आरोही आपल काम संपवून , रिक्षाने एका हॉटेल समोर उभी राहिली....आणि रिक्षावाल्याला पैसे देऊन आत शिरली व एका व्यक्तीला शोधु लागली...... थोड्यावेळाने ती व्यक्ती भेटली आणि त्याच्या समोर घाबरट भाव ठेवून त्याच्या समोरच्या चेअर वर बसली....व त्यांच्यात काहीतरी बोलण झाल , पण अचानक आरोही ने रागात उभी राहून सरळ त्याच्या तोंडावर पाणी फेकल....अस अचानक झाल्याने त्या व्यक्ती शॉक आणि रागात तिला पाहू लागला....व त्याचबरोबर तिथे अजुन एक व्यक्ती एका साइडला उभ राहून, आरोहीचा हा अवतार बघून तोही शौकमद्येच तिला पाहू लागला....
पुढे.....
आरोही घाबरत घाबरत त्या व्यक्तीच्या समोर येऊन बसली...आणि तो असुरी हास्याने तिच्याकडे बघत होता...
तो तिच्या हातात आपला हात घेऊन " अग जान इतकी काय घाबरतेस मी काय खाणार आहे का तुला..."
आरोही आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते , तर तो आणखी हात घट्ट पकडतो.....तरीही आरोही हात सोडवण्याचा निष्फळ प्रयत्न करत असते, पण तो काही हात सोडायला तयार नाही....
तो " अग जान किती घाबरशील मी फक्त हात पकडला आहे... अजुन काही केले नाही "
ती घाबरण्याचे नाटक करत " मला त्रास देऊन तुला काय भेटणार आहे.... प्लीज मला सोड जाऊ दे मला "
तो " नाही , अस कस सोडू मी तुला.... खूप दिवसांनी भेटली आहेस , हा चान्स तर मी जाऊच देणार नाही...मी किती शोधले होते आणि शेवटी तू भेटलीच... "
ती " काय पाहिजे तुला... "
तो " तू पाहिजे.... त्यादिवशी तर तू हातातून निसटून गेली होती , आता नाही जाऊ देणार...."
ती " प्लीज सोड माझा हात नाही तर मी आरडाओरडा करेल..."
तो " ओह एवढी हिम्मत तुझी... ठीक आहे ओरड मी नाही घाबरत कोणाला...😈"
आरोही परत एकदा प्रयत्न करत होती हात सोडवण्याचा...तर त्याने तिचा हात आणखी दाबला...
त्याने आणखी हात दाबल्यामुळे तर आरोहीला खूपच राग आला.... तिच्या डोळ्यात त्याच्याविषयी अंगार फुलला होता , चेहऱ्यावर ज्वालामुखीचा उद्रेक होत होता.... आणि तिने रागातच जोर एकटवून त्याचा हात आपल्या हातातून सोडवून घेतला व समोर असलेलं भरलेल्या पाण्याचं ग्लास उचलून त्याच्या चेहऱ्यावर पाणी फेकल.... आणि रागातच या राक्षसीनी सारखी धुसफूसत त्याला बघत होती... आजूबाजूचे लोक पण तिला या अवतारात बघून तेही घाबरलेली....
हे इतक्या अचानक झाल की त्यालाही काही समझले नाही.... आणि जेव्हा समझले तेव्हा तोही तसाच तिला रागाने लालबुंद होऊन बघत होता.... त्याला इतका राग आलेला की त्याने तिला मारण्यासाठी हात उचलला, पण तिने तो मारण्या अगोदरच त्याचा हात हवेतच पकडला व पाठीमागे मुरगळून त्याला खाली पाडले..... त्याचबरोबर एका कोपऱ्यात उभी असलेली व्यक्ती शॉकमध्ये आरोही ला बघू लागली.... ( आता ती व्यक्ती कोण आहे ते नंतर समझेल)
आरोही गूढपणे हसत " काय रक्षित ( हो तो रक्षित होता...त्याने आरोहिला भेटायला हॉटेल मध्ये बोलवलेल ) कसं वाटल माझा हा रूप.... आवडलाच असेल म्हणा , तुला काय वाटल मी अशी घाबरून तू जे म्हणेल ते करायला तयार होईल... नो वे मी तेव्हा भित्री होते पण आता नाही...."😈
आरोही ने त्याला अस सगळ्यांसमोर अपमानित केले म्हणून तिचा खूपच राग आला आणि तो तसचं उठून तिच्यासमोर उभ राहून रागातच " ये तुझी जीभ जास्त चालते का....( जीभ चालते का 🤔 कदाचित पाणी फेकल्यामुळे याच्या मेंदूवर परिणाम झालेला दिसत आहे....🤭) माझ्याशी पंगा घेवून खूप मोठी चूक करत आहेस लक्षात ठेव , नाहीतर मी माझ्या हातातून तू निसटली नसती तर तेव्हाच सांगितलं असत मी कोण आहे ते.... आणि हो तुझ हे रूप बघून मी तुला घाबरणार नाही आहे समझल... जास्त शहाणपणा नकोय, शिस्तीत राहायचं..."
आरोही " हो मिस्टर तुझ्या या फालतूच्या धमक्याने मी घाबरणार नाही आहे समझल....मला तेव्हाच राहायला पाहिजे होत , पण परिस्थितीपुढे हतबल होते.... आता नाही मी भित्री स्वताला इतकं खंबीर बनवलय की काहीही करू शकत नाही तू माझं... आणि हो हे तुझ शहाणपण आहे ना दुसऱ्याला जावून दाखवायचं इथे नाही , आला मोठा मला शहाणपणा शिकवायला.... इन्स्पेक्टर घेऊन जावा याला...."
इन्स्पेक्टर " काय रे तुला लाज नाही वाटत मुलींना त्रास देतोय.... मुली काय तुला खेळण वाटते काय , तुझ्यासारख्या च मुलामुळे आज मुली स्वतःच आयुष्य आपल्या परीने जगू शकत नाही आहे.... तुझ्यासारख्या मुळे समाज मुलींना दोष देतात, इतकंच नाही तिच्या घरचे पण मोकळेपणाने जगू देत नाही....( आरोही कडे बघत ) आरोही तुझ्यासारखी मुलगी अशीच खंबीरपणे उभी राहिली तर अश्या बेअक्कल मुलाचा नामोनिशाण मिटेल...."
( इन्स्पेक्टर ला आपल्याकडे येताना पाहून ) रक्षित " तुम्ही मला पुराव्याशिवाय नाही पकडू शकत..."
आरोही " तुला काय वाटतं मी मूर्ख आहे का...( इन्स्पेक्टर ला मोबाईल देत ) हे घ्या सर यात पूर्ण कॉल रेकॉर्डिंग आणि काही व्हिडिओज आहेत याच्याविरुद्ध..."
आरोही ला पूर्ण पुराव्यानिशी बघून त्याचा चेहरा तर बघण्यासारखा झालेला आणि त्याच पूर्ण शरीर भीतीने थरथरत होते....कारण आता त्याला कोणीच वाचवणार नव्हत , तो पूर्णपणे अडकलेला...तो तेथून पळून जाणार त्याआधीच त्याला इन्स्पेक्टर पकडतात.... तो पकडल्याने स्वताला त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपडत असतो...
इन्स्पेक्टर " तू कितीही सुटण्याचा प्रयत्न कर , काहीच करू शकत नाही...."😈
रक्षित धडपडत " आरोही तू आता वाचलिस, पण पुढच्यावेळी मी तुला सोडणार नाही....असा बदला घेईल की आयुष्यभर लक्षात ठेवशील.... सो आतापासूनच उलट मोजायला सुरुवात कर वेट अँड वॉच...."😈 डेविल स्माईल देत आरोही ला बोलला
आरोही " हो बघू मी अश्या धमक्यांना नाही घाबरत आता..... हिमतीने तितकं लढायला शिकली आहे मी...घेवून जावा सर याला , याच तोंडही बघायचं नाहीये मला..."
आरोही बोलली तस इन्स्पेक्टर रक्षित ला घेवून जातात....रक्षित ला घेवून जातात तस कोपऱ्यात उभी रामायण बघत असलेली रिया आरोही समोर येऊन उभी राहते आणि आरोही रियाला समोर बघून आनंदाने मिठी एकदम घट्ट मिठी मारते....
रिया " अग ये गुदमरतय मला मारण्याचा इरादा आहे की काय तुझा..."
आरोही " तू गप्प बस काहीही बोलतेस...एक पंच देऊ का 👊 "
रिया " नको बाबा 🙏 मला जगायचय अजून... "
आरोही " 🤣🤣🤣"
रिया तिला अस मनसोक्त हसताना बघून मनोमन सुखावली....
रिया " तू एकदम वाघिणी सारखी लढत होती माझी गरजच नव्हती तुला.... "
आरोही " पण माझ्याकडुन चूक झाली तर काही म्हणून सांभाळण्यासाठी.... सॉरी तुला अस अर्धवट कामातून बोलावलं "
रिया " अग ये सॉरी काय त्यात... तू एकदम परफेक्ट आहेस स्वतःसाठी तुला माझीच काय कोणाचीच गरज नाही....🤗"
आरोही " थँक्यू 😘💖"
रिया " अरे हो एक राहील ना त्या मोबाईल अस काय होत आणि कसले व्हिडिओ होते....🤔"
आरोही " हो सांगते , पण इथे नाही आश्रमात गेल्यावर आणि त्याआधी आपल्याला सुधा काकी कडे जायचं आहे त्यांना घेऊन यायचं आहे आपल्या आश्रमात , आता त्या आणि त्यांची फॅमिली आपल्यासोबत राहील... 🤗💖😊"
रिया " अय्या खरचं 😀 पण अस काय झाल की ते आपल्यासोबत राहणार...."
आरोही " हो चल सांगते मी रस्त्यात..."
आरोही आणि रिया अस बोलत बोलत हॉटेल च्या बजुलाच असलेल्या रिक्षा स्टैंड वर आल्या व त्यात बसुन सुधा काकिच्या रस्त्याच्या दिशेने निघाल्या...
आणि तिथे आरोही ला अश्या भयंकर रुपात शॉकमध्ये बघत असलेला व्यक्ती भानावर येत , तोही हॉटेल च्या बाहेर येऊन आपल्या गाडीत बसून आरोही निघाली त्या रस्त्याच्या विरूद्ध दिशेने आपल्या घरी निघाला.....
इकडे हरी ओम चाळ.......
आरोही आणि रिया हरी ओम चाळीत आल्या...आणि सुधा काकी च्या घरासमोर येऊन उभ्या राहिल्या...रिया दार वाजवणार तर ती समोरचं दृश्य पाहून अवाक झाली आणि आरोही ती अशी का बघतेय म्हणून समोर बघितल तर आरोहीची पण तीच रिअँक्शन होती...
क्रमशः
हॅलो....
पार्ट लेट आल्याबद्दल खूप सॉरी......🙏🙏
हो सके तो इस छोटीसी बच्ची को माफ कर देना...😊
सो......
😍 Stay tuned 😍
🤩 Stay happy 🤩
🤗 Take care 🤗