" आई आले मी बघ कुठे आहेस तू "
एक अकरा वर्षाची मुलगी शाळेतून आल्या आल्या आपल्या आईला आवाज देत होती...
तिची आई " आध्या किती तो गोंगाट जरा शांत पणे आवाज देता नाही येत का..."
आध्या " अग आई तुला माहीत आहे मला शाळेतून आल्या आल्या तू डोळ्यासमोर हवी असते..."
आई " आता काय लग्न झाल्यावर पण मला डोळ्यासमोर ठेवणार आहेस का..."
आध्या " काय ग आई मी अजून लहान आहे कशाला या छोट्याशा जीवाचा जीव घेतेस..."
आई " काहीही नको बडबड करुस चल आता जेवायला वाढते..."
आध्या " हो आलेच मी दहा मिनिटात फ्रेश होऊन..."
( आध्या शिंदे ही कथेची नायिका , दिसायला खूप सुंदर टपोरे पाणीदार काळे डोळे , पोपटासारखे नाक , कंबरेपर्यंत काळेभोर केस... दिसायला इतकी सुंदर असली तरी तिला आपल्या सुंदरतेचा कधी माज नव्हता , तिचा स्वभाव पूर्ण साधा सरळ तिला तसचं राहायला आवडायच कधीही ती कोणत्याही गोष्टीत मोठेपणा दाखवत नसे... तिचं राहणीमान ही साधं होत... ती आता पाचवीत शिकत होती... तिचं कुठुंब एक मध्यमवर्गीय होत कुठुंबात तिची आई कल्पना शिंदे गृहिणी , बाबा विश्वास शिंदे सरकारी नोकरीत ऑफिस मध्ये कामाला होते... तिचे बाबा तिच्या अभ्यासाविषयी खूपच कडक होते , कधी प्रेम तर कधी ती चुकल्यावर मात्र तिला तिच्या बाबांच्या रागाचा सामना करावा लागायच्या... ती कधी वाईट वागू नये म्हणून त्यांना तस रहावं लागयच... भाऊ कल्पेश शिंदे सहा वर्षाचा लहान पाहिलीत शिकायला होता , या भाऊ बहिणीच भांडण एकदा भांडले की कधी थांबायचे नाही... यांना सांभाळता सांभाळता कल्पना यांना नाकी नऊ यायचं... )
थोड्या वेळाने आध्या फ्रेश होऊन जेवायला आली...
तिच्या आईने आधीच जेवण वाढवून ठेवलं होत , त्या तिचीच वाट बघत डायनिंग टेबलवर बसल्या होत्या...
आध्या डायनिंग टेबलवर येऊन बसली...
आध्या " आई भरव ना..."
कल्पना आई " लहान आहेस का तू आता..."
आध्या " हो..."
कल्पना आई " मला काम आहेत तुझ्याच हाताने खा..."
आध्या लाडात " आई प्लीज..."
कल्पना आई घास तिच्या पुढे करत " तू काही ऐकणार नाहीस घे खा..."
आध्या खात खात " तुझ्या हाताने खायला छान वाटत , असा चान्स रोज नाही भेटत ना..."
कल्पना आई " हो हो नाटक पुरे आता... खाऊन झाल्यावर अभ्यासाला बस नाही तर माहीत आहे बाबा कसे आहेत..."
आध्या " हो... आई एक प्रश्न विचारू..."
कल्पना आई " विचार..."
आध्या " बाबा असे का वागत असतात कधी प्रेम कधी राग , नक्की बाबांचं माझ्यावर प्रेम आहे ना ?..."
कल्पना आई " आता अस विचारल परत नको विचारू समजल... बाळा ते तुझे वडील आहेत आणि खूप प्रेम आहे तुझ्यावर त्यांचं एक वडिलांना काय वाटत आपल्या मुलाची चांगली वागणूक , चांगले संस्कार व्हावेत म्हणून ते काळजी करत असतात... जर प्रेमच करत , लाड करत राहिले असते तर आता तू वाईट वागली असती... तुला वाईट वागणुकीवर नाव ठेवू नये म्हणून ते कधी कधी चूक झाल्यावर कट्टर होतात... समजल आता..."
आध्या " हो समजल आता मी खूप शिकून मोठी होणार आपल्या पायावर उभी राहणार... माझ्याकडून चूक होऊ नये म्हणून पुरेपूर प्रयत्न करेन..."
कल्पना आई " शाब्बास आता कस... जा आता अभ्यास कर..."
आध्या " हो..."
आध्या आपल्या रूम मध्ये अभ्यास करण्यासाठी निघून गेली...
आणि कल्पना आई आपल्या कामाला...
क्रमशः
© भाग्यश्री परब
यात काही चूक असल्यास माफी असावी....