वंश रागातच आपल्या बेडरूम मध्ये आला आणि दोन्ही हातांनी केस गच्च पकडून बेडवर जाऊन बसला....
नंतर ताडकन उठून वाराच्या वेगाने जीम मध्ये गेला....
वंश रागातच स्वतःशी बडबडत होता " समजतात काय हे स्वतःला... जेव्हा गरज होती तेव्हा काम आहेत म्हणून टाळायचे आणि आता बरोबर माझा पुळका आला आहे.... ती मिसेस रामेश्वरी तिला मी सोडणारच नाही , पैसे बघून मिस्टर सिध्दार्थ शी लग्न केल हिने आणि हिनेच माझ्या मॉम ला मारल आहे , पुरावा नाही म्हणून काही करू शकत नाही मी.... ह्या बाईसोबत अजुन कोणी तरी आहे , कोण आहे ते मी कसही शोधून काढेन..... आणि ती तिला पण सोडणार नाही तिला तिच्यामुळेच माझी मॉम नाही माझ्या सोबत , तिला तर असच नाही सोडणार अस तडफवेन की जगण विसरून जाईल..... "
रगरागात तो पंचिंग बॅग वर कंन्टीन्यूली जोरजोरात पंच मारत बोलत होता....
तो रागात बाजूच्या टेबलवर असलेली फुलदाणी तोडणार तर दरवाज्यावर थाप पडते... तसा तो रागात जिम मधून बाहेर येतो...
वंश जोरात ओरडत " काय आहे इथे...."
बाहेर निव्या आणि विष्णू असतात
निव्या " दादा दार उघड... "
वंश " मला इंटरेस्ट नाही आहे तुमच्याशी बोलायला समजल जावा इथून...."
विष्णू " दादा आमची काय चूक आहे यात आम्ही काय केल जे आमच्याशी अस वागत आहेस...."
वंश " हे मी म्हंटल ना जावा इथून एकदा सांगितलेल समजत नाही का.... आणि हो मी तुमचा दादा नाही आहे आणि नाही तुम्ही माझे भावंड ... यापुढे मला दादा बोलायच नाही..."
निव्या " दादा प...."
निव्या काही बोलणार वंश तिला मध्येच अडवत रागात जोरात ओरडतो " गेट लॉस्ट...."
वंश चा रुद्रावतार पाहून ते दोघ नाईलाजाने तिथून निघून जातात....
ते गेल्यावर वंश तिथे टेबलावर असलेली फुलदाणी उचलून जोरात जमिनीवर फोडतो आणि रागातच दात ओठ खात केसांवर हात फिरवत फ्रेश होण्यासाठी जातो.....
इथे निव्या आणि विष्णू निव्याच्या रूम मध्ये येतात...
विष्णू बेडवर बसत " दादा ला बघवत नाही आहे अस यार ... काय कराव काहीच समजत नाही...."
निव्या बेडवर त्याच्या बाजूला बसत " हम दादा असा वागत आहे ते मॉम आणि डॅड मुळे..... डॅड तर मॉम जे बोलतेय तेच खर अस समजतात त्यामुळे असे भांडण होतात... मॉम च काही तरी करावच लागेल ती जे काही करत आहे ना ते खूपच भयानक आहे कसही करून हे थांबवल पाहिजे...."
विष्णू " आपली सख्खी मॉम अशी वागतेय विश्वास बसत नाही आहे... आपण रामेश्वरी चे मुल आहोत म्हणून दादा अस वागत आहे.... म्हणजे जसे पालक तसे मुल अस.... पण आपण काहीच चूक केली नाही तरी अस...."
निव्या त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला धीर देत हसून " विशू होईल नीट सगळ एक ना एक दिवस दादा बोलेल आपल्याशी आणि खूप लाड करेल.... "
विष्णू " होप सो असच होऊ दे...."
निव्या " असच होईल... आधी मॉम ला काही वाईट करण्यापासून रोखले पाहिजे...."
( निव्या , विष्णू हे रामेश्वरी ची मुल दोघ एकाच दिवशी जन्माला आले फक्त दोघांमध्ये दोन तासाचा फरक होता निव्या मोठी होती एक तासाने... वंश तीन वर्षांनी मोठा होता.... निव्या , विष्णू आठवीत शिकत होते... दोघेही खूप हुशार दोघांचा दरवेळी पहिला नाही तर दुसरा नंबर यायचा कधी निव्या पहिली यायची आणि विष्णू दुसरा तर कधी विष्णू पहिला यायचा आणि निव्या दुसरी.... या दोघांची मॉम वाईट असली तरी हे दोघ कधीच वाईट मार्गाने गेले नाही.... दोघांनी रामेश्वरी ला काही वाईट गोष्टी करण्यापासून खूप वेळा अडवण्याचा प्रयत्न केला पण रामेश्वरी ने काही त्यांच ऐकल नाही..... मग या दोघांनी सगळ वेळेवर सोडून दिल पण प्रयत्न काही सोडले नाही ते रामेश्वरी ला समजावत राहिले....)
असेच महिने निघून जात होते वंश च त्रास देण थोड कमी झाल होत...
त्याला दीक्षा आवडायला लागली होती , पण त्याला कुठे माहीत होत ते आकर्षण आहे की प्रेम... तिच बोलण , ॲटीट्यूड , तिची हुशारी आवडायला लागल होत.... हे दीक्षा ला जाणवत होत , तिने तस दाखवल नाही... ती भाव खात होती... तिला वंश बद्दल सगळ माहीत होत तो कसा वागतो , राहतो , त्याचा स्वभाव सगळ काही माहीत पडल होत.... पण तिला तो कोण , कसा आहे काही फरक पडला नाही तिचा डोळा फक्त एका गोष्टीवर होता... तिने लगेच त्याच्याशी ओळख करून घेतली असती पण ती झुकेल हे तिच्यात बसत नव्हत त्यामुळे ती कशी आहे हे ती दाखवत होती म्हणजे वंश तिच्या मागेपुढे करेल...
इथे वंश तिच्याशी ओळख करून घेण्याचा प्रयत्न करून घेत होता , पण दीक्षा काही त्याला भाव देत नव्हती तरीही त्याने प्रयत्न काही सोडले नाही....
एक दिवस वंश ने तिला डायरेक्ट प्रपोज केला आणि दीक्षा ने मागचा पुढचा विचार न करता त्याला होकार देऊन टाकला......
त्यानंतर ते रिलेशन एन्जॉय करत होते..
सहा वर्षांनंतर...
एक मुलगा वैतागून आपल्या बेडरूम मध्ये येतो आणि समोर बघतो तर त्याचा चेहरा रागाने लाल होत....
तो रागात टेबलवर ठेवलेला काचेचा ग्लास रागात जमिनीवर जोरात फेकतो...
क्रमशः
- भाग्यश्री परब