आज दीक्षा सावंत चा कॉलेज मध्ये पहिला दिवस होता... ती दिसायला खूप सुंदर आणि हुशार होती... हुशार तर पण सोबत स्वार्थीही होती.... तिला वाटत होते की स्तुस्ती फक्त माझीच व्हावी बाकी कोणाची नाही , प्रत्येक गोष्टीत तिच्या अंगात ॲटीट्यूड भरलेला असायचा.....
तिला सगळ काही ब्रँडेड हव होत अगदी कॉलेज सुध्दा....
नाशिक च्या सर्वात टॉप शाळेत तिने दहावी पूर्ण केली , नंतर तिच्या वडिलांची बदली मुंबईत झाली त्यामुळे त्यांना मुंबईत याव लागल.... तिचे वडील महेश सावंत एका टॉप कंपनीचे सीईओ आहेत त्यामुळे त्यांना पैश्याची कधी कमी नाही पडली.... तिचे वडील महेश दिक्षाला कधीच कशात कमी पडू दिली नाही , दीक्षा वडिलांची लाडकी त्यामुळे तिला जस पाहिजे तस ते करू देत होते आणि दीक्षा मुळात हुशार असल्यामुळे काही शंका नव्हती....
पण माणसाला एखाद्या गोष्टीची सवय लागते हे त्यालाही समजत नाही , आपण काय चूक काय बरोबर आहे हे बघतच नाही आणि नकळतपणे समोरच्या माणसाला दुखावून बसतो....
असो आज तिचा चा कॉलेज मध्ये पहिला दिवस.... मुंबईच्या एका नामांकित कॉलेज च्या गेटसमोर एक पॉश कार येऊन थांबली आणि मागचा दरवाजा उघडून एक मुलगी ॲटीट्यूड मध्ये उतरून समोर कॉलेज वर नजर टाकत ॲटीट्यूड मध्येच चालत गेटच्या आत तिने एंट्री केली....
तिने आजुबाजुला बघितल तर सगळे तिच्या कडेच आ वासून बघत होते.... बघणारच दिसायला च ती इतकी सुंदर होती आणि तिची पर्सनालीटी बघता कोणाची पण नजर राहून राहून तिच्या वरच येईल अशी होती....
सगळे तिलाच बघत आहे म्हणून तिला चांगलच वाटत होत तिच्या मनात येऊन गेल की माझ्यापेक्षा अशी सुंदर आणि हुशार मुलगी कोणी नाही....
ती चालत च असताना मध्येच एक मुलगा तिला अडवतो...
तो मुलगा आपला उजवा हात पुढे करत " हाय आय एम निल...."
ती मुलगी त्याला वरून खालून न्याहाळत तोंड वाकड करत " डाऊन मार्केट...." बोलून त्याला इग्नोर करून पुढे निघून जाते.... कारण तो तिच्या लेवल चा नव्हता ना....
ती त्याला इग्नोर करून सरळ प्रिनसिपॉल च्या कॅबिन जवळ येते....
कॉलेज च्या एका साइडला चार पाच जण नवीन आलेल्या एका मुलाला त्रास देत होते....
त्यातला एक मुलगा त्या मुलाच्या समोर येऊन उभ राहत गूढपणे हसत " मी सांगतो ते करायच नाही केलस तर माहीत आहे काय होणार ते...."
तो मुलगा घाबरत " ह... ह... हो...."
त्या मुलाला हो बोलल्याशिवाय काही ऑप्शन नव्हत त्याला माहीत होत पुढे आपल काही खर नाही....
त्याला अस घाबरलेल बघून तो आणि त्याचे फ्रेंड जोरजोरात हसू लागले....
तो मुलगा त्या मुलाला " गुड... तर तुला तुझी बॅग आहे ती डोक्यावर ठेवून मुलीसारख नाचायच आहे.... बॅग ला हात न लावता..... समजल...."
तो मुलगा हो अशी मान हलवत घाबरतच आपली बॅग डोक्यावर ठेवतो आणि नाचायला सुरुवात करतो...
त्याला अस नाचताना बघून ते पोट धरून हसत होते... आजूबाजूचे पण काही विद्यार्थी हसत होते आणि काहींना खूपच राग येत होता पण ते काहीच करू शकत नव्हते....
तो आपल हसू थांबवत त्या मुलाला काही बोलणार तर त्याचा एक मित्र घाबरतच त्याला " वंश तुझे डॅड..."
वंश त्याच्या डॅड ला बघतो तर ते कोणाशी तरी बोलत उभे होते त्यांच लक्ष इथे नव्हत म्हणून वंश घाईतच आपली बॅग उचलतो आणि त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवत त्याची कॉलर नीट करत हळू आवाजात "कोणाला काही आमच्याबद्दल सांगितलस ना नंतर तू आणि मी आहे समजल...."
आणि त्याच्या डॅड च लक्ष इथे यायच्या आधी पटकन तिथून सटकतो....
इथे दीक्षा दारावर नॉक करत " मे आय कम इन सर..."
आतून " येस कम इन..."
दीक्षा आत येत समोरच्या चेअरवर बसत " सर माय नेम इज दीक्षा महेश सावंत.... न्यू ॲडमिशन...."
सर " हो ओळखतो मी तुला महेश ची मुलगी ना प्रत्येक क्लास मध्ये टॉप केल आहेस...."
सरांनी तिची स्तुती केली म्हणून तिला एकदम हवेत उडल्याची फिलिंग येत होती पण तिने तस न दाखवता नॉर्मली हसून " ह... सर तुम्ही माझ्या डॅडना ओळखता...."
सर " हो ओळखतो म्हणजे काय आम्ही मित्र आहोत कॉलेजपासून.... कधी कधी भेट होते... कधी भेटला तर तुझ्याबद्दल च बोलत असतो एकदा फोटो पण दाखवला फोटोत इतकी छान दिसतेस तर खऱ्या मध्ये कशी दिसत असेल... तुझे इतके गुणगान ऐकुन माझी इच्छा होती तू आमच्या कॉलेज मध्ये शिकायला याव आणि बघ आता इच्छा पूर्ण झाली.... "
दीक्षा हसत " थँक्यू सर...."
सर " अरे थँक्यू कशाला मी तुला बोलायला हव थँक्यू...."
दीक्षा " नाही सर तुम्ही माझ इतक कौतुक केल छान वाटल म्हणून थँक्यू...."
सर " आता हुशार मुलीच कौतुक करायलाच हव ना.... असो तुला काही मदत लागली अडचण वैगरे आली तर सांग बिंधास्त.... "
दीक्षा चेअर वरून उठत " हो सर थँक्यू...."
सर " हो तुला राम ( पियून ) तुझ क्लास दाखवेल....( राम जोरात आवाज देतात ) राम...."
तसा राम कॅबिन मध्ये येत " येस सर...."
सर दीक्षा कडे बघत " हिला अकरावी च क्लास दाखव..."
राम " हो.... ( दीक्षा कडे बघत ) चला...."
एवढ बोलून राम पुढे निघून जातो... दीक्षा पण सरांना थँक्यू बोलून त्याच्या मागे निघून जाते.....
क्रमशः
- भाग्यश्री परब