कॉलेज मध्ये....
सर रागात वंश काही बोलणार तर बाहेरून आवाज येतो....
" मे आय कम इन सर...."
त्या आवाजावरून सगळ्यांच्या नजरा बाहेर जातात.... बाहेर एक मुलगी ॲटीट्यूड मध्ये उभी असते....
तिच अस सौंदर्य बघून क्लास मधली सगळी मुल , मुलीसुद्धा तिला टक लावून बघत होते.... वंश सुद्धा कधी मुलीकडे एकटक न बघणारा आज तिला टक लावून भान हरपून बघत होता ( वंश स्त्रिया सोडून बाकीच्यांना त्रास देत होता... त्याने कधी मान वर करुन बघितल नाही , कधी थोड टच सुद्धा केल नाही , कधी एक शब्द पण बाहेर काढले त्यांच्यासमोर.... तो फक्त दोनच स्त्रियांवर राग राग करायचा..... कोण ते समजेल पुढे...)
सरांनी परमिशन दिली तस ती मुलगी आत आली...
सरांनी तिला इन्ट्रो द्यायला सांगितल्यावर तिने बोलायला सुरुवात केली " हॅलो...
माझ नाव दीक्षा महेश सावंत... मी मूळ नाशिक ची... माझं शिक्षण नाशिक च्या टॉप ( शाळेच नाव सांगते अबक...) शाळेत झाल आहे... "
दीक्षा च बोलून झाल्यावर सर तिला " ओके नाइस.... ( हाताने इशारा करत..) सीट..."
दीक्षा सरांना " थँक्यू " बोलून बसण्यासाठी सीट शोधते.. तिला वंश च्या बाजूला जागा रिकामी होती तर ती तिथे येवून बसली...
वंश तिच्यात इतक हरवला होता की त्याला समजलच नाही की ती कधी त्याच्या बाजूला येऊन बसली...
तिला अस वंश च्या बाजूला बसलेल बघून सगळ्यांचे डोळे मोठे झाले त्यांना वाटल की ही आता गेली पण वंश ने काही केल नाही... त्यामुळे सगळे " ह.. जाऊदे आपल्याला काय... " मनात बोलून समोर लक्ष दील...
तो आपल्याला एकटक बघतोय हे दीक्षा ला समजल होत.... ती ॲटीट्यूड मध्येच त्याला इग्नोर करून बसली होती.....
सर बोर्ड काही लिहायला जाणार तेवढ्यात बेल वाजली त्या आवाजाने वंश भानावर आला आणि बाजूला बघतो तर दीक्षा त्याच्या बाजूला बसली होती....
वंश मनात इकडे तिकडे बघत " ही कधी इथे आली.... आणि मी असा कसा वागू शकतो... ओह गॉड...."
लंडन मध्ये...
एक व्यक्ती फोन वर बोलत असते....
पलीकडून ".........."
ती व्यक्ती " अजुन थोडे वर्ष , तोपर्यंत झेला तिला...."
पलीकडून "......."
ती व्यक्ती " हे बघा मी तिला सांभाळायचे पैसे देतो त्यामुळे तिला सांभाळावच लागेल.... नाही तर माहीत आहे ना काय होईल....."
पलीकडून "......"
ती व्यक्ती " हम..... लक्षात ठेवा काही हुशारी केली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल....."
एवढ बोलून ती व्यक्ती लगेच फोन कट करते....
इंडिया मध्ये एका घरात....
फोन ठेऊन झाल्यावर एक माणूस चिडून समोर बसलेल्या एका बाईला " समजतात काय स्वतःला वैताग आला आहे नुसता... आणि ती एक ओझ बनून बसली डोक्यावर , एकदा का ती निघून गेली की बस एकादाची कटकट बंद होईल....."
समोर बसलेली बाई " हो... मला पण तिला सांभाळून सांभाळून वैताग आला आहे.... अजुन किती नाटक कराव लागेल आई वडिलांच...."
तो माणूस " ते बोलत आहेत अजुन थोडे वर्ष थांबा....."
ती बाई डोळे मोठे करत " काय ?..... "
तो माणूस " हो.... नाही तर ते काय करतील सांगू शकत नाही....."
हे दोघ बोलत असताना कशाचा तरी आवाज येतो तस ते शांत होतात.....
कॉलेज सुटल्यावर वंश आज सरळ घरी जायला निघतो...
वंशच सरळ घरी जाण त्याच्या मित्रांना खटकत त्याला कारण काय विचारतात.. वंश ला त्यांना काही सांगण्याचा मुड नसतो ( त्यालाच समजत नसत की अस काय होतय सारख सारख तिच्याकडे लक्ष जातय... विचार करून करून त्याच डोक बधीर झाल होत.. म्हणून त्याला कोणाशी बोलायच नव्हत एकांत हवा होता त्याला... म्हणून तो त्याच्या मित्रांना सांगण टाळतो...) कसतरी वेळ मारून वेगळ कारण देऊन तो घरी जायला निघतो....
वंश एका बंगल्यासमोर बाईक थांबवतो आणि हॉर्न वाजवतो तस गेटवरचा वॉचमन वंश ला बघून लगेच गेट उघडतो....
गेट उघडल्यावर वंश बाईक गेट मधून आत घेत पार्किंग एरिया च्या दिशेने बाईक पार्क करून बंगल्यासमोर उभ राहतो तर त्याच लक्ष वर असलेल्या नावावर जात
" जीवनश्री " जे त्याच्या आई ने ठेवल होत ते बघून त्याला त्याच्या आईची आठवण येत होती आणि त्या मुलीचा पण खूप राग येत होता.... इतका की ती समोर आली तर मर्डर पक्का होता.....
तो रागात धुसफूसत रागात स्वतःशीच " मी बदला घेऊनच राहणार सोडणार नाही तिला तिच्यामुळेच माझी आई सोडून गेली...."
इतक बोलून तो झपाझप पावले टाकत दरवाजा समोर येऊन उभ राहत बेल वाजवतो....
थोड्यावेळाने दार उघडल जात तसा तो पटकन आत येतो समोर बघतो तर सोफ्यावर चार व्यक्ती बसले होते , त्यांना बघून त्याला खूप राग येत होता... तो त्यांना इग्नोर करून रागातच आपल्या रूम मध्ये जात असतो की पाठून धारधार आवाज ऐकू येतो " वंश..." तसा तो हाताच्या मुठी आवळत राग कंट्रोल करत जागीच थांबतो....
क्रमशः
- भाग्यश्री परब