एक मुलगा झपाझप पावल टाकत रागातच आपल्या बेडरूम मध्ये येतो...
समोर त्या मुलीला बघून तो आणखी रागात येतो आणि बाजूच्या टेबलावर असलेली फुलदाणी उचलून जोरात जमिनीवर फेकतो...
त्या आवाजाने ती मुलगी दचकते आणि बेडवरून उठून उभी राहते...
तो मुलगा रागाने तिला बघत " तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बेडरूम मध्ये यायची हा.... आणि माझ्या बेडला हात लावायला कोणी सांगितल.... हे बघ आपल लग्न झाल म्हणजे हक्क असेल अस नाही , मला तुझ्याशी लग्न नव्हत करायच होत... पण नाईलाजाने कराव लागल जस काम पूर्ण होईल तस मी तुला डिव्होर्स देणार आहे त्यामुळे माझ्याकडून नवऱ्याची कोणतीही अपेक्षा नको ठेऊ समजल.... आणि मला तू माझ्या नजरसमोर पण नको आहे... या घरात खूप आहेत रूम त्यात राहू शकतेस , जाऊ शकते आता इथून...."
त्याच्या बोलण्याने त्या मुलीला खूप राग आला ती पण रागात " हॅलो मिस्टर वंश... मला काय हौस नाही तुमच्यासोबत राहायला हव तर मी हे घर सोडून दुसरीकडे पण राहू शकते.... आले मोठे ॲटीट्यूड दाखवणारे...."
एवढ ती मुलगी तोंड वाकड करून त्याला एक लूक देत रूमच्या बाहेर निघून गेली....
ती गेल्यावर वंश स्वतःशीच पुटपुटत " मला पण काही इंटरेस्ट नाही...." तोही तोंड वाकड करून फ्रेश होण्यासाठी निघून गेला....
ती मुलगी बाहेर आली तर त्या बंगल्यात भयाण शांतता होती... ती या घरात आली तेव्हा तिने बंगला नीट नव्हता बघितला मग ती आता बंगला नीट बघत होती.... बंगला खूप मोठा होता कुठे काय आहे हे कोणालाच समजणार नाही....
तिला काहीच समजत नव्हत कुठे जाऊ ती कन्फ्युज होऊन स्वतःशीच " निवृत्ती तू बाहेर तर आली आता कोणत्या रूम मध्ये घुसायच हे कोण सांगणार.... इथे तर साध किडा पण दिसत नाही आहे , अस वाटत आहे स्मशानभूमीत आलोय... हं.... काय करू आता मिस्टर ॲटीट्यूड ची मदत घ्यावी लागेल याव्यतिरिक्त दुसर ऑप्शन दिसत नाही आहे.... चला निवू बेबी...."
ती पटापट चालत त्याच्या रूमजवळ जात धाडकन दरवाजा उघडून आत आली...
ती अस अचानक आत आल्याने वंश एकदम दचकला , दचकल्यामुळे त्याचा हातात असलेली वस्तू खाली पडून त्याचे तुकडे तुकडे झाले....
वंश एकदा त्या वस्तू कडे एकदा निवृत्ती कडे बघत होता आणि निवृत्ती ती खाली मान घालून उभी होती तिला स्वतःचाच राग येत होता " अशी कशी मी पटकन आत आली , जरा काही मॅनर्स नाही निवु तुला... हं... आता परत या मिस्टर ॲटीट्यूड ची बडबड ऐकावी लागेल ज्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे.... हे देवा कुठे फसवल मला तू...." अस काही मनातच बडबडत होती....
वंश तिला कधीपासून आवाज देत होता तिच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता वरून ती खालीच बघत मऊ असलेल्या कार्पेटवर पायाच्या नखाने कुरडत होती... तिला अस करताना बघून वंशला आणखी राग आला तो तिच्या कानाजवळ जात जोरात ओरडला " तुला ऐकु नाही का..."
त्याच्या अस कानाजवळ जोरात ओरडण्याने ती दचकली सोबत तिच अंग थरथरू लागल....
तिला अस थरथरताना बघून वंश " मगाशी तर खूप तोंड चालत होत , आता काय झाल घाबरायला हा.... हे बघ तुला अस बघून माझ काळीज पिघळणार नाही आहे समजल....मग आता सांगशील अशी अचानक का आलीस ते...."
तरीही ती काही बोलत नाही म्हणून त्याचा आणखी आवाज वाढला.... त्याच्या आवाजाने ती आणखी घाबरली आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आल....
ती आली तशीच पटकन दरवाजा उघडून धावत बाहेर निघून गेली... इथे वंश तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिला....
नंतर भानावर येत त्याला काही फरकच पडला नाही तिच्या अश्या वागण्याने असा चेहरा करत मनातच " जाऊदे मला काय..." बोलून झोपायला गेला.....
निवृत्ती वंशच्या रूममधून धावतच बाहेर आली आणि तशीच धावत पटपट जिना उतरून बंगल्याचा मेन डोअर उघडून बाहेर पडून तिथे असलेल्या गार्डनमध्ये जात एका कोपऱ्यात बसून स्वतःची भीती घालवण्याचा प्रयत्न करत होती... ती अजुनही थरथरत होती , तिचे डोळे अजूनही वाहत होते काही केल्या अश्रू थांबण्याचा नाव घेत नव्हत...
थोड्यावेळाने ती शांत झाली आणि पाय दुमडून तिथेच जमिनीवर झोपून गेली.....
दुसऱ्या दिवशी सकाळी....
निव्या आणि विष्णू नेहमीप्रमाने वॉकसाठी गार्डनमध्ये आले...
ते दोघ चालत असताना विष्णू ला काहीतरी दिसल पण ते काय आहे हे त्याला समजत नव्हत म्हणून तो निव्याला इशारा करून तिथे बोट दाखवत तिला तिला तिथे बघायला सांगितल...
निव्या तो जिथे बोट दाखवत आहे तिथे बघितल तर तिलाही काही समजत नव्हत म्हणून ती त्याला घेऊन त्या ठिकाणी गेली...
तिथे गेल्यावर त्यांनी जे बघितल त्याने दोघांच्याही तोंडातून किंचाळी निघाली " वहिनी.."
क्रमशः
- भाग्यश्री परब