आरोही आणि रिया हरी ओम चाळीत आल्या...आणि सुधा काकी च्या घरासमोर येऊन उभ्या राहिल्या...रिया दार वाजवणार तर ती समोरचं दृश्य पाहून अवाक झाली आणि आरोही ती अशी का बघतेय म्हणून समोर बघितल तर आरोहीची पण तीच रिअँक्शन होती...
पुढे....
आरोही समोर काकीला अस बघून पळतच काकीकडे आली आणि तिच्या पाठोपाठ रियाही तिथे आली...
आरोही " काकी काय झाल तुम्हाला, हे एवढ कसं भाजल...."
सुधा काकी " ते.... मी किचन मध्ये जेवण बनवत होते, तर उमा ताईंनी मुद्दामून धक्का दिला.... त्यामुळे माझा हात तव्यावर भाजला...."
आरोही शॉकमध्ये " काय 😳..... त्यांना काही मन आहे की नाही... फक्त स्वतःच स्वतःचा च विचार करत असतात त्या दुसऱ्यांना काय वाटत ते पण दिसत नाही काकींना.... किती भाजलय तुम्हाला काकी थांबा मी बघतेच त्यांना.... अस कस कोणालाही त्रास देतात..."
रिया " हो थांब मी पण येते.... बघू काय करतात ते.."
रियालापण खूप राग आलेला उमा काकींनी जे सुधा काकींसोबत जे केल त्याचा...
सुधा काकी " नाही... नको त्यांना किती काहीही केलं तरी त्या नाही समजणार उगाच वाद आणखी वाढतील , त्यापेक्षा न बोललेल बर.... आणि तसंही आम्ही तुमच्या सोबत आश्रमात येत आहोत , तर आता त्रास नाही होणार यापुढे 😌😊....." ( तुम्ही म्हणाल की काका आश्रमात राहायला कसे तयार झाले... सो झाल अस की जेव्हा आरोही चाळीतून निघाली , तर तिने लगेच काकांना कॉल करून समजावून सांगितलं होतं... तेव्हा काका आरोही च्या समजवण्यावरुन राहायला तयार झाले.... कारण त्यांच्या पत्नीला आणि मुलीला आणखी त्रास होऊ नये म्हणून....)
मोहन काका ( सुधा काकींचे मिस्टर... ) " हो आरोही सुधा बरोबर बोलतेय , त्यांना काही बोलल्यावर उगाच वाद वाढेल.... आणखी काही त्रास नको त्यापेक्षा इथून गेलेले चांगलं आहे...."
आरोही " ठीक आहे काका , जस तुम्ही म्हणाल....😊"
मोहन काका " चल जाऊ आश्रमात सगळ समान भरून तयारी करून ठेवली आहे.... "
आरोही " हो काका चला.... मी टॅक्सी आधीच बुक करून ठेवली आहे येतच असेल... "
मोहन काका " अग याची काय गरज होती , मी केली असती ना टॅक्सी बुक.... उगाच तुला त्रास झाला बघ...."
सुधा " हो बरोबर बोलताय हे.... कशाला त्रास करून घेतेय..."
आरोही " अहो काका काकी मला कसला त्रास... तुम्ही आमचे आई वडीलांसारखे आहात... तुमची मदत करण हे माझं कर्तव्य आहे.... पण मी तुमच्यावर नाराज आहे तुमची कोणी नाही ना मी म्हणून अस बोलताय ना🥺😥😥...."
रिया " हो ना... अस करत का कोण...😥🥺"
आरोही ने अस बोलल्यावर त्यांना समाधान वाटल की आरोहीसारखी मुलगी मुलीच्या रुपात भेटली.... आणि त्यांच्या साठी मदत करायला खंबीरपणे उभी होती....
आरोहीच्या शेवटच्या वाक्याने त्यांच्या चेह्यावर हलक हसू उमटल आणि त्या रिया आणि आरोही कडे जाऊन हलकेच त्या दोघींच्या चेहऱ्यावरून हात फिरवले आणि दोघींच्या कपाळावर ओठ टेकवून त्या दोघींना जवळ घेतले...
सुधा काकी प्रेमाने आरोही ला " हो ग माझं बाळ ते , तुला कोणी सांगितलं की तू आमची कोणी नाही हा.... तू तर आमची मुलगी आहेस.... तू नसती तर आम्ही काय केलं असत , तुझे जितके उपकार मानावे तेवढे कमीच आहे....."
आरोही " काय हो काकी तुम्ही मी फक्त माझं कर्तव्य निभावलं... आणि यापुढे काही मदत हवी असेल तर बिंधास्त मला बोलू शकता... तुम्ही लोक काय बोलत बसला आहात चला लवकर टॅक्सी कधीची आली आहे...."
मोहन काका " हो... हो... चला... "
मोहन काकांची फॅमिली निघाली म्हणून उमा काकी लगेच बाहेर आल्या.... ते लोक दरवाजाच्या बाहेर पाय ठेवणार तेवढ्यात त्यांना उमा काकी चा आवाज त्यांच्या कानी पडला....
उमा काकी " बर झालं हे वादळ गेलं , उगाच डोक्याला ताप नाही.... आता आरामात राहायला भेटेल कोणतीही कटकट नाही... 😈 आणि हो तिकडे राहत आहात तर तिरसट नका वागू.... "
विलास काका ( उमा काकी चे मिस्टर...)" तू जरा गप्प बसशील का... ते जात आहेत ना तर जाऊ दे ना त्यांना शांतपणे..."
इकडे उमा काकींच्या बोलण्याला इग्नोर करून सरळ घराबाहेर पडले...
इकडे जीवनश्री फार्महाऊस ( निखिलच्या फार्महाऊस च नाव...)
निक ची फॅमिली जेवत गप्पा मारत होते....
सुमित्रा ( निखिलची आई ) निखिलला " निक बाळा काम कस चाललं आहे तुझं...."
निखिल " खूप छान काम चाललय मॉम... 😊 आणि मॉम तब्येत कशी आहे तुझी आता , गोळ्या नीट घेतेस ना... नाही तर त्यादिवशी सारखं अलगर्जीपणा करशील , किती घाबरवल होतस आम्हाला... "
सारंग " हो किती घाबरवल होतस तू...."
( एके दिवशी निकची आई घरच्या सगळ्या कामाच्या नादात गोळ्या घेतल्या नव्हत्या.... जेव्हा सगळे झोपण्यासाठी आपापल्या रुममध्ये जात होते तेव्हा अचानक निकच्या आईला श्वास घेण्यास प्रॉब्लेम होत होता.... सुमित्राला अस बघून निखिल आणि सारंग दोघेही घाबरले होते... त्या दोघांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच सूमित्राला घेऊन हॉस्पिटलला गेले... डॉक्टरांनी चेक नीकच्या आईला चेक केले तेव्हा समजलं की त्यांनी गोळ्या स्किप केल्या आहेत, म्हणून हा प्रॉब्लेम झाला... तेव्हापासून निक आणि सारंग सूमित्राची पुरेपूर काळजी घ्यायला लागले....)
सुमित्रा " अरे मी त्यादिवशी खरच विसरले होते गोळ्या घ्यायला कामाच्या नादात... आणि निक तुला इतकीच काळजी आहे तर सून का नाही आणत..."
सुमित्राने सुनेचा विषय काढल्यावर निखिलला थोडी चीड आली....
तो चिडतच " अग आई मला वेळ हवा आहे... इतक्यात नको लग्न... कशाला लग्नाचा विषय काढून चीड आणतेय..."
सुमित्रा " अरे अजून किती वेळ पाहिजे तुला... की वय झाल्यावर लग्न करणार आहेस.... आणि कोणी आवडत असेल तर सांग तिच्याशी लग्न लाऊन देऊ..."
सूमित्राने अस बोलल्यावर तो आणखीनच चिडला....
निखिल " आई...😩"
सारंग निखिल ची चिडचिड पाहून " अग सुमित्रा नको फोर्स करू त्याला... त्याला वेळ हवा आहे तर घेऊ दे , लग्न साधी गोष्ट तर नाही ना त्यासाठी जीवन साथी परफेक्ट पाहिजे असतो ना... काही लोक दिसतात तसे नसतात ना , कोणी याला अचानक मध्येच सोडून वैगरे गेली तर काय करणार.... "
सुमित्रा " हो तुमचं बरोबर आहे.... मला माझ्या मुलाला फक्त सुखात बघायचं आहे... सॉरी निक बाळा परत अस फोर्स नाही करणार...."
निखिल " नो आई तू का सॉरी बोलतेय... हे साहजिकच आहे , तुला काळजी आहे माझी म्हणूनच बोलतेय आय नॉ.... 😊😊😊😊 आणि डोन्ट वरी मला कोणी आवडली तर सर्वात आधी तुला आणि डॅडला सांगेल ..."
सुमित्रा " हो रे माझं बाळ ते.... 😊😊😊 चला पुरे झाल्या गप्पा उद्या लवकर उठायचं आहे ऑफिस साठी..."
सारंग आणि निखिल " हो..."
तिघांनी जेऊन ते आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेले....
थोड्यावेळाने.....
निखिल बेडवर इकडून तिकडे लोळत होता , त्याला झोपच येत नव्हती....सारखं त्याला संध्याकाळच प्रसंग आठवत होता... आणि डोळे मिटले की लगेच आरोही दिसत होती.... पण त्याला तिचा विचार च करायचा नव्हता तरीही आरोही सारखी त्याच्या डोळ्यासमोर येत होती.... या मुलाला कोण सांगणार की त्याला प्रेम झालाय ते , एवढा मोठा झाला आहे तरीही त्याला समजेना की प्रेम नावाचा रोग झालं आहे त्याला 😛🤣🤭....
निखिल बेडवर बसून विचार करत " यार ही 😩 आरोही का सारखी डोळ्यासमोर येतेय, काय होतंय मला कितीही विसरण्याचा प्रयत्न करतोय तरीही तिचाच विचार सारखा येतोय.... तिच्या प्रत्येक रुपात मी खेचला जातोय.... आज संध्याकाळी त्या हॉटेल मध्ये कशी डॅशिंग दिसत होती.... ( लगा... लगा.... लगा... झटका लगा... 🤭😛 हो तो निखिल होता.... जो आरोही ला रुद्र अवतारात बघून शॉक बसला होता.....) बापरे तिचा राग किती भयंकर होता... नाक , गाल किती लाल झालेले रागात , अस वाटत होत एकदम घट्ट मिठी मारावी.... पण अस का होत होतं काहीच समजत नाही आहे.... खरच मी प्रेम करायला लागलोय का तिच्यावर , ती पण करत असेल का माझ्यावर प्रेम.... ओह निखिल काय विचार करतोय तू ती का करेल तुझ्यावर प्रेम.... पण त्यादिवशी शेक हॅण्ड करताना तिच्या डोळ्यात दिसत होत , नंतर माझ्या हाताला लागलेल बघून तिची ती काळजी.... खरच प्रेम करत असेल का ती की स्वाभिमान म्हणून मदत केली असेल.... मला काहीच समजत नाही आहे , जाऊ दे पुढे काय होतय ते बघू आता झोपा निखिल राजे उद्या ऑफिसला जायला लेट होईल...."
निखिलने सगळे विचार झटकून मध्यरात्री झोपी गेला......
आश्रमात.....
मोहन काकांची फॅमिली, रिया आणि आरोही आश्रमात पोहोचले होते.... आरोहीची ओळख म्हणून मोहन काकांच्या फॅमिली ला तिथे राहू दिले.... नंतर त्यांना हक्काचं घर भेटल्यावर ते इथून जाणार होते... काकांच्या फॅमिली ला रूम दाखवून रिया आणि आरोही आपापल्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेल्या..... मग आश्रमातल्या सर्वांनी जेवण करून झोपी गेले....
सकाळी......
आरोही आणि रिया मार्केट ला आलेले डेकारेशन च सामान आणि खाण्यासाठी काही वस्तू घ्यायला आलेले.... कारण आश्रमात पार्टी होणार होती.... त्या आश्रमाचा एक नियम होता की कोणी न्यू मेंबर आला की अशीच छोटी पार्टी करायची.... तेच सामान घेताना आरोही कोणालातरी धडकली.... ती त्या माणसाला काही बोलणार तर त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि राग दोन्ही आलेलं.... रिया ची पण सेम रेअँक्शन होती....
दोघी एकदाच आश्चर्य आणि रागाने " तू....😳😡"
तो राक्षसी हसू आणत " हो मी.... काय मला बघून आश्चर्य वाटलं का.... 😈"
क्रमशः
©® भाग्यश्री परब
हॅलो.....
यात काही चूक असेल तर माफी असावी.....
भेटू नेक्स्ट पार्ट मध्ये 🥰😊.....
तब तक....
💖 Stay tuned 💖
🥰 Stay happy 🥰
🤩 Take care 🤩