तू अशीच जवळ रहावी... - भाग 4 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - भाग 4

तू अशीच जवळ रहावी... - भाग 4

मागील भागात:-

"दया येते ग मला तुझी...पण काय करू ना तुला जिवंत सोडले ना जय माझा कधीच होणार नाही कारण त्याला कळेल ना मी मारले म्हणून तुला...त्यामुळे मला तुझ्यासोबत असे वागावे लागते...कारण मला तुझ्यापेक्षा जय महत्त्वाचा आहे...मैत्रिणी काय पैसा फेकून मी मिळवू शकते...पण जयला नाही ना मिळवू शकत...म्हणून अस केलं...सॉरी माय बेस्टी आणि बाय बाय बाय...😔राम नाम सत्य हैं...देव तुझ्या आत्म्याला शांती देवो..."ती मुलगी स्क्रीन कडे पाहत हसुरी हास्य करत बोलते...ती तशीच विचित्र नजरेने तिच्या सलाईनमधून एक थेंब तिच्या हातापर्यंत पोहचण्याची वाट पाहत असते...काही सेंकदातच तो थेंब भावनाकडे पोहचणार असतो हे पाहून ती विचित्रपणे हसते...पण तेवढ्यात भावनाच्या रूमची लाईट जाते आणि पूर्ण रूम अंधारमय होते...तर इकडे तिची स्क्रीन देखील बंद होते...ती तशीच प्रयत्न करून बटन दाबून ऑन करत असते पण स्क्रीन काही केल्या ऑन होत नाही ते पाहून ती चवताळते आणि रागातच सगळं उचलून फोडून टाकते...

"मला तिला मरताना...तडपताना पाहायचे होते पण नाही मिळाले...😤जाऊ दे उद्या पेपरला नक्कीच कळेल मला ते..."ती मुलगी अस बोलून कुठेतरी निघून जाते...

आतापासून:-

इकडे भावनाच्या रूममध्ये रूममध्ये लाईट जाते...लँन्सी येऊन तिच्याकडे असलेल्या फिचरचा वापर करून ती भावनाला लावलेल्या मशिन्समध्ये विजेचा प्रवाह सोडते...तशी भावनाच्या रुम्सच्या लाईट सुरू होतात...ते पाहून मृत्युंजय भावनाच्या रूममध्ये येतो...पाहतो तर भावनाला लावलेली सलाईन काढलेली असते...सलाईनचा ब्लू कलर झालेला पाहून तो घाबरतो...तो पळतच तिच्याजवळ जातो...

"प्रिन्सेस काय झालं तुला...लँन्सी डॉक्टर ला बोलावून आण लवकर..."मृत्युंजय थोडस काळजीच्या स्वरात बोलतो...त्याच बोलणे ऐकून लँन्सी काही मिनिटात गोल गोल फिरून डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरला भावनाच्या रूममध्ये घेऊन सुध्दा येते...

"डॉक्टर काय झाले आहे माझ्या भावनाला...???" मृत्युंजय थोडस भीतीने विचारतो...कारण भावनाचे हार्टबीट भरपूर प्रमाणात वाढले होते...ते पाहून तो घाबरला होतात...डॉक्टरने स्लाईनची अवस्था पाहून काय समजायचे ते समजले...त्यांनी नर्स कडून दुसरी सलाईन मागून आणून लगेच तिला लावली...काहीवेळ डॉक्टर तिथेच राहून भावनाला चेक करत होते...त्यांना चेकअप करताना पण घाम फुटला होता...ती नॉर्मल झाल्यावर डॉक्टर रिलॅक्स झाले आणि तसेच ते मृत्युंजय कडे वळले...

"सॉरी सर बट यांच्या सलाईन मध्ये जालीम पॉइझन टाकलं होतं...एक जरी थेंब यांच्यापर्यंत पोहचला असता तर आम्ही पण काही करु शकलो नसतो..."डॉक्टर थोडस घाबरत बोलतात...

"व्हॉट...😡हे कोणी केलं आता...डॉक्टर मी भावनाला इथे उपचारासाठी ठेवले आहे हे लक्षात राहू द्या...आज जर तिला काही झाले असते ना तुमच्या हॉस्पिटलला एका क्षणात मिटवून टाकले असते तुमच्यापैकी कोणालाच माफ केले नसते मी..."मृत्युंजय रागातच डॉक्टरला सूनवत असतो...

"सॉरी सर आय एम सॉरी...प्लीज अस काही करू नका...मी पाहतो हे सर्व कोणी केले ते..."डॉक्टर मृत्युंजयचा राग पाहून घाबरत बोलतात...

"त्याची काही गरज नाही आहे डॉक्टर...आम्हाला मिळाली आहे ती..."एक मुलगी एका मुलीच्या हाताला घट्ट पकडून भावनाच्या रूमच्या दारात आणत बोलते...

"आरती तू इथे आणि ही तीच नर्स आहे...जिने मला डॉक्टरने बोलावले म्हणून सांगितले आहे..."मृत्युंजय त्या मुलीकडे पाहत शॉक होऊन बोलतो...

"जीजू मला लँन्सी मुळे यावे लागले...तिने मला help चा मेसेज टाकला होता आणि या नर्सचा व्हिडीओ देखील...😡हिची खबर घेण्यासाठी मी इथे आले आहे..."आरती अस बोलत त्या नर्सच्या एक सणसणीत कानाखाली वाजवते...तशी ती नर्स जमिनीवर पडते...तिचा अवतार पाहून डॉक्टर पण घाबरतात...कारण आरती खूप रागात होती...मृत्युंजय पण आरती ला पाहतो...कारण आज ती पोलिसांच्या वेशात होती...आता पोलीस म्हटल्यावर त्यांचा हात तर जबरदस्त बसणारच ना...त्या नर्सला दिवसा ढवळ्या तिने चांदणे दाखवले होते...

"आरु काय झालं आहे नक्की कळेल का मला?"मृत्युंजय तिला रागात पाहून विचारतो...

"डॉक्टर प्लीज तुम्ही बाहेर जा...मला personally बोलायचे आहे जीजू सोबत..."आरती शांत होत बोलते...तिचे ते बोलणे ऐकून आणि तिला पोलिसांच्या वेशात पाहून डॉक्टर घाबरून बाहेर जातात...आरु कोणाला तरी कॉल करून आतमध्ये बोलावते...तसे ते लोक काही वेळात भावनाच्या रूममध्ये येतात...मृत्युंजय सगळयांना पाहून शॉक होतो...कारण सगळे भावनाचे फ्रेंड्स होते ते...सर्वजण आरतीला पोलिसांच्या रुपात पाहून शॉक होतात...आरती मात्र फुल्ल जोशमध्ये सगळ्यांच्या समोर उभी होती...

"लँन्सी व्हिडीओ लाव..."आरती कडक शब्दांत बोलते...तिचे बोलणे ऐकून लँन्सी तिच्या पोटावर असलेल्या स्क्रीनवर व्हिडीओ ऑन करते...ती एक रोबो मशीन होती जी भावनाने तयार केली होती...तिच्यात भरपूर सारे फिचर ऍड केले होते...(पुढील काही पार्ट्स ला कळेल...😊)सगळेजण तो व्हिडीओ पाहत असतात...तो व्हिडीओ पाहून सगळयांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असतात...ती पण तो व्हिडीओ पाहून आधीच घाबरली होती...कारण तिने जे काही केलं ते त्या व्हिडीओ मध्ये कैद झाले होते...

व्हिडीओ मध्ये लाईट गेल्यावर लँन्सी धावतच आतमधे आली...तिने त्या परिस्थितीत पण येऊन भावनाच्या हाताला लावलेली सलाईन काढून टाकली...त्यामुळे भावनाकडे त्या विषाचा थेंब सुद्धा पोहचला नाही...ते पाहून मृत्युंजयला लँन्सी बद्दल कौतुक वाटत होते...तिथे असलेल्या सगळयांना तिच्याबद्दल खूप कौतुक वाटत होते...कारण आज तिच्यामुळे भावना जिवंत राहिली...व्हिडीओ संपताच क्षणी मृत्युंजय नर्स कडे जातो...तो आता भयंकर रागात होता...

"कोणाच्या सांगण्यावरून तू भावनाला मारण्याचा प्रयत्न केला...😡बोल लवकर...नाहीतर अशी शिक्षा करेन ना पुन्हा कधी तोंड दाखवायला पण मिळणार नाही तुला जगाला..."मृत्युंजय रागातच त्या नर्सला बोलतो...त्याचा राग पाहून नर्स घाबरते...

"बोल लवकर तू का केलं हे...😡जीजू थांबा तुम्ही मीच दाखवते हिला ...माझ्या मैत्रिणीला मारायला आली ना थांब तुला..."एक मुलगी त्या नर्सच्याजवळ येत रागात बोलते...ती तशीच धावून तिला मारायला जाणार हे पाहून मृत्युंजय तिला अडवतो...

"थांब प्रतीक्षा...तिला बोलू दे...नंतर बघू काय करायचे तिचे ते..."मृत्युंजय शांतपणे बोलतो...पण त्याच्या शांत रहाण्यात देखील एक वेगळाच राग दिसत होता...पण तो तेवढा दाखवत नव्हता...

"सर...मला...कॉल...आला....होता...त्यांनी...मला...
मॅडमना मारण्यासाठी 5 लाख रुपये दिले😭...म्हणून मी हे काम केलं...मला बाकी काहीच माहिती नाही...त्यांचा फक्त मेसेज आला होता..."नर्स रडतच बोलते...

"तो नंबर मला दे तू...या वेळी तुला सोडत आहे...पण पुन्हा जर तू अशी वागली ना माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल..."मृत्युंजय शांतपणे बोलतो...त्याचे बोलणे ऐकून नर्सला बर वाटत...ती लगेच तो नंबर मृत्युंजयला देते...तो नंबर पाहून मृत्युंजय शॉक होतो...पण खात्री करण्यासाठी तो नंबर सगळयांना दाखवतो...सगळे जण तो नंबर पाहून शॉक होतात...

"जीजू नो अस नाही होऊ शकत...😢मी जो विचार करत आहे तसच असलं तर भावना ला दुःख होईल..."प्रतीक्षा थोडीशी दुःखी होऊन बोलते...

"आय नो प्रतिक्षा पण खरं असलं तर मी सोडणार नाही...😡"मृत्युंजय भयंकर रागात बोलतो...त्याचा राग पाहून सगळे घाबरतात...पण भावना बद्दल किती possessive तो होता हे सगळयांना माहिती होते...सगळयांना भावनाचा हेवा वाटायचा मृत्युंजय सारखा जोडीदार तिला मिळाला होता...भलेही तीच प्रेम नव्हतं पण त्याच प्रेम निस्वार्थ होते तिच्यावर...त्यामुळे तो भावनाला अश्या परिस्थिती देखील सोडून गेला नाही...उलट त्याने तिला साथ दिली...

"जीजू भावनाची केस माझ्याजवळ आहे...हा अकॅसिडेंट झाला नव्हता...हा मुद्दाम प्लॅन करून घडवण्यात आलेला होता...😡तिच्या डोक्याला अकॅसिडेंट मुळे जखम झाली नव्हती...रॉडने तिला मारण्यात आले...क्रूरपणे तिच्यासोबत हे सगळं घडल...😢मला माझ्या टीम कडून कळल...त्या ठिकाणी मला हे पेन मिळालं..."आरु मृत्युंजयचा राग पाहून बोलते...तिचे बोलणे ऐकून भावनाचा मित्र परिवार आणि मृत्युंजय शॉक होतात...

"आरु भावनाची काय आहे ग दुष्मनी...ती फक्त तीच आयुष्य जगत होती ना...😢मग का तिला मारले ग कोणी..."आर्या आरु जवळ येत बोलते...(भावनाची तिसरी मैत्रीण...ओळख नंतर होईल सगळयांसोबत)

"माहिती नाही ग आर्या...पण बघू मी नक्कीच शोधून काढेन हे..."आरु...

''मला हे पेन देते का आरु?..."मृत्युंजय विचार करून मागतो...त्याने पेन मागितल्याने आरु लगेच पेन त्याच्या हातात देते...ते पेन पाहून लँन्सी आणि प्रतीक्षा पाहतच राहतात...

"चैतन्य तुला या पेनबद्दल काही माहिती आहे का?..."मृत्युंजय पेनला पाहत विचारतो...ते पेन पाहून प्रतीक्षा पुढे येते आणि मृत्युंजय च्या हातातुन पेन काढून घेते...

"जीजू हे साध पेन नाही आहे... व्हॉइस रेकॉर्डर पेन आहे...भावना ने तयार केलेलं आहे...त्यात तिने alexa सारख आर्टिफिशल इंटेललिंजेन्सच सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे...म्हणजे हे बघा दाखवते"प्रतीक्षा अस बोलत पेनच झाकण काढते...त्यातून एक छोटंसं टॉय बाहेर येते...एकदम छोट होत ते...ते दृश्य पाहून सगळे पुन्हा शॉक होतात...त्यांना सगळयांना भावनाच्या हुशारीचे कौतुक वाटते...

"ऐ हाय बु...😕तुझ्याकडे काही रेकॉर्ड आहे का?" प्रतीक्षा    त्या toy ला विचारते...

"नो डिअर....ओन्ली one रेकॉर्ड disk आहे..."बु बोलतो...

"त्याला विचार कोणत्या दिवशीचे आहे रेकॉर्ड?" मृत्युंजय...

"हाय जय🤗सॉरी जीजू अकॅसिडेंट च्या वेळीचा डेटा आहे..."बु मृत्युंजयला पाहून बोलतो...त्याचे बोलणे ऐकून  मृत्युंजयला आश्चर्य वाटते...तो फक्त त्याचे बोलणे ऐकून खुश होतो...तशीच सगळयांची स्थिती असते...कारण भावनाने कोणालाच सांगितले नव्हते तिचे मृत्युंजय वर प्रेम आहे ते... आज बु बोलला म्हणून सगळे थोडेफार खुश होते...पण आज भावनाची परिस्थिती गंभीर असल्याने ते थोडे दुःखी पण होते...

"येस because भावना लव मृत्युंजय मला बोलली..."बु खुश होत बोलतो...त्याचे ते बोलणे ऐकून मृत्युंजयचे डोळेच भरतात...तो ज्या प्रश्नाचे उत्तर शोधत होता त्याचे उत्तर आज बु ने त्याला दिले होते...त्याची खुशी तो शब्दांत मांडू शकत नव्हता...पण आज ती मात्र शांत असल्याने त्याला वाईट वाटले...त्याने लगेच भानावर येत स्वतःचे डोळे पुसले...

"बु प्लीज रेकॉडिंग ऑन कर ना..."आरु प्रतीक्षा कडे येत बोलते...तिचे बोलणे ऐकून बु शांत होतो...

"प्रतिक्षा पेनच रेड वाल बटन दाब...आपोआप रेकॉडिंग दिसेल..."बु बोलतो...तशी रेकॉडिंग चालू होते...त्यादिवशी ती मुलगी जे काही भावनाला बोलली...तिचे ते क्रूर पणे वागणे सगळं काही त्यात रेकॉडिंग झाले ते सर्व ऐकून सगळे सुन्न झाले...ते सर्व ऐकून मृत्युंजयच डोकच फिरले...त्यात त्या मुलीचा आवाज ऐकून मृत्युंजयला आणि मित्रपरिवाराला खूप राग येत होता...कारण तो आवाज सगळयांना ओळखीचा वाटला...

"ओह तर भावना च्या अकॅसिडेंट मागे ही आहे तर😡लहानपणापासून पाहत आलो होतो तिला नेहमी भावना बद्दल वाईट बोलून माझ्या मनात वाईट भरायची...पण ते नाही झालं म्हणून असला प्लॅन...शी%भावना ने हिला मैत्रिणी पेक्षा बहिण मानले होते...तर हिने असे वागावे तिच्यासोबत...😡भावनाला काय करू ग मी तुझं प्रिन्सेस एवढं पण चांगल कशी राहिली तू??तरीही सांगितले माणसाना पारख करून घे...पण नाही तुला ते कधी जमलंच नाही...तुझा स्वभावच नाही ना प्रिन्सेस असा...😢पण मी नाही सोडणार तिला...😡आता तर  मी हिला जन्माची अद्दल घडवणार"मृत्युंजय रागातच बोलतो...

"जीजू आता हिने एवढा प्लॅन केला होता तर हिला मी बिलकुल सोडणार नाही...मला आधीपासूनच ती आवडत नव्हती पण भावना मुळे गप्प होतो पण आता नाही सोडणार..."आर्या चिडत बोलते...त्या भवनाच्या मैत्रिणी चे ते बोलणे ऐकून सगळ्यांना राग येत होता...समोर भेटली असती तर तिचे काहीच खरे नव्हते...

"आम्ही...पण आहोत"लँन्सी बु एकत्र बोलतात...

"आरु मी अजून काही माहिती मिळाली तर काढा...मला माझ्या प्रिन्सेस सोबत थांबायचे आहे..."मृत्युंजय भावना कडे पाहून बोलतो...त्याचे बोलणे ऐकून सगळे शांतपणे बाहेर पडत असतात...

"हो जीजू मी काढते...पण इथे जे काही बोलणं झालं ते त्या महामायेला कळता कामा नये..."आरु सगळयांना पाहत बोलते...

"आरु आम्ही कोणालाच सांगणार नाही आम्हाला पण तिचा राग येत आहे...पण तू इथे कशी आली?"आर्या तिच्याकडे पाहत विचारते...

"ते हो...आपली लँन्सी मुळे...तिने भावना च्या हाताला घड्याळ बांधले आहे...त्यात कॅमेरा आहे...भावनाला धोका असला की ती येते तिला पाहायला...आज तिनेच मला मेसेज तिच्या कडे असलेल्या फिचरने मेसेज करून  बोलावून घेतले...नर्सचे फोटो सेंड केले...म्हणून मी आली...लँन्सी तू खरच खूप ग्रेट आहे यार...thank you डिअर..."आरु लँन्सी जवळ येत बोलते...

"THank you"लँन्सी...सगळे तिचे आभार मानून थोडस बोलून निघून जातात...ते गेले तसा मृत्युंजय भावनाच्या बाजूला बसतो...

"का प्रिन्सेस तू अशी वागते...तुला मला त्रास द्यायचा आहे ना द्यायचा ना...पण तू यावेळी मैत्री करताना चुकली राणी...😢का मानसी सोबत एवढी close झाली तू?ती नाही ग तुझ्या मैत्रीच्या लायकीची...किती क्रूर वागली ती तुझ्यासोबत...😢माझ्या प्रिन्सेसला किती त्रास झाला असेल ना...याची पण तिला काळजी नाही...शंभरदा तुला warn केलं होतं ना प्रिन्सेस मला मानसी खटकते...पण तू नाही ऐकलं...😑मलाच सुनावायची...पण यावेळी अजिबात मी तिला सोडणार नाही...😡तुझं खरच माझ्यावर प्रेम आहे का भावना?पण तू का नाही बोलली राणी एवढे दिवस...तुला माहिती आहे ना तुझे प्रेम मिळवण्यासाठी तुझ्यासोबत लग्नासाठी मला किती काय काय करावे लागले होते...😢तू पण काही कमी नव्हती भरपूर त्रास द्यायची मला...आता पण तेच करत आहेस...पण ते तुझ्यासोबत घालवलेले क्षण खूप स्पेशल होते...."मृत्युंजय अस बोलत भूतकाळाच्या आठवणीत जातो...

भूतकाळ:-

भावना मृत्युंजय सोबत लग्न न होण्यासाठी खूप काही प्लॅन करत होती...तिला त्याच्यासोबत लग्न करायचे नव्हते म्हणून ती तिच्या स्वभावाच्या विरुद्ध वागत होती...पण मृत्युंजयला तिच्या वागण्याचा काहीच फरक पडायचा नाही...उलट तो अजूनच तिच्यात गुंतत जात होता...तो तिला अजिबात एकट सोडत नव्हता...

असच एकदिवस भावनाला एक प्लॅन सुचला...म्हणून तिने मृत्युंजयला कॉल करून एका ठिकाणी बोलावून घेतले...तिचा फोन आल्याने मृत्युंजय पण लगेच भेटायला तयार झाला...भावनाने अस बोलवल्याने त्याला थोडी शंका आली...तो देखील पूर्ण तयारीने तिला भेटायला येणार होता....

ठरलेल्या ठिकाणी मृत्युंजय आधीच तिथे आला होता...तो तिथेच भावनाची वाट पाहत बसला होता...काहीवेळाने भावना पण एका मुलाचा हात पकडत त्याला हसतच घेऊन येत होती...ते पाहून मृत्युंजयला त्या मुलाचा राग आला पण त्याने तो कंट्रोल केला...भावनासारख्या मुलीला झेलायचे म्हणजे सोपे काम नाही हे त्याला कळलं होते...म्हणून त्याने हसतच तिच्याकडे पाहिले...

"ओ माय प्रिन्सेस किती गोड आहे ग तू?आज काय प्लॅन आहे तुझा बर?"मृत्युंजय तिच्याजवळ येत तिचे गाल ओढत मिश्किल पणे हसत बोलतो...त्याचे ते बोलणे ऐकून भावना चिडते...ती तशीच एका हाताने स्वतःचा गाल पुसते...

"मी सांगितले ना मला हात लावायचा नाही म्हणजे नाही😤"भावना रागातच त्याला बोट दाखवत बोलते...ती रागात पण त्याला cute वाटत होती...तिला तस चिडलेले पाहून तो गालातल्या गालात हसत असतो...

"हे हाय मृत्युंजय तू ना भावना पासून दूर रहा कारण भावना is my गर्लफ्रेंड...😚"भावनासोबत आलेला मुलगा मृत्युंजय बोलतो...त्याचे बोलणे ऐकून मृत्युंजय भावनाचा हात धरून तिला स्वतःकडे ओढतो...तशी भावना जाऊन त्याच्या मिठीत शिरते...अचानक पणे त्याने ओढल्याने तिला काहीच कळल नाही...मृत्युंजयने तिच्या खांद्याला घट्ट पकडून स्वतःच्या मिठीत ठेवले...

"प्रिन्सेस एवढं काय ग चिडते तू...अस चिडायचे नसते लहान मुलींनी..."मृत्युंजय थोडस हसतच तिला बोलत असतो...त्याचे बोलणे ऐकून ती चिडते आणि त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करते...पण तो आणखीन तिला घट्ट पकडतो...

"ऐ समीर तू माझा बॉयफ्रेंड आहे ना यांना सांग तस...तू आहे म्हणून मी यांना लग्न न करण्यासाठी सांगत आहे पण हे ऐकत नाही😣"भावना चिडतच बोलते...तिचे बोलणे ऐकून मृत्युंजयला काय कळायचे ते बरोबर कळते...तो काही वेळा साठी भावनाला बाजूला करतो आणि थोडस तिच्यापासून बाजूला होऊन कोणाला तरी कॉल करतो...मृत्युंजयने सोडल्याने भावना सुटकेचा श्वास घेते...तिला वाटते तो आता तिच्याशी लग्न कॅन्सल करेल म्हणून ती खुश असते...😜काहीवेळात मृत्युंजय फोनवर बोलून फोन बॉडीगार्ड कडे देऊन भावनाकडे येतो...

"ओह समीर...🙄सरनेम या गावडे ना..🤔"मृत्युंजय त्यांच्याजवळ येत बोलतो...

"येस...😅"समीर पण हसूनच मृत्युंजयला बोलतो...

"बॉडीगार्ड माझा फोन आणा जरा मृणाल देशमुखला कॉल करून सांगायचे आहे तिचा bf फ्रॉड आहे म्हणून😆..."मृत्युंजय गुढपणे हसत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून दोघे शॉक होतात...मृत्युंजय मात्र नजर रोखून दोघांना पाहतो...

"अरे भावना ताई अशी कशी ग तू एवढ्या चांगल्या जिजूला का ग खोटं बोलत आहे...😓अहो जीजू मी मस्करी केली..."समीर भानावर येत थोडस घाबरून भावनाला बोलतो...त्याचे बोलणे ऐकून भावना चुप बसते
...😥

"ओके निघ तू...😡"मृत्युंजय रागातच समीरला बोलतो...त्याचा तो राग पाहून भावनाला भीती वाटते...पुढे तिच्यासोबत काय घडेल याचा विचार करून...

"ओ मिस भावना सावंत झाले का तुमचे प्लॅन करून...😡कशी वागत आहेस तू?लहान आहे का?"मृत्युंजय चिडतच बोलतो...

"नाही संपले प्लॅन माझे...😣भरपूर प्लॅन करणार आहे मी...पण सध्या माझ्याकडे एकच रेडी आहे...😎"भावना attitude मध्ये बोलते...

"कोणता आहे...😡??"मृत्युंजय रागात बोलतो...

"पळून जायचा...😂"भावना हसतच बोलते आणि पळायला लागते...पण मृत्युंजय तिच्यापेक्षा हुशार होता...त्याने लगेच तिचा हात पकडून तिला अडवले...

"काय आहे ना तू ज्या शाळेत होती ना त्या शाळेचा मी प्रिंसिपल होतो...😎त्यामुळे अस वागणे शोभत नाही तुला प्रिन्सेस..."मृत्युंजय तिला पकडत बोलतो...तो तसाच तिला उचलून घेतो...

"आता तुला याची शिक्षा मिळणार प्रिन्सेस...😜पूर्ण एक दिवस तुला माझ्यासोबत घालवायचा आहे..."मृत्युंजय थोडस वर उचलून घेत बोलतो...त्याचे ते बोलणे ऐकून ती टेंशन मध्ये येते...

"मी खाणार तर नाही आहे तुला...काय आहे ना एवढी important मीटिंगस सोडून आलो ना मी त्यामुळे तुला आता हे करावे लागेल..."मृत्युंजय खट्याळपणे हसतच तिला बोलतो...

"मी नाही बोलले तर...😒"भावना इकडे तिकडे पाहत बोलते...

''आता जे काही केलं ना ते घरी सांगणार मी...😅" मृत्युंजय अस बोलत तिला एका गाडीत बसवतो...त्याचे ते बोलणे ऐकून आता मात्र ती घाबरते...तस ती अजिबात त्याला दाखवत नाही...मृत्युंजय पण तसाच तिच्याबाजूला येऊन बसतो...भावनाकडे पर्याय नसल्याने ती गपचूप तोंड फुगवून बसून रहाते...मृत्युंजयला ती खूप क्युट वाटत होती...पण तो शांत राहून तिला पाहत होता...

"चला ड्रायव्हर काका एक दिवस माझ्या होणाऱ्या बायकोसोबत एन्जॉय करणार आहे मी...😝"मृत्युंजय भावनाकडे पाहत बोलतो...

"कट्टी तुमच्यासोबत...😣"भावना गाल फुगवून बोलते...  मृत्युंजय मात्र हसत असतो...

"असच थोडी सोडणार तुला मृत्युंजय सोबत प्लॅंनिग काय...करायचे आहे तेवढे कर पण समोर ना मृत्युंजय आहे हे लक्षात ठेव...😎तू फक्त मिसेस मृत्युंजय बनणार आहे...हे लक्षात ठेव कायम..."मृत्युंजय हसतच तिला बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती दुसरीकडे मान करते...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
         ©®भावना सावंत(भूवि❤️)
****************************

Rate & Review

Maithili Ghadigaonkar
Swati Jagtap

Swati Jagtap 4 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 5 months ago

Dheeren

Dheeren 5 months ago

👌🏻👍🏻

Arati

Arati 5 months ago