Skrk - 1 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | स्कर्क - 1

The Author
Featured Books
Categories
Share

स्कर्क - 1


॥ श्री ॥


झोमटे क्रीएशन प्रस्तुतseason 1

jayweek- ....

एक अद्भुत, विलक्षण बहुविश्वातल्या वेड्या सूपरहीरोंची.. भयकथा .....
॥ -द- स्कर्क.. ॥

भाग 1 ..


(लॉस अन्जेलीस, कॅलिफोर्निया.)
कार्ले मुवीसिनेमेट्रीक थिएटर

1 6 डिसेंबर 2021


वेळ रात्री 8:45

स्पाईडरमैन-नो वे होम थर्ड शो रिलीज डेटकोरोना वायरस ला हरवुन. तब्बल दोन वर्षानंतर आज लॉस अन्जेलीस, कॅलिफोर्निया हॉलजवळ खुपसारी गर्दी जमली होती .खुप सारी म्हंणण्यापेक्षा अफाटच म्हंणेन मी !
आणि का नाही जमणार? लहान-मोठ्या सर्वांचा लाडका स्पाईडरमेन मार्वलचा मुवी जो रिलीज होणार होता! ज्याच नाव होत, स्पाईडरमेन नो वे होम. ह्या मुवी मध्ये एकाच वेळेस पुढिलप्रमाणे खुप सारे शत्रु ग्रीन गोब्लेन,इलोकट्रो,डॉक्टर ऑक्टोपस, लिझार्ड,सँडमॅन हे सर्व दाखवले जाणार होते, आणी ह्या सहा शत्रूंविरुद्ध एकाचवेळेस तीन स्पाईडरमैन टोबे मॅग्वायर प्रथम स्पाईडरमैन ,द्वितीय अँड्र्यू गारफिल्ड , तिस-या नंबरवर टॉम हॉलंड मिळुन लढा देणार होते. चित्रपटात दाखवले गेलेले प्रत्येक मल्टीव्हर्स दृश्य जणू शरीरावरच्या त्वचेवरचा एक नी एक केस रोमांचकारकपणे उभा करत होता. (मित्रांनो आता मी जास्त काही सांगणार नाही! नाहीतर कथा थांबुनच राहायची.! आणि तसंही ते लोक मुवी पाहायला जातीलच की? आणि आपण ही पाहुन घेऊ! !
(लॉस अन्जेलीस, कॅलिफोर्निया कार्ले मुवीसिनेमेट्रीक थिएटर .) मोठ्या
जाड़जुड सफेद लाईटने थिएट रच्या मालकाने नाव थिएटरच्या भिंतीवर लावल होत, आणी बाजुलाच एका मोठ्या इलेक्ट्रीक स्क्रीनवर स्पाईडरमैन नो वे होम च्या ट्रेलर ची मिनीटा-मिनीटाला वीडियो रिपीट होत-होती, जे की प्रत्येक प्रेक्षकाच लक्षवेधुन घेत होत . थिएटर म्हणायला रसत्याबाजुलाच होत, रसत्यावरुन अंगात स्वेटर घातलेल्या कामावरुन घरी चाललेल्या हातात बैगा घेतलेल्या बाई-मांणसांची ये जा सुरु होती, काही जण त्या थिएटर बाहेर तिकिट काढायला जमलेल्या रांगेतल्या गर्दीकडे पाहून पुढे जात होती.थेटरच्या आजुबाजुला इत्यादी केक,कपडे, राहण्याच्या बिल्डींगी होत्या, बिल्डींगींच्या सर्व लाईटस चालु होत्या, आजुबाजूला लाईटसचा झगमगाट होता.थिएटरच्या मागे दोन एकरावर पसरलेला झाडांचा भाग होता, जो की रात्रीच्या अंधारात श्रापीत असल्यासारखा काळा निळा पडलेला.
□□□□□□□□□□□□□□□□□
पुढे झाड संपली की सांता मोनिका बीच लागत असे, सकाळी त्या बीचवर लोकांची गर्दी जमलेली असायची, परंतु रात्री मात्र तो परिसर अगदी निर्मनुष्यहिंत शुकशुकाट व्हायचा, त्या शुकशुकाटात, स्मशानशांततेत समुद्राच्या विशिष्ट प्रकारच्या खळखळण्याचा आवाज यायचा ,आज ही येत होता. काहीवेळ निघुन गेला असेल. बीचच्या रेतीवर एक प्रकाश पडू लागला, हेड लाईटचा प्रकाश.त्या प्रकाशाने ती रेती सोन्यासारखी चमकु लागली.समुद्रातुन एक बोट पुढच्या हेडलाटचा प्रकाश चालू असलेल्या अवस्थेत वेगाने बीचच्या दिशेने येत होती. बोटीच्या इंजिनचा खर, खरण्याचा आवाज त्या शांततेला डीवचत , चेष्टा थेर ऊडवत होता ज्याने ती शांतता दुभागली जात होती. बोटमध्ये इंजीनजवळ एक माणुस बसलेला. अंगात एक काळा स्वेटर ,खाली निळी जीन्स , पायांत सफेद बुट डोक्यावर टोपी असा त्याचा पेहराव होता. त्याच नाव जॉन आहे तो बीचवर एक हॉटेल चालवत आहे, हॉटेल मध्ये त्याच घर सुद्धा आहे. आणि त्याच्या परिवारात धर्मपत्नी सारा, व मुलगा रोबीन राहत आहेत. आता ह्या क्षणी जॉन रोजप्रमाणे समुद्रातुन नुकताच मासेपकडून आपल्या बोटीतुन घरी यायला निघाला होता. परंतु रोज साह वाजता मासे पकड़ायला जाणारा जॉनरात्री अकरा वाजल्याशिवाय परत येत नसायचा , पन आज न जाणे क? जॉन सहा वाजता मासे पकडायला गेला होता आणि दोन तासांच्या आतच घरी आला होता.
परंतु अस काय घडलेल? मासे पकडायची जागा तर त्याच्या ओळखीची होती.इतक्या वर्ष तो मासे पकड़ायला जायचा आणि अकराशिवाय घरी यायचाच नाही.मग आजच का असा एनवेळी तो घरी आला होता?
त्याच्या चेह-यावर थोडे भीतीचे भाव रेखाटलेले,मनात भीती उत्तेजित झालेली.बोट सुद्धा भीतीने तो अशी काही वेगाने पळवत होता, जणु मागे काही विचित्र लागल असाव, कोणितरी त्या अंधारात मागुन त्याच पाठलाग करत असाव, चोर पोलिसा सारख . कारण त्याची भयविळख्यात सापडलेली नजर दर क्षणा-क्षणाला मागे जात होती.तो कधी -पुढे तर कधी पाठीमागे पाहत होता. आणि त्याची हीच क्रिया पुन्हा पुन्हा घडत होती.ह्याच तंद्रित तो हे विसरला गेला की बीच जवळ-जवळ येत आहे, कारण त्याची ती बोट बीचवर थोडीना चालू शकली असती? आणी मेन मुद्दा हा होता ! की बोटच स्पीड वेगवर्धक होत, की जिला एकदा का बीचच्या रेतीचा स्पर्श झाला तर नक्कीच मोठा अकलनीय अपघात होणार होता.
(अपघात नक्की होईल का? की नाही होणार ? या पाहुयात पुढे ).
बोटच्या इंजिनड्राईव्ह वर हात ठेवुन जॉन कधी मागे तर कधी पुढे पाहत होता.बोटचा वेग जास्त असल्याने ती बोट अक्षरक्ष पाण्यावरुन काही इंच
वर ऊडत होती.जॉनची भेदरलेल्य अवस्थेतली नजर मागे अंधारात तर कधी हेडलाईटच्या प्रकाशात पुढे पाहत होती, की अचानक त्याचवेळी जॉनच्या मागे पुढे पाहणा-या नजरेस तीस मीटर अंतरावरच बीचची सीमारेषा दिसली, ज्या सीमारेषेला पाहून त्याच्या पोटात गोळा आला, बोटचा स्पीड जेमतेम पन्नास-साठ असावा.
आता बोटचा स्पीड कमी कसा करावा हा प्रश्न त्याच्या भयाने भरुन गेलेल्या मेंदूत आला.परंतु प्रश्णावर विचार करण्यासाठी वेळ होता कुठे? जे काही करायचा असेल ते लागलीच , लगेच.बोट आता थांबण्याच्या मनस्थिती मुळातच नव्हती , हवेत जहाज उडाव तशी इंच,इंच पाण्यावरुन उडत बोट बीचच्या दिशेने एका बॉम्बसारखी बीचच्या दिशेने निघाली होती, की जी बीचला धडकताच एक मोठा स्फोट होऊन पृथ्वी तर नाही , परंतु जॉनला मात्र दगाफटका करवु शकत होती.
वेळ तर संकटाच्या वेळी सेकंदाच्या काटेने धावत असतो,पाहता-पाहता तीस मीटर अंतर बोटने कापायला सुरुवात केली, जॉन इकडे पुर्णत बळ लावून बोटच स्पीड कमी-कमी करु लागला.परंतु वेळ हातातुन निघुन गेली होती.तीस,पंचवीस,वीस,पंधरा, दहा, काट्या-काट्याने बोट पाण्यावरुन उडत ऊडत अंतर कापू लागली , नी पुढच्या क्षणाला ती बोट बीचवर आदळून जॉनसहित उध्वस्त होणार:तेवढ्यात प्रस्ंगसावधानता दाखवत जॉन ने बोटमधुन हवेत उडी घेतली, हवेला कापत मिसाईल सारखी बोट पाण्यावरुन उडत ऊडत पुढे जाऊन बीचवर आदळली, ज्यासरशी बोटच्या इंजीनच्या गोल-गोल फिरणा-या चक्रीचा मातीला स्पर्श झाला, त्याचवेळेस ती बोट अक्षरक्ष कोलांड्या खात हवेत उडाली आणि इंजीनचा अक्षरक्ष हवेतच रॉकेट फुटाव तसे स्फोट झाला.बोटमध्ये असलेले सर्व मासे आजुबाजुला उडाले गेले.पुढच्याच क्षणाला बोटचा आग्निरिहिंत सांगाडा हवेतुन खाली जमिनीवर बीचच्या मातीवर येऊन धडाम आवाजासरशी आपटला:
पाण्यावरुन हलके-हलके तरंग उठत होते, तेवढ्यात त्या तरंगरिहित
पाण्यातुन जॉन डोक काढून वर आला आणि जोर-जोरात पाण्यात हातपाय हलवत नाकातोंडावाटे श्वास भरु लागला. जॉनला काहीक्षणापुर्वीच आठवल की आपण बोट वरुन उडी मारनार नव्हतोच, परंतु इतका ऊशीर जो पाठलाग जॉनची भीती त्याचा डॉग धरुन मागे लागली होती, ती त्याच्या अंगावर काल झडप घ्यायला आली होती.कारण पाण्यातुन काहीतरी त्याच्या दिशेने लाल रक्तासारख जाड-जुड काहीतरी मानवी क्षमतेच्या दृष्याला न जुमानता येणार, न मानता येणार काहीतरी चिकट द्रवासारख, लाल रक्तच जणु पाण्यातुन त्याच्या शरीरावर झेपावल होत. ज्या चिकट द्र्व्याला की आणखी काही विचित्र असेल ही, ज्याला पाहून जॉन ने पाण्यात उडी घेतली होती, आणी तो कसलही आकार उकार नसलेला प्राणि की आणखी काही बोटवर जाऊन आदळला होता,पुढे मात्र जॉनला काही ठावुक नाही तो पाण्यात बुडाला जो होता.जॉनच्या चेह-यावर बोटच्या जळणा-या सांगाड्याचा तांबडा प्रकाश पसरलेला, आणी त्याच्या मनात नाना त-हेच्या प्रश्णांनी काहूर माजवल होत.आपन जे काही चिप-चिपचीत आकार पाहिल , ते नक्की काय होत? भुत,पिशाच्च की आणखी काही?
आणी ते आपल्या मागे का लागल होत? बोट सोबत ते सुद्धा जळाल असेल का? त्याची सुद्धा राख झालि असेल का? हात पाय हळवत पाण्याने भिजलेल शरीर घेऊन जॉन बीचवर आला. समोर काही पावलांवरच बोटचा सांगाडा अग्नित विलीन होऊन चट, चट आवाज करत जळत होता ,आगीतुन काजव्यासारखे लहान-लहान निखारे बाहेर पडत होते.एक-एक पाऊल वाढवत जॉन जळणा-या बोट जवळ येऊ लागला, तसा अंगाला गरम गरम आगीचा स्पर्श होऊ लागला , शरीरातल रक्त कस गरम गरम होऊ लागल.कपाळावरचे द्रव बिंदू हाताने पुसून काढून ,पुढे दोन्ही हातांनी डोळ्यांवर आलेले पांढरट केस मागे सारले.
श्वास थांबायच नाव घेत नव्हता,तो जोरानेच सुरु होता. जॉन एकटक
त्या जलणा-या आगीत एकाग्र होऊन पाहत होता.
(हे अस बघ्याच भुमिका करण्यापेक्षा स्व्त:च जीव त्याने वाचवायल हव होत ,नाही का? परंतु मानव ठरला मूर्ख प्राणी, त्याच मन काय चंचल असत! कुठे कधी रसत्यावर अपघात घडला! आणि त्याला त्या रक्तब्ंबाळ देहांची भीती वाटत असली तरी ही ती पाहणार म्हंणजे पाहणारच, नाही का?) तोंडावाटे विशिष्ट प्रकारचा श्वासरीहिंत आवज येत, जॉन जागेवर उभ राहुन त्या ज्वाला अग्नित एकटक पाहत होता, की पुढच्याक्षणाला त्या आगीत दोन लाल विस्तवासारखे डोळे चमकले, नी त्या चमकणा-या डोळ्यांसहित आगीचा एक जोरदार भडका वर हवेत उडाला, ते खूनशी लाल विस्तवासारखे डोळे पाहताच जॉनच सर्व अंग मागे झोकून दिल्यासारख रेतीवर पडल, जॉनच शरीर जरी रेतीवतर पडल असल.तरी भितरलेले , भयाने ग्रासलेळे विस्फारलेले डोळे मात्र पुढे बोटच्या जळणा-या त्या आगीत , ते जे काही त्यात दबा धरुन बसल होत तिकडे स्थिरावले होते. क्षणा-क्षणाला छातीचे ठोके त्या आगीला पाहुन धड़कत होते, ते जे काही आहे , सैतान की भुत, पिशाच्च, एलियन ते आताच आग्नितुन बाहेर निघेल , आणी आग्नितांडव माज्वुन आपल्या देहावर धाऊन येईल .आपल्या देहाच न जाणे कशाप्रकारे चिरफाड करेल:खाईल की आणखी काही करेल , पुढील विचार करुन तर जॉनच्या पाण्याने भिजलेल्या त्या थरथरणा-या अंगावर बिजली गिरावी त्याप्रकारे एकामागुन एक शहारा येऊ लागला. जॉनच सर्व लक्ष पुढे आगीत होत. आगीत कसलीतरी हालचाल होत होती.मेलेला मुर्दा चित्तेत उभा रहातो की काय अस दृश्य दिसत होत. निळी जीन्स घातलेल्या जॉनचा पांढ-या बुटांचा पाय आगीपासुन ठिक इंचभराच्या अंतरावरच होता,की अचानक त्या आगीतुन एक चिप-चिपित (जेली) गांडूळा सारख लाल पदार्थ त्या बुटावर येऊन चिपकल, पाहता पाहता त्या लाल चिप-चिपीत द्र्व्याने तो पांढराबुट अक्षरक्ष वितळवुन काढला आणि थेट जॉनच्या पायांवर प्लास्टीक चिपकावे त्याप्रकारे त्वचेवर चिपकू लागला.त्या चिपचिपित लाल रक्तरंजित जिवाचा संपर्क ज्यासरशी जॉनच्या त्वचेवर झाला , ती त्वचा भाजल्यासारखी आतुन
गरम तव्यावर पडना-या पाण्याच्या थेंबासारखी फ्स्स फ्स्स आवाजकरत
धुर सोडू लागली. पायांवरशी तो चिपचिपित लाल रक्तरंजित द्र्व
विषासारखा जॉनच्या पुर्णत शरीरावr फ्स्स, फ्स्स विशिष्ट प्रकारचा आवाज करत शरीरातुन धुर सोडत पसरु लागला. काहीवेळातच तो रक्तरंजित लाल द्रव जॉन च्या सर्व शरीरांवरच्या भागावर पसरला आणि पुढच्या काहीवेळेतच जॉनच पुर्णत शरीर लाल रंगात , चिपचिपित तेलकट आकृतीत परावर्तीत झाल, ज्याला ना आकार होता ना कसला उकार फक्त एक कालपट जेलीसारख सपाट वर्णन होत त्यास. जॉनच्या शरीरावर त्या उपद्रवाने आपल ठाव मांडल होत. ठाव मांडून त्याने आपल रुप दाखवायला सुरुवात केली, नी त्यावेळेतच एक अद्भूत विळक्षण प्रकार घडायला सुरुवात झाली , तो लाल चिपचिपीत द्र्व्य अक्षरक्ष एका राक्षसी दैत्या सारख आपल आकार वाढवु लागला. जॉनच सामान्य शरीर पाच फुट होत, जे की आता 8 फुट झालेल, हात पाय सामान्य होते, ते आता ह्याक्षणी बलाढ्य अजगराच्या शरीरासारखे फुगले होते.चेहरा सामान्य मुळीच नव्हता, काहीतरी वेगळा मानवाच्या विचारशक्तिच्या पल्याड चित्र-विचित्र रुप त्या मानवाच्या चेह-यावर अवतरल होत.एक मोठा गुळगुळीत टक्कल पड़लेल डोक , नी सरड्या सारखी वळ-वळवणारी ती एक अमानविय गुलाबी रंगाची जिभ, आणी त्या जिभेभोवती मुखात उगवलेले पिवळेजर्द विखारी काट्यासारखे विषारी धारधार दात आणि क्षणा-क्षणाला उघडझाप करणारे ते क्रोधहिंत, व भुखेने पेटुन ऊठलेले मोठाले हिरवे डोळे.
वर निळ्या आकाश गंगेत, चंदेरी रंगाचा चंद्र उगवला होता.त्या चंद्राकडे
त्या अवाढव्य अमानवी दैत्याने आपल भलमोठ डोक वर करुन पाहिल, नी जबडा वासला, ते धारधार सू-या सारखे दात चंद्राच्या उजेडात जरा वेगळेच दिसले, नी ती सरड्यासारखी जीभ त्या धारधार दातांवरुन जीभळ्या चाटावी त्याप्रकारे स्स स्स स्स आवाज करत फिरु लागली .
जणु ते अवाढ्व्य सैतान की दैत्य? साक्षात चंद्राला सुद्धा आपल भक्ष्य बनवण्यास पाहत होत.
" स्स्स्स.. ! स्कर्क...! स्स्स..स्कर्क..! हा हा हा हा हा..!"
त्या लाल तोंडाच्या वासलेल्या भल्यामोठ्या जबड्यारुपी तोंडातुन सरड्यासारखी जीभ बाहेर येऊन वाकडी तिकडी तोंडावर फिरु लागली
नी ते सुळ्या सारख्या दातांची हालचाल होत एक खोल खर्जातला भरडा आवाज व एक गडगडाटी छातीत धस्स व्हाव असे हास्य त्या अवाढ्व्य दैत्याच्या मुखातून कालपट लाल गाळत निघाल.
□□□□□□□□□□□□□□□□□
कार्ले मुवी थिएटर बाहेरची गर्दी , आता ओसरली होती.ओसरली म्हंणण्यापेक्षा आता तिथे एक कुत्र ही भटकत नव्हत असंच म्हंणेण मी.
र्हियेटर बाहेर फक्त स्पाईडरमैन नो वे होम चित्रपटाच ट्रेलर काय ते मिनीटा मिनिटाला रिपीट होत-होत बस्स, तीच काय ती हालचाल.बाकी सर्वीकडे शांतता नी गारठा होता.तिकिट खरेदी घरातला माणुस सुद्धा
चित्रपटाचा शेवटचा शो असल्याने खिडकीबंद करुन थिएटर मध्ये निघुन गेला होता.
नो वे होम चाहत्यावर्गाच्या संख्येला पाहता पुर्णत मुवी थिएटर असा काही तुडूंब भरला होता, की मुंगी सुद्धा दिसणार नाही.
मुवी थिएटरच्या प्रोजेक्शन स्क्रीन म्हंणजेच एक मोठा राखाडी पडदा ज्यावर चित्रपट दाखवला जातो.त्या प्रथम सीटलाईनवर एक आठ वर्षाची मुलगी बसलेली, गौरवर्ण गोल चेह-याची , तपकीरी केसांची, अंगावर फ्रोझेन कार्टून टी-शर्ट , आणी खाली एक ब्लैक जीन्स घातलेली. त्या मुलीच नाव रौंडा राऊसे होत .त्या मुलीच्या सीट बाजुलाच एक स्त्री बसलेली त्या स्त्रीला पाहून अस वाटत होत ! की ती नक्कीच तीची आई असावी.कारण त्या स्त्रीच वर्णन स्वरुप हुबेहुब त्या लहानग्या मुलीसारखच मिळत जुळत होत.
" मॉम?" रौंडाने आपल्या आईकडे पाहिल, तिची हाक ऐकताच तिच लक्ष प्रोजेक्शन स्क्रीनवर सुरु झालेल्या नो वे होम च्या चित्रपटावरुन हटल गेल. स्क्रीनवर नुकताच स्पाईडरमैन कोन आहे? हा सीन दाखवत होते.
" काय ग काय झाल..!" रौंडा ला तिच्या आई म्हंणजेच पियुने प्रश्ण केला. आईच्या प्रश्णावर रौंडाने दात दाखवत हसत एक करांगूली तिला दाखवली.
" अरे माझ्या देवा ! " रौंडाच्या आईने कपाळावर हातच मारुन घेतला
" ठीके चल लवकर ! मुवी चालू व्हायच्या अगोदर..जाऊन येउयात.!"
दोघीही मायलेकी आपल्या सीटवरुन ऊठल्या आणि थिटर हॉलच्या दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या काळे कपडे घातलेल्या बोडिगार्ड मांणसाला काहीतरी सूचना सांगून बाहेर निघुन गेल्या.
□□□□□□□□□□□□□□□
वाचक दोस्तांनो जस की मी म्हणालो होतो .की थिएटरमागे दोन एकर पर्यंत मोठ मोठाल्या हिरव्या झाडीच जंगल पसरल होत .आणि जंगल संपुन थोड अंतर चालत जाताच पुढे सांता मोनिका बीच लागायच.काहीक्षणापुर्वीच त्या बीचवर पृथ्वीवरच्या मणुष्याच्या कल्पनेच्या विचारचक्राला तडे जातील अशी एक विकृत घटना घडली होती , एक अशी घटना . जी फक्त माणूस टीवीवरच, किंवा एका vfx तंत्रज्ञानामार्फत स्क्रीनवर पाहू शकतो. कालोखात रात्री अपरात्री न जाणे मनुष्याच्या निद्रेअवस्थेमागे अशा कित्येक, लाखो घटना घडतात . ज्या घटनेंपासुन ह्या भुतळावर अस्तित्त्वात असलेला एक नी एक मनुष्य अजाण असतो.आज ही ह्या कालोखाच्या गडजंग अंधारांच्या चार भिंती आड एक घटना घडली होती , आणि त्या घटनेचा एक नी एक पाहणारा हक्कदार इथे जमलेला एक-नी -एक वाचक होता.
हो की नाही मित्रांनो ? तुम्ही सर्वांनी पाहीलंत ना जॉन समवेत काय घडल कशाप्रकारे तो अवाढव्य एव्हील्स दैत्यात रुपांतरीत झाला?
(बर ते सर्व जाऊद्या आपन पुढे वाचुयात! अर्धे वाचक तर म्हंणत असतील काय उगीचच बडबड करत बसतो हा! वाचुन पन नाही देत माफ करा आपल असंच सुरु असतं😄🙏🏼 )
थीटर मागे असलेल्या जंगलातल्या झाडांच्या फांद्यावरुन एक आठफुट राक्षसी दैत्यासारखी आकृती एका माकडासारखी झोके घेत घेत पुढे येत होती. त्या दैत्याच्या झोक्यासरशी ते झाड अक्षरक्ष खालून वर पर्यंत हालत होत, आणी झाडावरची पान हवेतुन खाली जमिनिवर पडत होती.त्या राक्षसी दैत्याच ते चिपचिपीत तेळकट शरीर आणि त्या शरीरावर उमटलेल्या जाड जाड नसा हिरव्या रंगाने कालोखात चमकत होत्या.
कालोखात पाहता जणू अस वाटत होत, की काहीतरी अमंगळ, अकुशल कालोखातुन आपल्या नरडीचा चावा घ्यायला ज्वळ येत आहे.
एक मोठा फांदी तुटल्याचा विशिष्ट प्रकारचा कट- आवाज झाला आणी
तो आठफुटी दानवी आकार जाडजुड फांदीसहित जमिनिवर धप्पकन माती आणी पालापाचोला ऊडवत खाली कोसळला.
□□□□□□□□□□□□□□□
लहानगी रौंडा वॉशरुम मध्ये आरशासमोर नळावर हात धुवत ऊभी होती. वॉशरुम च्या भिंती सफेद रंगाच्या होत्या.वर सफेद रंगाच्या चार पाच ट्यूब जळत होत्या त्या ट्यूपांचा प्रकाश खाली पसरला होता. रौंडा एकटक हात धुण्यात मग्न झालेली.की तेवढ्यात एक मोठा आवाज झाला, तो आवाज टॉयलेट मध्ये एकटी ऊभी असलेल्या रौंडाच्या दोन्ही कानांनी अचूक टीपला. रौंडाची आई पियु इंस्टावर रिल पाहण्यात व्यस्त असल्याने तीला तो आवाज ऐकू आला नाही.आवाज येताच रौंडाने समोर आरशात पाहिल , समोर भिंतीवर एक चौकोनी आकाराची उघडी खिडकी होती. ती तिच्या नजरेस पडली. तिच्या बाळमनात न जाणे काय विचार आला ? की कसली कुतुहल निर्माण झाली.?तीने बंद दरवाज्यासमोर असलेल्या
वॉशरुम साफ करायच सामान होत, त्या सामाना बाजुलाच एक स्टूल होता.तो स्टूल सरकवत सरकवत खिडकीखाली आणला आणी त्या स्तुलवर ऊभी राहून खिडकीतुन बाहेर पाहू लागली.वॉशरुम थिटरच्या मागे होत आणी मागे ते झाडांच जंगल होत. रौंडा एकटक त्या चंद्राच्या प्रकाशात काळ्या निळ्या पडलेल्या झाडांच्या आकृतीकडे टक लावुन पाहत होती, आवाज बाहेरुन आला होता, याचा अर्थ नक्कीच काहीतरी घडल अशणार.? रौंडाच्या बाळमनात मोठ्यांसारखा प्रश्न आला. की तितक्यात चंद्राच्या जांभळसर प्रकाशात आजूबाजूला पाहणा-या रौंडाच्या चेह-यावर हिरवा पेटता प्रकाश पडला, हिरव्या प्रकाशाने तिच तोंड उजळून निघाल आणि त्या चेह-यावर आश्चर्यकारक भाव पसरले.
समोर झाडांच्या काळ्या निळ्या आकृतीमधोमध एक आठ फुट लाल रंगाने पेटलेला राक्षसा सारखा आकार उभा होता. आणी त्या आकाराच्या शरीराचे हात पाय जाड-जुड बलाढ्यपणे फुगलेले होते.
हाताचा एक पंजा अक्षरक्ष फावड्यापेक्षाही मोठा होता, डोक्यावर टक्कल होती कान वगेरे काही नाही नव्हत.डोळे अगदी ताणल्या सारखे मोठे हिरव्या रंगाचे होते,बलाढ्य शरीरातुन फुगलेल्या नसा हिरव्या रंगाने चमकल्या जात अक्षरक्ष टरारुन फुगून आल्या होत्या.
" व्होट द फक ! " काहीक्षण रौंडाचा तो आकार पाहुन तोंड आ वासल्या सारख मोठ झाल, व ती पुढे पाहत पुन्हा म्हणाली
" काय आहे हे..? "
□□□□□□□□□□□□□□□
झाडाची फांदी त्या दैत्याच वजन न झेपल्याने तुटुन पडली .आणी त्या तुटणा-या फांदीसहीत तो दैत्य ही कोसळला. इतक्या फुटा वरुन खाली पडून ही त्या दैत्याच्या अ:मानवी शरीराला इजा, खरचटन तर सोडाच हो! साधी खालची माती ही शरीराला चिकटली नव्हती.इतकी असीम अफाट शक्तिशाली ताकद होती त्या दैत्यात.परंतु हा दैत्य अहे कोण?
भुत आहे पिशाच्च आहे ? की आणखी काही? त्याच नाव जो पर्यंत आपल्याला कळ्ंत उमजत नाही तो पर्यंत आपण त्याला दैत्यच म्हणू ठीके ना? बर !
जमिनीवर दोन्ही हात टेकवुन तो दैत्य उभा राहीला , उभ राहताक्षणीच
शारीरीक रचनेत असलेल्या अमानविय शक्तिने त्याला कसलीतरी चाहूल लागली.कोणीतरी आपल्याकडे चोरुन पाहत असल्याची .
(आणी खरच लहानगी रौंडा त्याला पाहत नव्हती का? बापरे ! म्हंणजे रौंडाच्या जिवाला तर धोका आहे नाही का मित्रांनो ? आता काय होईल मग?) त्याच्या लाल रक्तासारख्या चिपचिपीत त्वचेच्या गोल मटोल डोक्याखाली म्हंणजे मानेवर गाडिच्या एसीला जसे छिद्र असतात , तसे अचानक छिद्र पडले .
□□□□□□□□□□□□□□□
रौंडा एकटक त्या दैत्याकडे पाहत होती, लाल , आणि हिरव्या रंगात पेटलेला एक आठफुट स्टेच्युसारखा तो दैत्य कालोखात उभा होता.त्याची कसलीही हालचाल होत नव्हती. रौंडा एकटक खिडकीबाहेर पाहण्यात व्यस्थ होती .की तेवढ्यात एक मानवी हात तिच्या मागुन जवळ आला. आणी त्या हाताने तिला आपल्या दिशेने खेचुन घेतल.
□□□□□□□□□□□□□□□□
" हयांऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!" धारधार दातांचा जबडा वासुन, सरड्या सारखी एक फुट हवेत वलवलणारी गुलाबी जीभ बाहेर काढत -त्या दैत्याने थीटरच्या उघड्या खिडकीत फिस्कारत पाहील.आणि पुढच्याच क्षणाला त्याच्या नजरेस ......काहीही दिसल नाही.
□□□□□□□□□□□□□□□□
" रौंडा ! वॉशरुमला सांगून हे काय करत होतीस तु?"
रौंडाच्या आईने म्हंणजेच पियुने तिला मेन धोक्याच्या क्षणालाच हाताला धरुन खाली खेचल होत.अन्यथा पुढे काय घडल असतं हे सांगायला नकोच! आई आपल्या मुलाच्या रक्षणाकरीता धावुन आली होती हे ह्या
दृष्यास लागू होत.नाही का? आई ती आईच.
" मोम्मा...! मला ना हात धूतावेळेस कसलातरी आवाज आला ! तर मी हा स्टूल घेऊन खिडकीतुन बाहेर पाहील, तर मला वेनम सारख काहीतरी उभ आहे असं दिसल.!" रौंडा एक सहा वर्षाची मुलगी ! तिच्या ह्या बोलण्यावर भले कोण लागलीच विश्वास ठेवणार होता, नाही का? एकवेळ आपण विश्वास ठेवु शकतो, कारण आपण ते पाहिलं आहे नाही का?
" औह माय वेनम हा ? " रौंडाच्या मातेने म्हंणजेच पियुने तिला अस म्हंणतच आपल्या कवेत उचलुन घेतल,! आपल्या मातेच्या वक्तव्यावर
रौंडाने फक्त मान खालून वर हलवली.
" तुला माहीतीये का?" पियु लहान मुलांसारखी भाषा आणि हावभाव वापरुन उच्चारली.
" काय ग..मम्मा?" रौंडाने नकळत प्रश्न केला.
" तो वेनम ना ! तुला घेऊन जायला आला होता!"
" काय ..?" जरा लहानश्या पन मध्येम मोठ्या आवाजात रौंडा किंचाळली.
" हो खरच बेबी..!"
" नाही ना म्म्मा! मला नाही जायच..त्याच्या जवळ. तो माणसांच डोक खातो! " रौंडा पियुच्या कवेत घेतलेल्या अवस्थेत म्हणाली.
" अच्छा! मग तर आपल्याला लवकरात लवकर स्पाईडरमैन ची मदत घ्यावी लागेल.!"
" पन स्पाईडरमैन कुठे भेटेल?"
" मुवी मध्ये आहे ना!"
" अंग मग चल ना लवकर !" रौंडा पियुच्या खांद्यावरुन उतरली आणि आप्ल्या मातेला अक्षरक्ष हाताला ओढतच थीटरच्या दिशेने घेऊन जाऊ लागली.तिच्या ह्या अवस्थेवर नकळत पियुच्या चेह-यावर एक हसु उमटल ,मनातच म्हणाली.
" वेडूबाई!"
(अर्ध्यातासानंतर )
लाल रंगाच्या लाईटस पेटल्या जात थिएटरमध्ये नो वे होम मुवी प्रक्षेपणाला सुरुवात झालेली, लहान मोठी सर्व फेंन्स मुवी पाहण्यात गर्क होते मोठ्या प्रोजेक्शन स्क्रीनवर मुवी रनिंग टाईम पस्तीस मिनीटे पन्नास सेक्ंद होत.स्क्रीनवर ग्रीन गोब्लीन ची एंट्री चालू होती. डॉक्टर ऑक्टोपस, स्पाईडरमेंन ब्रिजवर उभे राहून संभाषण करत उभे होते, की तेवढ्यातच एक आगळावेगला नाय्नो टेक्नोलॉजीने बनलेला एक विचित्र चेंडूसारखा बॉम्ब येऊन पुलावर पडला आणि एक विस्फ़ोट्क तांबडा प्रकाश उडवून कानठळ्या बसवणा-या आवाजासहित फुटला.आणि त्याचक्षणी थिटरमध्ये पेटलेल्या त्या लाल रंगाच्या लाईटस चरचरु लागल्या, त्यांचा तो लाल रंग कमी जास्त होऊ लागला.त्या कमी जास्त होणा-या प्रकाशासरशी चर चर आवाज होऊ लागला. परंतु त्या प्रकाशाकडे कोणाचही लक्ष नव्हत , फक्त तो दरवाज्यात उभा असलेला काले कपडे घातलेला बोडिगार्ड सोडुन . त्याने खिशाला लावलेली एक काळ्या रंगाची मशीन हाताने उपटून काढ़ली,( हॅण्डहेल्ड हॅम रेडिओ वॉकी टॉकी). आणि ती मशीन तोंडाजवळ नेऊन काही सूचना देणार कि तेवढ्यात त्याच्या उघडलेल्या मुखात एक लाल रक्तासारखा चिपचिपीत द्रव अंगा खांद्यावरुन घसरत आला , व झटकन पाण्यासारखा त्याच्या मुखात घूसला.तसे त्या बॉडीगार्डच्या चेहरा श्वास न मिळाल्याने काळा निळा पडू लागला, त्याने आपले स्व्त:चे दोन्ही हात गळ्याभोवती आवळले आणि धाडकण मागे अंधारात कोसळला, व ते लाल दिवे पुर्ववत झाले.पुढच्याचक्षणाला त्या प्रोजेक्शन स्क्रीनवर हवेत ऊडणा-या ग्रीन गोब्लीन ची एंट्री झाली, आणि त्याचवेळेस भल्यामोठ्या पांढरट प्रोजक्शन स्क्रीनवर लाल रंगाने पसरायला सुरुवात केली ज्याने पुढील चित्र दिसायचे बंद झाले . काय घडतय,? काय चालू आहे? कोणाला काहीच कलंत नव्हत? सर्व काही विचित्र चालू होत.अर्ध्ये प्रेक्षक ह्या घटने नंतर घाबरुनच गेले, तर अर्धे प्रेक्षक मुवी मध्येच का थांबवला ह्यावरुन त्रासिक सुरात वाद घालू लागले .की अचानक ते थांबलेले लाल चरचरणारे दिवे पुन्हा एकदा जोर जोरात चरचरु लागले, फट, फट ,फट आवाज करत फटाक्याची माल फुटावी त्याप्रकारे ते डाव्या आणि उजव्या बाजुचे सर्व चरचरणारे लाल दिवे एकालाईनीत फुटले गेले .आणि असा काही भीतीचा गौप्यस्फोट झाला की त्या थेटर मध्ये
चिडीचुप शांतता पसरली .पुढे प्रोजेक्शन स्क्रीनवर पसरलेला लाल रक्तरंजित प्रकाश त्या सर्वांच्या भेदरलेल्या लहान मोठ्या आईच्या कुशीत घुसलेल्या लहान मुलांच्या तोंडावर पडलेला.नव्वद-शंभर ची पब्लिक अक्षरक्ष भेदरुन गेली होती.की तेवढ्यात एक माणुस बाहेर जाण्यासाठी चोर पावलांनी दरवाज्याच्या दिशेने निघाला , आणि दरवाजा खोलू लागला.परंतु दरवाजा तर अमानविय शक्तिने जाम झाला होता .तो भला मानवी शक्तिने उघड़णार कसा ? त्या जाम झालेल्या कडीचा आवाज त्या स्मशान शांततेत गुंजू लागला.प्रत्येकाची भेदरलेली नजर त्या माणसाच्या कृतीवर पडली.
की अचानक त्या लाल रंगाच्या प्रोजेक्शन स्क्रीनमधुन लांब- लांब लाल रंगाच्या झाडाच्या शेंड्यासारख्या चिप-चिपीत स्पाईडरमैंन सारख्या जरा जाड़जुड वेब शुटर स्प्प,स्प्प आवाज करत निघाल्या नी थेट जाऊन द्या मानवाच्या पाठीवर बसल्या.सापळ्यात अडकलेला मासा ज्याप्रकारे पाण्यातुन बाहेर खेचाव , त्याचप्रकारे तो माणुस त्या प्रोजेक्शन स्क्रीनच्या दिशेने अफाट वेगाने खेचला गेला , नी त्या लाल प्रकाशात जाऊन त्याची एक भयंकर आर्तकिंकाळी थिएटरमध्ये घुमली.ह्या दृश्याला पाहुनतिथे जमलेल्या एके-एका साधारण मनुष्याची अशी काही बोबडी वळली, की एका पाठोपाठ लहान-मुली मोठ्या बायका ऊर फाटेस्तोपर्यंत किंचाळू लागल्या.उठत धडपडत ,जो तो चेंगरा चेंगरीकरत दरवाज्याच्या दिशेने
पळू लागला, आणी इकडे मागे ऊरलेला एक एक जण त्या वेब शुटरने त्या लाल रक्तरंजित प्रोजेक्शन स्क्रीनआत जाऊन गडप होऊ लागला.किंकाळ्यांचा लोट लोट नी लोट ऊडाला नरकात प्रवेश केल्या सारखी गरमी पसरली. शेवटी दहा बारा जनांनी जोर लावुन तो दरवाजा कसतरी उघडला, आणि एका वारुळातुन पिसाळलेल्या मुंग्या बाहेर पडाव्या तश्या बायका-मांणस-लहान मुल उठत धडपडत बाहेर पडू लागली...!
क्रमश:.....


कृपया कथेविषयी तूम्हाला काय वाटत ते कळवा..🙏🏼😊


🙏🏼😊...
जयविक...!। स्कर्क ।

चे भाग मोठे असतील..
आणी ही एक फ्री स्टाईल कथा आहे ह्यात वाचकांना बिल्कुल बोर
होणार नाही. हा शब्द आहे माझा..