वंश आणि त्याचे मित्र क्लास मध्ये येतात... वंश दुसऱ्या बँच वरच्या दोन मुलांना उठायला सांगतो पण ते काही ऐकत नाही....
ते दोघ नवीन असल्याने त्यांना माहीत नसत वंश च वागण.... तो असा जबरदस्ती करून उठवत असल्याने ते दोघ त्याच काही ऐकत नाही... वंश ला त्या दोघांनी ऐकल नाही म्हणून खूपच राग येतो आणि रागातच त्यातल्या एका जणाची कॉलर पकडून एका झटक्यात त्याला उभ करत त्याच्या डोळ्यात डोळे घालून " माझ कोणी नाही ऐकेल अस कोणी जन्माला नाही आल आहे... गप्प पणे माझ ऐकायच इथून उठायच आणि दुसरीकडे बसायच समजल.... "
वंश चा रुद्र अवतार बघून ते दोघ गपगुमान तिथून उठतात आणि दुसऱ्या जागेवर जाऊन बसतात....
सगळे गप्प झालेले बघून वंश आणि त्याचे मित्र काही ना काही मस्ती करत असतात मध्येच विचित्र आवाज काढणे , कोणाच्या डोक्यात टपली मार वैगरे असले उद्योग करत होते... त्यांना वैतागून एक हुशार मुलगा त्यांच्या जवळ येत बोलतो " हे बघा तुम्हाला जे काही करायच आहे ते बाहेर जाऊन करा इथे अभ्यासात त्रास होतोय...."
त्या मुलाच्या बोलण्याने वंश रागात त्याची मान पकडुन जोरात दाबतो आणि त्याच्या कानाजवळ जात थंड आवाजात " मघाशी ट्रेलर दाखवला ते बघितल नाही का , की लक्ष भलतीकडे होत... "
तो पुढे काही बोलणार तर सरांची येण्याची चाहूल लागली तस वंश ने पटकन त्या मुलाची मान सोडून त्याला राखून बघत " सरांमुळे वाचलास भेट एकांतात मग दाखवतो पूर्ण पिक्चर...."
एवढ बोलून वंश लगेच जागेवर जाऊन बसला आणि बाकीचे पण आपापल्या जागेवर जाऊन बसले....
क्लास मध्ये सरांची एन्ट्री झाली तसे सगळे उभे राहून सगळ्यांनी सरांना विश केल फक्त वंश ॲटीट्यूड मध्ये बसून होता....
सरांनी ते बघितल त्यांना राग तर आलेला पण ते काही करू शकत नव्हते , त्यांना माहीत होत वंशचा स्वभाव त्यांनी काही बोलल असत तर आणखी काही विपरीत घडून बसले असते म्हणून गप्प राहणेच चांगल आहे अस त्यांना वाटल.....
सरांनी सगळ्यांना बसायला सांगून शिकवायला सुरुवात केली....
इथे एस. आर इंडस्ट्री मध्ये...
एक मॅनेजर दारावर नॉक करत " मे आय कम इन सर.."
आतून " येस , कम इन..."
परमिशन भेटल्यावर मॅनेजर आत येतात...
आत त्यांना बसायला सांगून बोलण्याचा इशारा करतात...
तस मॅनेजर बोलू लागतो " सर ही एन.के इंडस्ट्री ची फाईल एकदा चेक करून बघा...."
" ओके... चेक करून पाठवून देतो...."
मॅनेजर " हो " बोलून त्यांचा निरोप घेऊन निघून जातो....
ते फाईल हातात घेतात तेवढ्यात त्यांना एका नंबर वरून फोन येतो....
फोन उचलल्या पलीकडची व्यक्ती " मिस्टर सिध्दार्थ...."
( मि. सिध्दार्थ राणे एस. आर इंडस्ट्री चे सर्वसेवा यांनी खूप मेहनत करून यांची कंपनी टॉप थ्री मध्ये आणली... यांची पहिली पत्नी बाळाला म्हणजेच एक मुलगा जन्म देताच सोडून गेली... त्या मुलाला कोणी सांभाळायला हव म्हणून त्यांनी दुसर लग्न केल त्यांच्या दुसऱ्या पत्नीच नाव रामेश्वरी... रामेश्वरी ना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन मुल आहेत.... रामेश्वरी चा स्वभाव , मुलांच नाव , आणि ते कसे आहेत हे कळेल हळूहळू....)
सिध्दार्थ " हो बोला...."
पलीकडून " ..................."
पलीकडची व्यक्ती काही तरी सांगत असते तस त्यांच्या चेहरा लालबुंद होत होता.....
सिध्दार्थ रागातच " बघतो मी त्याला....."
बोलून झाल्यावर ते लगेच फोन ठेवून देतात आणि रागातच आवरत स्वतःशीच " खूप झाल त्याच आज काय ते सोक्षमोक्ष होईल.... खूपच वैतागून ठेवल आहे त्याने...."
एवढ बोलून ते झपाझप पावले टाकत निघून जातात.....
इथे कॉलेजमध्ये....
वंश सर शिकवत असताना वेगवेगळे आवाज काढून त्याच त्रास देण चालू होत... त्याला काहीच फरक पडत नव्हता की कोणाला त्रास होतय ते जणू काही स्वताला मोठ राक्षस समजत होता....
त्याच्या अश्या वागण्याने सरांना खूप राग आला ते रागात काही बोलणार तर बाहेरून आवाज येतो......
अमृता बिल्डिंग मध्ये....
एका प्लॅटमध्ये एक बाई आणि एक माणूस आपल्या बेडरूम मध्ये काही तरी बोलत असतात....
त्यांच बोलण बाहेर एक मुलगी ऐकत असते ते दोघ जसे बोलत होते तस तिला रागासोबत वाईट आणि खूप रडू येत होत.... ती तशीच धावत आपल्या बेडरूम जात दार लावून तिथेच दाराजवळ मटकन खाली शून्यात नजर लावून बसते.....
क्रमशः
- भाग्यश्री परब