तू अशीच जवळ रहावी... - 21 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - 21

तू अशीच जवळ रहावी... - 21

मृत्युंजय आणि भावनाचे प्रेम दिवसेंदिवस वाढतच जात होते...भावनाचा हात बरा होईपर्यंत मृत्युंजयने तिला ऑफिस जॉईन करायला मनाई केली होती...म्हणून ती पण जास्त त्याला विचारायला जायची नाही...बु आणि लँन्सी घरात असल्याने तिचा वेळ पण जायचा...

आज ती लँन्सी ला चेक करत होती...लँन्सी मशीन असल्याने वेळोवेळी भावनाला तिचे पार्ट्स चेक करावे लागायचे...कारण तिचं काही खराब होऊ नये म्हणून...आज जय नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला होता...भावना लँन्सी ला चेक करत असते आणि बु एका टेबलवर राहून तिच्यासोबत बोलत असतो...छोटुसा होता तो पण आवाज मात्र त्याचा बरा होता...

"बु शांत रहा की...??किती बडबडतो तू??मला डिस्टर्ब करत आहे तू..."भावना लँन्सीच्या अंगातील चिप काढत बोलते...

"हुं...मी जास्त बोलतो??तू बोलते तेव्हा काही नाही आणि मला बोलते आता..."तो...

"बु तू ना...😣जाऊ दे मला बोलायचंच नाही...या लँन्सीच पाहते मी..."ती अस म्हणून तिची चिप काढून बेडजवळ नेते...ती हातात चिप घेते आणि एक कापड काढून ती पुसून साफ करायला लागते...बु भावना बोलल्यामुळे गप्प बसतो...तो फक्त टेबलावर राहून तिला पाहत असतो... भावना चिप साफ करून पुन्हा लँन्सीमध्ये घालते...ती सगळं वरून ते खाली पर्यंत तिला चेक करते आणि नंतर तिला पुन्हा ऑन करते...तसे लॅन्सीचे हात चालू होतात...

"फिचर अपडेटेड..."लँन्सी बोलते...तीच बोलणं ऐकून ती खुश होते...

"मला पण बघ की जरा...किती छोटा आहे मी...??मला थोडस मोठं कर ना??"बु बोलतो...

"अरे बु तुला मी छोटं ठेवलं याला काहितरी कारण असेल ना???म्हणून तू छोटच रहाणार..."भावना बु च्या समोर हात करत बोलते...तीच बोलणं ऐकून तो गप्प रहातो आणि तिच्या हातावर उडी मारतो...तशी ती पटकन त्याला हातात घेते...

"मी ऑफिस जॉईन करणार आहे उद्यापासून...तू पण येणार आहे माझ्यासोबत..."भावना...

"ओह ऑफिस...ओके मी नेहमीच तुझ्यासोबत रहाणार आहे..."बु बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती खुदकन हसते...तिचे ते इन्व्हेंशन होत पण ती त्याला स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळायची...लँन्सी ही रोबो असली तरीही ती भावनाची काळजी तिच्या मोठया बहिणीसारखी घ्यायची...म्हणून जयला आता तेवढी भावना ची काळजी करायचे टेन्शन नव्हतं...कारण लँन्सी भावना कडे असताना कोणाचीही हिंमत होणार नाही तिला टच करायची...हे तिघे मस्त आपापसात बोलत असताना भावनाला चक्कर आल्यासारखे होत असते...तिचे डोळे आपोआप झाकले जात होते...ती खाली पडणार अस दिसताच लँन्सी तिला धरते...

"You ओके भावना...??"लँन्सी तिला धरून विचारते...तिने धरल्याने ती पटकन सावरते...

"लँन्सी आय डोन्ट नो पण मला...कसतरी होत आहे...प्लीज डॉक्टरला...कॉल..."भावना स्वतः ला सावरत बोलते...

"वन मिनिट...मी चेक करते नंबर..."लँन्सी अस बोलून भावनाचा मोबाईल हातात घेऊन नंबर चेक करते...ती कॉल करे पर्यंत भावना स्वतःला सावरून बेडवर जाऊन पडते...ती बु ला बेडवर ठेवते आणि गप्प डोळे बंद करून राहते...लँन्सी नंबर चेक करून डॉक्टरला कॉल करते...त्यांच्यासोबत बोलून कॉल कट करते...बु भावना कडे पाहतो आणि हळूच जाऊन तिच्या हाताला हळूहळू चेक करतो...तो एवढूसा होता म्हणून त्याला तिला पाहायला वेळ लागतो...

"ओय भावना म्हणून सांगितले होते मला मोठं कर...किती वेळ लागतो यार तुझ्या हाता पर्यंत पोहचायला...पण असो सध्या..."बु त्याच्या आवाजात बोलतो...

"बु सध्या मला खरंच कंटाळा आला आहे...त्यामुळे गप्प पडू दे.."भावना अस बोलून अंगावर पांघरूण घेते...

"You आर प्रेग्नेंट मिसेस मृत्युंजय..."बु तिला झोपलेल पाहून बोलतो...त्याच बोलणं ऐकून ती पटकन तोंडावरची पांघरूण काढते आणि उठून बसते...

"व्हॉट???"लँन्सी आणि भावना जोरात शॉकमध्ये ओरडतात...

"एवढ्या मोठयाने दोघी ओरडू नका...मी खरं तेच सांगत आहे..."बु...

"व्हॉट??मी प्रेग्नंट??कशी असू शकते??"भावना इनोसेंट फेस करून विचारते...तीच बोलणं ऐकून दोघे तिच्याकडे पाहतात...

"तू एक नंबरची मूर्ख मुलगी आहे...त्या जिजुनी काय पाहून तुझ्यासोबत लग्न केलं ना काय माहीत...मला तर खूप दया येते त्यांची..."बु तिला पाहून बोलतो...

"हा ना मी पण तोच विचार करते..."लँन्सी बोलते...

"तुम्ही दोघ गप्प रहा की...मला कसले मूर्ख बोलत आहात तुम्ही???जय तर बोलले होते की मी प्रेग्नंट नाही होऊ शकत एका किसने..."ती विचार करून बोलत असते पण जेव्हा तिला काहीतरी आठवते तशी ती घाबरून गप्प राहते...तिच्या चेहऱ्यावर थोडस टेन्शन आणि भीती होती...ते लँन्सीच्या नजरेतून सुटले नाही...लँन्सी बु ला स्वतःच्या हातात घेते आणि त्याच बटन बंद करते तसा तो बंद होतो आणि तिच्या हातात पडतो...ती तशीच त्याला आपल्या मुठीत बंद करते आणि भावनाच्या बाजूला जाते...

"काय झालं भावना??कसलं टेन्शन आलं तुला??ही आनंदाची गोष्ट आहे ना??"लँन्सी...

"लँन्सी त्यांना मुलं नको आहेत...त्यात हे अस घडलं...म्हणून भीती वाटत आहे...खरतर ही आनंदाची गोष्ट असते एखाद्या बाईसाठी पण माझ्यासाठी चांगली आणि वाईट पण आहे..."भावना नाराज होऊन बोलते...

"तू डॉक्टरला कॅन्सल कर...बॉडीगार्ड त्यांचे चमचे आहेत...ते लगेच सांगतील त्यांना...मग ते पुन्हा प्रश्न विचारतील...माझ्या चुकीमुळे हे सगळं झाल झालं...मी खूपच वाईट वागली त्यांच्यासोबत..."भावना बोलते...आता तिचे डोळे डबडबले होते...

"भावना तुमच्या दोघांच्या मर्जीने झालं आहे हे...त्यात रडण्यासारखे काय आहे??जयला सांगून बघ...आधीच विचार करून स्वतःला आणि बाळाला त्रास देत बसणं योग्य नाही आहे..."लँन्सी तिला जवळ घेऊन बोलते...तीच बोलणं ऐकून भावना तिला बाजूला करून स्वतःचे डोळे पुसते...

"मी सध्यातरी सांगणार नाही...मला वेळ हवा आहे..."भावना विचार करून बोलते...

"वेळ घे पण जास्त नाही..."लँन्सी अस बोलून बु ला चालू करते आणि तिथून घेऊन जाते...ते दोघे गेल्यावर भावना विचारात हरवून जाते...

"जेव्हा मला प्रेम नव्हतं तेव्हा जय माझ्यावर प्रेम करत होते आणि मला प्रेम झालं तेव्हा ते माझ्यापासून दूर दूर जात होते...आता दोघांना प्रेम झालं तेव्हा असलं काहीतरी होऊन बसले...नशिबच विचित्र आहे माझं...किती भारी वाटायचं ते माझ्या मागे मागे राहायचे,मला ओरडायचे... पोजेसिव्ह होत असायचे नेहमी...पण एक दिवस माझं अतीच झालं आणि त्यानंतर त्यांनी सगळं सोडून दिलं...ते दूर रहायला लागले माझ्यापासून...पण मला मात्र एक वेगळीच इच्छा मनात जागी झाली...त्यांना नेहमी डोळ्यासमोर पहायची..."भावना अशीच स्वतः सोबत बोलतच डोळे बंद करते आणि ती भूतकाळाच्या आठवणीत रमून जाते...

भूतकाळ:-

भावनाच वागणं जरा अतीच झालेलं होत...जयने सगळे प्रयत्न केले पण ती काही त्याला मानत नव्हती...तरीही त्याने एक छोटासा प्रयत्न करायचा म्हणून स्वतःसोबत ठरवले...तो एकदिवस ऑफिसला गेलाच नाही आणि भावनाला फोन देखील केला नाही...तिला थोडं अजीब वाटलं पण काहीतरी काम असेल म्हणून ती गप्प बसली होती...जयने आता तिला फोन करणं बंद केलं होतं...त्यात तो ऑफिस मध्ये असला तरीही तिच्यासोबत जास्त बोलायचा नाही एकदम बॉस अँड एम्प्लॉयी सारख बोलणं चालू असायचे...तिला तर कळतच नव्हतं तो का अस वागत आहे...पण स्वतःच्या मनाला समजावून ती गप्प राहायची...आता तो जास्त भावनाच्या कंपनीत यायचा पण नाही...म्हणून तिला आता थोडा राग यायचा त्याला...एकदिवस ती मनाशी काहितरी ठरवते आणि अचानकपणे त्याच्या घरी स्कुटी घेऊन जाते...बॉडी गार्डला ती ओळखीची असल्याने ते तिला काही न विचारता आतमध्ये जायला देतात...ती घरात येऊन पाहते तर घरात खूप मोठे लोक आले होते...त्यांना पाहून ती थोडीशी घाबरते...

"भावना तू ??कधी आली इथे??"जयची आई तिला पाहून बोलते...त्यांचा आवाज ऐकून ती त्यांना पाहते...

"ते...सॉरी...आंटी...मला बॉस कडून फाईल हवी होती...नाही काहितरी त्यांना विचारायचे होते..."ती थोडीशी घाबरून त्यांना बोलते...

"अग काम काय नंतर होतच राहतील...तू ये इकडे...माझी नवीन सून पहा ना...कशी दिसते ती??तुला आवडली ना??"जयची आई बोलते...त्यांचं बोलणं ऐकून तर ती हादरते...सून हा शब्द ऐकून तिला थोडस दुःख होत...पण तरीही स्वतःला सावरून चेहऱ्यावर खोट हसू ठेवून ती आतमध्ये जाते...त्या तिला आतमध्ये आणतात आणि जयच्या बाजूला बसवतात...जय थोडस अंतर ठेवून बसतो...

"नशिबाचा खेळ आहे भावना...काय करणार ना तू तरी??नसेल आपल्या नशिबात जय...सध्या त्याच्या कडे पाहून तर मला वाटतं नाही तो प्रेम करतो ते...एक महिना झाला असेल कॉल वगैरे करून...आधीसारखं काहीच वागणं नाही आहे त्यांचं...बरोबर ना कस असेल तू तर अशी वेंधळट असते...ते स्मार्ट आहे...मग त्यांना तश्याच मुली हव्या असतात...आधी एखाद्या मुलीच्या मागे फिरायचा ती नाही मानली की आपल्या क्लासची मुलगी पाहून लग्न करायचं हेच तर बिझनेसमन च काम असत...पण तुला का दुःख होत आहे बर??"भावना बसून स्वतःच्या मनात विचार करत बोलते...आसपास काय चालू आहे याकडे पूर्ण तीच लक्ष नव्हतं...ती आपल्यातच हरवलेली असते...

"भावना चहा घे की..."आरोही तिला आवाज देत बोलते...तिच्या आवाजाने ती भानावर येते...

"नको...मला नाही आवडत..."भावना भानावर येत बोलते...

"मी जाऊ का??"ती मृत्युंजयला विचारणार असते की तीच लक्ष स्वतःच्या हातावर जाते...तिचा एक हात त्याने घट्ट स्वतःच्या एका हातात धरला होता...तो सध्या त्याने दाबला...

"या माणसाला मनातलं पण कळत का??पण यांनी माझा हात कधी धरला??का धरला बर??स्वतःची बायको तर समोर आहे ना??आता का दाबत आहे हात माझा??यांचा हात पण विचित्र आहे??उगाच नको तिकडे असतो...काढू का हात हातातुन त्यांच्या...??चुकून धरला असेल...पण तो कसा काढू??"भावना त्याच्याकडे पाहून मनात बोलते...तो मात्र काही न झाल्याचं दाखवत समोरच्या लोकांसोबत बोलत असतो...ती स्वतःचा हात त्याच्या हातातुन सोडवण्यासाठी स्वतःचा एक पाय उचलते आणि हळुवार त्याच्या पायाकडे घेऊन जात त्याच्या पायावर फिरवत असते...तिच्या अश्या करण्याने तो आणखीन जोरात तिचा हात दाबतो आणि रागात तिच्याकडे पाहतो...त्याचा राग पाहून ती गप्प आपला पाय स्वतःकडे घेते आणि खाली मान घालून शांत रहाते...

"Excuse me मिस्टर तनेजा..."जय समोरच्या व्यक्तीला पाहून बोलतो...तनेजा नाव ऐकून भावना मान वर करते...

"आईशप्पथ पंजाबी लोक आहेत ही तर??हा हा काय भारी ना..."भावना समोरच्या लोकांना पाहून स्वतः सोबत बोलते...

"मिस भावना तुम्ही येता का रूममध्ये??"जय तिच्याकडे पाहून बोलतो...

"नाही येणार मी आता..."भावना त्याला पाहून बोलते...तसा तो तिच्याकडे रागात पाहतो...पण ती हसून त्याला पाहते...

"आप तनेजा हो??आप पंजाबी हो ना??"भावना खुश होत विचारते...मृत्युंजय तर अजीब नजरेने तिला पाहतो...

"येस...आपका नाम क्या हैं??"एक मुलगी तिला पाहून विचारते....

"मेरा नाम भावना सावंत-पटेल हैं..."ती त्या मुलीकडे पाहून बोलते...तीच नाव ऐकून मृत्युंजय पासून सगळे भावनाला शॉक होऊन पाहतात...

"आपके मिस्टर पंजाबी हैं क्या???"ती पंजाबी मुलगी तिला पाहून विचारते...जय देखील आता भावना काय उत्तर देते हे पाहत असतो...तिच्या बोलण्यावर भावना विचार करते आणि काहीतरी ठरवून ती बोलायला सुरुवात करते...

"येस...मेरे हजबंड पंजाबी हैं..."भावना एका हाताचे फिंगर क्रॉस करून बोलते...तीच बोलणं ऐकून जय रागातच तिला पाहतो...मृत्युंजयची आई आणि बहीण मात्र ओठ तोंडात दाबून हसत दोघांना पाहत असतात...जय स्वतःचा पाय तिच्या पायावर ठेवून तिला गप्प करत असतो...पण ती मात्र फुल्ल इग्नोर करून त्यांच्यासोबत असते...जय सगळया प्रकारे तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो...पण ती मात्र न थांबता स्वतःच्या नवऱ्याचे गुणगान गायला सुरवात करते...

"सॉरी मिस्टर तनेजा...मुझे इनसे बात करनि हैं..."जय मधेच अडवत बोलतो...

"जर तू आता रूममध्ये नाही आली तर याचे परिणाम पुढे तुला पाहायला मिळतील..."जय तिला ऐकू जाईल या आवाजात दातावर दात घासत रागात बोलतो...त्याच अस बोलणं ऐकून ती थोडीशी घाबरते...तो तिच्यासोबत बोलून तिथून निघून जातो...

"Excuse me..."भावना अस बोलून कसनुसपणे हसून तिथून उठते आणि जय गेला त्या जिन्यावरून वर जाते...

"मलाच नेहमी अस दाबात ठेवतात हुं...मी नाही राहत दाबात कोणाच्या..."भावना स्वतःशी बडबडत रूमकडे म्हणून जात असते...पण काही अंतरावर जाताच 5 ते 6 मोठया रुम्सचे दरवाजे तिला बंद दिसतात त्यात तिला जयची रूम कोणती असते ती माहितीच नसते...

"बडे लोग और उनके बडे घर...असे बांधतात की विचारूच नका...4 ते 5 च माणस राहतात तरीही मोठे मोठे बंगले बांधून मोठेपणा दाखवत असतात...मी विचारच करत होती या धरतीची झाड कमी कशी झाली...या लोकांनी कमी केली ती...एवढी मोठी घर बांधून...त्यापेक्षा छोटसं बांधल तर किती छान दिसत ना??त्यात माणसांची वर्दळ तरी असते...यात सगळे आपलं आपलं करतात..."भावना अस बोलून एका एका रूमकडे जात असते...तिला काही जयची रूम कळतं नाही...एक शेवटची रूम रहाते...तिथे पाय ठेवताच तिचे हार्ट बिट्स अचानक वाढू लागतात...पण ती त्याकडे दुर्लक्ष करून दरवाजा वाजवणार असते की,तेवढ्यातच तिला कोणीतरी आतमध्ये खेचते...त्याच्या अश्या करण्याने ती घाबरते...

"काय चालू होतं बाहेर तुझं??😡कोण पटेल आहे??"तो रागातच तिला भिंतिच्या दिशेला पुश करत विचारतो...ती बिचारी त्याच्या आवाजाने घाबरते...

"तू सांगते का आता??की मी शोधून काढू??"तो तिच्या बाजुला दोन्ही हात ठेवून तिला लॉक करत विचारतो...त्याच्या एवढ्या जवळ असल्याने तिला कसतरी होत...पण मनावर ताबा ठेवून ती मान वर करून त्याला पाहते...तर त्याचे डोळे अंगार ओकत होते असे तिला वाटले आणि चेहरा देखील रागाने लाल झाला होता...त्याला अस पाहून तिला धडकी भरते...

"तुम्ही लाल...टमाटर सारखे लाल का झालात??तुम्ही बायको असताना लग्न करू शकतात ना??मग मी पण करू शकते...कारण लग्नाचा काहीच पुरावा नाही आहे..."ती त्याच्याकडे पाहून थोडीशी हसून बोलते...तीच अस बोलणं ऐकून तो रागातच तिला पाहतो...

"मी विचारलं ते सांग??"तो...

"काय फालतूगिरी आहे यार तुमची...जावा तिकडे मला नाही सांगायचे कोणाला माझ्या नवर्याबद्दल...😏"ती हाताची घडी घालून बोलते आणि दुसरीकडे मान करते...तिचा हा attitude पाहून तो रागात तिच्या मानेत स्वतःचा चेहरा घालतो आणि तिच्या कानपाकळीवर स्वतःचे ओठ टेकवून हळूच तिथे चावतो...त्याच्या अश्या करण्याने ती घाबरते आणि चिडतेदेखील...

"जय...😡तुम्ही जर अस केलं ना मी पोलीस complaint करणार...एकतर बायको असताना दुसरं लग्न करत आहात तरीही मी काही बोलत नाही...पण तुम्ही असा माझा फायदा घेता ना ते मला अजिबात आवडत नाही..."ती रागात बोलतच असते की तो स्वतःचा हात तिच्या तोंडावर ठेवून तिला बंद करतो...

"मी केलं तर तुला राग येतो???आणि तू केलं त्याला काय बोलतात??मी च तुझी compliant करणार..."जय रागात बोलतो...

"उ...उ.."त्याने तोंडावर हात ठेवल्याने ती अस करते...तसा तो पटकन हात काढतो...ती रागातच त्याला तो बेसावध असताना बाजूला करून बेडवर जाऊन बसते...

"स्वतःला कोण समजतात हे काय माहिती...???यांनी दुसऱ्या मुलीसोबत फिरावे,तिला पार्टीत घेऊन नाचावे...नंतर तिच्यासोबत बरच काही करून तिला सोडून द्यावे हे बरोबर येत यांना....आम्ही मुलींनी साधं कोणत्या मुलासोबत बोललं की यांना राग येतो...😡यांच्या फिलिंग फिलिंग आणि आमच्या काय आहे मग??सतत ऐकून घ्यायचं यांचं..."ती रागातच बेडवर बसून बोलत असते आणि काहीवेळा पूर्वी रागात असलेला तो तीच बोलणं ऐकून शांत होतो...

"माझं लग्न नाही झालं आहे...ना तुमच्यासोबत...ना इतर कोणासोबतही...जर सावंत-भोसले नाव असू शकत??तस सावंत-पटेल पण नाव असू शकत??याचा विचार नाही आला का मनात???नेहमी नवऱ्याचं आडनाव पाहतात..."ती डोळ्यातून पाणी काढून बोलत असते...तीच बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक हसू येत...कारण खूपच क्युट दिसत होती ती...

"ओके कळलं मला तुझं लग्न नाही झालं आहे...मग रडते का तू??तुला आनंद व्हायला हवा ना मी लग्न करतो हे पाहून??तुझ्या मागे मागे पुन्हा फिरणार नाही..."तो हसून तिला बोलतो...त्याच बोलणं ऐकून ती रागात त्याला पाहते...ती रागातच त्याच्या खिश्यातून मोबाईल काढते आणि कोणाला तरी कॉल करते...

"हॅलो मामी...तू सकाळी सांगत होती ना??त्याला मुलाबद्दल??तर त्याला होकार कळव माझा आणि हो कॉफी शॉपमध्ये पण पाठवा...😤एकदाच लग्नच करते...सगळ्यांच्या मनाला शांती तरी मिळेल..."ती रागात फोनवर बोलते आणि पुढच काही ऐकायच्या आधीच ती कॉल कट करते...

"झालं समाधान???आता तुम्ही सुखी आणि मी सुखी...सतत टोमणे असतात मला..."ती रागात अस बोलून त्याच्या रूममधून बाहेर पडून जाते...

"ही अशी विचित्र का आहे??ऐकून घ्यायच्या आधी मला बोलून निघून पण गेली...आता कोणता मुलगा आहे हिला पाहणारा??कॉफी शॉपमध्ये...?आज उगाचच हिला उकसवल...भोगा आता फळ...या माझ्या रागात ती त्याला होकार देऊन आली तर...??"जय असा विचार करून पटकन धावतच खाली येतो...

"आई भावना कुठे गेली??"मृत्युंजय...

"सुनबाई गेल्या की...या नवीन सुनबाईच काय करायचं आहे??"मृत्युंजयची आई थोडीशी हसून विचारते...

"आई तुमच्या मुलांना विचारा आणि फिक्स करा...इथं माझी बायको मला भाव देत नाही आणि तू एक आहेस की,जाऊ दे मी येतो पाहून...तुम्ही ठरवा तुमचं..."जय अस बोलून तिथून निघून जातो...तो गेल्यावर सगळे त्याला हसतात...

"तुमची सून आणि मुलगा खुप गोड आहेत...आम्हाला आवडेल या घरात सून द्यायला..."मिसेस तनेजा...

"सॉरी मिसेस तनेजा आमचा मुलगा ठरवेल आणि त्याची आई शालिनी त्यामुळे ते दोघे आले की या पुन्हा..."जयची आई...

"ओके मॅडम...😊"मिस्टर तनेजा अस बोलून त्यांचा हसून निरोप घेतात...इकडे रागात भावना स्कुटी घेऊन कॉफी शॉप ला येते...ती एक चेअर पाहून तिथे जाऊन बसते...ती तशीच मोबाईल मध्ये ढवळत असते...पाच मिनिटांनंतर तिथं एक मुलगा येतो आणि तो जाऊन तिच्या बाजूला बसतो...त्याला स्वतःच्या जवळ पाहून तिच्या डोक्यावर आठ्या पडतात...

"Excuse मी...तुम्ही समोर जाऊन बसा प्लीज..."ती त्याला पाहून बोलते...तीच अस बोलणं ऐकून तो समोरच्या चेअरवर बसतो...

''तुमचं नाव भावना ना??नाईस नेम..."तो तिला पाहून हसून बोलतो...

"आता माझं नाव भावना नसलं असत तर तुम्ही इथे बसला असता का?काय विचित्र लोक आहेत...मलाच भेटतात..."ती त्याच्याकडे पाहून त्याला बोलते...तीच अस बोलणं ऐकुन तो तिला पाहतो...

"माझं नाव ज्ञानेश्वर..."तो हसून तिला बोलतो...

"ओके ग्यानेश्वर..."भावना...

"ग्यानेश्वर नाही ज्ञानेश्वर..."तो तिला समजावत बोलतो...

"तेच ते एकच आहे...पुढच बोला काय काम आहे ते??पाहायला का आलेलात??मी काय एलियन आहे का??जे पाहायला येतात??"ती त्याच उत्तर न ऐकता स्वतःच बोलायला लागते...तीच बोलणं ऐकून तो विचित्र नजरेने तिला पाहतो...

"नाही अहो...ते रीत असते ना म्हणून आलो...तुम्ही खूप मस्त आणि अतरंगी आहात..."तो हसून तिला बोलतो...

"मी तुम्हाला सांगू का??तुमचं नाव ऐकून मला वाटलं मी कोणत्या तरी साधू माणसाला भेटायला आली अस...पण इट्स ओके ना..."भावना हसून त्याला बोलते...

"मग आता फिक्स करणार काय लग्न???मी आवडलो काय तुम्हाला??"तो तिच्याकडे पाहून बोलतो...भावना काही बोलणार त्या आधीच जय येऊन तिच्या बाजूला बसतो...ती काही बोलणार त्या आधीच तो तिच्या गळ्यात हात घालून तिला जवळ घेतो आणि तिच्या मऊ मऊ गालावर स्वतःचे ओठ टेकवतो...ज्ञानेश्वर शॉक होऊन तिला पाहतो...ती रागात त्याला पाहते...

"बायको आय मिस you शोना...मेरे शोना ने कॉफी पी??"जय हसून प्रेमाने तिच्याकडे पाहून तिला विचारतो...जयच बोलण ऐकून तिच्या डोक्यावर आठ्या पडतात...

"हे कोण आहेत तुमचे??"ज्ञानेश्वर जयला पाहून विचारतो...

"कोण आहे शोना मी तुझा...??"तो तिच्या हाताच्या नाजुक बोटांमध्ये स्वतःचे बोट अडकवत बोलतो...

"जय तुम्ही काय विचित्र पणा करत आहात??मी लग्न करणार आहे ना...😡त्यामुळे उठा इथून आणि जावा..."ती चिडून बोलते...

"आले आले माझ्या मणीमाऊला राग आला...मी लेट झालो म्हणून...ओके मला येतो...माझ्या मनीचा राग काढायला..."जय अस म्हणून तिला उठवतो आणि तसाच तिला स्वतःच्या खांद्यावर उचलून घेतो...ती तर त्याच्या अश्या करण्याने घाबरते...

"जय सोडा मला खाली..."ती...

"नाही..."तो अस बोलून तिला घेऊन जातो...ज्ञानेश्वर ला काय समजायचं ते समजते...

"बर झालं ही आफत माझ्या आयुष्यात नाही आली....थोडीशी विचित्रच आहे...जाऊ दे आता दुसरी कोणी तरी पाहूया..."ज्ञानेश्वर अस बोलून तिथून निघून जातो...

जय तिला उचलून आणून गाडीत टाकतो...पण आता तो तिला रागात पाहतो...ती देखील तेवढ्याच रागात त्याला पाहते...

"ही कोणती पध्दत आहे वागायची...😡मला जाऊ द्या इथून..."ती रागात त्याला पाहून बोलते...जय तिला उत्तर न देता गाडीत बसतो आणि गाडीत समोर असलेली चिकटपट्टी हातात घेतो आणि पूर्णपणे ती थोडीशी कापून तिच्या तोंडाला लावतो...तिचे हात देखील तो रुमालने बांधतो...तशी ती गप्प होते...

"खूप ऐकुन घेतले तुझे...आजपासून तू सरदेशमुखांच्या घरात राहायचे..."जय रागात तिचा सीटबेल्ट लावून बोलतो...त्याच बोलणं ऐकून ती नाही मध्ये मान हलवते...तसा तो स्वतःला शांत करतो...

"मी आजवर तुझ्यावर जबरदस्ती,बळजबरी नाही केली आहे...कारण मला तू मनापासून आवडते...आजवर सगळे काही मला कमावून मिळालं आहे...पण तू मला मिळत नाही...तू खूप काँफुज्ड आहेस...तुझ्या डोळ्यांत पाहून कधी कधीं वाटायचं मला तुझं माझ्यावर प्रेम आहे...पण कधी कधी अस वाटत की तू नाही करत प्रेम...इट्स ओके नको करू प्रेम...पण स्वतःच आयुष्य दुसऱ्याच्या हातात देताना त्या व्यक्तीची पारख कर आणि मग निर्णय घे...घाबरू नको मी कुठेच बाहेर सांगणार नाही आपलं लग्न झालं म्हणून...तुला मी नको आहे ना??तर ठीक आहे मनालीचा प्रोजेक्ट झाल्यावर मी निघून जाणार आहे...मग तुला माझा कधीच त्रास होणार नाही...सॉरी आतापर्यंत दिलेल्या त्रासाबद्दल..."जय थोडस विचार करून बोलतो...त्याच बोलणं ऐकून ती गप्प रहाते...

"मग काय मॅडम मी गेल्यावर तुम्ही तर खुश होणार ना??आनंद होणार तुम्हाला...असला खडूस माणूस चालला आहे याचा??"जय थोडस हसून तिच्या तोंडावरची पट्टी काढत बोलतो...

"जय तुम्हाला कस सांगू मला कळत नाही आहे...पण मी नक्की सांगते तुमच्याशिवाय मी कोणाचीही होणार नाही...फक्त वेळ द्या मला..."भावना मनातच त्याला पाहून बोलते...जय बोलतच तिला मोकळं करतो...तो तिला मोकळं करून तिथून गाडी काढतो आणि तिला घेऊन जातो...गाडीत एकदम शांतता असते...जय तसच तिला घरी सोडतो आणि तिथून निघून जातो...

वर्तमानकाळ:-

ती भूतकाळात हरवलेली असते...तेवढ्यात तिला तिच्या कपाळावर कोणाचा तरी स्पर्श जाणवतो...तशी ती डोळे थोडेसे किलकिले करून पाहते...

"गुड एव्हनिंग प्रिन्सेस..."जय तिच्या गालावर स्वतःचा गाल घासत बोलतो...तशी ती हसून त्याला पाहते...

"गुड एव्हनिंग जय..."ती हसून त्याला बोलते...

"एवढा चेहरा कसा उतरला आहे तुझा हा??"जय काळजीने तिला विचारतो...तिचा चेहरा थोडासा थकलेला वाटायचा म्हणून तो विचारतो...

"काहीच नाही...असच ते...उद्या ऑफिसला जायला हवं ना...?म्हणून थोडस टेन्शन आलं..."ती उठून बसत बोलते...

"ओह त्यात टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे...मी आहे ना तिथे..."जय...

"हुं....चला खाली जाऊन जेवण करू या आणि मग झोपुया..."भावना कसबस हसून त्याला बोलते...

"ओके...तू फ्रेश हो...मी खाली जातो..."जय अस तिला बोलून खाली जातो...तशी ती तो गेल्यावर आनंदाने स्वतःच्या पोटावर हात फिरवते...

"सॉरी मम्माला माफ कर...पण लवकरच सांगणार आहे मी..."ती पोटावर हात फिरवून बोलते...तशीच ती सगळं व्यवस्थित करून फ्रेश व्हायला जाते...फ्रेश वगैरे होऊन ती मस्त तयार होऊन खाली येते...ती खाली आल्यावर लँन्सी तिला जबरदस्ती खाऊ घालते...तीच मन नव्हतं पण तरीही बाळासाठी म्हणून तिला खाऊ घालते...जयला आज घरात थोडं अजीब वाटत होतं पण काही असेल त्यांचं अस समजून तो गप्प राहतो...जेवण जेऊन ती आणि तो रूममध्ये येतात...तो जाऊन बेडवर पडतो... तशी ती हसून त्याच्याजवळ जाते आणि त्याच्या कुशीत शिरून झोपून जाते...

"उद्या साठी बेस्ट ऑफ लक प्रिन्सेस...मी आहे ना तिथे...नको टेन्शन घेऊ..."जय तिला झोपलेल पाहून बोलतो...तो हसून तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि तिला घेऊन झोपी जातो...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
भावना सावंत(भूवि❤️)

Rate & Review

Swati Jagtap

Swati Jagtap 3 months ago

Jak

Jak 3 months ago

sanjana kadam

sanjana kadam 3 months ago

Arati

Arati 3 months ago

Priya Gavali

Priya Gavali 3 months ago