बाजूची व्यक्ती " अग फोन कधीपासूनचा वाजतोय तुझा बघ..."
आरोही भानावर येत " हो... बघते...."
आरोही फोन उचलून " हॅलो....."
पुढे.....
पलिकडची व्यक्ती रागात धारधार आवाजात " मिस आरोही , तुमचं लक्ष कुठे आहे.... कधीचा कॉल करतोय , तुम्ही इथे नक्की कामच करायला येता ना....."
आरोही " सॉरी सर ते...ते...ते "
आरोही ला मध्येच थांबवत पलीकडची व्यक्ती " लवकर फाईल घेऊन या मिस्टर कदम ची..."
पलीकडची व्यक्ती " हो....हो...हो सर..."
पलिकडच्या व्यक्तीचं बोलून झाल्यावर त्याने लगेच फोन कट केला.....इकडे आरोही पटकन मिस्टर कदम ची फाईल शोधून कॅबिन च्या दिशेने निघाली....
आरोही चालता चालता मनात " लक्ष कुठे असत तुझ आरोही , हं आता सरांचा ओरडा खा.... एकतर आधीच टेन्शन आल आहे आणि आता हे सर...."
कोणाच्या तरी धक्क्याने भानावर येत , झपाझप पावलं टाकत ती निखिल च्या कॅबिन समोर उभी राहिली आणि एक दीर्घ श्वास घेत तिने दारावर नॉक केलं....आतून जसा रिस्पॉन्स आला तस ती आत आली....
निखिल रागाने तिच्याकडे बघत कडक आवाजात " फाईल...."
त्याचा रागीट चेहरा बघून आरोही ने लगेच त्याचा हातात फाईल दिली.... त्याने फाईल घेऊन चेक करायला सुरुवात केली....
निखिल फाईल चेक करत असताना तिचं लक्ष बाजूला टेबलवर ठेवलेल्या एका फोटो फ्रेम वर गेलं त्यात निखिलच्या फॅमिली होती.....
आरोही मनात " किती गोड दिसत आहे हे कुटुंब..... आई बाबा मला आज तुमची खूप आठवण येत आहे.... काय होऊन बसलय हे , बाबांनी तर घरचा रस्ताच बंद केला आहे..... पण मी हार नाही मानणार स्वतःला सिद्ध करून राहणार त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल.... "
आरोही विचार करत असताना निखिल ने तिला आवाज दिला.... तिचा रिस्पॉन्स आला नाही मग त्याने पुन्हा आवाज दिला... तरीही नो रिस्पॉन्स अस त्याने दोनदा आवाज दिला , तरीही रिस्पॉन्स आला नाही ..... ( आरोही गेली कामातून 🥺 देवा 🙏 तूच वाचव आता आरोही ला...)
आरोही उत्तर देत नाही म्हणून निखिल चा राग अनावर झाला..... आणि त्याने रागात जोरातच आवाज दिला " आरोही.....😡"
त्याच्या या ज्वालामुखी सारख्या आवाजाने आरोही तर दचकलीच... त्याचा रागीट चेहरा बघून तिला धडकी बसली आणि तिचे हात पाय पण थरथरायला लागले.... कारण तिने इतकं रागीट कोणालाच बघितलं नव्हत , ती पहिल्यांदा अस बघत होती.... तिला भीती वाटत असतानाच जीव एकटवून बोलायला जाणार तर मध्येच त्याने तिला थांबवून ज्वालामुखी सारखा बरसायला लागला...
" तुम्ही इथे नक्की कशासाठी येता काम करायला की टाईमपास करायला.... मगाशी पण असच झालं होतं , कुठे आहे कुठे लक्ष तुमचं..... अगोदर पण असच वागत होता का.... की आजच अस वागताय हा , असच जर असेल ना तर तुमच्या सारख्या एम्प्लाॅयी ची गरज नाही आहे , जे इथे काम सोडून टाईमपास करायला येतात....आता माझं तोंड नका बघू जा इथून आणि हो जर इथे टाईमपास करायला आला असाल तर रीसाइन लेटर देवून इथून जाऊ शकता.... असे टाईमपास करणारे लोक नाही चालणार माझ्या कंपनी मध्ये समजल.... समजता काय स्वताला....."
आरोही जी मान खाली घालुन त्याच बोलण ऐकत होती , तिने हळूच मान वर करुन भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघितल आणि तिला रडताना बघून त्याला वाईट वाटलं..... तो काही बोलणार त्या अगोदरच आरोही धीर एकटवून त्याच्याशी बोलू लागली....
" माझं लक्ष नव्हत त्यासाठी सॉरी 🙏 पण त्या अगोदर तुम्ही आधी विचार करायला पाहिजे होता की नक्की प्रॉब्लेम काय आहे.... प्रॉब्लेम जाणून न घेता बोलायला लागला , जाऊ दे तुम्हाला नाही समजणार हे सगळ... आणि मला माझी लायकी दाखवली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 सो तुम्हाला वाटतय की आम्ही टाईमपास करायला येतो , अस टाईमपास केलेलं आवडत नाही तर मी आजच तुम्हाला रीझाईन लेटर देते आणि हा जॉब सोडते..... धन्यवाद 🙏.... "
एवढ बोलून आरोही डोळे पुसत कॅबीन बाहेर निघून गेली.... आणि इथे निखिल आपण काय करून बसलो यात त्याला गिल्ट वाटू लागलं.....
दुसरीकडे एका जुन्या फ्लॅट मध्ये दोन व्यक्ती आपापसात बोलत होते.....
पहिला व्यक्ती " आरोही आता बघ माझं खर रूप.... मला तडपवल होत ना तू आता तू तडपशील.... अब आयेगा हसली मजा...."
दुसरा व्यक्ती " हो खूप त्रास दिला होता तिने माझ्या जिगरी मित्राला... आता तिची पाळी आहे त्रास झेलायची 😂😂😂..... "
पहिला व्यक्ती " 😂😂😂"
पहिल्या व्यक्तीने फोनमध्ये काहीतरी टाईप करून बाजूला ठेवला.... आणि ड्रिंक च ग्लास ओठांना लावून ड्रिंक
चाखत होता.....
इकडे ऑफिस मध्ये.....
आरोही फ्रेश होऊन आपल्या डेस्क वर येवून बसली आणि रिझाईन लेटर बनवायला सुरुवात केली.....
आणि....
इथे निखिल आरोही ला कसं थांबायचं याचा विचार करत होता......
आरोही च लेटर बनवून झाल.... तिने त्याचा प्रिंट काढून त्यावर सिग्नेचर करून ती द्यायला कॅबीन च्या बाहेर उभी राहिली आणि तिने डोअर नाॅक केलं.....
आतून " कम इन...."
रिस्पॉन्स आला तस ती आत आली....
तिने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या समोर लेटर ठेवून
आरोही " हे घ्या माझं रिझाईंन लेटर.... मी हा जॉब सोडतेय.... "
निखिल ने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली " मिस आरोही मगाशी मी रागात काहीही बोललो त्यासाठी सॉरी.... पण तुम्ही अस एवढ्याशा कारणासाठी जॉब नाही सोडू शकत..... मान्य आहे मी चुकलो त्यासाठी माफी पण मागतो हवं तर..... प्लीज जॉब नका सोडू.... "
आरोही " नाही मी जर इथे थांबले तर आणखी काही चुकेल त्यापेक्षा मी जॉब च सोडणं बेटर आहे.... आणि काळजी नका करू मला दुसरा जॉब भेटेल , कितीही वेळ झाला तरी चालेल..... "
निखिल " मिस आरोही प्लीज अस नका करू.... आय नौ की सॉरी हे खूप छोट आहे.... "
आरोही " नो मिन्स नो मला फक्त परमिशन द्या म्हणजे मी इथून जाऊ शकते..... "
निखिल ला समजल की आरोही अस काही ऐकणार नाही.... मग त्याने ते रिझाईन लेटर चे तुकडे तुकडे करून डस्बिन मध्ये टाकले.... आणि त्याच्या चेहऱ्यावर गोड हास्य पसरले.....
निखिल " सो आता तुम्ही जाऊ शकता..... "
आरोही ला राग तर आलेला पण तिने शांततेत घेऊन त्याला बोलली....
आरोही रागात पण शांत " हे काय केलं तुम्ही.... तुम्हाला काय वाटल अस करून जाऊ देणार नाही.... मी दुसर पण बनवू शकते.... "
निखिल " हो बनवा काही हरकत नाही... आणि मी ते असच फाडून फेकेन.... 😂"
निखिल ची अशी मस्करी करण्याने आरोही खूप चिडली आणि त्याच्याशी बोलून काही फायदा नाही... अस समजून ती तशीच उठून कॅबीन बाहेर आली ते थेट आपल्या डेस्क वर जाऊन काम करू लागली....
इकडे निखिल तिला अस चिडलेल बघून हसू येत होत.... त्याला हायस वाटल की ती आता जॉब सोडून नाही जाणार ते... तोही रिलॅक्स होवून आपल काम करू लागला.....
क्रमशः
©भाग्यश्री परब
यात काही चूक असल्यास माफी असावी...
😘 Stay tuned 😘
🤗 Stay happy 🤗
💖 Take care 💖