Diwana dil kho gaya - Part 7 books and stories free download online pdf in Marathi

दिवाना दिल खो गया (भाग ७)

(मुग्धाबद्दल एव्हाना सिलूने जॉर्ज आणि मीराला सांगितले होते. ती दोघे मुग्धाला अमेरिकेत येण्याचा नेहमी सल्ला देत असत. त्यांचे ऐकून मुग्धाला ही क्षणभर वाटे की, सगळं सोडून सरळ सिलूकडे अमेरिकेला निघून जावे. पण सध्यातरी ते तिला शक्य नव्हते. आता पुढे..)

मुग्धा सुद्धा तिच्या ऑफिसच्या कामात व्यग्र असे. जर तिला सिलूची खूपच आठवण झाली तर कॉफी शॉप किंवा चौपाटी ही तिची ठरलेली एकांतात बसायची ठिकाणे असत. कधी कधी उमा ही तिला कंपनी द्यायला तिच्याबरोबर येत असे.
असेच सहा महीने निघून गेले. सिलू आणि मुग्धा यांनी एव्हाना एकमेकांना कामात बरेचसे व्यस्त करून घेतले होते. त्यामुळे फक्त एकमेकांशी बोलण्याइतपत ते वेळ काढत असत.

सिलूच्या कंपनीला एक नवीन प्रोजेक्ट मिळाले होते आणि याची सगळी जवाबदारी ही सिलूवर देण्यात आली होती. तसेच यासाठी त्याला १ महिना जर्मनीच्या ऑफिस मध्ये काम करावे लागणार होते. त्याची राहण्याची आणि जेवणाची सगळी व्यवस्था ऑफिस करणार होते. सिलूने हे मुग्धाला कळविले. मुग्धा खूपच एक्ससाइट झाली. सिलूला नवीन नवीन देश फिरायला मिळत आहे त्याचे तिला अप्रूप वाटत होते.

सिलूबरोबर ह्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी एक सहकारी नेमला गेला होता. त्या दोघांना मिळून हा प्रोजेक्ट एक महिन्यात पूर्ण करायचा होता. सिलू फ्लाइटने जर्मनीला पोहोचला. तिथून तो महिनाभर ज्या हॉटेलवर थांबणार होता तो तिथे पोहोचला. त्याची त्या सहकार्याबरोबर लंच साठी भेट होणार होती. सिलू वेळेवर त्या हॉटेलच्या रेस्टॉरंट मध्ये पोहोचला. त्याच टेबल हे आधीच रिजर्व होते. त्याने घड्याळाकडे एक नजर टाकली तो ५ मिनिट लवकर आला होता.
जेमतेम २ मिनिट्स झाले असतील तेवढ्यात एक मधुर आवाज त्याच्या कानावर पडला.
“गुड आफ्टरनून मिस्टर सिलू”

सिलूने वर पाहिले आणि तो पाहातच राहिला. त्याच्या समोर एक सुंदर गोरीपान मुलगी उभी होती. तिने फॉर्मल कपडे घातले होते. तिचे केस तर इतके सिल्की आणि शाइणी होते की विचारू नका. तिने हलकासा मेकअप केला होता. ती इतकी सुंदर होती की, जणू स्वर्गातली अप्सराच!! सिलूची नजर तिच्यावरून क्षणभर हटलीच नाही.
पण तो काहीवेळातच भानावर आला. सिलूने त्या मुलीला बसायला सांगितले. तिने मग स्वत:ची ओळख सिलूला करून दिली. तिचे नाव रोजेला होते. तिची आई इंडियन आणि वडील जर्मन त्यामुळे रोजेलाला इंडियाची बरीच माहिती होती. तसेच इंडिया बद्दल आकर्षण ही होते. पण ती कधीही इंडिया मध्ये गेली नव्हती. परंतू तिच्या आईकडून इंडिया मधल्या कहाण्या ती रोज ऐकत असे.

आज तिला प्रथमच एका इंडियन व्यक्ति बरोबर आणि ते पण १ महिना काम करण्याची संधी मिळणार होती म्हणून ती
भरपूर खुश होती. तिने एकादमात सिलूला स्वत:बद्दल सर्व सांगून टाकले.
सिलू तिच्या बोलण्याने खूपच प्रभावित झाला. त्याने ही तिला स्वत:च्या फॅमिली आणि मुग्धाबद्दल सांगितले. हे ऐकून रोजेला खूप आनंदी झाली. मग त्यांनी लंच आटपला आणि मग लॉबीमध्ये बसून त्यांच्या नवीन प्रोजेक्टबद्दल चर्चा करू लागली.

लॉबीमध्ये त्यांना हवी तेवढी शांती मिळत नव्हती मग त्या दोघांनी कधी तुझ्या तर कधी माझ्या असे ठरवून रूम मध्येच चर्चा करण्याचे ठरविले.
सिलूने रात्रीच मुग्धाला रोजेला बद्दल सांगितले. सिलूला त्याच्या रिलेशनशिपमध्ये कोणताही आडपडदा ठेवायचा नव्हता. तसे तर मुग्धाला सिलूवर पूर्ण विश्वास होता. पण तरीही सिलूला माहीत होते की, लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप टिकवायची असेल तर जे आहे ते सर्व शेअर करणे जरूरी आहे.

सिलूने उगाचच रोजेला ची तारीफ मुग्धाजवळ केली की, ती किती सुंदर आहे वगैरे वगैरे. त्याला वाटतले मुग्धा चिडेल. पण मुग्धाने तसे काहीच रियॅक्ट केले नाही. उलट तिने सिलूला एक सॉन्ग रेकॉमेंडेशन सेंड केले आणि ते सॉन्ग त्याला ऐकायला सांगितले.

सिलूने झोपताना ते सॉन्ग प्ले केले. त्या सॉन्गचे बोल होते.
♬♬ हम तेरे बिन अब रह नहीं सकते तेरे बिन क्या वजूद मेरा
तुझसे जुदा गर हो जाएंगे तो ख़ुद से ही हो जाएंगे जुदा
क्यूंकि तुम ही हो अब तुम ही हो ज़िन्दगी अब तुम ही हो
चैन भी, मेरा दर्द भी मेरी आशिक़ी अब तुम ही हो ||
तेरा मेरा रिश्ता है कैसा एक पल दूर गवारा नहीं
तेरे लिए हर रोज़ हैं जीते तुझ को दिया मेरा वक़्त सभी
कोई लम्हा मेरा ना हो तेरे बिना हर सांस पे नाम तेरा..
क्यूंकि तुम ही हो अब तुम ही हो ज़िन्दगी अब तुम ही हो
चैन भी, मेरा दर्द भी मेरी आशिक़ी अब तुम ही हो ♬♬

सिलूचे काम आता बऱ्यापैकी पूर्ण होत आलेले. रोजेला ही सुद्धा सिलूची खूप चांगली मैत्रीण बनली होती. सिलूला सोईस्कर व्हावे यासाठी रोजेला तिचे घर जर्मनीमध्ये असताना सुद्धा हॉटेल मध्ये राहात होती. काम संपल्यावर ती सिलूला जेवढे जमेल तितके जर्मनी फिरवणार होती आणि हो त्यांच्याबरोबर जमेल त्या वेळेला व्हिडियो कॉलच्या माध्यमातून मुग्धा ही असणार होती.

मुग्धा सिलूला खूपच मिस करत होती. अमेरिकेला प्रवासी व्हिसावर जाणे मुग्धाला काही अवघड नव्हते. पण घरातले तिला एकटे ते पण परक्या देशात फिरायला पाठवायला मिळूच तयार नव्हते. तिचे एकदा येण्याचे ठरले असते मग पुढची मदत जॉर्ज आणि मीरा तिला करणारच होते. जेणेकरून सिलूला सर्प्राइज मिळेल. मुग्धा रोज हाच विचार करत होती की, सिलूला कसे भेटायला जाता येईल.

पण म्हणतात ना, “अगर किसी भी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने में जुट जाती है” अगदी तसंच काही मुग्धाच्या बाबतीत घडलं. उमाला तिच्या ऑफिसच्या ट्रेनिंगसाठी १५ दिवस अमेरिकेला जावे लागणार होते. काही निवडक सहकाऱ्यांपैकी उमाची निवड झाली होती. परदेशात एकदातरी जायला मिळावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. उमाचे स्वप्न आता पूर्ण होणार होते. तिने ही बातमी कळताच मुग्धाला फोन केला. मुग्धा तर इतकी खुश झाली की विचारू नका.

उमाशी बोलून मुग्धाने फोन ठेवला आणि मग एक कल्पना तिच्या डोक्यात आली. तिने पुन्हा उमाला फोन करून कॉफी शॉप मध्ये बोलविले. उमा घाईतच तिथे पोहोचली. तिने मग सगळी कल्पना उमाला सांगितली. उमाला थोडी ती रिस्की वाटली पण मैत्रिणीच्या आनंदासाठी ती सुद्धा तयार झाली. मग काय दुसऱ्या दिवशीच मुग्धाने उमाला समोर ठेवून अमेरिकेला फिरायला जायची परवानगी घरच्यांकडे मागितली आणि उमा बरोबर आहे मग त्यानीही होकार दिला.

मुग्धाचा आनंद गगनात मावत नव्हता. पुढील १५ दिवसांनी तिचे अमेरिकेचे फ्लाइट होते आणि सगळ्यात चंगली गोष्ट म्हणजे ती आणि उमा एकाच फ्लाइटमधून प्रवास करणार होत्या. तिने ही बातमी मीराला कळविली आणि सिलूपासून ही बातमी लपवून ठेवावी ही विनंती केली. सिलू १५ दिवसांनी जेव्हा अमेरिकेत परत येणार होता तेव्हा त्याच्यासाठी एक मोठे सर्प्राइज तयार होते आणि ते म्हणजे मुग्धा !!

सिलू एक शांत, संस्कारी आणि सुस्वभावी मुलगा होता. कोणतीही मुलगी सहज त्याच्या प्रेमात पडेल असा होता तो. मग रोजेला हिला तर सिलूचा एक महिन्याचा सहवास मिळाला होता. तर मग ती सिलूच्या प्रेमात नाही पडणार असे कसे बारे नाही होणार!!
जर्मनीमधले काम संपायला अजून एक आठवडा बाकी होता. पुढचे ७ दिवस खूपच महत्वाचे होते म्हणून काही दिवस तरी सिलूला मुग्धाला हवा तसा वेळ देता येणार नव्हता. त्याने मुग्धाला तसे सांगितले मग मुग्धाने ही त्याला समजून घेतले.

क्रमश:
(सिलू आणि मुग्धाची लवस्टोरी अशीच सुरू राहील. पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा आणि हो, हा भाग आवडला तर लाइक आणि शेअर नक्की करा.)
धन्यवाद
@preetisawantdalvi