Premacha chaha naslela cup aani ti - 59 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५९.
















सकाळी.....

डोअर बेल वाजते..... मावशी जाऊन दार उघडतात.... समोर शौर्य उभा असतो..... त्या त्याला आत बोलावून घेतात.... सगळे बाहेर हॉलमध्ये बसून असतात..... सुकन्या तिच्या रूम मध्ये रेडी होत असते.....

आजी : "अरे शौर्य बाळा.... ये.... लवकर आलास.... बस...."

शौर्य : "सुकन्या??"

आजी : "हो हो... तयार होत आहे ती...."

शौर्य बसतो.....

शौर्य : "बाकीचे कुठे गेलेत.....??"

आजी : "सल्लुचे लेक्चर्स होते..... सो, तो मॉर्निग वेळेस निघून गेला..... संजय ऑफीसच्या कामाने आणि जया किचनमध्ये आहे.... आणि हो मी इथे आहे तुझ्या समोर..."

शौर्य : "यू आर सो फनी, ग्रॅणी...."

आजी : "अरे चार दिवस जगतो आपण.... त्यातही मोजून मापून कशाला जगायचं.... बिनधास्त जगायचं.... कोणावर प्रेम करायचं असेल ते बिनधास्त करायचं.... तुला आवडतं का कोणी?"

आजी त्याच्या चेहऱ्यावर नजर रोखून बघते.....

शौर्य : "नाही.... असं कोणी नाही...."

त्याच्या चेहऱ्यावर कुठंही कन्फ्युजन नसतं.... आजीला यावरून समजतं की, तो सध्या कोणाच्याही प्रेमात नाही..... तेवढ्यात सुकन्या बाहेर येते......

सुकन्या : "निघायचं....?"

शौर्य : "तुझा ब्रेक फास्ट?"

आजी : "आधीच आटोपलं आमचं..... ती नंतर रेडी व्हायला निघून गेलेली....."

शौर्य : "ओके.... चला येतो मग आम्ही..... अँड ग्रॅणी.... मी प्रॉजेक्ट नंतर इंडिया सोडून जातोय... कायमचा.... सो त्यांनतर आपण ग्रँड सेलिब्रेशन करूया...."

हे ऐकून आजी आणि सुकन्या शॉक होतात......

आजी : "कायमचा म्हणजे?"

शौर्य : "हो..... आहे काही रीझन..... सो.... बट, येस.... भेटायला येत जाईल.... आय प्रॉमिस....."

आजी : "अरे बाळा पण असं अचानक...."

शौर्य : "हो....."

असं म्हणत तो बाहेर निघून जातो..... इकडे सुकन्या आणि आजी एकमेकींकडे गोंधळून बघतात..... आजी सुकन्याला जा असा इशारा करते..... ती त्याच्या मागेच बाहेर निघून जाते....

जया किचनमधून शौर्य साठी खायला घेऊन येते.....

जया : "आई अहो.... शौर्य कुठेय....?"

आजी : "अग तो तर गेला.... म्हणजे सोबतच सुकन्या पण गेली...."

जया : "हो का..... पण, तुम्ही का इतकं टेन्शन घेतलंय....."

आजी : "अग हा प्रॉजेक्ट नंतर इंडिया सोडून निघून जाणार म्हणाला...."

हातातली प्लेट ठेवत........

जया : "व्हॉट???"

आजी : "अग हो म्हणून मला धक्का बसला.... आणि बोलला की, काही रीझन मुळे निघून जायचं त्याला.... काय असेल ग....."

जया : "आता हे तर तोच सांगू शकतो..... पण, असं अचानक.... नाही म्हणजे काही तरी नक्कीच असेल ना.....!"

आजी : "मला ही तेच वाटतं....."

जया : "जाऊद्या सांगेलच तो...."

दोघीही गप्पा मारत बसतात..... तिकडे सुकन्या आणि शौर्य कार मध्ये जाऊन बसतात...... शौर्य कार स्टार्ट करतो......

सुकन्या खूप प्रयत्न करते..... नेमकं तो असा अचानक का निघून जातोय त्याला विचारावं..... पण, तिची हिंमतच होत नाही.... त्यांची कार आश्रम साठी रवाना होते....

पोहचून दोघेही आत जातात..... आजोबा त्यांना काही पेपर्स देतात.....

आजोबा : "हे घ्या बाळांनो.... यात ज्या ऑर्फनेजला तुम्ही भेट द्याल ना...... त्याची एकुण - एक इन्फॉर्मेशन लिहायची..... त्यांच्या प्रॉब्लेम्स सुद्धा लिहायच्या जेणेकरून, आपण यावर नंतर काम करू..... समजलं ना बाळांनो...."

दोघे : "हो....."

आजोबा : "शौर्य..... बेटा सुकन्या तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे..... काळजी घे तिची..... ओके....."

शौर्य शेक हॅण्ड करत....

शौर्य : "डोन्ट वरी अंकल..... मी पूर्ण काळजी घेईल तिची...."

तो असं बोलताच सुकन्या लाजते..... तो ही गालातच हसत बाहेर पडतो..... सुकन्या आजोबांना बाय करून त्याच्या मागे बाहेर पडते..... सुकन्या फाईल्स बॅक साईड ठेवते आणि स्वतः तिकडे बसणार तोच....

शौर्य : "पुढे बस ना...."

सुकन्या : "आं..... पुढे!"

शौर्य : "अग हो.... ये ना..... बोलायचं असलं की मागे फिरू का... आणि माझा ऍक्सिडेंट झाला म्हणजे...."

सुकन्या : "अरे काय हे.... असं बोलावं लागतं का...."

शौर्य : "अच्छा सॉरी..... ये लवकर आता......"

सुकन्या जाऊन शौर्यच्या शेजारी बसते.....

शौर्य : "सीट बेल्ट....."

स्टिअरिंग वर हात ठेवत तो तिला डोळ्यांनी इशारा करतो... ती लगेच सीट बेल्ट बांधून घेते..... शौर्य कार स्टार्ट करतो..... कार मध्ये साँग वाजत असतो......


ज़िन्दगी दो पल की
इंतज़ार कब तक
हम करेंगे भला
तुम्हें प्यार कब तक
ना करेंगे भला
ज़िन्दगी दो पल की
दिल में तुम्हारे
छुपा दी है
मैंने तो अपनी ये जां
अब तुम्हीं इसको संभालो
हमें अपना होश कहाँ
बेखुदी दो पल की,
ज़िन्दगी दो पल की
इंतज़ार कब तक
हम करेंगे भला
तुम्हें प्यार कब तक
ना करेंगे भला


गाणं संपतं आणि दोघांची नजरानजर होते.... सुकन्या लगेच मान फिरवून घेते...... शौर्य गालात हसत परत ड्रायव्हिंग वर कॉन्सन्ट्रेट करतो..... थोड्याच वेळात ते ऑर्फनेज येऊन पोहोचतात..... शौर्य कार पार्क करतो आणि दोघेही आत शिरतात....

आश्रमच्या एडमिनिस्ट्रेशन टीम सोबत बोलून सगळी इन्फॉर्मेशन त्यांना घ्यायची असते..... समोरच एडमिनिस्ट्रेशन ब्लॉक असतो ते तिथे जातात....

शौर्य : "मे आय कम इन सर......"

इंगळे : "कम इन....."

एका फाईल मध्ये डोकं खुपसून वर न बघताच ते बोलतात.... सुकन्या आणि शौर्य आत शिरतात....

इंगळे : "बोला...."

ते अजूनही फाईल मध्येच डोकं खुपसून बोलत असतात....

सुकन्या : "सर..... आम्ही वृध्द संगोपन आश्रमातून आलोय...... आम्हाला महत्वाची माहिती हवी आहे......"

आश्रमाच्या नावाने, त्यांचं खुपसलेलं डोकं वर काढत ते घाबरून जागेवर ऊभे होतात....

इंगळे : "नमस्कार मॅडम..... माफ करा.... मी ओळखलं नाही.... बसा ना..... या......"

सुकन्या आणि शौर्य एकमेकांकडे हसून बघतात.... कारण, आश्रमाचे नाव ऐकून तो जास्तच घाबरला असतो.....

इंगळे : "बोला मॅडम, आपल्याला आम्ही काय मदत करू शकतो......?"

सुकन्या : "आबांशी बोलणं झालं का आपलं?"

इंगळे : "हो मॅडम.... ते म्हणाले तुम्हाला जी माहिती लागली पुरवण्यात यावी..... सांगा कुठली माहिती हवी आहे?"

सुकन्या : "आम्हाला एज लिमिट क्रॉस करून पुढच्या वर्षी बाहेर पडणाऱ्या मुलांची माहिती हवी आहे......"

इंगळे : "मी तुम्हाला आमच्या सिस्टीमचा पासवर्ड देतो..... तुम्ही तुम्हाला हवी ती माहिती घ्या....."

सुकन्या : "पण, त्यात तुमची कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असली तर.....!"

इंगळे : "नाही मॅडम त्यात फक्त त्याच फाईल्स आहेत..... ज्यांची माहिती तुम्हाला हवी आहे.... आणि तसंही.... तुमच्यावर संशय घेऊन कसं चालेल.... तुम्ही बिनधास्त माहिती काढून घेऊ शकता....."

शौर्य आणि सुकन्या पटपट प्रिंट्स काढून घेतात आणि त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडतात....... आणि तिथल्या मुलांशी संवाद साधून त्यांचे प्रॉब्लेम्स नोट करून घेतात.... नंतर बाहेर निघतात.....

सुकन्या : "किती चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्याला सिस्टम ॲक्सेस करू दिलं ना....."

शौर्य : "हो ना..... मला वाटतं ना.... असंच पुढे सगळे को - ऑपरेट करत राहिले..... तर, आजच आपलं काम पूर्ण होईल.... कारण, आपल्याला फक्त पाच आश्रमांची माहिती घ्यायची आहे.... आपण प्रिंट्स काढून घेऊया एन्ट्री नंतर करू... कारण, एन्ट्री करत बसलो तर लेट होईल....."

सुकन्या : "बरोबर..... चल...."

दोघे लवकर - लवकर सगळे आश्रम आटोपते घेतात..... सगळीकडे त्यांचा एक्स्पेरीअन्स चांगला असतो..... त्यांना सर्व आजोबांच्या आश्रमातून आले असल्याने को - ऑपरेट करतात.... आणि सुकन्या नात असल्यामुळे त्यांना मान ही देतात..... शेवटच्या आश्रमातून माहिती घेऊन ते बाहेर पडतात......

दोघेही कमरेवर हात ठेवत.... मोठा श्वास घेतात आणि "सुटलो" असा एकमेकांना इशारा देत एकमेकांकडे गालात हसून बघतात..... थोडा वेळ कारला टेकून उभे राहून रिलॅक्स होतात.....

शौर्य वेळ बघतो.... तर, @०५:०० वाजले असतात..... तो खिशातून त्याचा मोबाईल फोन काढतो आणि सल्लूच्या नंबर वर कॉल करतो....

शौर्य : "हॅलो..... सलमान..... हा मी बोलतोय शौर्य....."

सलमान : "................... ................."

शौर्य : "हो अरे ते सुकन्या आणि मी.... आज दिवसभर प्रॉजेक्टवर काम करत होतो.... तर, आता मी काय म्हणतो.... तिला मी डिनर साठी घेऊन जाऊ का?"

सलमान : "............... .............."

शौर्य : "ओके....... घे बोल तिच्याशी....."

सुकन्या : "हॅलो..... हा दादू...... ओके...... ओके..... हो..... हो..... आय एम कंफर्टेबल विथ हिम........ या..... ओके..... बाय..... लव्ह यू दादू....."

सुकन्या शौर्य जवळ फोन देत......

सुकन्या : "तू हे सर्व कधी प्लॅन केलं.......?"

शौर्य : "काय?"

सुकन्या : "डिनर....?"

शौर्य : "हे बघ आपलं काम झालं आहे.... मग आता इथून पुढची प्रोसेस अंकल करणार... सो, आपण दोघांना परत कधी भेटता येईल सांगता येत नाही.... अँड मी इंडिया सोडून जाण्याआधी आपण सोबत डिनर तर करूच शकतो.... राईट......"

तो खिशातून कारची की काढतो आणि कारकडे वळणार की, सुकन्या मागून त्याला आवाज देते......

सुकन्या : "शौर्य...... तू काय लपवतो आहेस.....? तू का इंडिया सोडून बाहेर जातो आहेस?"

शौर्य जागीच थांबतो....... त्याच्या डोळ्यांत नकळत अश्रू दाटून येतात... कसा तरी तो डोळ्यांच्या काठा पुसत तिच्या बाजूने वळतो......

शौर्य : "हे कसले प्रश्न झाले अग...... माझी इच्छा नाहीये आता इंडिया मध्ये जास्त वेळ थांबायची....."

सुकन्या : "का....?"

सुकन्या काहीही झालं तरी आज सगळं ऐकायचं हे ठरवून त्याला एकावर - एक प्रश्न विचारत असते..... तो तिच्याकडे न बघताच खाली मान घालून बोलत असतो..... सुकन्या आजपर्यंत कोणाशी इतकी कधीच बोलली नसते आणि एखाद्या मुलाशी तर पहील्यांदाच!!!!..... पण, शौर्य बद्दल तिच्या मनात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली असल्याने ती आज सगळं माहित करायचं असं मनाशी ठरवते.....

शौर्य : "सुकन्या हे बघ मला नाही रहायचं बस.... चल आता...."

सुकन्या : "शौर्य..... हे बघ तू मला सगळं आज आणि आताच सांग.... नाही तर, मी आयुष्यात तुझं तोंड बघणार नाही....."

ती आता चांगलीच चिडते.... तिचा तो राग शौर्यला काळजीत टाकण्यासाठी पुरेसा असतो......

शौर्य : "हे बघ सुकन्या..... मी तुला सांगू शकणार नाही.... प्लीज चल तू...."

तो जायला निघणार तोच.....

सुकन्या : "कोणी आहे का तुझ्या लाईफ मध्ये....."

हे म्हणत असताना तिचं हृद्य जड होतं.... कधी न लागलेली ओढ तिला लागून असते...... तिच्या डोळ्यांच्या काठा भरून येतात..... तो काय बोलेल ह्याकडे ती आतुरतेने बघत असते....

शौर्य : "सुकन्या...... सॉरी बट, लव्ह इज नॉट माय कप ऑफ टी......."

हे बोलताक्षणीच ती आश्चर्याने त्याच्या चेहऱ्याकडे बघत बसते...... तिचे शब्द बोलणारा तो...... तिला आश्चर्याचा धक्काच बसतो...... हा असं कसं बोलू शकतो असं ही तिला वाटून जातं.......

सुकन्या : "शौर्य..... अरे..... हे काय बोलतो आहेस......"

शौर्य : "सगळं सांगतो..... बट, प्रॉमिस त्यानंतर तू माझ्याशी फ्रेंडशिप ठेवणार...... आय वोंट लूज यु......"

तो तिच्यापासून लांब जात थांबतो.....

शौर्य : "आपण हे सर्व इथे डिस्कस नाही करू शकत..... चल...... तुला सगळं सांगतो मी....."

सुकन्या काहीही न बोलता कार मध्ये जाऊन बसते......

शौर्य : "सिट बेल्ट......."

डोळ्यांनीच इशारा करून स्वतःचा सिट बेल्ट तो बांधून घेतो..... थोड्या वेळानंतर एका नाईट गार्डन समोर येऊन ते थांबतात.....

शौर्य : "उतर....."

सुकन्या : "आपण डिनर करणार होतो ना....?"

शौर्य : "तुला सगळं ऐकायचं ना.....?"

सुकन्या : "हो...... पण, इथे??"

शौर्य : "ह्याशिवाय तुला मी मघाशी तसं का बोललो हे कसं समजेल......"

सुकन्या गोंधळात असते..... शौर्यच्या प्रत्येक गोष्टीत तिला काही तरी गूढ भासतो..... ती बाहेर निघते.... शौर्य कार लॉक करून गार्डनच्या दिशेने जात असता सुकन्या विचारात गुंतलेली त्याला दिसते......

शौर्य : "सुकन्या.... चल....."

ती भानावर येते आणि त्याच्या मागे जाते...... शौर्य एका बाकावर जाऊन बसतो......

शौर्य : "कम...... बस इथे......"

सुकन्या अजुन ही गोंधळात असते......

सुकन्या : "शौर्य......????"

तिला असंख्य प्रश्न पडलेले असतात....... ज्या प्रश्नांना आज शौर्य उत्तरणार असतो......

शौर्य : "एस्लिन...... माय एव्हरी थींग...... जिच्यासाठी मिच तिचं ड्रीम होतो.... बट......"

तो पुढे काही बोलायच्या आधीच सुकन्याला मिठी मारत ढसाढसा रडतो.... सुकन्या गोंधळात पडते.....

सुकन्या : "हे.... शौर्य..... डोन्ट क्राय...... टेल मी.... व्हॉट हॅपंड.....?"

तो थोडा शांत होत सांगायला सुरुवात करतो.....

शौर्य : "एस्लीन अँड मी..... खूप चांगले फ्रेंड होतो..... ह्या गार्डन मध्ये नेहमीच यायचो...... आमची फ्रेंडशिप, लवशिपमध्ये कधी कन्व्हर्ट झाली समजलच नाही.... खूप प्रेम होतं माझं तिच्यावर..... बट.... काही दिवसांंनी तिच्या एक मेजर सर्जरी वेळी...... नाही वाचवू शकलो तिला मी.... आय टोटली ब्रोक..... खूप वर्ष तिच्या आठवणीत जिवंत होतो.... बट, नंतर वाटलं हे कुठे तरी थांबलं पाहिजे.... अँड आय डीसाईडेड यानंतर प्रेमातच पडायचं नाही..... लव्ह इज नॉट माय कप ऑफ टी..... बट, त्यादिवशी अचानक तुला धडलकलो अँड परत प्रेमात पडलो.... नकळत सर्व घडत होतं..... तुझ्याकडे खेचला जात होतो..... नंतर तुझ्यासाठी मी स्पोकन मराठी क्लासेस जॉईन केले...... सगळं काही नकळत घडलं.... बट, काहीच दिवसांआधी परत आठवलं...... आता जर मी प्रेम केलं आणि देव न करो ते मी गमावलं तर, जगू शकणार नव्हतो ग मी.... म्हणून, प्रेमाच्या दूर..... इंडिया सोडून जातोय...... सॉरी इफ यू हर्ट..."

तो सगळं बोलून जातो आणि डोळे मिटून रडू लागतो...... सुकन्या नकळत त्याला शांत करायला मिठीत घेते.....

सुकन्या : "शौर्य...... प्लीज तू शांत हो..... इतकं सगळं मनात ठेवलं होतं तू आज पर्यंत....."

शौर्य : "सांगून कोणाला त्रास नव्हता द्यायचा ना......"

सुकन्या : "मलाही नाही......"

शौर्य : "....."

सुकन्या : "शौर्य..... मला ही प्रेम वगैरे नको होतं लाइफ मध्ये...... कारण, मी लहान असताना आमच्या घरच्यांसोबत जे काही इन्सीडन्स घडलेत.... त्यावरून ठरवलं होतं की, जर इतके त्रास प्रेमात सहन करावे लागत असतील.... तर, लव्ह इज नॉट माय कप ऑफ टी.... पण, तुझं तर वेगळ्या रीजन मुळे हे सेम ओपिनियन बनलं आहे.... मी तर कधीच प्रेम ही करून बघितलं नाही...."

शौर्य : "असे कुठले इन्सीडन्स? की, तू प्रेमातच पडली नाहीस.....?"

सुकन्या : "मला निंनी सांगत होती..... आजोबांचे मिञ पिटर अंकलच्या मुलीवर म्हणजेच जॉली वर सचिन चाचुंच खूप जीवापाड प्रेम होतं..... पण, जॉली चाची तिचं मॅक वर प्रेम होतं आणि त्याच्या जाण्याने ती पुर्ण आतून डिस्टर्ब झालेली..... पण, सचिन चाचूने तिच्यावर विश्वास ठेवत तिचं मन जिंकलं होतं.... त्यानंतर सचिन चाचुंच्या एका केस मध्ये नंदिनी मासी भेटली तिच्यावर तिच्याच बॉय फ्रेंडने आणि त्याच्या फ्रेण्ड्सने मिळून गँग रेप केला.... त्या केस मुळे सचिन चाचु खूप इमोशनली ब्रोक झाला होता...... त्यानंतर त्यांनी तिला बहीण मानलं..... नंतर वैभव चाचू नंदू मासीच्या लाईफ मध्ये आले अँड आता ते सोबत आहेत.... त्यानंतर कली मासीला वाचवताना जॉली मासीला जीव गमवावा लागला होता.... तेव्हा सचिन चाचू परत डिप्रेस्ड झालेला..... बट, मग कली मासी जीचं सुद्धा सच्चू चाचू वर खूप प्रेम होतं..... तिने त्याला सगळ्या डिस्टर्बिंग कंडीशन मधून बाहेर येण्यास मदत केली होती..... सो, नंतर त्याला ती आवडायला लागली अँड आता ते सोबत आहेत..... नंतर उर्वि वहिनीच्या घरी इतका मोठा मॅटर झालेला..... तेव्हा सल्लू दादू सुद्धा खूप डिप्रेस्ड झाला होता..... त्याची कंडीशन मला कली मासीने जेव्हा एक्स्प्लेन केली मीच रडून दिलं होतं..... मग मला सांग ना शौर्य, जर प्रेमात इतक्या परीक्षा द्याव्या लागत असतील......! तर का मी प्रेमात पडावं.....??? नको मला असं प्रेम जिथं कधी ना कधी, काही तरी गमवावंच लागत असेल..... आणि सॅक्रिफाईजेस करावे लागत असतील..... तू समजू शकतोस कारण, तू ही गमावलं ना एस्लिनला....?"

शौर्य : "तुला प्रेम न करण्यामागचे तुझे रीझन्स व्हॅलिड वाटतात...??"

सुकन्या : "म्हणजे?"

शौर्य : "हे बघ सुकन्या, प्रेमात कोणा एकाला लांब जावच लागतं.... आणि म्हणून आपण प्रेमातच पडलो नाही.....! तर, लाईफ जस्ट वेस्ट असेल.... मी केलं होतं प्रेम तरी दुसऱ्यांदा मला प्रेम झालं ना... बट, मला भीती आहे तुला मी गमावलं ना..... तर, मी जगू शकणार नाही..... म्हणून मी प्रेम न करण्याचं ठरवलं.... पण, तुझ्या बाबतीत मला तुझे ओपिनियन इमॅच्युअर् वाटतात..... कारण, तू प्रेम न करता ओपिनियन बनवले आहेस....."

सुकन्या : "पण....."

शौर्य : "हे बघ सुकन्या लाईफ मध्ये ना आपल्याला कोणी ना कोणी आवडतोच..... ते प्रेम की आकर्षण हे ओळखायचं असतं...... तू विचार कर..... तुझ्याकडे आता सेलिब्रेशन पार्टी पर्यंत वेळ आहे.... पार्टीच्या दिवशी मला नक्की सांग..... तुला आजवर कोण आवडलं..... विचार कर स्वतःला प्रश्न विचार.... तुला तुझं उत्तर मिळेल...... चल आता आपण डिनर एन्जॉय करूया.... नो मोअर क्वेशन्स...."

तो जायला उठणार.... तोच, सुकन्या त्याचा हात पकडून त्याला थांबवून घेते.....

सुकन्या : "मी जर तुला सगळं सांगितलं...... तर, तू थांबशिल इथेच...... नेहमीसाठी..... प्लीज....?"

शौर्य : "हे शक्य नाही..... प्लीज फोर्स नको करुस...."

तो हात सोडवत निघून जातो.... सुकन्या मनातच काही तरी ठरवून उठते आणि कार मध्ये जाऊन बसते......

दोघेही मस्तपैकी डिनर एन्जॉय करतात.... शौर्य तिला घरी ड्रॉप करून स्वतः निघून जातो.....
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️