तू अशीच जवळ रहावी... - 8 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - 8

तू अशीच जवळ रहावी... - 8

भावना कोणती तरी वस्तू पाहून घाबरून जंगलाच्या दिशेने पळून जाते...तिच्या मागे जय पण धावतच जातो...तो तसाच पळतच तिला शोधत असतो...पण त्याला ती काही मिळत नाही...इकडे ती घाबरून पळत पळत खूप पुढे आली होती...त्यात आता अंधार पण पडत होता म्हणून ती तशीच घाबरत घाबरत चालत होती...पळून पळून तिला दम लागला होता...त्यात हृदयाचे ठोके पण मोठया प्रमाणात तिचे वाढले होते...आता पळणे तिला शक्य होत नव्हते म्हणून ती तशीच एका मोठया झाडाचा आधार घेऊन तिथेच उभी राहते...

"एवढया जंगलात मी पळून तर आली पण आता बाहेर कशी जाऊ...🤔हडळ वगैरे असतात ना जंगलात रात्रीचे...मला घेऊन गेली तर मी काय करू बर तिच्यासोबत...😔बेअर गिल्स पण नाही आहे माझ्यासोबत...सकाळ पर्यंत जिवंत राहिली तर ठीक आहे..."ती थोडीशी शांत होऊन बोलते आणि ती तशीच घाबरत घाबरत चालत असते...तेवढ्यात कोणीतरी मागूनच तिच्या कंबरेत हात घालून तिला थोडस वर उचलते...तशी ती आणखीन घाबरते...

"मम्मी हडळ...😭भूत ने पकडल मला...सॉरी ना हडळ मला नाही यायचे होते इथे पण चुकून आले..."ती अस रडतच बोलते...

"ऐ चूप...😡कोणी हडळ भूत नाही आहे...नको ते विचार करून जंगलात पळून आली ना थांब देतोच तुला हडळ कडे...😡"एक जबरी माणसाचा आवाज तिच्या कानावर पडतो...

"नको नको ती मला कच्च खाईल...😰कच्च खाल्लं तर आत्म्याला शांती नाही मिळणार माझ्या... मी पण मग हडळ होईल तिच्यासारखी...🙁आईने सांगितले होते लहानपणी..."भावना घाबरून लहानमुलांसारखे बोलत असते...तिचे ते क्युट बोलणे ऐकून त्याचा तो राग कुठल्या कुठे गायब होतो...तो तिला अलगदपणे खाली सोडतो... तशी ती मागे वळून त्या व्यक्तीला पाहते...त्याला पाहून ती पुन्हा घाबरून पळतच असते...हे दिसताच तो तिचा हात पकडतो...

"सोडा सोडा...😢मला तुम्ही वाईट आहात जय मला नाही यायचे तुमच्यासोबत...एका आईस्क्रीम साठी फाईट केली त्याच्या बद्दल्यात मी काहीही वाईट करू देणार नाही माझ्यासोबत..."ती तशीच घाबरून त्याला न पाहता बोलत असते...तिचे ते बोलणे ऐकून आता तो पण चिडतो...तो तसाच तिचा हात पकडून तिच्यासमोर उभं राहतो...

"काय समजलं ग तू मला...😡मी एवढा खालच्या थराचा माणूस नाही आहे की तुझं....शी भावना मलाच लाज वाटत आहे बोलायला...तू मात्र एवढा मोठा गैरसमज करून घेतला...😡तुझ्यासारख्या किती तरी मुलगी माझ्या आसपास फिरत असतात पण मी नाही बघत त्यांच्याकडे...एक सांगू जर मला अस करायचे असते ना अश्या किती तरी मुलीसमोर पैसे फेकून केलं असत...पण नाही मला हव्यास आहे...तू तू मात्र खुप घाण विचार करते...एका कॉमडोम च्या पॅकेट वरून तू तुझं माझ्याबद्दलच मत बनवून मोकळी झाली...तुझा होणारा नवरा नंतर पण त्या आधी चांगले मित्र मैत्रिण आहोत ना आपण...😤त्या नात्याने तरीही विचार करायचा होता माझ्याबद्दल...आपल्या नात्यात ना विश्वासच नाही आहे...तर प्रेम वगैरे दुसरी गोष्ट राहिली...

मला ना आता खरच तुझा भरपूर राग येत आहे...वेडी कुठची...जरा पण मला विचारता नाही आले का तुला त्या पॅकेट बद्दल...आता मी नाही आलो असतो तर तुझे काय झाले असते...याचा तरी विचार करायचा होता तू..."मृत्युंजय रागातच तिला पाहून बसतो...त्याचे ते बोलणे ऐकून ती गप्प खाली मान घालून राहते...त्याचे बोलणे ऐकून तिला काय बोलावे ते समजत नव्हते...तसा तो थोडा शांत होतो आणि तिचा चेहरा स्वतःच्या ओंजळीत धरतो...तशी ती त्याला भरल्या डोळयांनी पाहते...

"सॉरी ना प्रिन्सेस जास्त ओरडलो ना मी तुला...पण काय करू तू विचारच चुकीचा करत होती...ते पॅकेट तिथे भेटले ते माझंच असेल असा समज तरी तू कसा केला??अग जंगलात भरपूर कपल्स येतात त्यांच असेल कोणाचे तरी...आपल्या मध्ये तुझ्या मर्जी शिवाय काहीच होणार नाही...मग लग्न झालं आपलं तरीही तू जो पर्यंत मनाने माझ्याजवळ येत नाही तोपर्यंत मी वाट पाहेन...त्यात तुला माझ्याबद्दल फिलिंग निर्माण नाही झाल्या तर आपण दूर जाऊ एकमेकांपासून...मला फक्त तू सुखी हवी...😊बाकी काहीच नको...तुला कोणी आवडत असेल तर तस सांग मला...???मग मी निघून जातो..."मृत्युंजय प्रेमाने तिच्यासोबत बोलत असतो...ती तर काही क्षण त्याच्यातच हरवून जाते...कारण त्याचे ते डोळे तिला त्याचा खरे पणा
दाखवत होते...त्या डोळ्यात काळजी,प्रेम,भीती,दुःख सगळे काही होते...ती उत्तर देत नाही म्हणून तो स्वतःचा हात काढतो आणि तो तसाच जात असतो...तशी ती त्याचा हात पकडते...

"अहो मला एकटीला नका ना सोडून जाऊ...😥मला भीती वाटते...मला कोणीच आवडत नाही...☹️"ती थोडीशी इकडे तिकडे पाहत बोलते...तिचे शेवटचे बोलणे ऐकून त्याच्या मनाला समाधान वाटते...तो तसाच आनंदात तिला मिठी मारतो...त्याने अचानक मिठी मारल्याने ती गोंधळते...त्याच्या अश्या स्पर्शाने तिच्या अंगावर काटा उभा राहतो...ती अंग चोरून गप्प बसते...त्याच्या जेव्हा लक्षात येते...तस तो तिला सोडतो...

"सॉरी..."तो ओशाळून तिला बोलतो...पण इकडे त्याच्या अश्या वागण्याने तिचा चेहरा मात्र गुलाबी झाला होता...अंधार असल्याने ते त्याच्या लक्षात आले नव्हते...ती लगेच नॉर्मलं होते आणि हळूहळू पुढे चालू लागते...त्याच्या सोबत असण्याने तिची भीती कुठल्या कुठे गायब झाली होती...

"चल जाऊया ना??"तो...

"हुं...चला पण तुम्ही माझा हात पकडा हा...मागूनच कोणी मला उचलून नेल तर म्हणून..."ती क्युट फेस करत त्याला बोलते...तिचे ते बोलणे ऐकून तो कपाळावर हात मारतो...🤦तो तसाच तिचा हात पकडतो आणि चालू लागतो...

वर्तमानकाळ:-

मृत्युंजय अचानक पणे कसल्या तरी आवाजाने आठवणी तुन बाहेर येतो...त्याची नजर दरवाजा कडे जाते...पाहतो तर लँन्सी आणि भावनाचे बाबा असतात...त्यांना पाहून तो उठतो आणि त्यांच्याजवळ जातो...

"लँन्सी काही काम आहे का??"मृत्युंजय...

"ही डायरी...At unknown story..."लँन्सी जयच्या हातात डायरी देत बोलते...तो त्या डायरीकडे पाहतच राहतो...कारण ती मस्त अशी पिंक कलरच्या कव्हर ने सजवून बंद केलेली होती...लँन्सीने त्या कव्हर कडे असलेल्या छोट्याश्या रेड कलरच्या बटणला दाबले तशी ती डायरी खुल्ली...

"तुझ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील यात जय...😊यासाठी मी आलो होतो इथे..."भावनाचे बाबा अस म्हणून भावनाकडे जातात...ते प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवतात...

"लवकर बरी हो ना बाळा...तुझा साथीदार तुझी वाट पाहत आहे...पूर्ण बिझनेसवर पाणी सोडून तो आज फक्त तुझ्यासाठी एवढे दिवस इथे बाजुला बसून राहतो...खूप खूप लकी आहेस तू..."भावनाचे बाबा हळु आवाजात तिच्यासोबत बोलत असतात...ते काही वेळ तिच्यासोबत बोलून रूमच्या बाहेर निघून जातात...नेहमी आपल्या मुलीचे हावभाव मन त्यांना ती ने न बोलता कळत असायचे...पण आज तीच शांत राहणे पाहून त्यांना कसतरी झाले...त्यांना जास्त वेळ तिच्याजवळ थांबणे योग्य वाटत नव्हते म्हणून ते बाहेर पडले...लँन्सी ने एक नजर भावना वर आणि जय वर टाकली आणि ती पण तशीच बाहेर गेली...ते दोघे गेल्यावर तो डायरी घेऊन तिच्याजवळ आला...तो तिथेच तिच्या बेडवर बसला...त्याने न राहवून डायरीतिल पान हळूहळू परतायला सुरवात केली...काही पान चाळून झाल्यावर त्याची नजर एका पानावर थांबली...

"तुम्हाला त्रास द्यायला मला आवडत होते...कारण तुम्ही खूप स्पेशल आहात...लग्न मोडण्यासाठी प्रयत्न करणारी मी...कधी तुमच्या प्रेमात पडले माझे मलाच कळले नाही...दुसरं कोणी असते तुमच्या जागी तर पळून गेले असते...पण तुम्ही नाही गेलात...उलट भरभरून माझ्यावर प्रेम करू लागला होतात...

जय तुमचे त्यादिवशीचे जंगलातिल बोलणे...मला ओरडणे वगैरे सगळ्या गोष्टीतुन तुम्ही तुमचे प्रेम मला दाखवत होतात...त्यावेळी तुम्ही माझ्यासोबत काहीही केलं असत जेव्हा मी तुमच्या मिठीत झोपले होते...पण तुम्ही नाही काही केलं...आजवर तुम्ही नेहमीच समजूतदार पणे वागत होतात...मी किती त्रास देत होती आणि तुम्ही तो सहन करत होतात...ते जंगलातील दिवस खूप भारी होते........"

भावनाच्या डायरीतील असे बोलणे वाचून जयच्या चेहऱ्यावर गोड हसू येते...तो तसाच डायरी वाचता वाचता डोळे बंद करतो आणि जंगलातील आठवणीत जातो...

भूतकाळ:-

जय भावना चा हात पकडून चालत असतो...तेवढ्यात तिच्या पायाला काहीतरी लागते...तशी ती कळवळते...

"मम्मी😥"भावना अस बोलून  जयचा हात सोडून खाली जमिनीवर बसते...तिच्या अश्या करण्याने मृत्युंजय तिला पाहतो तर तिच्या पायात काटा घुसला होता आणि थोडस रक्त पण येत होतं...ते पाहून ती रडायला लागली होती...

"शु प्रिन्सेस ओरडू नको...एवढासा तर काटा आहे..."जय खाली बसत बोलतो...तो तसाच हात पुढे करून काटा काढायला जात असतो...तशी ती पाय मागे घेते...

"अरे छोटसं तर आहे...आता काढतो ना बाळा...🤗"जय लहानमुलीला समजवतात तस तिला समजावत असतो... जयच्या समजवण्याने ती पाय पुढे करते तसा तो तिचा हळूच काटा काढून टाकतो...तो तसाच खिशातून स्वतःचा रुमाल काढतो आणि तिच्या पायाचे रक्त पुसून घेतो...

"दुखतय मला...🙁"भावना पायकडे पाहून बोलते...

"दुखतंय ना आपण इथेच बसू मग काही वेळ...तसही आज पौर्णिमा असल्याने चंद्राचा प्रकाश आहे आपल्यासोबत..."जय आकाशातिल चंद्राला पाहून बोलतो...तो तसाच जाऊन एका झाडाकडे बसतो...

"एवढ्या मोठया जंगलात anaconda आला तर मी काय करू...😱त्यात जंगली हिंस्त्र प्राणी असले तर...ते पण कमी तर एखादी चेटकीण,हडळ माझ्यासमोर आली तर मी काय करू...😧अजून मला जगायचे आहे राव...मला खरच खाल्लं तर कोणी...मग मी मरून जाणार ना..."भावना एकटीच घाबरत आसपास पाहून बोलत असते...तिचे ते बोलणे ऐकून जय रागातच तिच्याजवळ येतो...

"तू चूप बसते का जरा...😡काय लावलं आहे मगासपासून...स्वतः लाच हौस होती ना पळायची...ती हौस भरली नाही म्हणून अशी बडबडत असते... आता ना गपचूप पणे माझ्यासोबत चालायचे...आता जर पळाली आणि बोलली ना तर खरच तुला एखाद्या जंगली प्राणी ची मेजवानी साठी पाठवेन...😡लास्ट वॉर्निंग आहे तुझ्या साठी भावना...पुन्हा मरण वगैरे असे काही आलं ना तोंडात तर मी किस करीन तुला...😡"जय चिडतच बोलतो आणि तो खाली वाकून तिला स्वतःच्या दोन्ही हातात उचलून घेतो...ती काही बोलायला जाणार पण त्याचे आधीचे बोलणे ऐकून ती तोंडावर दोन्ही हात ठेवते...

जय तिला तसच उचलून घेऊन चालत असतो...आता त्याने वॉर्निंग दिली होती म्हणून ती गपचुपच बसली होती...तिची काहीच हालचाल होत नाही म्हणून त्याची नजर तिच्यावर जाते...तस तो पाहतो तर ती तशीच त्याच्या दोन्ही हातात झोपून गेली होती...ते पाहून तो गालात हसतो...तो एका मोठया झाडाकडे थांबतो आणि अलगदपणे तो खाली वाकून तिला त्या झाडाच्या छायेत खाली जमिनीवर झोपवतो...तिच्या मनात आणखीन काही विचार येऊ नये म्हणून तो थोडस दूर एका झाडाखाली जागा पाहून तिला पाहत झोपतो...

मध्यरात्री कधितरी भावनाला विचित्र आवाज ऐकायला येतात...तशी तिची झोप चाळवते...ती उठून डोळे चोळून पाहते तर सगळीकडे झाडच झाड असतात...हे पाहून तिच्या लक्षात येते की ती जंगलात आहे...ती आसपास पाहते तर जय तिला दिसत नाही...तिची नजर एका झाडाकडे जाते...तर तिथे तिला तो शांत झोपलेला दिसतो...इकडे विचित्र आवाज ऐकून ती घाबरते...ती तशीच उठते आणि लंगडतच घाबरून जयकडे जाते आणि थोडस अंतर ठेवून त्याच्या बाजूला कानावर हात ठेवून झोपी जाते...जयला स्वतःच्या छातीकडे कोणाचा तरी स्पर्श जाणवतो...तसा तो पटकन डोळे खोलतो...पाहतो तर भावना त्याच्या कुशीत थंडीने कुडकुडत झोपली होती...हे पाहून तो गालात हसतो आणि तिचे हात बाजूला करून तो उठतो...तो बसून स्वतःचे ब्लेझर काढतो आणि तिला घालून देतो...तशी ती स्वतःचे दोन्ही हात एकत्र छातीकडे ठेवून झोपून जाते...चंद्राच्या प्रकाशात तिचा चेहरा एकदम खुलून दिसत होता...ते पाहून तो खुश होतो...तो पुन्हा तिला पाहून तिच्या बाजूलाच जमिनीवर पडतो...तो झोपतच असतो की तेवढ्यात ती झोपेतच पुन्हा त्याच्या कुशीत शिरते...ते पाहून तो हसतो आणि जास्त विचार न करता तो तिच्या बाजूला कडल करून तिला जवळ घेतो...त्याच्या उबदार अश्या गरम मिठीत ती पण शांत झोपून जाते...त्याचे पण आज मन थोडेफार समाधानी झाले होते...त्याच्या मिठीत झोपल्याने तिला जागच आली नाही रात्रभरात...त्याला पण उशिरा झोपल्याने जाग आली नव्हती...

खूप उशीराने त्याला जाग आली...त्याने बाजूला पाहिले तर ती गायब होती...त्याने आसपास नजर टाकली तर ती त्याला कुठेच दिसत नव्हती...हे पाहून तो घाबरला...तो तसाच तिला पळतच इकडे तिकडे शोधू लागला तर त्याला एकेठिकाणी स्वतःचे ब्लेझर पडलेलं दिसले...ते पाहून तो आणखीनच घाबरला...त्याच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले...

"प्रिन्सेस यार कुठे गेली तू...तुला ना नाहीच कळतं माझे मन म्हणून तू अशी वागत असते...आता ना तुला बांधूनच ठेवावे लागेल मला..."जय अस म्हणून स्वतःचे ब्लेझर उचलतो आणि तो तसाच तिला शोधत असतो...

इकडे जंगलात तो तिला शोधत होता...कुठेतरी त्याच्या कानावर तिचा आवाज पडला आणि तो त्या दिशेला गेला...तो काही मिनिटांत तिथे पोहचला पण समोरच दृश्य पाहून तो जबरदस्त शॉक झाला...

"ये तू ना खूप चांगला आहे त्यात मी शिव भक्त पण
आहे...त्यामुळे मला तू आवडतो...तुझा रंग पण भारी आहे पहिल्यांदा पाहत आहे मी ना तुला...खूप भारी आहेस तू...😚मी चुकून इकडे आली त्यामुळे सॉरी हा माफ कर...😞छोटी बच्ची समजकर..."ती  विनवणी च्या स्वरात लाडीगोडी लावत बोलत असते...कारण तिच्या समोर एक मोठा साप आपला फना काढून तिला पाहत विळखा घालून बसला होता...ही त्याच्या समोर काही अंतरावर मांडी घालून बसली होती...हे दृश्य पाहून जय मात्र भयंकर चिडला होता...

"ही खरच वेडी आहे का...😤साप आहे तो...आता ना हिला खरच ओरडावे लागेल मला..."तो अस म्हणत तिच्याजवळ जातो...तो तिची नजर नाही पाहून अचानकपणे त्या सापाला मागून धरून उचलून दूर फेकून देतो...त्या सापाला फेकल्याने ती मात्र भयंकर चिडते...

"अहो लागलं असेल ना त्याला...😤बिचारा होता तो मी समजावत होती ना त्याला तरीही नाही तुम्हाला कळत...प्रेमाने समजावले की कळले असते त्याला आणि मी त्याच्या वाटेत आली होती तो नाही काही..."ती रागातच बोलत असते...

"व्हॉट तो बिचारा...😡सिरिअसली तुला वेड लागलं आहे का?विषारी साप होता तो?चावला असता तुला?काय प्रेमाने समजवण्याचे बोलत आहेस तू?मी बोललो तर तुला कळत नाही आणि त्या सापाला प्रेम सांगत आहे...आता तुला याची पनिषमेंट मिळणार आहे...😡"तो अस रागात बोलत तिच्याजवळ चालत असतो...ती हळूहळू मागे सरकत असते...तो काही पावलं चालतच असतो...ती पण मागे जाते...तिला मागे झाड लागते...तशी ती थांबते...तो एकदम तिच्याजवळ येतो आणि तिच्या कंबरेत हात घालून तिला स्वतःजवळ खेचतो...त्याच्या अश्या करण्याने ती घाबरून डोळे बंद करते...तो हळूच स्वतःचे ओठ तिच्या कपाळावर नेऊन टेकवतो आणि तिला सोडून देतो... त्याचा स्पर्श तिला जाणवत नाही तशी ती डोळे खोलून पाहते...तर तो एका झाडाखाली राहून तिला हसून पाहत असतो...

"काय आहे ना आता जर पळाली तर खरच......"तो खट्याळ पणे तिला पाहून बोलत असतो...

"अहो कळलं मला...बस्स झालं तुमचं...😣"ती घाबरून बोलते...तसा तो हसून तिथून चालू लागतो...ती पण त्याच्या मागे गपचुप चालत असते...तिच्या पायातील पैंजनाच्या आवाजाने त्याला कळत होते की ती त्याच्यासोबत आहे...खूप पुढे चालून आल्यावर त्याला तिच्या पैंजनाचा आवाज येत नाही...तसा तो मागे वळतो आणि मागच दृश्य पाहून तो शॉक होतो...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
          ©®भावना सावंत(भूवि❤️)
****************************

Rate & Review

Priya Gavali

Priya Gavali 4 months ago

टिना

टिना 4 months ago

Karuna

Karuna 4 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 4 months ago

I M

I M 4 months ago