वंश हातातल्या मुठी आवळत राग कंट्रोल करून थंड आवाजात " मला काही बोलायच नाही एकट सोडा मला...."
एवढ बोलून तो जाणार तर परत तोच आवाज येतो " पण मला बोलायच आहे... आणि ते तुला ऐकावच लागेल...."
वंश समजल की ते काहीही करून त्याला सोडणार नाही मग तो परत पाठी चालत एका छोट्या सोफ्याजवळ येत त्यावर ॲटीट्यूड मध्ये बसत हाताने इशारा करून " बोला... काय बोलायच मिस्टर सिध्दार्थ तुम्हाला...."
ते रागातच " वंश तोंड सांभाळून बोल समजल मी तुझा वडील आहे...."
वंश खुनशी हसत " ओह... वडील कशावरून ( रागात ) तुम्ही माझे वडील नाहीत फक्त नावापुरते आहात समजल.... हेच बोलायच आहे का अस असेल तर मी जातोय... टाइम वेस्ट नाही करायच मला...."
वंश उठला तस त्याच्या कानाखाली जोरात कोणी तरी मारल.. वंश ने डोळे उघडून बघितल तर त्यांना बघून त्याचे डोळे पूर्ण रागाने लाल झाले आणि तो मोठ्याने गरजला " डॅड.... नो मिस्टर सिध्दार्थ तुमची हिम्मत कशी झाली माझ्यावर हात उचलण्याची....."
वंश जस बोलत होता तस त्यांचा राग वाढतच होता.... ते अजुन एक मारणार तर , वंश ने त्यांचा हात हवेतच पकडला " मला तुमच्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाही समजल...." एवढ बोलून त्यांचा हात झटकला आणि एका बाई कडे बघून " हो , मिसेस सिध्दार्थ ची सो कॉल्ड बायको सांभाळा तुमच्या नवऱ्याला...."
वंश ने त्यांना अस म्हंटल्याने त्या रागात सिध्दार्थ ना " वघा तुमचा मुलगा कसा बोलायला लागला मोठ्यांशी...."
सिध्दार्थ वंशला रागाने बघत " वंश ती तुझी मॉम आहे.... असले संस्कार नव्हते दिले मोठ्यांना अस उलट बोलायचे ... "
वंश " हो मिस्टर तुमचे संस्कार मला नका शिकवू , मला जस राहायच तस मी राहेन समजल...."
सिध्दार्थ चिडून रागात " ते मिस्टर बोलण बंद कर डॅड आहे मी तुझा डॅडच बोल.... आणि कॉलेज मध्ये काय केलस रॅगिंग... का अस करत आहेस कॉलेज आणि माझ नाव बरबाद करायला ना...."
वंश हसत टाळ्या वाजवून " अरे व्वा.... हुशार निघालात मिस्टर.... "
सिध्दार्थ " अस करून काय भेटणार आहे तुला...."
वंश " मनाला शांती.... ( एवढ बोलून तो जात असतो तर मध्येच थांबून मागे वळून ) आणि हो तुम्ही मिसेस धनश्री माझी खरी मॉम तिला विसरला असाल पण मी नाही.... माझ्या मॉम ला ( त्या बाईकडे रोखून बघत ) कोणी मारल त्याचा बदला मी घेऊनच राहणार काहीही होऊ दे....."
एवढ बोलून तो तडक आपल्या बेडरूममध्ये निघून जातो....
त्या बाईला वंश ने अस रोखून बघितलेल बघून धडकीच भरते...
ती बाई हिम्मत करून सिध्दार्थ जवळ येत " बघा बघा कसा बोलतोय हा... काही मॅनर्स आहेत की नाही याच्यात , पुढे बिझनेस कसा सांभाळेल हा.... माहीत नाही बिझनेस पुढे नेईल की मातीत मिळवेल....."
सिध्दार्थ च डोक आधीच गरम होत त्यात त्या बाईने आणखी गरम केल ते त्या बाईवर खेकसले " रामेश्वरी तुझ तोंड जास्त चालवू नकोस समजल , पुढे काय होईल काय करायच आहे ते मी बघेल समजल....."
इतक बोलून तेही आपल्या बेडरूम मध्ये निघून जातात.....
सिध्दार्थ गेल्यावर रामेश्वरी मनात गूढ पणे हसत " काहीही झाल तरी ही प्रॉपर्टी माझ्या नावावर करूनच राहील त्यासाठी कोणाचा पण बळी घेऊ वाटल तरी घेईन... अगोदर माझा पचका झालेला पण यावेळी मी हार नहीं मानणार....."
रामेश्वरी अस हसताना बघून दोन जणांना राग येतो ते दोघ तिच्याजवळ येतात....
त्यातला पहिली व्यक्ती रामेश्वरी ला रोखून बघत " मॉम तू जो विचार करत आहेस ना ते डोक्यातून काढून टाक समजल.... तुला जे वाटत आहे ते कधीच नाही होणार....."
दुसरा व्यक्ती " खूप काही केलस तू तरी आम्ही काही बोललो नाही पण यापुढे आम्ही गप्प नाही बसणार दादाला काहीच होऊ देणार नाही आम्ही समजल....."
रामेश्वरी " निव्या , विष्णू काहीही बरळू नका.... तुम्ही दोघ माझी मुल आहात हे नका विसरू....."
( पहिली व्यक्ती ) नीव्या रागात " मॉम जर तू काही केल याने डॅड , दादाला काही झाल ना आम्ही विसरून जाईल की तू आमची मॉम आहेस ते.... चल विष्णू....."
इतक बोलून निव्या विष्णू चा हात पकडुन त्याला तेथून घेऊन जाते......
निव्या आणि विष्णू गेल्यावर रामेश्वरी स्वतःशीच " माहीत नाही या दोघांना काय झाल आहे.... इतका कसला पुळका येतोय... मी नाही घाबरत कोणाला इथे मी पोलिसांना नाही घाबरत माझ्या मुलांना का घाबरु.... माझ काम मी करूनच राहणार , येतील हे दोघ आपोआप आपल्या मॉम कडे.... हंह... " बोलून कुठे तरी बाहेर निघून जाते......
क्रमशः
- भाग्यश्री परब