा लेकुरवाळा। संगे भक्तांचा मेळा.
विठ्ठलाच्या अंगाखांद्यावर त्याची भक्त मंडळी खेळताना दिसतात. विठ्ठलाच्या अंगाखांद्यावर भक्तमंडळी खेळत असल्यामुळे त्याला माऊली असे म्हटले जाते. सर्व भक्तांची आई . विठू माऊली...
उत्तमोत्तम भक्त विठ्ठलाला लाभले याचे कारण स्वतः विठ्ठल आज्ञाधारक होता. तो जगन्नियंताची आज्ञा पाळायचा. सृष्टीला नवजीवन देणारा होता. अशी लोकांमध्ये धारणा होती. विठ्ठल सर्वसामान्यांचा देव होता. दीनदुबळ्यांचा देव...

पंढरीनाथ महाराज की जय.
तुकाराम महाराज की जय... विठ्ठल विठ्ठल विठ्ठल...
ज्ञानबा तुकाराम. जय हरी विठ्ठल...

असा गजर जेव्हा एखाद्या मंदिरात ऐकू येतो. वाटेवर ऐकू येतो. कीर्तनामध्ये ऐकू येतो. त्यासोबत टाळ मृदंग चिपळ्या यांचे मधुर आवाज येतात.. ते ऐकून कान खरोखरच तृप्त होतात.

विठ्ठलाच्या आधी त्याच्या भक्तांची नावे घेतली जातात. त्याच्या भक्तांच्या जयजयकार केला जातो. त्यानंतर शेवटी विठ्ठल विठ्ठल म्हटले जाते. त्याचे कारण हेच आहे की विठ्ठल भक्तांसाठी धावून जाणारा आहे. भक्तांचे रक्षण करणारा आहे.

श्री विठ्ठल हा पर्यावरण रक्षक आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी तो घेतो . जंगलामध्ये रुक्मिणी सहित राहतो. जंगलातील पशु पक्षांना काही इजा होणार नाही याची काळजी घेतो. झाडाखाली पहुडतो. स्वच्छ निसर्गाचा आनंद घेतो.

विठूचा गजर हरिनामाचा. झेंडा रोविला असे भक्तगण अभिमानाने म्हणतात.

भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला शोधत दिंडीरवनात आलेत तिथे भक्त पुंडलिकाच्या आश्रमामध्ये जवळ आल्यावर पुंडलिकाने त्यांना दिलेल्या विटेवर ते उभे राहिले .त्यावेळे पासून श्री विठ्ठलाचा अवतार सुरू झाला. विठ्ठलाची जी छबी आहे, कमरेवर हात ठेवून ती निर्माण झाली. श्री विठोबा त्या अवतारात प्रकटले. त्या प्रसंगा पासून कमरेवर हात ठेवलेल्या विठोबाची मूर्ती लोकांच्या डोळ्यात साठवली गेली. कमरेवर हात ठेवलेल्या सावळ्या विठोबाचे गोजिरी आणि साजिरे रूप तिथे निर्माण झाले.. श्रीकृष्ण रंगाने निळा होता. विठ्ठल आणि रुक्मिणी रंगाने काळे आहेत. त्याची भक्त मंडळी सुद्धा काळ्या विठ्ठला अशीच सार्थ हाक त्याला मारतात. सावळ्या विठ्ठला असे बोलतात....

पंढरपूरचे विठोबा मंदिर सर्वसामान्यांना खुले करून देण्याचा सन्मान साने गुरुजी यांना आहे. पंढरपूरच्या मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम करणारे बडवे मंदिरात फक्त सवर्णानाच प्रवेश देत होते. इतर लोकांना नाही. त्यामुळे साने गुरुजींनी पंढरपूरला जाऊन त्यांच्या अनुयायांसह आंदोलन केले .ते मंदिर सर्वांसाठी खुले केले. ही घटना भारत देशाच्या स्वातंत्र्यच्या काळात घडलेली आहे. या गोष्टीला आता सत्तर वर्षे होऊन गेली आहेत. सानेगुरुजी उत्तम समाज सुधारक होते.

भगवान श्री विठ्ठल थोर प्रबोधनकार होते. त्यांनी त्यांच्या भेटीतून , कृतीतून समाज प्रबोधन केले. समाजाला अंधश्रद्धेच्या बेडीतून मोकळे केले. भक्तांच्या संतांच्या सहायाने श्री विठ्ठलाने हे कार्य मोठ्या प्रमाणात केले. भक्त आणि संतांच्यावर त्यांनी विठ्ठलकृपा केली. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यावर अनुग्रह केला. अनेक रंजल्या-गांजल्या लोकांना त्यांनी बोध दिला. प्रबोध दिला. त्यांचे प्रबोधन केले. स्वतः जवळच्या दिव्यशक्तीने विठू माऊलीने चमत्कार केले . अशा अनेक घटनांनी विठूमाऊली प्रबोधनकार ठरली. यामध्ये गरीब श्रीमंत असा त्यांनी भेदाभेद केला नाही....

नरहरी सोनार श्रीमंत व्यक्ती होता .तो फक्त शंकराची भक्ती करायचा. तो शैव भक्त होता. तो वैष्णव नव्हता.
वैष्णव भक्त विष्णूची, कृष्णाची, विठ्ठलाची भक्ती करत. नरहरी सोनाराला विठ्ठलाच्या कमरेची सोनसाखळी तयार करण्याची संधी मिळाली. मात्र त्याने ती नाकारली. परंतु त्याची पुन्हा पुन्हा विनवणी केल्यावर तो विठ्ठलाच्या कमरेची सोनसाखळी करायला तयार झाला. त्यासाठी नरहरी सोनाराने अट घातली.
मी डोळ्यावर पट्टी बांधून विठ्ठलाच्या कमरेचे माप घेईन. मग कंबर पट्टी तयार करीन. त्यानुसार नरहरी सोनार विठ्ठलाच्या मंदिरात गेला. मंदिरात शिरण्यापूर्वी त्याने डोळ्यावर पट्टी बांधली. त्याने विठ्ठलाच्या कमरेवर स्वतःचे दोन्ही हात ठेवले .तर त्याला विठ्ठलाच्या मूर्तीच्या जागी शंकराचे मुख दिसले .शंकराची मूर्ती दिसली. तो चपापला. त्याला आश्चर्य वाटले. त्यांने डोळ्यावरची पट्टी काढली तर समोर विठ्ठलाची मूर्ती दिसत होती .त्याने पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधली. त्याला पुन्हा विठ्ठलाचेच रूप दिसले. पुन्हा तेच तेच दृश्य दिसले. असे पाच सहावेळा केल्यानंतर त्याला मनोमन खात्री पटली कि विठ्ठल आणि शंकर एकच आहे . त्या मध्ये भेदाभेद करायचा नाही. असा दृष्टांत विठ्ठलाने नरहरी सोनारला दिला. त्या घटनेने नरहरी सोनार विठ्ठल भक्त झाला. जो नरहरी सोनार विठ्ठलाला मानत नव्हता. तो नरहरी सोनार आता दिवस-रात्र विठ्ठल भक्तीचा भोक्ता झाला होता. पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीच्या डोक्यावर शंकराची पिंडी आहे. ती मूर्ती दोन देवतांचे प्रतीक आहे. स्वतः श्री विठ्ठल आणि श्री भोळाशंकर...

विठ्ठलाने काळे रूप धारण केले. निळी अंगकांती घेतली नाही. याचे कारण जसा देश तसा वेश.
ज्या ठिकाणी श्रीकृष्ण मथुरेला ,गोकुळामध्ये किंवा द्वारकेला होता. त्या त्या ठिकाणी त्याचे रुप वेगवेगळे होते. विठ्ठलाचा अवतार रूपात महाराष्ट्रात प्रवेश झाल्यावर त्याचे रूप त्याने काळ्या रंगाचे स्वीकारले.रंग रूपातील बदल त्याला दिव्यत्व प्राप्त करून देतो. नवी तेजस्वी ओळख सांगून जातो. त्याचा अवतार दाखवतो. आपल्या भक्तांना वेगळ्या रंगात आणि आगळ्यावेगळ्या वेशभूषेत विठ्ठलाच्या रूपात दर्शन त्याने दिले. तो बदल भक्तांना आवडला . त्यांच्या डोळ्यांमध्ये तोच भक्तीभाव राहिला.

श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल....

जय हरी विठ्ठल... जय हरी विठ्ठल...
समाज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल नाद करू लागला. आपल्या भक्तांना योग्य मार्गदर्शन करणारा विठ्ठल त्या काळातला श्रेष्ठ होता. अनेक चमत्कार आणि दिव्य गोष्टी विठ्ठलाने त्या काळात केल्या आहेत.


विठोबा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे आणि कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे महादैवत आहे.
पंढरपुराच्या देवळात फक्त विठ्ठलाची मूर्ती आहे. रुक्मिणीचे देऊळ वेगळे आहे. पुरातन काळी संतांच्या दिंडी पंढरपूरला जात त्या मध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव होते. पंढरपूरमध्ये रुक्मिणीची मूर्ती वेगळ्या ठिकाणी आहे.

संत ज्ञानेश्वरांनी सुरू केलेली दिंडी आठशे वर्षापासून आळंदी येथून निघते. या दिंडीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या दिंड्या सामील होतात. त्यामध्ये मानाच्या दिंड्या असतात. पुढे कोण? मागे कोण ?या प्रकारे त्याची रचना असते. म्हणजे आधी कुणाची दिंडी .
नंतर कुणाची दिंडी असा त्याचा अर्थ आहे. दिंड्यांमध्ये विणा वाद्य वाजवणाऱ्याला मानाचे स्थान असते. टाळ, मृदंग, चिपळ्या सुद्धा वाजत असतात. दिंडी मार्गामध्ये स्त्री-पुरुष फुगड्या खेळतात. त्यामध्ये गरीब-श्रीमंत असा भेदभाव नसतो.

संत तुकारामांनी सुरू केलेली दिंडी यात्रा देहू गावातून निघते. देहूगाव पुण्याजवळ आहे. . तुकाराम महाराजांनी सुरु केलेल्या दिंडीचा मार्ग सोलापूर मार्गे पंढरपूर आहे. देहू पासून पंढरपूरला चालत पालखी किंवा दिंडी नेण्याला १९ दिवस लागतात.

ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीचा मार्ग वेगळा आहे. आळंदी, पुणे, जेजुरी , सासवड,वाल्हे, लोणंद फलटण, माळशिरस वाखरी व शेवटी पंढरपूर असा दिंडी मार्ग आहे...

खांद्यावर पताका किंवा ध्वज, कपाळाला टिळा, गळ्यात तुळशीची माळ, मुखी विठ्ठलाचे नाव अशा प्रकारे दिंडींची पायी मिरवणूक काढण्यात येते. त्याला पंढरीची वारी म्हणतात. वारी म्हणजेच आनंद सोहळा. वारी करणाऱ्यास वारकरी म्हणतात. गळ्यात तुळशीची माळ म्हणजे जप माळ घातल्याशिवाय वारकरी होता येत नाही. त्यासाठी मांसाहारी पदार्थ सोडावे लागतात, व्यसने सोडावे लागतात. सात्विक आहार घ्यावा लागतो.

वारी करणाऱ्या पेक्षा परतवारी करणाऱ्याची संख्या खूप कमी असते. परंतु परतवारी करणाऱ्यांना अडचणीला खूप तोंड द्यावे लागते. आषाढीची वारी करतेवेळी अनेक ठिकाणी वारकऱ्यांना मदत करणारे, अन्नपदार्थ पुरवणारे, पाणी देणारी सेवा करणाऱ्या संस्था असतात. परत वारी ही आषाढी एकादशी या दिवशी नसते ती इतर दिवसांमध्ये असते. त्यावेळी अशा सुविधा सोयी नसतात. परतची वारी करणारे सुद्धा पायी चालत असतात .त्यांना अशा गैरसोयीला तोंड द्यावे लागते. यासाठी परतवारी खूपच महत्त्वाची आहे. खूपच कष्टाची आहे. मेहनतीची आहे.

सर्व भारत देशातून पंढरीच्या वारीला लोकं येतात. हजारो लाखोंच्या संख्येने येतात. त्यासाठी दिंडी काढली जाते. त्या दिंडीचा एक प्रमुख असतो. दिंडीचा प्रमुख स्त्री अथवा पुरुष कोणीही भंडारी असू शकते.

दिंडी मार्गक्रमणामध्ये मेंढ्यांचे रिंगण ,अश्वरिंगण,उभे रिंगण सोहळा पार पाडला जातो. झेंडेकरी, डोक्यावर तुळशीच्या कुंड्या घेणाऱ्या स्त्रिया, विणेकरी... अशी मंडळी असतात... यांच्या सर्वांच्या उत्साहात विठोबाची सेवा केली जाते. अनेक वारकरी पायी चालत विठोबा माऊलीला भेटायला आलेले असतात. हे दृश्य फक्त पंढरपूरचेच नसतं. महाराष्ट्रा मध्ये जिथे जिथे विठ्ठलाची मंदिरे आहेत. तिथे थोड्याफार फरकाने असेच विठ्ठल भक्त येतात .विठ्ठल मूर्तीचे दर्शन घेतात. आषाढी एकादशी उत्साहाने साजरी करतात..

भारतामध्ये महाराष्ट्रातील विदर्भ भागातील अमरावती जिल्ह्यात रुक्मिणीचे माहेर आहे. त्या गावाचे नाव कोंडीण्यपुर. नल दमयंतीचे गाव सुद्धा तेच आहे.

आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री सपत्निक विठ्ठलाची पूजा करतात. तो त्यांचा सन्मान असतो. त्यांच्यासोबत विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी असलेल्या रांगेतील वारकरी संप्रदायातील एका भक्ताला सुद्धा त्यांच्यासोबत विठ्ठलाची पूजा करण्याचा मान दिला जातो.

संत कबीर, ज्ञानदेव ,नामदेव यांच्या काळात पंढरपूर येथे संत कबीर, येऊन गेले होते. कबीर या नावाचा अर्थ आहे ' महान ' कबीरांनी सुद्धा विठ्ठलाची भक्ती केली. त्याच्यासाठी दोहे लिहिले. संत कबीर जिथे राहत होते बनारस काशीला ती मंदिराची नगरी होती. त्या मंदिराच्या नगरीमध्ये मुसलमानांनी तोडलेली मंदिरे त्यांनी पाहिली होती. हिंदू आणि मुसलमानात धर्माच्या नावाखाली चाललेली रस्सीखेच त्यांनी पाहिली . त्या कारणाने मानवतावादी माणुसकीचा नवा धर्म त्याच्या मनात निर्माण झाला. प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे आचरणा करण्याचे स्वातंत्र्य आहे .प्रत्येकाने एकमेकांच्या भावनांचा आदर करावा. राम आणि रहीम भेदभाव न करता त्यांचा आदर करावा असे त्याला वाटत होते. विठ्ठल, राम ,कृष्ण यांचा कबीर भक्त होता. संत कबीर साधना ,नामस्मरण, समाजाचे अवलोकन आणि लोकांचे प्रबोधन या कार्यात जास्त रमत होते. ते साधक उपासक आणि भक्त होते.

कबीराच्या विचारांनी जे लोक पुढे गेले .ते स्वतःला कबीर पंथाचे म्हणू लागले. या पंथात हिंदू-मुस्लीम सर्वजण होते. पांढऱ्या रंगाची उंच टोपी. कपाळी गंधाचा टिळा . गळ्यात तुळशीची माळ अशी कबीरपंथी यांची ओळख होती . तुळशीची माळ ही विठ्ठल भक्तीची खूण होती.


कबीरांनी ईश्वरासाठी राम, कृष्ण, विष्णू, गोविंद, साईहरी, अल्ला, करीम, खुदा, अशी नावे वापरली. त्यापैकी दोन नावे कबीरांना जास्त प्रिय होती.
एक म्हणजे राम आणि दुसरा रहीम..

कबीरांच्या दोहा याची संख्या अगणित आहे. कबीर ग्रंथावली ,कबीर साखी किंवा कबीर बीजक यामध्ये कबीरांचे दोहे आहेत. कबीरांचे दोहे एक अनमोल अक्षय ठेवा आहे.

संत कबीरांनी आयुष्याच्या अंतिम समयी काशी सोडली. त्याचे गाव मगहर येथे जाऊन आपले जीवन संपे पर्यंत त्यांनी तिथेच वास्तव्य केले. काशीला मोक्ष मिळतो अशी लोकांची धारणा होती. परंतु मोक्ष कुठेही मिळू शकतो. असे कबीरांचे थोर विचार होते. ते आपल्या गावाला येऊन राहिले. त्यांनी ते सिद्ध करून दाखवले. त्यांच्या अलौकिक आणि जगावेगळ्या विचारांमुळेच कबीर संत बनले. कबीरांनी हिंदू इस्लाम या दोन्ही धर्माचे अंतिम ध्येय सहिष्णुता, बंधुभाव, समाजसुधारणा आहे असे दाखवून दिले. पंढरपूरच्या विठोबाने संत कबीरांना पंढरपूर येथे येण्यास मार्ग दाखवला... पंढरपूरला येऊन कबीर पुन्हा त्याच्या कर्मभूमीत गेले. तिकडे जाऊन त्यांनी समाज सुधारकाचे महाकार्य केले. त्यांच्या दोह्यांचा अर्थ म्हणजे मनुष्य जन्माने नाही तर कर्माने, ज्ञानाने, कार्याने, आणि बोधामुळे श्रेष्ठ ठरतो. साधू हा कोणत्या धर्माचा जातीचा पंथाचा आहे याचा विचार करू नये. तर त्याचे ज्ञान पहावे. अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली. विठ्ठलाचे कार्य त्यांनी उत्तरे पर्यंत नेले आणि निष्ठेने केले... मोठ्या प्रमाणात वाढवले.

संत कबीरांनी हिंदी भाषेमध्ये विठ्ठलाचे भजन लिहिले आहे....

सब आलम का रखनेवाला विठ्ठल पंढरपुरवाला।
खूब बिराजे सब संतो का हुआ मेला।

निशान झेंडा चंद्रभागा मे हुवा मेला‌। आखाडी एकादसीसे कबीर भगत हुआ चेला.

त्यांचे दुसरे ही भजन आहे.

हरी से कोई नही बडा। दिवाना क्यू गफलत मे पडा। बेटा हरी से लपटा। जब खंब कट्पटा।।1।।
गोपीचंद और भरतर राजा महलमलकु तब छोडा।।2।।
पुंडलिक ने सेवा किनी विठ्ठल हट पर खडा।।३।।
कहत कबीर सुनो भाई साधो हरिचरण चीत्त जडा।।४।।