diwana dil kho gaya - Part 9 in Marathi Love Stories by preeti sawant dalvi books and stories PDF | दिवाना दिल खो गया (भाग ९)

दिवाना दिल खो गया (भाग ९)

(दोघेही प्रवास करून आल्यामुळे फार थकले होते. त्यामुळे पडल्या पडल्या दोघांची झोप लागली.
त्यांना झोपून काही तास उलटले असतील. इतक्यात रात्री कोणीतरी जोरजोरात दरवाजा वाजवत होते. आवाजाने दोघांची झोपमोड झाली. दोघेही एकत्र दाराकडे धावले.
पुढे पाहतात तर काय????) आता पुढे....

सिलूने दरवाजा उघडला तर समोर एक पोलिस उभा होता आणि सगळीकडे धावपळ चालली होती. सिलूला काहीच कळत नव्हते. नक्की काय चाललय ते.
तो पोलिसाला काही विचारणारच होता तेवढयात तो पोलिस स्वत:च सिलूला म्हणाला, “तुमच्या इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या फ्लॅटला शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे आणि ती हवेमुळे सगळीकडे पसरतेय. म्हणून आम्ही ही इमारत पूर्णपणे खाली करत आहोत. कृपया तुमच्या घरात अजून कोण असतील त्यांना घेऊन आमच्याबरोबर चला आणि नीट खात्री करा सगळी कुटुंबीय आहेत का. बी क्वीक.”

सिलूने मग कसलाही विचार केला नाही. मुग्धाला घेऊन तो पोलीसाच्या मागे पळाला. सिलू ६ व्या मजल्यावर राहत होता. पोलिसाने सिलू, मुग्धा आणि त्यांच्या फ्लोरवर राहणाऱ्या अजूनकाही जणांना सुखरूप इमारतीच्या खाली आणले. आग खूपच पसरत होती. नशीब पोलिस वेळेवर आले नाहीतर कोणाचे काही खरे नव्हते. अग्निशामक दलाचे लोक आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते.

मुग्धा ह्या सर्व प्रकारामुळे भलतीच घाबरली होती. एव्हाना जॉर्जचा फोन सिलूला आला, “सिलू तू कुठे आहेस? मुग्धा आणि तू ठीक आहात ना? सगळ्या न्यूज चॅनेलवर तुमच्या बिल्डींगचीचं न्यूज दाखवत आहेत.”

“मी ठीक आहे जॉर्ज. पण मुग्धा थोडी घाबरली आहे. सो प्लीज तू गाडी घेऊन येशील का मी मुग्धाला तुझ्याबरोबर पाठवतो. इकडे सगळे नीट व्हायला उद्याचा दिवस जाईल. तोपर्यंत मला इथेच थांबावे लागेल”, सिलू म्हणाला.

“थांब मी मीराला सोबत घेऊन येतो म्हणजे ती मुग्धाला घरी घेऊन जाईल आणि मग मी तुझ्याबरोबर इथेच थांबेण”, असे बोलून जॉर्ज आणि मीरा त्यांच्या घरातून निघाले.

मुग्धा सिलूला सोडून कुठेही जायला तयार नव्हती पण जॉर्ज त्याच्याबरोबर थांबतोय हे कळल्यावर ती मीरा सोबत जायला तयार झाली.

जॉर्जने येताना सोबत पाण्याची बाटली आणि एक-दोन वेफर्सची पॅकेट्स आणली होती. एव्हाना आग बऱ्यापैकी आटोक्यात आली होती. पण पहिल्या मजल्यावरचे २ फ्लॅटमधील सामान पूर्णपणे जळून गेले होते. ह्या सगळ्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. हा पण त्या फ्लॅटमध्ये राहणारी २ माणसे जखमी झाली होती. त्यांना वेळीच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. पूर्ण आग विझेपर्यंत पहाटेचे ४ वाजले त्यांनंतर सर्वांना बिल्डिंगमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली. सिलूने रूमवर जाऊन सगळे व्यवस्थित आहे की नाही ते चेक केले. त्यानंतर तो जॉर्जबरोबर त्याच्या घरी गेला. मुग्धा सिलूची वाट बघत जागीच होती. सिलूला आलेले पाहिल्यावर मुग्धाने सिलूला गच्च मिठी मारली. त्यानंतर पूर्ण दिवस ते दोघे जॉर्जच्या घरीच थांबले.

मुग्धाचा मूड ठीक करण्यासाठी सिलूने तिला अमेरिकेची सैर करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्याने सर्व व्यवस्था केली. मुग्धा खूप खूप खुश होती. तिला सिलूबरोबर जास्तीतजास्त वेळ घालवायला मिळत होता.

मुग्धा अधूनमधून घरी फोन करीत असे. सिलूचा ही त्याच्या घरी रोज फोन होई. तरीही अजून त्या दोघांच्याही घरी त्यांच्या नात्याबद्दल माहीत नव्हते.

अमेरिकेत पूर्णपणे स्थिरस्थावर झाल्याशिवाय सिलू घरी सांगणार नव्हता. त्याला माहीत होते एकवेळ अप्पा त्याच्या लग्नासाठी तयार होतील. पण अम्मा ती कधीच तयार होणार नाही. त्यासाठी सिलूला काहीतरी शक्कल लढवावी लागणार होती. पण सध्यातरी त्याला खूप वेळ होता.

मुग्धा आणि सिलूची अमेरिका सफर खूप छान झाली. चार दिवसात जितके अमेरिका पाहता येईल तितके त्यांनी पाहिले. ती दोघ घरी आली. इतक्यात मुग्धाला तिच्या घरून फोन आला.
तिच्या वडिलांचे अॅक्सिडेंट झाले होते. त्यामध्ये त्यांना जबर मार लागला होता. सध्या ते हॉस्पिटलमध्ये होते. मुग्धाला तिच्या लहान बहिणीने हे फोन करून सांगितले. फोन ठेवताच मुग्धा जोरजोरात रडायला लागली. सिलूने लगेच त्याच दिवशीचे मुंबई जाण्याचे विमान तिकीट कसेबसे बूक केले. मनात नसतानाही ४ दिवस आधीच मुग्धाला मुंबईला जावे लागत होते.

अगदी जड अंत:करणाने तिने सिलूचा निरोप घेतला आणि ती मुंबईला निघाली. हे सगळे इतके अचानक घडले की, आत्ता मुग्धा इथे होती आणि पुढच्या क्षणी ती इथे नाही. ही कल्पनाही सिलूला सहन होत नव्हती.

मुग्धाला कधी एकदा तिच्या बाबांना बघते असे झाले होते. सुदैवाने तिची फ्लाइट वेळेवर होती म्हणून ती वेळेतच मुंबईत पोहोचली. तिने सिलूला पोहचल्याचा फोन देखील केला. सिलूने फोनवरून मुग्धाला धीर दिला.
मुग्धा सुखरूप घरी पोहोचली. प्रथम ती फ्रेश झाली आणि तडक हॉस्पिटलमध्ये जायला निघाली. तिथे तिचे काका होते. काकांना भेटून मुग्धाला रडू कोसळले.
काकांनी तिला लांबूनच तिच्या बाबांना दाखविले. औषधांच्या गुंगीमुळे ते झोपले होते.
“मुग्धा बेटा, दादाची प्रकृती आता बऱ्यापैकी स्थिर आहे. त्याच्या डोक्याला थोडा मार लागला आहे आणि हाता-पायाला फ्रॅक्चर झालंय. पण इतके काही घाबरण्याचे कारण नाही. डॉक्टर म्हणालेत की, उद्यापर्यंत त्याला नॉर्मल वॉर्ड मध्ये शिफ्ट करतील म्हणून. मग आपण त्याला भेटू शकू. तू आता घरी जा आणि आराम कर. प्रवासाने थकली असशील”, असे बोलून काकांनी तिला ऑटोमध्ये बसविले. बाबांना बघून मुग्धाच्या जीवात जीव आला. तिने सिलूला फोन करून बाबांच्या प्रकृतिविषयी सांगितले. त्यांची प्रकृती स्थिर आहे हे ऐकल्यावर त्यालाही बरे वाटले. तो ही मग त्याच्या कामाला लागला.

मुग्धाच्या घरातले वातावरण अगदी शांत शांत झाले होते. कधी एकदा मुग्धाचे बाबा ठीक होऊन घरी येतात असे सगळ्यांना झाले होते. दुसऱ्या दिवशी बाबांना नॉर्मल वॉर्ड मध्ये शिफ्ट करण्यात आले. तेव्हा मुग्धाचे काका आणि मुग्धा दोघेही त्यांना भेटायला वॉर्ड मध्ये आले. मुग्धाला इतक्या दिवसांनी समोर बघून बाबा अत्यंत खुश झाले. सध्यातरी डॉक्टरांना बाबांच्या प्रकृतीमद्धे काहीच कॉमप्लीकेशनस् दिसत नव्हते. त्यामुळे २-३ दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळेल असे डॉक्टर म्हणाले.

पण थोडे दिवस तरी त्यांना पूर्णपणे बेडरेस सांगण्यात आला होता. काही दिवसातच बाबा बरे होऊन घरी परतले. घरात आज आनंदी वातावरण होते. बाबांच्या अचानक हॉस्पिटलाईज होण्यामुळे मुग्धाला चार दिवस आधीच निघावे लागले होते. त्यामुळे तिला कोणासाठी काहीच आणता आले नाही. तसेच तिची अमेरिका टूर कशी झाली तिने तिथे काय काय पाहिले हे सगळेच सांगायचे राहिले होते. तसे तर सांगण्यासारखे काहीच नव्हते. पण तिला माहीत होते घरचे तिला विचारणारच.

रात्री सगळ्यांची जेवणे आटोपली आणि मग मुग्धाकडून अमेरिका टूरमध्ये केलेली मजा ऐकण्यासाठी सगळे उत्सूक झाले. मग मुग्धाने पण सिलूबरोबर बघितलेला अमेरिका त्यांना सांगितला. अर्थात सिलूचे नाव वगळून.

मुग्धा झोपताना विचार करत होती की, “आई-बाबांना सिलूबद्दल कसे सांगायचे. अजून दिड वर्ष तरी मला काहीनाकाही कारण काढून पुढे न्यावी लागतील. एकदा का सिलू मुंबईत आला की, आई-बाबांना सिलूबद्दल सविस्तर सांगू. नाहीतर सिलूलाच सांगेन तूच ये मागणी घालायला.” हा विचार करता करता ती झोपी गेली. खूप दिवसांनी आज तिला शांत झोप लागली होती.

मुग्धाचे बाबा हळूहळू ठीक होत चालले होते. सिलू आणि मुग्धाचे बोलणे सुद्धा ठरलेल्या वेळेवर होत राहायचे. सिलू सुद्धा अम्मा-आप्पांची खुशाली रोज घेत असे. सध्यातरी त्यांचे आयुष्य सरळमार्गी होते.

असेच काही महीने निघून गेले. सिलूला आता अमेरिकेत येऊन जवळजवळ एक वर्ष होत आले होते. त्याची कामाची जवाबदारीही खूप वाढली होती. तरीही तो अम्मा-अप्पा आणि मुग्धा या तिघांनाही वेळ देत होता. फोन नाही करता आला तर मेसेज तरी नक्की करीत असे.

एकदा अचानक सिलूला ऑफिसच्या कामानिमित्त कॅनडामध्ये चार दिवसाची टूर होती. सिलूने हयाबद्दल मुग्धाला आणि आप्पांना ही सांगितले. कदाचित कामामुळे त्याला फोन करता आला नाही तर त्यांना काळजी वाटू नये म्हणून.
सिलू कॅनडाला जायला निघाला. सिलूने साहीलला फोन करून अम्मा-अप्पा कडे लक्ष द्यायला सांगितले. साहीलने ही त्याला तू काळजी करू नकोस मी आहे असे सांगून धीर दिला. पण त्यालाही अचानक काही कामानिमित्त परगावी जावे लागले. तसे तर तो २ दिवसांत परत येणार होता.

साहील अर्ध्या रस्त्यावर पोहोचलाच होता तेवढयात त्याला सिलूच्या अम्माचा फोन आला की, अप्पांच्या छातीत दुखतय आणि त्यांना अस्वस्थ वाटतंय. साहीलला काय करावे हेच सुचत नव्हते. सिलूच्या घरी परत जायलाही त्याला ४ ते ५ तास लागणार होते आणि साहीलचे काम सुद्धा खूपच महत्वाचे होते. म्हणून त्याने आधी डॉक्टरांना फोन करून सिलूचा पत्ता दिला आणि मग लगेच मुग्धाला फोन करून सद्यपरिस्थिती सांगितली. मुग्धाला हे कळताच कसलाही विचार न करता ती तडक सिलूच्या घरी पोहोचली.

क्रमश:

(आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी ही कथामालिका वाचत रहा. तसेच हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. हा भाग आवडल्यास त्याला लाइक, कमेन्ट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद)
@preetisawantdalvi

Rate & Review

I M

I M 2 years ago

uttam parit

uttam parit 2 years ago

Dheeren

Dheeren 2 years ago

👌🏻👍🏻

Manali Sawant

Manali Sawant 2 years ago

Preeti Patil

Preeti Patil 2 years ago