तू अशीच जवळ रहावी... - 7 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - 7

तू अशीच जवळ रहावी... - 7

"भावनाने मला...तयार...केलं आहे...तिच्यासाठी काहीपण..."लँन्सी ऍक्टिग करत बोलते...तिची ती ऍक्टिन पाहून भावनाचे बाबा थोडे हसतात...

"भावना सोबत आणि त्या कार्टुन सोबत राहून तू पण तशीच झाली आहे...घरात नाटक कंपनीच आहे माझ्या...बर जयला कॉल कर..."भावनाचे बाबा लँन्सीला बोलतात...त्यांचे बोलणे ऐकून लँन्सी नाही मध्ये मान हलवते...ते पाहून भावनाचे बाबा शॉक होतात...

"का नाही करणार?अग त्याला माहिती असल पाहिजे ना हे सर्व?"भावनाचे बाबा समजवण्याच्या सुरात बोलतात... पण तरीही ती नाही मध्ये मान हलवते...भावनाचे बाबा लँन्सी अजून काही विचारायला जाणार तेवढ्यात डॉ.शर्मा तिथे येतात...

"भावनाला शुद्ध आली आहे...त्यामुळे तू जाऊन तिला भेटू शकतो...😊तू सांगत आहेस वहिनिला टेन्शन नको म्हणून लगेच भवनाला डिस्चार्ज देत आहे...पण तू तिची व्यवस्थित काळजी घ्यायची..."डॉ.शर्मा बोलतात...

"हो नक्की घेईन आणि thank you..."भावनाचे बाबा...

"हुं...चल मी पण निघतो आता भेटू आपण नंतर हा...😊"शर्मा

"हो नक्कीच..."भावनाचे बाबा अस म्हणून डॉ.शर्माचा निरोप घेऊन भावनाच्या रूममध्ये जातात...ते पाहतात तर भावनाला शुद्ध आली होती आणि ती बेडवर एकदम शांत विचार करत बसली...लँन्सी पण आतमध्ये येऊन तिच्या बाजूला उभी राहते...

"तू ठीक आहे ना भावना...?"भावनाचे बाबा काळजीने विचारते...त्याच्या आवाजाने ती भानावर येते आणि मान हलवून "हो" बोलते...तसे तिचे बाबा रिलॅक्स होतात...

"मला मृत्युंजयला सांगावे लागेल...आज जे काही ते योग्य नव्हते..."भावनाचे बाबा बोलत असतात...तेवढ्यात भावना त्यांना हात दाखवून थांबवते...

"पप्पा मला घरी जायचे आहे आणि कोणाला काही सांगण्याची गरज नाही आहे...😑मी ठीक आहे... " भावना हळू आवाजात थोडीशी चिडत बोलते...कारण तिला आता मृत्युंजयचे नाव पण आसपास नको होते...एवढी ती त्याच्यावर चिडली होती...इकडे लँन्सी पण गप्पच बसते...तिचे ते चिडून बोलणे पाहून भावनाच्या बाबांना काय समजायचे ते समजते...ते पण गप्प बसतात आणि हॉस्पिटलच्या डिस्चार्ज च्या फॉर्मलिटी पूर्ण करण्यासाठी रूमच्या बाहेर निघून जातात...

"लँन्सी अजिबात कोणाला काही सांगू नको हा...😏मला माहित आहे तू पण त्यांचीच आहे...आज हे सगळं त्यांच्यामुळेच झालं ते नसते ना आयुष्यात तर अस घडलंच नसत..."भावना लँन्सीकडे पाहत बोलते...नेहमी बोलनारी भावनाला समजवणारी लँन्सी पण आता गप्पच बसते...ती बोलत नाही पाहून भावना तिला पाहतच राहते...

"काय झालं तुला?आज तू बोलत नाही आहेस?"भावना...

"काही नाही चल मी तुला आवरुन घेते..."लँन्सी पूर्णपणे मृत्युंजयचा विषय टाळण्याचा प्रयत्न करत होती...लँन्सीचे बोलणे ऐकून भावनाने स्वतःचे थोडेफार आवरले...लँन्सी ने पण तिला मदत केली...ती सगळं आवरुन भावनाला रूमच्या बाहेर घेऊन आली...तिचे बाबा पण सगळे फॉर्मलिटी पूर्ण करून तिच्याजवळ आले आणि मग तिघेही घरी जायला निघाले...लँन्सी ने आपल्या फिचरने कॅब ला कॉल करून हॉस्पिटलच्या बाहेर आधीच बोलावले होते...ते तिघे कॅब मध्ये बसले आणि घरी गेले...

घरी पोहचल्यावर भावनाच्या बाबांनी त्यांच्या जवळ असलेल्या दुसऱ्या की ने हळूच दरवाजा उघडला...पण पाहतात तर समोर भावनाची आई उभी होती...त्या तिघांकडे नजर रोखून पाहत होत्या...त्यांना काही कळू नये म्हणून भावनाच्या बाबांनी दुसऱ्या की ने दरवाजा ओपन केला होता...पण ते हे विसरले होते पुढे तिची आई आहे...भावना घरी आली नाही म्हणून त्यांना झोपच लागली नाही...त्या तिच्या काळजीने जागे राहिल्या होत्या...हे तिघे घरात पाय ठेवत असतात...तेवढ्यात दारातच भावनाला चक्कर आल्यासारखी होते...ती खाली पडणार असते...तेवढ्यात कोणीतरी मागून तिला धरते...तिला अस पडताना पाहून सगळे घाबरतात...

"जय तू इथे?"भावनाचे बाबा विचारतात...

"मी नंतर सांगतो आधी भावनाला पाहतो..."मृत्युंजय अस म्हणत तिला स्वतःच्या दोन्ही हातात उचलून घेतो...तो तसाच तिला तिच्या रूममध्ये घेऊन जातो आणि बेडवर ठेवतो...तो बेडवर ठेवून तिच्या अंगावर पांघरून टाकत असतो तर लँन्सी पटकन येऊन त्याच्या हातातील पांघरून घेऊन तिच्या अंगावर टाकते...लँन्सी अस वागणं त्याला थोडं विचित्र वाटत होते...पण सध्या भावना important होती म्हणून तो गप्प बसला होता...तो तिच्या बाजूला जाऊन बसणार अस दिसताच लँन्सी त्याला अडवते...तो भावनाला हात लावायला जाणार तर ती त्याचा हात पकडते...आता मात्र मृत्युंजयला तिचा भरपूर राग आला होता...

"काय चालू आहे लँन्सी तुझे...😤का अशी वागत आहे?"मृत्युंजय रागातच तिचा हात झटकत बोलतो...तशी ती त्याच्या पोटात एक पंच मारते...तिच्या पंचमुळे मृत्युंजय जमिनीवर पडतो...लँन्सी पुन्हा त्याला मारायला जात असते...तसा तो बाजूला होऊन तिचा वार चुकवतो...तो तसाच उठून उभा राहतो...

"लँन्सी वेडी झाली का तू...😡?मला का मारत आहे?माझी चूक काय?"मृत्युंजय रागातच तिला विचारतो...

"भावनाला त्रास दिल्याबद्दल शिक्षा...तुमच्यामुळे झालं हे सगळं...तुम्ही केलं हे सगळं..."लँन्सी बोलते...पण तिचे बोलणे ऐकून तो शॉक होतो...

"व्हॉट???मी का करू असे?ती माझा जीव की प्राण आहे...मी का वागू तिच्यासोबत असा?''मृत्युंजय थोडस चिडत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून लँन्सी स्वतःच्या पोटावर असलेले बटन दाबते...तस तिच्या पोटावर एक व्हिडिओ चालू होतो...

"भावना तुला मी नाही समजावू शकत तू माझ्यासाठी काय आहे ते...ही कंपनी मला तुझ्यासाठी घ्यावि लागली...तुला अपमानित करण्यासाठी नाही तुझा इन्सल्ट करण्यासाठी नाही घेतली प्रिन्सेस...तू अस कस बोलू शकते यार...मला नाही गमवायचे आहे तुला...भीती वाटते त्या गोष्ठीची मला म्हणून हे उपद्याप चालू आहेत...या मानसीच मला काहीतरी करावे लागेल...चिपकु गर्ल...जिने पाहायला पाहिजे ती तर पाहत पण नाही आणि ही नको असलेली मला पाहत असते...😣आज ना दाखवतोच तुला भावना..."मृत्युंजय स्वतःशीच बडबडत असतो...

हे मृत्युंजय भावना बाहेर गेल्यावर बोलतो ते बोलणे लँन्सी त्याला दाखवते...पहिलेच ती त्याला एकदाच प्ले करून दाखवत होते पण शेवटचं त्याचे वाक्य आज तुला दाखवतोच हे ती जास्त वेळा प्ले करत होती...आता ते पाहून मृत्युंजयला काय समजायचे ते समजते...लँन्सी ने गैरसमज केला होता...हे त्याच्या लक्षात आले...

"लँन्सी माझ्या बोलण्याचा असा अर्थ नव्हता...मी दुसरं काही तरी चांगलं करणार होतो असलं वाईट नाही काही...प्लीज जो तू गैरसमज केला तो बाजूला ठेव आणि मी काय सांगतो ते आधी ऐकून घे..."मृत्युंजय थोडस चिडत बोलतो...त्याचे ते बोलणे ऐकून ती शांत राहते आणि हातानेच बोल म्हणते...

"इथे नको चल गॅलरीत जाऊन तुला सगळं सांगतो..." मृत्युंजय अस बोलत तिला गॅलरीत घेऊन जातो...

"हे बघ लँन्सी भावनाच्या जीवाला धोका आहे म्हणून मी माझं सगळं सोडून इथे आलो आहे...आज मी तिचा बॉस आहे याला पण काही कारण असतील ना माझे?मला तिला काही करायचे असते तर एवढे दिवस थांबलो नसतो मी...मला तिला तिच्या मर्जीने स्वीकारायचे आहे... स्वतःची मर्जी नाही लादायची मला तिच्यावर...आज माझं चुकलं की माझ्या लक्षात नाही राहिले भावनाबद्दल पण घरी देखील प्रॉब्लेम झाला होता म्हणून जावं लागलं मला..."मृत्युंजय अस बोलून थांबतो...

"काय अस काम आलं?"लँन्सी विचारते...

"मानसीच्या बाबांनी आज मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले होते...मानसी सोबत लग्न केले तर ते एका 500 कोटीच्या प्रोजेक्टवर सही करतील...तो प्रोजेक्ट आहे महत्त्वाचा पण भावनापेक्षा नाही...मानसी थोडीशी मला सायको वाटते बालपणी पासून...मी तिला एवढं सांगितले तरीही ऑफर ठेवली तिने...😤आज जे घडले ते पण तिच्यामुळेच घडले...तिला भावनापासून थोडं दूर ठेव एवढंच मी सांगेन तुला...भावनाला मी सांगितले तर पटणार नाही ना म्हणून बोलत आहे...अँड खूप सार thank you तुला सगळं कळलं मला...तू खूप खूप भारी आहेस फक्त गैरसमज करू नको एवढं मी तुला सांगेन..." मृत्युंजय थोडस विचार करत बोलतो...त्याचे असे बोलणे ऐकून ती "सॉरी सॉरी" बोलते...

"ऐ सॉरी नको म्हणू...तू माणूस नसली तरीही भावनाने तुझ्यात इमोशनच फिचर भरलं आहे म्हणून आज तू तिच्या काळजीने तिला मदत करायला गेली...तुझ्याजागी मी असलो असतो ना तर हेच केलं असत...आज माझी प्रिन्सेस फक्त तुझ्यामुळे वाचली आहे...अशीच सोबत रहा तिच्या नेहमी...😊"मृत्युंजय तिच्याकडे पाहत बोलतो...यांचे बोलणे चालू असते तेवढ्यात भावना चुळबुळ करत काहीतरी झोपेतच बडबडत असते...तिचे ते बोलणे ऐकून तो धावतच तिच्याजवळ येतो आणि तिच्या बाजूला बसून तो तिला थोपटवू लागतो...

"जय तुम्ही...तुम्ही...खूप...वाईट...आहात..."भावना झोपेतच बडबडत असते...तिचे ते बोलणे ऐकून तो तिला पाहतो...

"हो बाबा मी वाईट आहे...खूप वाईट आहे...पण आता तू शांत झोप...उद्या भांडू हा आपण..."मृत्युंजय तिला थोपटवत बोलतो...इकडे लँन्सी मात्र त्या दोघांना तशीच पाहत राहते...तो तिला झोपवून बाहेर येतो...

"आई नका काळजी करू तुम्ही जाऊन झोपा...मी पण घरी जातो...तिला अजिबात ऑफिसला पाठवू नका...मी सांभाळून घेईन सगळं..."मृत्युंजय भावनाच्या आईला समजावत बोलतो...

"हो तुम्ही आहात म्हणून कसली काळजी नाही आम्हाला...😊"भावनाची आई बोलते...

मृत्युंजय थोडावेळ आई बाबांसोबत बोलून घरी निघून जातो...त्याला ऑफिसच्या वॉचमन कडून सगळा प्रकार कळला होता...त्याने वॉचमन ला पण कामावरून काढून टाकले होते...पण यात त्याला एक अस नाव पण कळलं की ज्याने त्याचा पाराच चढला होता...

मृत्युंजय घरी आला आणि फ्रेश होऊन गपचूप विचार करत रूममध्ये येरझारा घालत होता...आजच्या प्रकाराने त्याचे डोके सुन्न झाले होते...तो विचार करत फ्लॅशबॅक मध्ये जातो...

फ्लॅशबॅक:-

लँन्सी जेव्हा आतमध्ये गेली होती तेव्हा वॉचमन ने त्याला कॉल करून सगळं काही सांगितले ते सर्व ऐकून तो त्याचे काम सोडून फास्ट मध्ये गाडी ड्राईव्ह करून ऑफिसला पोहचला पण तो पर्यंत लँन्सी तिथून भावनाला घेऊन गेली होती...त्याने रागातच वॉचमन ला एक कानाखाली वाजवली...

"अक्कल आहे का तुला?बघता येत नाही का आतमध्ये कोणी राहिले का नाही ते?😡"मृत्युंजय थोडस चिडत बोलतो...त्याचे ते बोलणे ऐकून वॉचमन घाबरतो...

"सर...आज मानसी मॅडम शेवटी बाहेर आल्या त्यांनी मला सांगितले आतमध्ये कोणीच नाही आहे त्यांनीच सगळ्या लाईट्स बंद केल्या मला मदत म्हणून...त्यानंतर मी कुलूप केलं..."वॉचमन थोडस घाबरत बोलतो...

त्याच्या तोंडातून मानसीच नाव ऐकून आता मृत्युंजयचा पारा चढतो...कारण आधी तिचा बाप आणि आता ती अशी वागली होती...मृत्युंजयने रागातच पटपट कोणाला तरी कॉल केले आणि त्यांच्याशी बोलून फोन कट केले...

"उद्यापासून तू कामावर यायचे नाही...😡"मृत्युंजय रागात बोलून त्याच पुढच न ऐकता गाडीत जाऊन बसतो...तो तिथूनच भावनाच्या घरी जातो...

वर्तमानकाळ:-

मृत्युंजयचा फोन वाजतो तसा तो फोन उचलतो... फोनवरच बोलणं ऐकून त्याच्या ओठाच्या कडा रुंदावतात...तो तसाच फोन कट करून टेबलवर ठेवतो आणि मस्त बेडवर पडून झोपून जातो...

****************************

मृत्युंजयने सांगितल्यामुळे दोन  दिवस भावनाला तिच्या आई बाबांनि ऑफिसला पाठवले नव्हते...घरात दोन दिवस बसून बसून पण तिची आता चिडचिड होत होती...ती चिडचिड आता लँन्सी वर तर कधी फ्रेंड्स वर निघायची...यासर्वात तिला मृत्युंजयने अजिबात कॉल केला नव्हता म्हणून ती स्वतःवर थोडीफार खुश होती...इकडे मृत्युंजय मात्र तिच्या घरातल्याना सगळयांना कॉल करून तिची विचारपूस करत होता...त्याने तिचे सुट्टीचे आणखीन दिवस वाढवले अस तिला आईकडून कळले म्हणून ती रागात होती...ती रागातच तयार झाली आणि त्याच्या घरी गेली...

ती बंगल्याकडे आली आणि त्याचा एवढा मोठा बंगला पाहून ती पाहतच राहते...कारण मृत्युंजय किती श्रीमंत असेल याचा ती अंदाज बांधू लागली...

"माझ्या मते साधारण भरपूर श्रीमंत आहे...मग हे श्रीमंत आहेत ना मग बाकीच्या मुलींना का नाही मागणी घातली बर...🤔माझ्या मागे का लागले आहेत...केवढी सुखी पोरगी होती मी पण हा माणूस आल्यापासून सगळं आयुष्यच बदलल माझं...😑रोज प्लॅन करावे लागतात मला...पण आता काय करू मी...गाड्यातर कुठे दिसत नाही म्हणजे नाही आहेत मग मी जाते घरी...😣मस्त आईस्क्रीम खाऊन घरी जाणार..."भावना अस बोलत गेटवरूनच परतून जाते...आधी अशीच शॉपिंगला एकटी जाते आणि त्यानंतर आईस्क्रीम खाण्यासाठी एका शॉपकडे जाते...ती शॉप थोडीशी आऊट साईट ला होती आणि जास्त गर्दी पण नव्हती म्हणून ती आतमध्ये जाते...

इकडे ती बाहेर पडल्यापासून मृत्युंजय तिला शोधत होता...कारण तीच लोकेशन भरपूर ठिकाणी फिरताना दाखवत होते...ते पाहून आता त्याला रागच आला...तो तसाच उठतो आणि ऑफिसमधून बाहेर पडून त्याच्या त्या महागड्या गाडीत बसतो...गाडी स्टार्ट करून तो तिथून तिच्या लोकेशनवर जात असतो...

"अरे या पोरीला घरात बसायला सांगितले तर मॅडम एंजॉय करत आहे...😏हिच्या एवढं कोणीच फिरत नसेल...नुसती नाचवत आहे...कधी शॉपिंग मध्ये...कधी गार्डन मध्ये तर कधी आईस्क्रीम पार्लरला...तिथे जाऊन काही केल्या नाही पुरे...😑"मृत्युंजय अस बडबडतच गाडी चालवत असतो...तो एका ठिकाणी गाडी थांबवतो आणि पुढच दृश्य पाहून तो डोक्यावर हात मारून घेतो...🤦

"ऐ तू नंतर आला होता म्हणून हे माझं आहे...😤मी नाही देणार तुला..."भावना एका माणसावर ओरडत रागात बोलते...

"तू मुलगी आहे म्हणून मी बऱ्या बोलाणे तुला सांगत आहे...सोड तो डब्बा...नाहीतर परिणाम वाईट होतील..." तो माणूस पण चिडत बोलतो...

"मी सांगितले ना मी नाही देणार म्हणजे नाही देणार...😒आईस्क्रीम के लिए कुछ भि करुंगी...हा फाईट नहीं करुंगी...ओ मुझे नहीं आती हैं रे बाबा...🤷"भावना बोलते पण तिचे ते बोलणे ऐकून मृत्युंजय हसतो...

"ओह म्हणजे तुला येत नाही फाईट तर मग सोप्प आहे हे मग मी घेऊच शकतो की..."तो व्यक्ती अस म्हणून तो बॉक्स उचलत असतो...तशी भावना पटकन बॉक्स उचलते आणि पैसे तिथे ठेवून पळू लागते...तिला पळताना मृत्युंजय दिसतो...तशी ती त्याच्याजवळ येते...

"ओय तू हिरो आहेस ना...😕हे एवढं शरीर कमवल आहे जीमने त्याचा उपयोग कर की...नुसतं घासफूस खाऊन शो ला आणि मुलींना पटवायला ठेवलं आहे का?"भावना मृत्युंजयकडे येत बोलते...तिचे ते बोलणे ऐकून तो काहीच बोलत नाही...

"ओ कोण तुम्ही...🤔मी नाही ओळखत तुम्हाला..." मृत्युंजय भावनाला बोलतो...आता त्याचे बोलणे ऐकून ती चिडते...

"बघ हा पण ओळखत नाही तुला...चल दे तो बॉक्स...आम्ही सोडून देऊ तुला..."तो माणूस धावतच काही माणसांना तिच्याजवळ घेऊन येत बोलतो...आता ती एवढी तापली होती की तिने आईस्क्रीमचा बॉक्स उचलला आणि मृत्युंजयच्या गाडीच्या टपावर ठेवला...तिने खाली वाकून एक दगड उचलला आणि मृत्युंजयच्या दिशेने रागात फेकला...पण तो अलर्ट असल्याने तो पटकन वाकला आणि तो दगड जाऊन त्या भावनासोबत भांडणार्या व्यक्तीला बसला ते पाहून भावना तिथून पळाली...

आता तिचा तो दगड बसल्याने तो व्यक्ती भयंकर तापला आणि रागातच तो तिच्या मागे धावू लागला...प्रकरण वाढल्याने मृत्युंजय धावतच भावनाकडे जाऊ लागला...आता एवढी लोक मागे लागल्याने भावना अजून जोरात पळू लागली...तिला वाटत होते जय पण चिडेल म्हणून ती पळत होती...

"ओय लोंगो तुमहें नहीं मारना था रे बाबा...😣ये आदमी का सर फोडणा था मुझे लेकिन ओ भि इच्छा अधुरी रह गयी मेरी"भावना पळता पळता लोकांना बोलते...

पण इकडे जय मात्र तिच्या मागे पळणाऱ्या एका एका व्यक्तीला चांगला मारत होता...ते पाहून ती थांबली आणि पुन्हा अस u turn घेऊन आईस्क्रीमच्या सेंटर मध्ये येऊन एका चेअर वर बसली...जयने तीच ऐकलं नाही अस तिला वाटत होतं म्हणून ती खुश होती...पण त्याने ते तिचे बोलणे ऐकले होते...

"या डिशुम👊...वा यांना काही जमल नाही तरी फायटींग भारी जमते...ओ अंकल मेरे लिए पॉपकॉर्न,आईस्क्रीम लेकरं आओ..."भावना चेअरवर बसत बोलते...तसा एक माणूस भावनाची ऑर्डर तिला आणून देतो...

"आर you पागल भावना...😡तो तिथे मारत आहे आणि तू काय इथे असे खात आहे..."एक मुलगी भावनाकडे येत बोलते...

"नहीं रे बाबा मेरे को फायटींग से डर लगता हैं इसलीए मैं यहा पर बैठकर एन्जॉय करुंगी...😒बट तू यहापर क्या झक मारने आयी हैं क्या प्रतीक्षा?"भावना त्या मुलीला पाहून बोलते...

"चैतन्य हिला उचल आणि त्या माणसांजवळ देऊन टाक...ही इकडे मस्त एंजॉय करते आहे आम्हाला काळजीत ठेवून..."प्रतीक्षा चिडतच बोलते...

"नको नको मला फाईट नाही खेळायची अजून माझं आयुष्य बाकी आहे...😣इतने जलदी नहीं मरना मुझे..."भावना थोडीशी वैतागत बोलते...

"भावना$$$$😡 हे पुन्हा आलं नाही पाहिजे तोंडात तुझ्या..."मृत्युंजय तिच्याजवळ येत रागातच बोलतो...त्याचा आवाज ऐकून ती घाबरते...तो येऊन तिच्याजवळ बसतो...

"पण वाद कशाला झाला होता ते तरी सांग माझी आई😡"प्रतीक्षा थोडीशी चिडत तिला पाहत बोलते...

"आईस्क्रीम साठी एकच राहिले होते...त्यात माझे फेवरेट होते ना म्हणून...पण एवढं फाईट करून मला मिळाली...😅आईस्क्रीम के लिए कुछ भि...😙"भावना जयकडे पाहत बोलते...तिचे असे बोलणे ऐकून तिघे कपाळावर हात मारून घेतात...🤦पण ती मात्र आईस्क्रीम खाण्यात मग्न असते...

"जीजू मी आधीच सांगते हे पिस विचित्र आहे...😂काही खर नाही तुमचे..."प्रतीक्षा थोडीशी हसत बोलते...

"काय करणार एकच आहे ना..."जय तिच्याकडे पाहत बोलतो...पण तीच अजिबात लक्ष नव्हत यांच्या बोलण्याकडे...कारण आईस्क्रीम लव्हर होती ती...

प्रतीक्षा आणि चैतन्य हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते...पण भावनाच्या आणि जयच्या खूप जवळचे फ्रेंड्स होते...भावनांजयचे खूप असे कॉमन फ्रेंड्स होते...त्या सगळयांना आधीपासूनच माहिती होते जयचे तिच्यावर किती प्रेम आहे ते...पण भावना अज्ञान होती...त्या चौघांने आईस्क्रीम एंजॉय केले...खाऊन झाल्यावर चैतन्य आणि प्रतीक्षा तर हसून निघून गेले...ते निघून गेल्यावर जयने भावनाचा हात पकडला आणि थोडस ओढतच तिला गाडीत टाकलं आणि एकदम फास्ट स्पीडने गाडी चालवू लागला...भावनाला त्याचा हा अवतार पाहून थोडी भीती वाटायला लागली...त्याने एका शांत कोणीच नसलेल्या ठिकाणी गाडी घेतली...तो गाडी थांबवून खाली उतरतो... तो उतरला म्हणून भावना उतरते...उतरत असताना तिच्या पायाला काहितरी लागते...म्हणून ती वाकून पाहते...ती ती वस्तू हातात घेते आणि ते पाहून एक भीतीची लकेर तिच्या अंगावर येते...ती ते तिथेच फेकून देत वाट भेटेल तिकडे घाबरून पळायला लागते...

मृत्युंजय मागे वळून पाहतो तर भावना गायब असते...त्याला काहीतरी भेटते आणि ते पाहून तो पण थोडस चिडतो...तो आसपास पाहतो तर ती त्याला जंगलाच्या दिशेने पळतना दिसते...म्हणून तो पण ती वस्तू रागात दूर फेकून देत तिच्या मागे धावू लागतो...

"भावना थांब...😤प्रत्येकवेळी गैरसमज करून घेत असते तू..."मृत्युंजय पळतच तिला बोलत असतो...पण ती काही क्षणातच त्याच्या नजरे आड होऊन जंगलात निघून जाते...

"ही मुलगी ना...😡नुसती पळण्यातच आयुष्य घालवणार आहे माझे...नेहमी मीच चुकतो असे वाटत हिला...आता हिला शोधून काढावे लागेल..."मृत्युंजय अस म्हणत जंगलात घुसतो...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
           ©®भावना सावंत(भूवि❤️)
****************************

Rate & Review

Maithili Ghadigaonkar
Swati Jagtap

Swati Jagtap 3 months ago

Priya Gavali

Priya Gavali 4 months ago

टिना

टिना 4 months ago

uttam parit

uttam parit 4 months ago