तू अशीच जवळ रहावी... - 14 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - 14

तू अशीच जवळ रहावी... - 14

ती रडत असते आणि तो तिला शांत करत असतो...पण ती काही शांत होत नसते...ती त्याच्या मिठीत राहून नुसती रडत असते...

"प्रिन्सेस नको रडू ना...काय झालं आहे ते सांगशील मला...मी आहे ना तुझ्यासोबत...बोल ना प्रिन्सेस..."तो तिला जवळ घेऊन तिचे डोळे पुसत बोलतो...त्याच्या बोलण्याने ती थोडीशी शांत होते...तो तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावर हात फिरवत असतो...खूप वेळ तो तसाच करत असतो...तिचं रडणं बंद झाल्याने तो तिला बाजूला करत असतो...तशी ती खाली पडत असते...

"हे प्रिन्सेस काय झालं तुला??काय होत आहे तुला..."तो घाबरून तिला धरत बोलतो...कारण तिला चक्कर आली  होती आणि तिने केव्हाचे डोळे बंद केले होते...तिला तस पाहून तो घाबरतो...

"भावना काय होत आहे तुला??"तो घाबरून तिला विचारत असतो पण तिच्याकडून काहीच प्रतिकार येत नाही...तो तसाच तिला स्वतःच्या दोन्ही हातात उचलतो आणि सोफ्यावर ठेवतो...तिला ठेवून तो पळत जाऊन किचनमधून पाणी आणतो आणि तिच्या डोळ्यावर शिंपडतो...तस ती डोळे उघडझाप करते ते पाहून त्याला बर वाटत...

"प्रिन्सेस काय झालं बाळा तुला??''तो काळजीने तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती त्याच्याकडे पाहते...त्याच्या डोळ्यात तिला काळजी,प्रेम हे सगळं जाणवत होते...ते पाहून ती उठते...तसा जय तिला स्वतः जवळ घट्ट पकडतो...

"तू ओके आहेस ना प्रिन्सेस??तुला त्रास होत आहे तर नको सांगू मला..."जय तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत बोलतो...त्याच्या अश्या वागण्याने ती गपचूप शांतपणे त्याच्या मिठीत राहते...

"जय तुम्ही आणि मी लहान होतो ना..."ती हळू आवाजात बोलायला लागते...

"हा तेव्हा काय झालं??"तो घट्ट तिचा एक हात धरत विचारतो...

"तेव्हा तुम्ही इंग्लंड ला गेलात ना....त्याच्या नंतर मी कोणत्याही मुलासोबत बोलत नव्हते...मला नाही आवडायचे...पण त्याच काळात माझी मम्मी प्रेग्नेंट होती...तिला एक छोटासा मुलगा झाला मी तेव्हा 10 वर्षाची होती...खूप आनंद झाला होता मला त्यादिवशी भाऊ जो मिळाला होता ना...मी खूप प्रेम करू लागले त्याच्यावर जीवापेक्षा जास्त जपत होते...खूप बोलायची मी त्याच्यासोबत...त्याला कितपत समजायचे मला नाही माहीत पण तो खूप गोड हसायचा खूप भारी वाटायचं मला तेव्हा...पण देवाला नाही मान्य होत माझं सुख...माझा आनंद त्याला नको होता म्हणून त्याला माझ्यापासून दूर घेऊन गेला तो...😭रक्षाबंधन होत माझं पहिलच त्याच्यासोबतच एवढी excite होती मी त्यादिवशी...माझी excitement पाहून मम्मी पप्पांनी सकाळीच मला राखी बांधायला सांगितली...मी मस्त अशी छोटीशी राखी त्याच्या हातात बांधली आणि त्याच दिवशी संध्याकाळी तो मला सोडून गेला जय...😭तेव्हापासून मी माझ्या आताच्या भावापासून दूर राहते...माझी सावली पण मी त्याच्यावर पडू देत नाही..."ती रडत रडतच त्याला बोलते...तिचे बोलणे ऐकून त्याला पण वाईट वाटते...

"तू अस का करते प्रिन्सेस जो गेला तो गेला ना मग त्याची शिक्षा आहे त्याला का??त्याला नाही वाटत का माझ्या दि ने मला राखी बांधायला हवी??कोण बोललं तुझ्यामुळे गेला तो?प्रिन्सेस त्याला हार्ट चा प्रॉब्लेम होता...त्याच्या हृदयात होल होता...त्यामुळे तो काही दिवसच राहिला..."जय प्रेमाने तिला समजावत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती त्याच्यापासून दूर होते...

"नाही काकी बोलल्या माझ्यामुळे झालं...मी राखी बांधली म्हणून झालं...मला त्याला शेवटच पण पाहू दिलं नाही काकीने...😭त्यावेळी सगळे दुःखी होते म्हणून काकीने मला त्याच्या पासून दूर ठेवले होते...मी वाईट आहे ना म्हणून केले...माझ्या परिवारातिल बाकी सगळ्या बहिणी त्याला रक्षाबंधन साजर करतात पण मला कधीच नाही करता आलं...पुन्हा तस घडू नये ना..."ती दुःखी होऊन बोलत असते...आज किती तरी वर्षांनी ती मनात साचलेलं सगळं बोलत होती...आज ती व्यक्त होती...घरात भाऊ असून देखील कधी तिने रक्षाबंधन, भाऊबीज हे सण साजरे केलेच नव्हते...त्याच्या शिक्षणासाठी ती धडपडत असायची वडिलांनंतर त्याची थोडीफार जबाबदारी तिने उचलली होती...त्याचे सगळे हट्ट ती पुरवायची पण त्याच्यापासून दूर राहून...प्रेम तर भरपूर होते तिचे...पण एका भावाला तिने गमावले अस घरच्यांनी तिला सांगितल्यामुळे ती दूर राहू लागली...ती च्या मुळे त्याला काही होऊ नये म्हणून ती अस करत होती...लोकांसाठी ती  आनंदी होती पण तिच्यासाठी ती कधीच आनंदी नव्हती...

"शु$$$$ अस काही नसतं पिल्लु...जे व्हायचे असत ते होऊन जातं...तुला माहीत आहे तुझा भाऊ वाट पाहत असतो ग तुझ्या राखीची...बाकी बहिणी पेक्षा त्याला तुझी राखी महत्त्वाची आहे...बाकीच्या गिफ्ट साठी वगैरे त्याच्याजवळ वर्षांतून कधीतरी येतात...पण त्याची बहीण वर्षभर घरात राहून त्याची काळजी घेत असते...त्याला हवं नको ते काय बघत असते...त्याला थोडस काही झालं की तिला त्रास होत असतो...जो त्याच्या बाकीच्या बहिणींना नाही होत...तरीही अस असताना ती दूर राहते त्याच्यापासून हे पाहून त्याला वाईट वाटत...किती वर्षे दूर राहणार प्रिन्सेस??तू त्याच्यासाठी दूर जात नाही हे कळतय मला....एवढं सगळं असताना का अस वागते तू???"जय शेवटचे काही शब्द आवाज चढवत बोलतो...कारण तिची काही चुकी नव्हती हे त्याला तिला लक्षात आणून द्यायचे होते...त्याचे बोलणे ऐकून ती डोळे पुसते...

"पण नको मला......"ती बोलत असते...

"ओके फाईन तुला सांगून कळत नाही ना?😡नको करू तू...पण एवढं मात्र लक्षात ठेव की तू त्याची चूक नसताना त्याला त्रास देत आहे...एक बहीण म्हणून कर्तव्य पार पाडत आहेस तू...पण त्याला ते नको आहे...त्याला त्याची बहीण हवी आहे...जर तू जवळ असून त्याला प्रेम देऊ शकत नाही तर तू दूर गेलेलीच बरी...त्याला निदान वाईट तरी वाटणार नाही...😡उद्याच तू आमच्या इंग्लडच्या कंपनीसाठी जायचं आहेस...तिथून शिक्षण घ्यायच आणि जॉब करायचा...सगळ्या फॉर्मलिटी पूर्ण झाल्या तुझ्या..."तो ती ऐकत नाही म्हणून चिडून बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती उठते...

"मी नाही जाणार कुठेही...😡मला पैसा,शिक्षण काहीच नको मला माझा भाऊ म्हत्ववाचा आहे..."ती रागातच बोलते...तिचे ते बोलणे ऐकून जय शांत होतो...कारण त्याला जे उत्तर हवं होतं ते उत्तर त्याला मिळालं होतं...

"ओके भाऊ महत्वाचा आहे ना उद्या रक्षाबंधन आहे आणि उद्या तू त्याला राखी बांधली तर तुला भारतात राहायला मिळेल पण जर तू अस नाही केलं तर तुला पाठवले जाणार..."जय चिडूनच तिला बोलून निघून जातो...त्याचे असे बोलणे ऐकून तिचे मन घाबरते...तिच्यासमोर तिच्या आधीच्या भावाचा चेहरा येतो...पण आता जयने तिच्यासमोर ऑपशन न ठेवल्याने तिला ते करावेच लागणार होते...

ती काहीतरी मनाशी ठरवते आणि फ्रेश होण्यासाठी रूममध्ये निघून जाते...

वर्तमानकाळ:-

अचानक ढगांच्या गडगडाटने तो दचकतो आणि आठवणीतून पटकन भानावर येतो...तो समोर पाहतो तर पाऊस कोसळत असतो...पावसामुळे वातावरण एकदम थंडगार झाले होते...अंधार देखील झाला होता...त्याची नजर खाली गेली तर ती तिथे नव्हती...त्याने वरूनच आसपास तिला पाहायले तर त्याला ती कुठेच दिसली नाही...तो काळजीने तसाच खाली आला...खाली आला तर ती मस्त अशी भिजून ओलेचिंब झाली होती...पूर्ण साडी तिच्या अंगाला चिटकलेली होती...तिला अश्या अवतारात पाहून तो चिडला...

"वाव आयस्क्रीम झाली आता पाऊस बाकी होता ना?😡किती भिजली तू??"तो थोडस चिडतच तिला बोलतो...

"नही मुझे कुछ नहीं होता...😄"ती हसुन त्याला बोलते पण लगेच तिला शिंका सुरू होतात...ते पाहून तो बाजूचाच एक टॉवेल तिच्याजवळ घेऊन येतो आणि थोडस रागातच तीच डोकं पुसायला लागतो...

"अहो अस रागात करणार तर अजिबात पुसायचे नाही...😒''ती चिडतच बोलते...तसा तो शांत होऊन पुसतो...

"एवढं डोकं का तापलं आहे तुझं???"तो तिचा चेहरा पाहून विचारतो...

"नाही तर काहीच नाही माझं कशाला डोकं तापेल..."ती बोलते पण त्याला काही समाधान होत नाही म्हणून तो तिला स्वतःकडे वळवतो...

"प्रिन्सेस मी तुला ओळखतो लहानपणापासून...या चेहऱ्यावरची एक एक रेषा बदली की मला कळते..."तो तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत बोलतो...

"हा तेज सरना नावाच्या माणसाचा फोन आला होता तुमच्या फोनवर...मी त्याला बोलली की तुम्हाला नाही बोलायचे...😒मग त्याने तुमच्याबद्दल वाईट बोलले म्हणून मग मी पण त्याला रागात बोलली आणि फोन कट केला..."ती अस म्हणून झालेला प्रकार त्याला सांगते...

(तेज सरना जीवनभर तुझी साथ हवी या स्टोरीत आहे...यात तो सीन लिहलेला आहे 16 व्या पार्ट मध्ये म्हणून मी तो सीन इथे लिहणार नाही...😄काहीजण हीच स्टोरी वाचतात त्यांच्यासाठी आहे हे...)

"अरे माझी प्रिन्सेस ती गैरसमज झाला असेल पिल्लु त्याचा..."जय तिला समजवण्याच्या सुरात बोलतो...

"नाही माझ्या पती बद्दल कोणीही वाईट बोललेल मी खपवून घेणार नाही...😏"ती चिडूनच बोलते...

"एवढे प्रेम आहे माझ्यावर??"तो तिच्या कंबरेत हात घालून तिला जवळ ओढत विचारतो...

"खुद से भि ज्यादा...😚"ती त्याच्या डोळ्यात पाहत बोलते...दोघेही त्या क्षणापूरते एकमेकांच्या डोळयांत पाहत असतात...जयला तिचे थरथराने ओठ आपलेसे करण्याचा मोह येतो तो तिला घट्ट पकडून तिच्या ओठांजवळ चेहरा नेत असतो की तेवढ्यात तिचा फोन वाजतो तशी ती हसून त्याच्यापासून दूर होते...ती थोडीशी दूर होऊन कॉल उचलते...

📲"हॅलो भावना मैं धरा बात कर रही हुं"पलीकडून ती बोलते...तिचा आवाज ओळखीचा वाटल्याने ती खुश होते...

📲"अग ऐ मला मराठी येते तेवढी बोल तू मराठी..."भावना हसून बोलते...

📲"मी तुला फोन लावायचा प्रयत्न केला पण लागलाच नाही?कुठे होती तू?"धरा काळजीने विचारते...

📲"ते मी नंतर सांगेन पुन्हा कधी भेटली की...😊तू बोल ना तू कशी आहेस ते?"भावना हसून तिला बोलत असते...

📲"मी मस्त आहे...मी तुला माझ्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी फोन केला आहे..."धरा थोडीशी लाजत बोलते...

📲"अरे वा! कौन हैं वो?"भावना...

📲"पंजाबी आहे...प्लीज तू ये ना यार पंजाब ला...माझं अस स्वतःच कोणीच नाही आहे ना म्हणून मला अस वाटत तू यावं..."धरा रिक्वेस्ट करत बोलते...तीच बोलणे ऐकून ती जयकडे पाहते...

"अहो माझी मैत्रीण आहे धरा तर तीच लग्न ठरलं आहे पंजाबी मुलाशी...पंजाबला आहे...तर..."भावना कसतरी फोनवर हात ठेवत जयला विचारत असते...तिचे बोलणे ऐकून जय तिच्याजवळ येतो...

"ओके आपण जाऊ...😊तसही हनिमून साठी तिथूनच मनाली,उत्तराखंडला जाऊ..."मृत्युंजय मिशकील पणे तिला जवळ घेत बोलतो...

"अहो तुमचं काहीही असते...😣"ती अस बोलून त्याच्यापासून दूर होते आणि फोनवर बोलू लागते...

📲"कोणासोबत बोलत होती भावना तू??"धरा...

📲"अंम...माझे पती...😌"ती लाजत बोलते...तिचे बोलणे ऐकून धरा शॉक होते...

📲"व्हॉट तू लग्न केलं??मला का नाही सांगितले?ओके या वेळी चिडत नाही आमच्या जीजू ला पण घेऊन ये...तू कधी येणार आहेस??"धरा...

📲"अग चेन्नई एक्प्रेस थांब जरा...😣हो मी लग्न केलं झालं त्याला वर्ष दीड वर्ष ती खूप मोठी स्टोरी आहे नंतर सांगेन तुला...😊तुझे कोणते लग्नाचे कार्यक्रम झाले ते सांग आधी..."भावना हसून तिला विचारते...

📲"हा रोका झाला,फोटोशूट झालं आणि संगीत सेरेमनि झाली काल..."धरा आनंदात तिला बोलते...

📲"मिन्स चुडा,घरोली,कलिरे आणि हळद बाकी आहे तर...ओके तुझा चुडा, कलिरे आमच्याकडून येणार आहे...😊घरोली रसम पण आमच्याकडुन होईल कारण you are my sister..."भावना हसून विचार करून बोलते...तिचे बोलणे ऐकून धरा शॉक होते...

📲"तुला कस माहीत एवढं असत ते मला तर हे काहीच माहिती नव्हते..."धरा विचार करत बोलते...

📲"अरे यार मी सुद्धा सावंत पटेल आहे...😍म्हणून माहीत आहे मला माझ्या घरात हे सर्व रसम केल्या जातात...हा महाराष्ट्रीयन पण असतात...😄"भावना हसून जयकडे पाहत बोलते...

📲"ओके ओके या तुम्ही मी सांगते माझ्या सासुबाईला..."धरा आनंदी होऊन बोलते...

📲"चल बाय हा ठेवते फोन...😊''भावना हसुन बोलते आणि फोन कट करते...

"काय होत हे मला पण करावे लागेल का या रसम??"जय तिच्याजवळ येत तिला विचारतो...

"अरे मेरे पती खूप भारी असतात त्या रसम...चुडा हा माहेरकडून असतो ना...धराचे तर कोणीच नाही आहे म्हणून आपण घेऊन जाऊ अशी माझी ईच्छा आहे..."ती हसून त्याच्या गळ्यात हात घालत बोलते...

"ओके जाऊ पण चुडा कधी घ्यायचा??"जय तिला विचारतो...

"अरे तो तर आजच घ्यावा लागेल...😕कारण तो रात्रभर दुधात राहायला हवा...अशीच रसम आहे...आता काय करूया बर??"ती थोडीशी पॅनिक होत बोलते...

"ओके प्रिन्सेस आपण बुक करू नेटवर?मग येईल लगेच..."जय बोलतो...

"अहो अस नसत ते...🤦लाल चुडा जो नवरी साठी असतो त्यातील एक एक बांगडी चांगली सिलेक्ट करून घ्यावि लागते...कारण तो चुडा वर्षभर तिच्या हातात राहतो...हा जसा माझ्या हातात आहे तसा...कितीही पंजाबी मुली मॉडेल झाल्या तरीही चुडा त्या घालतात... हेच पंजाबी मुलींची खासियत आहे..."भावना जयला समजावत बोलते...

"मग आपण जायचे का आता 😒"जय भुवया उंचावत तिला विचारतो...तशी ती मानेन हो बोलते...

"ओके आधी पंजाबची flight बुकिंग करू आणि मग निघू...तोपर्यंत तू तयार हो जा...मी वसुल करणार आहे तुझ्याकडून आज रात्री सगळं..."जय तिच्या कपाळावर किस करत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती लाजून तिथून पळून जाते...ती गेल्यावर जय चैतन्यला कॉल लावतो...काही वेळात तो कॉल चैतन्य उचलतो...

📲"हॅलो चैतन्य पंजाबचे दोन तिकीट्स बूक कर..."जय...

📲"मी तुला बोलणारच होतो पण बर झाले तू तिथे जात आहेस ते..."चैतन्य...

📲"म्हणजे काय झालं??"मृत्युंजय...

📲"तेज सरना बिझनेसमन आहे त्याला एका प्रोजेक्टवर तुझी सिग्नेचर हवी आहे...म्हणून मी तुला त्यासाठीच कॉल करणार होतो..."चैतन्य...

"भावना जे नाव बोलली तो हाच आहे तर...ओके माझं ही काम होईल आणि भावनाचे ही होईल..."मृत्युंजय मनातच स्वतःशी बोलतो...

📲"ओके कर बुक उद्या सकाळची हा आणि आठवड्या भराचे...मी जरी ऑफिसला नसलो तरीही ऑफिसवर माझे लक्ष आहे..."जय वेगळ्याच टोनमध्ये चैतन्यला बोलतो...

📲"हो कळले मला चल ठेवतो मी..."चैतन्य अस बोलून फोन कट करतो...

"प्रिन्सेस तू खुप सहन केल पण आता मी अजिबात तुला त्रास होईल अस वागणार नाही...तुझ्यासाठी हे दिवस स्पेशल बनवणार आहे..."जय मनाशी काहीतरी ठरवून बोलतो...तो तसाच रूममध्ये तयार होयला निघून जातो...

काहीवेळात दोघे तयार होऊन पावसाच्या वातावरणातच शॉपिंगला जातात...मॉलजवळ आल्यावर भावना खाली उतरते...जय पण तिच्यासोबत उतरतो...दोघेजण आधी चुडा घ्यायला जातात...भावना चुड्यातिल एक एक design आणि बांगडी चेक करून घेत असते...खुप वेळा नंतर तिला मनासारखा चुडा भेटतो...ती मस्त असे मोठे कलिरे पण खरेदी करते...ते सुद्धा चांगले बघून...😄वजनाने जड असतात पण त्यातच मज्जा असते म्हणून ती मोठे असे वाजणारे घेते...


                                 कलिरे

तो तिला खरेदी करताना पाहून तिची पण वेगवेगळी खरेदी करून घेतो...तो काहीतरी मनाशी ठरवून तिच्यासाठीचे मॉडेल टाईप आणि साडी वगैरे घेऊन टाकतो...तिची धरासाठीची शॉपिंग होते...तशी ती मृत्युंजयला शोधते... तसा तो तिला एका ठिकाणी उभा असलेला दिसतो...

"कुठे होतात तुम्ही??"ती विचारते...

"कुठेच नाही प्रिन्सेस चल झालं ना तुझं??"तो...

"अंम झालं...चला जाऊ..."ती हसून त्याला बोलते...तिचे बोलणे ऐकून तो तिच्या हातातील बॅग घेतो आणि तिला तिथुन घेऊन जातो...दोघेही बाहेरच रेस्टॉरंट वर खाऊन घरी परतात...भावना घरी आल्या आल्या चुडा काढते आणि एका ताटात दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून त्यात तो चुडा हळुवार ठेवते...ती तशीच सगळं आवरुन जयकडे जाते...जय तीचीच वाट पाहत थांबलेला असतो...ती हळूच त्याच्या बाजूला जाऊन त्याच्या कुशीत शिरते...तो एका हाताने तिला जवळ घेतो आणि प्रेमाने तिच्या केसांवर हात फिरवतो...

"आपण कुठे जाणार आहोत पंजाब नंतर??"ती...

"तुला पोहचली का खबर...??मला माहीतीच होत म्हणून तर मी ठिकाण नाही सांगितले...😄माझ्या बायकोला मी कुठेही नेल तरीही मला कोणी विचारणार नाही..."तो हसून तिला कुरवाळत बोलतो...

"ऐसे करते हो आप...😏मुझे नहीं करनि बात आपसे..."ती फुगून त्याच्यापासून दूर होत बोलते...ती तशीच अंगावर पांघरून घेऊन नजर दुसरीकडे फिरवुन झोपी जाते...तिला अस पाहून तो हसतो...तो तसाच बेडवर झोपतो आणि मागुनच तिला मिठीत घेतो...तशी ती आणखीन दूर होण्याचा प्रयत्न करते...तो हळूच तिला घट्ट धरतो आणि तिचे केस समोर टाकून तिच्या उगड्या पाठीवर स्वतःचे ओठ टेकवतो...त्याच्या अश्या करण्याने ती शहारते...तो हळूहळू स्वतःचे ओठ तिच्या मानेवर नेतो आणि क्षणाचाही विलंब न करता तिच्या मानेवर स्वतःचे दात लावतो...

"अहो 😣जा बाबा तुम्ही असच करतात...मला खायचं नाही हा...मी व्हेज आहे..."ती सरळ होत त्याला बोलते...तिचे बोलणे ऐकून तो हसतो...

"तस आज मी नॉनव्हेज खाल्लं पण..."तो खट्याळपणे बोलत असतो की ती त्याच्या तोंडावर हात ठेवते...

"किती खोटं बोलशाल तुम्ही...मला माहित आहे ना माझ्या जयने कधीच नॉनव्हेज सोडलं ते..."ती हसून त्याला बोलते आणि स्वतःचा हात काढून ती त्याच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवते...दोघेही एकमेकांच्या स्पर्शात हरवून जातात...खूप वेळाने दोघेही एकमेकांच्या कुशीत झोपून जातात...

*******************************

📲"हा उस लडकी को कुछ भि कर के उठा लो..."एक व्यक्ती रागातच फोनवर कोणाला तरी बोलतो...

📲"लेकिन सर security बहुत टाईट हैं...उसे ऐसेही नहीं हात लगा सकते"दुसरा व्यक्ती...

📲"मैने जो कहा वो करो...😡मेरा प्लॅन अगर सक्सेस नहीं हुवा तो मैं किसीं को नहीं छोडूनगा..."पहिला माणूस...

📲"लेकिन सर आप जो सोच रहे वो नहीं हो सकता..."दुसरा...

📲"मुझे उससे उसका बच्चा चाहीए मैं उसमें पॉवर डालुंगा...जो शक्ती और ब्रेन उसमें हैं वो किसीं और में नहीं हैं...मुझे सिर्फ मेरा इन्व्हेशन चाहीए उसके बाद उस लडकी को मार डालुंगा..."तो विचित्रपणे हसत बोलतो आणि फोन कट करतो...

"ये आदमी पागल हैं...अगर इसका इन्व्हेशन सफल हुवा तो यहा से धरती की बरबादी शुरु हो गी...अल्हा सलामत रखना उस लडकी को...आज पहेली बार मैं माफिया होकर आपके पास दुवा कर रहा हुं..."तो गुडग्यावर बसत हात समोर करत बोलतो...तसाच तो डोळे बंद करून नमाज पठण करायला लागतो...

दुसऱ्या दिवशी भावनांजय पंजाबच्या flight साठी सकाळीच पहाटे एअरपोर्ट वर निघून जातात...तिथून ते पंजाबच्या flight मध्ये बसतात...काही क्षणात त्यांचं विमान हवेत झेप घेत...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
       ©®भावना सावंत(भूवि❤️)

Rate & Review

sanjana kadam

sanjana kadam 3 months ago

Jak

Jak 4 months ago

टिना

टिना 4 months ago

I M

I M 4 months ago

Adesh Misal

Adesh Misal 4 months ago