Diwana Dil Kho Gaya Part-10 in Marathi Love Stories by preeti sawant dalvi books and stories PDF | दिवाना दिल खो गया (भाग १०)

दिवाना दिल खो गया (भाग १०)

(साहीलने आधी डॉक्टरांना फोन करून सिलूचा पत्ता दिला आणि मग लगेच मुग्धाला फोन करून सद्यपरिस्थिती सांगितली. मुग्धाला हे कळताच कसलाही विचार न करता ती तडक सिलूच्या घरी पोहोचली.) आता पुढे.....

साहीलने अम्माला फोन करून सांगितले की, “आंटी, मी एका महत्वाच्या कामात अडकलो आहे आणि मला पोहोचायला उशीर होईल त्यामुळे सिलूची ऑफिस मधली सहकारी डॉक्टरांना घेऊन घरी पोहोचेल. तिचे नाव मुग्धा आहे.” असे म्हणून त्याने फोन ठेवला व मुग्धाला ही ह्याची कल्पना दिली. तसेच मुग्धाला डॉक्टरांचा नंबर देऊन कॉनटॅक्ट करायला सांगितला.

काहीवेळातच मुग्धा सिलूच्या घरी डॉक्टरांना घेऊन पोहोचली. मुग्धाने दारावरची बेल वाजविली. अम्माने दरवाजा उघडला.
तेव्हा मुग्धा पटकन बोलली, “अम्मा मी मुग्धा आणि हे डॉ. सहाणे”

अम्मा खूप घाबरलेली दिसत होती. तिने दोघांना अप्पा झोपलेल्या खोलीत नेले. डॉक्टरांनी अप्पांना तपासले आणि त्यांनी अम्मा आणि मुग्धाला बाहेर येण्याचा इशारा केला.
“मि. अय्यरांना सौम्य अटॅक येऊन गेला आहे. त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागेल. मी तुम्हाला हॉस्पिटलची चिठी लिहून देतो. लवकरात लवकर तुम्ही त्यांना तिथे अॅडमिट करा. काही मदत लागली तर मी आहेच.” असे म्हणून डॉक्टर निघून गेले.

अम्माने मुग्धाकडे बघितले. मुग्धाने अम्माला धीर दिला. तिने लगेच अॅम्ब्युलेन्सला कॉल केला आणि हॉस्पिटलमध्ये ही चौकशी केली. डॉ. सहाणे यांनी आधीच हॉस्पिटलमध्ये कळवून ठेवल्यामुळे हॉस्पिटलच्या स्टाफ ने सुद्धा मुग्धाला कॉपरेट केले. अम्मा आणि मुग्धा दोघेही आप्पांना घेऊन हॉस्पिटल मध्ये पोहचल्या. त्यांना तातडीने आयसीयू मध्ये अॅडमिट करण्यात आले. तोपर्यंत मुग्धाने बाकी फॉरमॅलिटीज पूर्ण केल्या. काहीवेळात डॉ. सहाणे सुद्धा तिथे पोहोचले. अम्मा आणि मुग्धा हॉस्पिटलच्या वेटिंग रूम मध्ये बसून डॉ. सहाणे बाहेर येऊन काय बोलतील याची वाट पाहत होते. अम्मा एकसारखी रडत होती. पण मुग्धाने अम्माचा हात घट्ट धरून ठेवला होता. तिला एकसारखी सिलूची आठवण येत होती. सिलू भारताबाहेर असल्यामुळे त्याच्या कंपनीने मेडिकल इमरजेनसी असल्यास त्याच्या फॅमिलीसाठी कंपनीचा नंबर देऊन ठेवला होता. तो नंबर सिलूने मुग्धाला ही देऊन ठेवला होता. पण आज खरंच तो नंबर उपयोगी पडला होता.

तेवढ्यात डॉ सहाणे आले. त्यांनी मुग्धाला सांगितले, “सध्या मि. अय्यर स्टेबल आहेत. पण त्यांना चोवीस तासांसाठी अन्डर ओबसेरवेशन ठेवावे लागेल. त्यांनंतर पुढचे निर्णय घेता येतील. सध्या ते औषधांच्या गुंगीत आहेत. सो तुम्हाला सध्यातरी त्यांना भेटता येणार नाही. त्यांच्यासाठी चोवीस तास एक नर्स ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सध्यातरी तुम्ही घरी जाऊ शकता. हवे तर ईवनिंगला तुम्ही परत या.” असे बोलू डॉक्टर निघून गेले. डॉक्टरांना विनवणी करून एकदा अम्माला अप्पांना लांबून बघण्याची परवानगी देण्यात आली.

अम्माने अप्पांना बघताच त्यांना रडू कोसळले. मुग्धाने त्यांना सावरले व ती अम्माला घरी घेऊन आली. तिने तिच्या घरी कळविले की, तिच्या मैत्रिणीच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्यामुळे तिला थोडे दिवस तिथेच थांबावे लागेल.
मुग्धाने अम्माला घरी आणले आणि मग फ्रेश होऊन त्यांना पाणी आणून दिले. अम्माने ते घेतले व ती फ्रेश होऊन देवघरात गेली. दिवाबत्ती करून तिने प्रार्थना केली. मुग्धाने अम्माला धीर दिला आणि तिला आराम करायला तिच्या खोलीत पाठवविले. मग तिने वरण भात बनवला आणि अम्मा नको म्हणत असताना सुद्धा तिला जबरदस्तीने दोन घास खायला लावले. तेवढ्यात मुग्धाला साहीलचा फोन आला की, दोन दिवस तरी तो इथून निघू शकणार नाही यासाठी त्याने दिलगिरी व्यक्त केली. त्याने आप्पाच्या तब्बेतीची चौकशी सुद्धा केली आणि लवकरात लवकर तिथे येण्याचा तो प्रयत्न करतोय असेही त्याने मुग्धाला सांगितले. मुग्धाने तू येईपर्यंत मी सर्व सांभाळून घेऊन असे साहीलला सांगितले.

आप्पांचे सगळे टेस्ट झाले होते. त्यांच्या हॉर्टमध्ये चार ब्लॉकेज होते. त्यासाठी ऑपरेशन ची सध्या गरज नव्हती. पण तरीही अजून दोन दिवस त्यांना हॉस्पिटल मध्ये राहावे लागणार होते. त्यांना नॉर्मल वॉर्ड मध्ये शिफ्ट करण्यात आले. त्यांना बघण्यासाठी चोवीस तास नर्स होती त्यामुळे तिथे रात्री राहण्याची गरज नव्हती. आप्पांना घरातूनच दोन दिवस जेवणाचा डबा दिला जात होता. दोन दिवसांनी आप्पांना डिस्चार्ज मिळाला.

इथे सिलूचे कॅनडामधले काम संपत आले होते. अजून एक दिवस तिथे राहावे लागणार होते. काम इतके जास्त होते की, त्याला फोन बघायला ही फुरसत नव्हती. त्याला अम्मा-अप्पा आणि मुग्धाची फार आठवण येत होती. पण अजून एक दिवस असे स्वत:च्या मनाची तो स्वत: समजूत घालत होता. हे प्रोजेक्ट त्याच्या कंपनीसाठी खूप महत्वाचे होते. त्यामुळे त्यासाठी १००% देणे हे त्याचे कर्तव्य होते.

साहील घरी न जाता डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये पोहचला. तेव्हा त्याला कळले की, आप्पांना आजच डिस्चार्ज मिळत आहे. मुग्धा त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या फॉरमॅलिटीज पूर्ण करण्यात बीजी होती. दुपारपर्यंत आप्पांना डिस्चार्ज मिळाला. अम्मा खूप खुश होती. साहीलशी बोलताना आज ती मुग्धाची तारीफ करताना थकत नव्हती. आज मुग्धा नसती तर काय झाले असते असंही विचार करून तिच्या डोळ्यात पाणी तरळले.

साहील सर्वांना घरी सोडून लगेच निघून गेला. त्याने अम्माला तो रात्री एक फेरी टाकेल असे देखील म्हणाला. अम्माने हट्टाने मुग्धा नाही म्हणत असताना सुद्धा तिला जेवायला थांबविले.

अम्माला मुग्धा खूप आवडली. तिला सिलूसाठी अशीच बायको अपेक्षित होती. पण मुग्धा मराठी मुलगी होती आणि सिलू तमिळ. तसेच अम्माला सून म्हणून घरात तमिळ मुलगीच हवी होती. त्यामुळे तिने मुग्धाबद्दल केलेला तो विचार मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला.

अम्माने आप्पांना जेवायला दिले. मुग्धाने अम्माला आप्पांच्या औषधांविषयी सर्व माहिती दिली. ती रोज संध्याकाळी घरी एक फेरी नक्की मारेल असे तिने अम्मा-आप्पांना सांगितले आणि त्यांचा निरोप घेतला. मुग्धा निघून गेल्यानंतर अम्माने मुग्धाविषयी तिच्या मनात आलेले विचार आप्पांना सांगितले. आप्पांना आधी थोडे हसू आले. पण त्यांच्या पण मनात मुग्धा सून म्हणून कायमची या घरात यावी असे वाटत होते. सिलू त्या दोघांच्या शब्दाबाहेर नव्हता.

सिलूचे काम संपले होते. फायनल डॉक्युमेंटेशन बाकी होते. ते त्याचे सहकारी करणार होते. आज खूप दिवसांनी सिलू रीलॅक्स झाला होता. त्याने त्याचा फोन हातात घेतला. इतक्या दिवसात त्याला भरपूर मेलस् आणि मेसेज आले होते. त्याने त्यावर ओझरती नजर टाकली. मुग्धाचा रोज एक मिस् यू आणि लव यू चा मेसेज होता. त्याला ते बघून फार बरं वाटलं.

तो त्याचे मेल्स वाचू लागला. तर त्यामध्ये खूप सारे मेल्स मेडीक्लेम संदर्भात होते. त्याने पटापट ते मेल्स ओपन केले आणि त्यावर असलेले आप्पांचे नाव वाचून तो शॉक झाला. त्याने त्वरित घरी फोन केला. अम्माने फोन उचलला. सिलूचा आवाज ऐकल्यावर अम्माला रडू कोसळले.

अम्माने सिलूला आतापर्यंत घडलेली सगळी हकीकत सांगितली आणि मुग्धाने त्यांना कसे सावरले आणि कशी मदत केली हे ही सर्व सांगितले. अम्मा तर मुग्धाची तारीफ करताना थकत नव्हती.

सिलूला एकावर एक शॉक मिळत होते. पण ते सुखद होते. पहिले तर अप्पा इतक्या मोठ्या संकटातून बचावले हेच त्याच्यासाठी महत्वाचे होते. पण तो अम्मा-अप्पा संकटात असताना त्यांच्या जवळ नव्हता ह्याचे त्याला खूप वाईट वाटले.

पण सिलूच्या मनात राहुन राहुन हा विचार येत होता की, मुग्धा तिथे कशी पोहोचली. त्याने मुग्धाला लगेच फोन केला. सिलूच फोन आलेला पाहून मुग्धा खूप खुश झाली. त्याचा आवाज ऐकताच तिला रडू कोसळले. सिलूने अम्माला फोन केल्याचे मुग्धाला सांगितले. मग तिने साहील महत्वाच्या कामात अडकल्यामुळे ती कशी सिलूच्या घरी पोहोचली. तसेच अप्पा ठीक होऊन घरी येईपर्यंत काय काय झाले ते सगळे तिने सिलूला सांगितले.

ध्यानीमनी नसताना अचानक मुग्धा सिलूच्या घरी काय गेली आणि तिने चक्क अम्मा आणि अप्पा दोघांच्याही मनात जागा केली ह्याचे त्याला खूप अप्रूप वाटले. त्याचे मन आता इथे लागत नव्हते कधी एकदा घरी जाऊन अम्मा – अप्पा आणि मुग्धाला भेटतोय असे झाले होते त्याला.

क्रमश:

सिलू आणि मुग्धाच्या प्रेमकथेत पुढे काय काय वळणे येतील हे जाणून घेण्यासाठी ही कथामालिका वाचत रहा. तसेच हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. हा भाग आवडल्यास त्याला लाइक, कमेन्ट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.)

@preetisawantdalvi

Rate & Review

uttam parit

uttam parit 2 years ago

Dheeren

Dheeren 2 years ago

mast.... plz jast kahi complications yayla nakot😄

Manali Sawant

Manali Sawant 2 years ago

Preeti Patil

Preeti Patil 2 years ago