सगळ्यांचा होकार समजून ती तो बटण दाबते आणि कसला तरी आवाज येतो तसे सगळे अवाजाच्या दिशेने बघतात तर आरोही , रिया आणि बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल येते...
पार्थ पोलीस स्टेशन वरून लगेच आपल्या घरी आला.
पार्थ आपल्या स्टडी रूम मध्ये समोरच्या टेबलावर असलेल्या त्या बॉल ला एकटक बघत होता..
तेवढ्यात त्याच्या फोनची ट्यून वाजते तस तो विचारातून बाहेर येत फोन मध्ये एक फोटो बघतो तर त्याच्या चेहऱ्यावर विचित्र एक्स्प्रेशन असतात... आणि तो काही तरी आठवण्याचा प्रयत्न करतो , नंतर जस त्याला आठवत तस त्याचे डोळे विस्फारतात...
पार्थ लगेच वेळ न घालवता कोणाला तरी कॉल करतो..
कॉल उचल्यावर पलीकडून " हॅलो..."
पार्थ " हॅलो , मी तुला एक फोटो पाठवत आहे त्याची सगळी माहिती पाहिजे उद्या सकाळपर्यंत... ओके..."
पलीकडून " ओके सर... उद्यापर्यंत भेटेल माहिती तुम्हाला..."
एवढ बोलून दोन्ही कडून फोन कट होतो...
पार्थ फोन ठेवल्या ठेवल्या लगेच निखिल ला कॉल करतो..
इथे निखिल फ्रेश होऊन आल्यावर त्याच्या फोन वाजतो तो फोन वरच नाव बघतो तर पार्थ चा असतो , पार्थला माहिती भेटली असेल म्हणून निखिल लगेच कॉल उचलून " हॅलो..."
पलीकडून पार्थ " हॅलो निखिल..."
पार्थ पुढे काही बोलणार तर निखिल त्याला मध्येच अडवत " भेटली माहिती पार्थ , कोण आहे तो ज्याने डॅड ला मारण्याचा प्रयत्न केला..."
पार्थ " हे एक्स्प्रेस जरा ब्रेक मार श्वास घे जरा... हो भेटली आहे माहिती पण..."
निखिल परत मध्येच अडवत " पण.. पण काय पार्थ बोल पटकन..."
पार्थ " तू बोलू देणार तर ना.. आता एकदम गप्प बसायच समजल , मध्येच बोललास ना तर बघ संगणारच नाही काही.... सो शट युअर माऊथ अँड जस्ट लीसन ओके..."
निखिल " ओके बोल... " ( निखिल शहाण्या बाळसारख गप्प काय माहीत पार्थने काही सांगितल नाही तर..)
पार्थ " हो.. माहिती भेटली पण जो फोटो भेटला आहे त्यावर माझा विश्वास बसत नाही आहे त्यामुळे ते कन्फर्म करण्यासाठी मी एका माणसाला कामाला लावल आहे... तर आता आपल्याला उद्याची वाट बघावी लागेल... तोपर्यंत अजुन काही भेटत का ते शोधण्याचा प्रयत्न करेन..."
निखिल " हम... ठीक आहे , मी तो फोटो बघू शकतो का..."
पार्थ " हो... पाठवतो मी फोटो..."
निखिल " हा... चल ठेवतो मी आता फोन काम पडली आहेत खूप... "
पार्थ नाटकी पणे " दोस्त दोस्त ना रहा..."
निखिल आठया पाडत " तुला काय झाल आता मध्येच..."
पार्थ " काम झाल की लगेच मित्राला विसरायच... ये नाइंसाफी है साहब..."
पार्थ च ऐकुन निखिल कपाळावर हात मारत " तुझी नौटंकी दुसऱ्याला दाखव , तीन दिवस काम पेंडींग राहिली आहेत तेच मला पूर्ण करायच आहे... एकीकडे आरु पर्यंत कस पोहोचायच त्याच्या शोध पण चालू तू आहे म्हणून अर्ध टेन्शन कमी होतय नाही तर माझी हालत खराब झाली असती..."
पार्थ " अरे ये पार्थ है तो टेन्शन की क्या बात... लवकरच आपण वहिनी पर्यंत पोहोचू बस त्या फोटो बद्दल कन्फर्म होऊ दे..."
निखिल " हो.. आतापर्यंत माझ्या आरूने आपल अर्ध काम पूर्ण केल असेल...."
पार्थ " व्हॉट कस काय?..."
निखिल " कळेल नंतर समोरासमोर आल्यावर.. आता मला काम करू दे चल बाय..."
पार्थ पुढे काही बोलणार निखिल ने लगेच कॉल कट केला...
पार्थ कट झालेला फोनकडे बघत स्वतःशीच " असा कसा हा... चलो कोई बात नही आता वहिनी कशी आहे ते समोर आल्यावरच कळेल... चलो पार्थ बाबू काम को लगो...."
पार्थ ने त्या माणसाच फोटो सेंड करून कामाला लागला...
गीता रागात कोणाला तरी फोन करते पण पलीकडून फोन उचलला जात नाही , तरीही ती खूप वेळा फोन करते..
शेवटी पलीकडून फोन उचलला जातो..
पलीकडची व्यक्ती रागात गीता ला काही बाही बोलत असते " तुला मला फोन करायची हिम्मत कशी झाली , मी बोललो ना आपल नात संपल आहे..."
गीता पण तेवढ्याच रागात त्या व्यक्तीशी बोलत असते " मला मारायची हिम्मत कशी झाली तुझी , आता तर मी खरच तुला सगळ्या जगासमोर आणणार आहे... आता बघच तू ही गीता काय करते ते..."
( हे दोघ बोलत असताना बाहेर कोणी तरी लपून उभ असतो... आणि तिथेच बाजूच्या टेबलावर असलेल्या लॅंडलाईनवर या दोघांच बोलण ऐकत असत... हो कारण गीता ने स्वताच्या फोन वरून केला पण त्या व्यक्तीने फोन उचलला नाही म्हणून तिने बेडरूम मध्ये असलेल्या लॅंडलाईनवर फोन केला.. )
पलीकडून " तू अस काहीच नाही करायच समजल नाही तर मी अस काही करेन ना की तुझी इमेज च खराब होईल..."
गीता " काय करणार आहेस तू हा ?..."
पलीकडून " मी आपण रात्रीचे एकमेकांसोबत असलेले व्हिडीओ वायरल करणार.... मग बघ पुढे काय होत ते..."
गीता न घाबरता त्या व्यक्तीला " कर तुला काय करायच ते मी तुझ खर रूप तर समोर आणणारच...."
एवढ बोलून गीताने फोन कट केला...
पण बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला यांच बोलण ऐकून जळफळाट होत होता आणि सोबत आश्चर्य ही वाटल.. ती व्यक्ती मनात " हा जिवंत कसा याला तर मी.."
ती व्यक्ती स्वतःला नॉर्मल करत हॉल मध्ये आली आणि तिथूनच ओरडून गीता ला आवाज दिला.. तशी गीता राग कंट्रोल करून बेडरूम मधून हॉल मध्ये येत त्या व्यक्तीला हसून " विजय आलात तुम्ही खूप लेट केलात... फ्रेश होऊन या मी जेवण वाढते..."
एवढ बोलून गीता किचन मध्ये निघून गेली.. इथे विजय रागात मुठी आवळून फ्रेश व्हायला निघून गेला...
निखिल पार्थ ने पाठवलेला फोटो निरखून बघत होता.. तो मनात " यांना कुठे तरी बघितल्या सारख वाटत आहे , कुठे बघितल आहे मी... "
निखिल मेंदू ला जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काही आठवत नाही... शेवटी थकून उद्या बघुया म्हणून ते विचार झटकतो आणि पूर्ण लक्ष कामावर ठेवतो....
आरोही आणि रिया असतात त्या घरात...
ते बटन दाबल्याने कसला तरी आवाज येतो तसे सगळे त्या आवाजाच्या दिशेने बघतात तर त्यांच्या चेहऱ्यावर मोठ हास्य पसरत...
ते बटन दाबल्याने त्या दरवाज्यासमोर असलेला अंधार प्रकाशाने उजळला होता आणि तिथेच आणखी एक बंद दरवाजा उघडल्याने त्याचा आवाज सगळ्यांना ऐकु गेला...
आरोही त्या दरवाज्यासमोर जात " बर झाल आपण या अंधारात नाही गेलो नाही तर डोक फुटल असत..."
रिया तिच्या बाजूला येत खांद्यावर हात ठेवून " ही तुमची कृपा समजायची..."
रिया च्या बोलण्याने आरोही आपली कॉलर टाईट करत हसून तिच्या कडे बघते , रिया पण हसून आरोही कडे बघते...
आरोही रियाने खांद्यावर ठेवलेला हात खाली घेत मागे वळून सगळ्यांकडे बघत " चला निघायच का आता आपला रस्ता खुल्ला झाला आहे..."
तसे सगळे एकसुरात " हो " बोलतात....
आरोही , रिया पुढे जाऊन बाकीच्या मुली या दोघींच्या पाठोपाठ चालू लागतात.. काही अंतर पुढे गेल्यावर तिथे आणखी एक दरवाजा असतो..
आरोही कपाळावर हात मारत " इस मुसीबत को हमसे प्यार हो गया लगता है , जब देखो तब पागलो की तरह हमारे पीछे पीछे आती है..."
अचानक त्यातली एक मुलगी ओरडून बोलते " ताई तुझ्या बाजूच्या भिंतीवर बघ काय आहे..."
त्या मुलगी बोलली तस आरोही बाजूला बघते तर तिथे चार बटन असत ते बघितल्यावर तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते.. आरोही त्या मुलीला " अरे व्हा मेरी जान गूड..."
आरोही त्या बटना कडे बघत विचार करते " यातल कोणत असेल या दरवाज्याच बटन.. "
तिला विचार करताना बघून रिया तिला " अग कसला विचार करत आहेस दाब..."
आरोही " अग थांब इथे तीन बटन आहेत यातल कोणत आहे ते बघतेय..."
रिया " दाब ना कोणत पण..."
आरोही तिला बारीक डोळे करून रोखून बघत.. आरोही ला आपल्याकडे अस बघताना बघून रिया गप्प बसत " कर तुला काय करायच ते..."
आरोही " हा.." बोलून त्या बटनाकडे बघून विचार करते.. खूप विचार करून झाल्यावर ती दुसर बटन दाबते पण चुकून तिच्याकडून तीसरही बटन दाबले जाते...
बटन दाबल्यावर दरवाजा उघडण्याचा आवाज येतो आणि सगळे समोर बघतात तर सगळ्यांचे डोळे मोठे होतात सोबत त्यांच शरीरही कापत असत....
क्रमशः
©® भाग्यश्री परब