Prema, your color is new ... 21 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | प्रेमा तुझा रंग नवा... २१

प्रेमा तुझा रंग नवा... २१

त्या मुलीचं बोलण ऐकून त्या माणसाचं डोकं फिरल होत , तस त्याने रागातच आपल्याकडची बंदूक काढून एक गोळी हवेत चालवली....


नंतर तो काही बोलणार तेवढ्यात त्याच्या डोक्यावर मागून कोणी तरी वार केला तस खाली बेशुद्ध होऊन पडला.....


पुढे...


आरोही त्या माणसाला पडलेलं बघून त्याच्यावर एक नजर टाकून बाकीच्यांकडे बघत " चला या कचऱ्याला उचलून ( एके ठिकाणी हात दाखवत ) तिथे फेकून देऊ..."


तश्या सगळ्याजणी तिला सॅल्युट करून एक सुरात " येस मॅम...."


आरोही च न घाबरता संकटांना हसत हसत लढण बघून तिथे असलेल्या मुलीला चांगलीच हिम्मत आलेली.... आरोही होतीच तशी भलेही तिने दुःख सोसल असल तरी ती त्या दुःखाला कवटाळून न बसता त्या दुःखाला ती हसतच सामोरे गेली.... म्हणून ती आता न घाबरता आता आलेल्या संकटांना सामोरे जात होती आणि सोबतच त्या मुलींना पण शिकवत होती की संकटांना घाबरून काही होणार नाही आपल्याला लढावं लागेल यातून बाहेर पडाव लागेल...


आरोही जशी कणखर होती , तशीच ती बिंदास्त आणि अल्लड ही होती...


त्या मुलींचं असा प्रतिसाद बघून आरोही गोड हसली आणि दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवून " इश्श , मला लाज येतेय...."


तिचा असा नौटंकीपणा बघून तर रिया ने डोक्यावरच हात मारून घेतला.... इथे सगळ्या मुली तिला शॉक होऊन गालात हसत होत्या....


आणि रिया ही कधी नाही सुधारणार अश्या अविर्भावात तिला बघत होती....


रिया तिला रोखून बघत " आरु बाळा तुझी नौटंकी संपली असेल तर , आपण आपल काम करायचं का...."


रियाच ऐकुन आरोही " हो , हो... चला या ( त्या पडलेल्या माणसाकडे बघत ) कचऱ्याला तिथे ठेवू आणि आत येईल त्यांना कोणाला दिसणार नाही अस बसू , म्हणजे त्यांना शंका नाही येणार आणि असच करून एका एका कचऱ्याला गोळा करू.... मग सगळे कचरे गोळा झाल्यावर आपला रस्ता मोकळा...."


रिया तिच अस सारख मगापासून तेच तेच ऐकुन वतागली होती... ( कारण जेव्हा आरोही ने प्लॅन सांगून झाल्यावर सगळ्यांनी डन करून थोड शांत झालेले , पण आरोही काही शांत बसली नाही ती सारखं सारखं त्या सगळ्या जणींना समजावून सांगत होती आणि या मुली तिला हो ला हो करत होत्या... पण रिया खूपच वैतागली होती तिच तेच तेच समजावून सांगणे.... त्यामुळे रियाची खूपच चिडचिड होऊ लागली....) तस रिया तिला चिडून " हो... हाच प्लॅन आहे आपला माहिती आम्हाला , अस रिपीट रिपीट करून आमचे कान का वाजवते आहेस.... आणि हे तू सारखं कचरा का बोलत आहेस यांना ?....."


आरोही रिया ला हसून इंनोसेंट फेस करून " मी ढोल ताशा वाली कुठे आहे तुमची कान वाजवायला काहीही काय बोलतेस रीयु बेबी.... आणि मी यांना कचरा बोलतेय कारण यांना गुंड नाव नाही शोभत , या कचऱ्यांपेक्षा ते गुंड शोभले बाबा ते कसे बांधून एकाच जागी ठेवतात काहीच काम नाही सांगत बघ , आणि जास्त नाही मारत बघ आणि यांनी तर डायरेक्ट काम करायला लावल आणि वरून किती मारल त्या लेडी कचरे वाली ने एकदा हातात येऊ दे बघतेच तिला...."


( 😲😵 आरोही आणि आरोही च डोकं... 🤦 हे बाई नाही सॉरी सॉरी ( मी बाई बोललेल बघून ही आरोही माझी हालत खराब करायची बाबा ) हे पोरगी एक त्याला बांधलेलं असेल , वरून धमकी देऊन त्याला गप्प केलं असेल मग तो शांतच राहील की घाबरून , मग त्यांना हात साफ करायची जास्त मेहनत नाही घ्यावी लागणार ना....🙄)


रिया तर तिचं ऐकुन कुठेतरी तिला डोकं आपटावस वाटत होत...


रिया आणखीच चिडून " हे मूर्ख मुली तुला आणि तुझ्या डोक्याला इथूनच प्रणाम...."


आरोही आशीर्वाद द्यायची अक्टिंग करून " तथास्तु बालिके...."


हीची नौटंकी बघून रिया तर डोक्यावरच हात मारून घेतला.....


रिया " तू काय सुधारायची नाही... चल आता पुढचं प्लॅन वर्क करू...."


रियाच्या बोलण्यावर सगळ्यांनी पुढचा प्लॅन वर्क केला....


सगळ्यांनी मिळून त्या माणसाला उचलून एका कोपऱ्यात नेऊन ठेवलं आणि कोणाला तो माणूस दिसणार नाही अस ते बसले.....

इथे निखिल च्या घरी....


निखिल ची बेडरूम................


निखिल ऑफिस मधून आल्यावर फ्रेश होऊन बाल्कनीत एका चेअर वर बसून कॉफी पीत कोणाशी तरी बोलत होता....


निखिल पलिकडच्या व्यक्तीला " पार्थ उद्या ऑफिस मध्ये ये भेटायला मला तुझी हेल्प हवी आहे...."


( पार्थ कोण आहे ते कळेल नंतर.... आणि त्याची नौटंकी पण आरोही च्या तोडीस तोड आहे हा.... कळेल नंतर 🤭...)


पलीकडून पार्थ " ओके बॉस , मी नक्की येईन तुमची ऑर्डर फॉलो करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे...."


इथे निखिल ने डोक्यावर हात मारून मनातच " आरोही काय कमी होती का , की हे सुरू झाल.... आरोही यार खूप आठवण येत आहे तुझी लवकर भेट ग मी पण प्रयत्न करतोय तुला शोधण्याचा...."


निखिल मनातच बोलत होता , त्याला भानच नाही राहील की समोर पार्थ बोलतोय ते नंतर पार्थ च्या मोठ्या आवाजाने तो भानावर आला " हो बॉस कोणत्या विश्वात निघून गेलात आम्हाला सोडून...."


निखिल " तुझी नौटंकी काय संपायची नाही... ये उद्या ऑफिस मध्ये... चल आता ठेवतो काम आहेत मला...."


पार्थ " म्हणजे मी काय रिकामा वाटलो का...."


इथे निखिल चिडून आवाज वाढवत " तुझ्या तर ...."


निखिल ला चिडलेल बघून पार्थ " ओके ओके सॉरी भेटू उद्या आपण... बाय ठेवतो फोन...."


पार्थ ने बोलून लगेच फोन कट केला... इथे निखिल पण फोन ठेवून काम करत बसला.....


दुसऱ्या दिवशी निखिल फ्रेश होऊन , नाष्टा वैगरे करून ऑफिस ला निघून जातो.....


निखिल काम करत मनातच " आता काहीही करून आरोही ला शोधून काढेन.... मी वचन दिले आहे तिच्या बाबांना की आरोही ची काळजी घेणार , तिला काही होऊ देणार नाही.... काश मी त्यादिवशी अलर्ट असतो तर आरोही आता माझ्या सोबत असती तेही हॅप्पी हॅप्पी.... तिच्या बाबांनी जे काही सांगितलं होत ते तर खूपच अवघड होत एक वाईट गोष्टी मुळे एका नात्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यात आरोही ला किती काय सोसावं लागलं....तरीही ती या संकटांना सामोरे गेली हसत हसत.... म्हणूनच मी तुझ्या प्रेमात पडलो आरु.... आता तुला लवकरच शोधून माझं प्रेम व्यक्त करेन , मला माहित आहे तुझ पण माझ्यावर प्रेम आहे... मी बघितल आहे तुझ्या डोळ्यात..... उफ आरोही आय लव्ह यू...."


निखिल मनात बोलत असताना डोअर च्या नाॅक ने भानावर येत " येस कम इन...."


निखिल ने परमिशन दिल्यावर पार्थ आत आला आणि निखिल च्या समोरच्या चेअर वर बसत " काय बॉस कोणत्या स्वप्न नगरीत रमला होता ?....( एक भुई उंचावत ) वहिनीच्या का हा....."


( चला पार्थ ची ओळख करून घेऊ.... तर हा आहे पार्थ देशमुख , दिसायला हँडसम एकदम ( पुढे काही नाही लिहिणार एक हँडसम मध्येच खूप काही येत 😁 ).... खूप मेहनत करून एक पोलिस ऑफिसर बनला.... याच्या घरी त्याचे आई , बाबा आणि हा हे तिघेच राहतात.... तर हा निखिल चा लहानपणापासून चा मित्र.... दोघेही प्रत्येक गोष्टीत मदत लागली की लगेच धावत येतात.... मग आता निखिल ने मदत मागितली आणि तो नाही येणार अस होईल का.... निखिल ने बोलावलं आणि दुसऱ्या दिवशी बंदा हाजिर.... पार्थ समजूतदार असला तरी कुरापती आणि दुसऱ्यांना हसवण्यात माहीर आहे 🤭.... ते तर पुढे समजेलच.....)


निखिल " तुला काय करायच आहे रे..... मी तुला कामासाठी बोलावलं आहे... अश्या नसत्या चौकश्या नको करू समजल...."


पार्थ नाटकी रुसत " ह.... दोस्त दोस्त ना रहा.... एका हँडसम ऑफिसर ला ओरडतो आहेस शरम नही आती क्या तुम्हे...."


निखिल " लाज असती तर बोललो नसतो समजल...."


पार्थ " ओके ओके , वोर्क टाल्क.... अनी प्रोब्लम...."

निखिल कपाळावर आठ्या पाडत " पार्थ , तू आणि तुझी इंग्लिश ओह गॉड.... तुझी अशी इंग्लिश ऐकुन ना ते इंग्रज परत यायचे भारतात , आणि त्यांना ना ' इंग्लिश चेंज ' मोर्चा काढावा लागेल.... काय रे तुला चांगली इंग्लिश येते ना का त्या बिचाऱ्या इंग्लिश ची वाट लावत आहेस... "

पार्थ " येऊ दे की त्या इंग्रजांना थोडा अनुभव येईल महायुद्धाचा 😉.... त्यांनी मोर्चा काढला तर काढू दे मे अकेला ही काफी हू उनके लिये.... वाटलस तर अजुन दहा पंधरा जणांना माझ्या स्टाईल ची इंग्लिश शिकवून माझ्या सोबत लढायला घेऊन जाईल...."

निखिल " हो का , पण त्यांना का शिकवणार ते असेच पण येऊ शकतात ना लढायला...."

पार्थ " अरे त्यांना भाषेने पण लढायला यायला पाहिजे ना , ते जर माझी इंग्लिश सोडून त्यांची इंग्लिश बोलले तर मला उदास फिल येईल अस वाटेल ते त्यांच्या साईड ने आहे....हा जर ते माझ्यासोबत नसेल तर तू आहेस की माझा जिगरी दोस्त...."

निखिल तर पूर्ण सुन्न झाला त्याच बोलण ऐकून....

निखिल " हे तुझ्या अश्या फालतू कामात मला नको आणू ..... तू आणि तुझी इंग्लिश तुम्ही बघून घ्या...."

पार्थ " झाल कल्टी मारलीस वाटलच मला...."

निखिल " तुझे गुणगान नको सांगू , मला हेल्प करायला आला आहेस तू हे नको विसरू...."

पार्थ " हो , बोल काय हेल्प पाहिजे तुला...."

निखिल " हा , तर....."

क्रमशः

©® भाग्यश्री परब

सॉरी पार्ट लेट झाला आणि थोडा छोटा आहे त्यासाठी....
एक प्रॉब्लेम गेला की दुसरा प्रॉब्लेम येत त्यामुळे मन लागत नव्हत म्हणून पार्ट थोडा लेट झाला आहे.... समज लो थोडा....
यात काही चूक असल्यास माफी असावी.....


🥰 Stay happy 🥰
😍 Take care 😍

Rate & Review

Be the first to write a Review!